भाग ४ संध्याकाळ शहरावर अलगद उतरली होती. रस्त्यांवर दिवे लागले होते, दुकानांचे बोर्ड चमकत होते, आणि लोकांची धावपळ अजूनही थांबलेली नव्हती. कुणी ऑफिसमधून घरी जात होतं, कुणी बाजारहाट उरकत होतं, कुणी फोन कानाला लावून घाईघाईने चालत होतं. सगळीकडे हालचाल होती.पण अंबिकाच्या मनात मात्र विचित्र गोंधळ चालू होता.दिवसभर ती स्वतःला समजावत होती, काही नाही, जास्त विचार करतेयस, ते सगळं मागे सोड. पण जिथे जाई तिथे तिच्या मनात तीच गल्ली उभी राहत होती.ती नीताला बाय करून बसस्टॉपवर उतरली. घरापर्यंत दहा मिनिटांचा रस्ता होता. रोजचा. सुरक्षित. ओळखीचा.तिने फोन काढून नीताला मेसेज टाइप केला.घरी पोहोचले की call करते.मेसेज पाठवून ती चालायला लागली.पहिल्या दोन मिनिटांत