फुग्यांमध्ये दडलेले जीवनाचे रहस्य एके दिवशी आनंदसर रंगीबेरंगी फुग्यांनी भरलेली मोठी पिशवी घेऊन वर्गात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल उमटले. सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक-एक फुगा दिला आणि सांगितले, “हा फुगा फुगवा, त्यावर आपले नाव लिहा आणि शेजारच्या रिकाम्या खोलीत ठेवून या.” विद्यार्थ्यांनी आनंदाने फुगे फुगवले, त्यावर आपापली नावे लिहिली आणि ते खोलीत ठेवून दिले. त्यानंतर आनंदसरांनी सर्व फुगे एकमेकांत मिसळून टाकले आणि विद्यार्थ्यांना सांगितले, “आता पाच मिनिटांत आपापला फुगा शोधून काढा.” सूचना मिळताच सर्व विद्यार्थी फुग्यांकडे धावले. कोणी नाव शोधू लागले, कोणी दुसऱ्याच्या हातातून फुगा हिसकावू लागले, तर कोणी घाईघाईने एका फुग्यानंतर दुसरा फुगा तपासू लागले. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता—“माझा