---झपाटलेला वाडा - भाग 2: विहिरीत कोणीतरी पोहतंयआर्यन झोपला नाही. त्याने प्रयत्न केला, पण डोळे बंद केले की त्याच्या तोंडात चिखल भरायचा. तोच काळा, चिकट चिखल जो विहिरीत होता. त्याला उलटी येत होती, पण तोंडातून फक्त पाणी येत होतं. विहिरीतलं पाणी.सकाळी सहा वाजता त्याने हाताची मूठ उघडली. रात्री जे केस हातात आले होते ते अजूनही होते. आश्चर्य म्हणजे ते वाळलेच नव्हते. रात्रभर त्याच्या मुठीत होते तरी ओलेच होते. आणि त्यांचा वास बदलला होता. काल रात्री फक्त शेवाळाचा वास होता, आज सकाळी त्यातून ताज्या रक्ताचा वास येत होता. जणू आत्ताच सांडलेले रक्तजमिनीवर राख तशीच होती. रात्री त्याने पायाने पुसण्याचा प्रयत्न केला