निषाद पर्व - भाग 6

  • 201
  • 1
  • 69

             निषाद पर्व -भाग ६"अर्जुना, पूर्व स्मृतिंनी मीआजही इतके व्यथित व्हावे याचे आश्चर्य तुझ्या मुखावर दिसत आहे. अरे, क्रीडेखातर केवळ करमणूक वा मनोरंजनाच्या हेतूने मृगयेच्या नावाखाली निष्पाप पशुपक्षांची निघृणहत्या...कत्तल करून धर्म कृत्याच्या साफल्य प्राप्तीचा आनंद मानणारे तुम्ही शासक... गुरू द्रोणांचे शिष्यत्व पत्करण्याची इच्छा वनचर निषादाने बाळगावी हेच मुळी तुमच्या लेखी औध्दत्यठरते.अर्जुना... अगुंष्ठ छेदामुळेही झाले नाही एवढे दारुण दुःख द्रोणांनी मला नाकारल्यामुळे झाले. त्यावेळी तुम्हीराजपुत्रांनी परस्परांना नेत्रपल्लव्या करीत केलेली कुत्सित स्मिते आणि उपहासपूर्ण भाषणे...त्यांनी माझ्या काळजावर झालेल्या व्रणांची खपली काढताच आजही मी व्यथित झालो कारण अर्जुना... निषाद, वनचर असलो तरी त्यावेळी मी सुद्धा निषाद राज हिरण्यधनूचा पुत्र... तुम्हा सारखाच... राजपुत्रच नव्हतो का?""तुम्हा