"प्रेम हेच असतं का? कि काही वेगळं दडलं आहे या एका शब्दामागे.. जे मला अजून उमजलं नाही आहे?" असंख्य प्रश्न मनाशी कल्लोळ माजवत होते. जेवण्यासाठी पुन्हा बोलावणी आली म्हणून ती निघून गेली.हळू हळू वैदेही आणि शिव चं भेटणं कमी व्हायला लागलं होतं.. तो फक्त कधीतरी खेळायला यायचा. शिव आणि सिद्धी मधील जवळीक वाढली होती हे तिला स्पष्ट दिसून येत होतं..त्याचा तिला हळू हळू हेवा वाटायला लागला होता.सिद्धीचा नाही तर त्या जवळीकचा. कारण त्या जवळीक मुळे शिव सतत सिद्धी मागे फिरत असे, सगळीकडे त्याला त्याच्या आजूबाजूला सिद्धी हवी असे.वैदेहीपासून लांब होतं चालला होता. तिच्याशी खूप निवडकच बोलायचा.चॅट वर देखील वैदेही मेसेज