स्वतःच भविष्य घडवायच आहे, स्वयंपाक शिकायचा आहे. आई-वडिलांची काळजी घ्यायची आहे, लग्न करायच आहे, बचत करायची आहे, स्वतः च घर घ्यायच आहे, आई-बाबांच स्वप्न पूर्ण करायच आहे, हे करायचंय ते करायचंय पण ह्या सगळ्यात मला काय करायचंय? हे सगळं तर मी कोणा ना कोणा साठी तरी करतीये पण माझं काय मी माझ्यासाठी काय करतीये? मला जे करायचंय ते तर ह्यात आलच नाही. कारण मला या पेक्षा वेगळ करायचंय मला नृत्य शिकायचय, गिर्यारोहण करायचंय, मनसोक्त फिरायचंय, मुक्या जिवांची काळजी घ्यायची आहे, चित्रकार बनायचंय, कार्यक्रम व्यवस्थापक व्हायचंय, मनसोक्त हसायचय, बागडायचय, एकट राहायचय, "मला मी व्हायचंय." होय मला