स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर जयसिंग भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग ७ भाग ६ वरुन पुढे वाचा........ “त्यामध्ये फ्लॅट आणि ५० लाख देण्याचा उल्लेख होता त्या बद्दल तुम्हा लोकांची काय प्रतिक्रिया होती?” – घोलप. प्रशांत साहेबांनी आमच्या साठी इतकं काही केले की त्यांना पैसे मिळताहेत बघून आम्हाला पण बरंच वाटलं.” - अप्पासाहेब. ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. “युअर ऑनर, २००२ मधे अमृतलाल आणि प्रशांत यांची ओरियंट हॉटेल मधे भेट झाली.