काळी बाहुली - भाग 6

  • 648
  • 249

काळी बाहुलीभाग ६ काळ्या बाहुलीचा पहिला ठावआजीने जमिनीवर पडलेल्या त्या कागदाकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला. निखिलच्या हातातला कागद थरथरत होता. त्यावर लिहिलेले शब्द त्याच्या डोक्यात सतत घुमत होते. आजीने मला पुरलं होतं. तो कागद जुना होता, अक्षरं फिकट झाली होती, पण शेवटचा शब्द अजूनही स्पष्ट दिसत होता. निखिलने आजीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत आता लपवण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.निखिलने विचारलं, आजी, हा कागद कुणी लिहिला.आजीने काही उत्तर दिलं नाही. गणपत काका मात्र त्या कागदाकडे पाहत होते. त्यांनी तो निखिलच्या हातातून घेतला आणि उलटापालटा केला. मागच्या बाजूला काहीच नव्हतं. ते म्हणाले, हा कागद गौरीच्या अक्षरात आहे.निखिलने लगेच विचारलं, पण गौरी