Cancer Phobia : सत्य आणि भ्रम

कॅन्सर फोबिया : प्रवास संपला नाहीभाग १ : भीतीच्या पलीकडे... एक नवा किरणलेखन : अविनाश शांताबाई भिमराव ढळे          : एक अश्वस्थामा --------------------------------------------------------------------रात्रीचे जवळजवळ दोन वाजले होते.घरात सगळे झोपले होते.पण समीरच्या डोळ्यांना झोप नव्हती.हातात मोबाईल होता.स्क्रीनवर एक रिपोर्ट उघडा होता.काही वैद्यकीय शब्द त्याला समजत नव्हते.Lymph node... biopsy... malignant... staging...त्याने एक शब्द Google वर टाकला.पुढच्या क्षणी दहा वेबसाइट उघडल्या.एका ठिकाणी कॅन्सर.दुसऱ्या ठिकाणी stage.तिसऱ्या ठिकाणी मृत्यूचे आकडे.चौथ्या ठिकाणी कोणीतरी लिहिले होते,“ही औषधी घेतली की कॅन्सर सात दिवसांत बरा होतो.”पाचव्या व्हिडिओमध्ये कुणीतरी सांगत होते,“केमोथेरपी करू नका.”समीरचा श्वास वाढला.त्याने मोबाईल बाजूला ठेवला.पुन्हा उचलला.पुन्हा Google.पुन्हा भीती.पुन्हा प्रश्न.आणि शेवटी एकच विचार...“मला कॅन्सर झाला तर माझं