मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 1

(28)
  • 2.5k
  • 727

भाग १रात्रीचे साडेअकरा वाजले होते. शहरापासून थोडं दूर असलेला तो लांबलचक हायवे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अंधार पसरला होता. फक्त बाईक्सच्या हेडलाईट्सचा पांढराशुभ्र उजेड आणि इंजिनांचा घुमणारा आवाज वातावरण दणाणून सोडत होता.एक-दोन नाही...पंधरा-वीस सुपरबाईक्स रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या.त्यांच्या आसपास जमलेले रायडर्स. कोणी हेल्मेट अॅडजस्ट करत होतं, कोणी ग्लोव्हज चढवत होतं, तर कोणी रेसच्या आधीचा अॅड्रेनालिन रश एन्जॉय करत होतं."आज दमनला हरवायचं आहे."कोणीतरी आत्मविश्वासाने म्हटलं.आजूबाजूचे सगळे हसले."स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत रे."त्यावर दुसऱ्याने टोला मारला. त्याचवेळी गर्दीत अचानक शांतता पसरली.दूरवरून एका बाईकचा आवाज जवळ येऊ लागला.... गडगडाटासारखा.क्षणाक्षणाला वाढत जाणारा. पुढच्याच क्षणी काळ्या रंगाची स्पोर्ट्स बाईक तिथे येऊन थांबली.कावसकी निन्जा एच 2बाईकवरून उतरला तो.सहा