झपाटलेला वाडा - भाग 8

  • 267
  • 81

झपाटलेला वाडा - भाग 8: लेखकाची परतफेडवाडा पडला होता. दोन मजली, शंभर वर्ष जुना भोसले वाडा दोन सेकंदात जमीनदोस्त झाला होता. जिथे वाडा होता तिथे आता फक्त मातीचा ढिगारा होता. गावकऱ्यांनी ठरवलं - इथे आठ झाडं लावू. आठ आत्म्यांच्या नावाने. सावित्री, भैरवनाथ, किसन, कमला, सुनिता, श्रुती, रघुनाथ, दत्ता. त्यांची आठवण.आर्यन पुण्याला परत आला. त्याची तीच खोली. तेच टेबल. पण तो आता तो आर्यन राहिला नव्हता जो महिन्यापूर्वी गेला होता. आधी तो कल्पनेने भूतं लिहायचा. गुगल करून. आता त्याने खरं भूत पाहिलं होतं. त्यांच्या हाताला हात लावला होता. त्यांच्या चिता जाळल्या होत्या.त्याने लॅपटॉप उघडला. नवीन फाईल. नाव टाईप केलं - झपाटलेला