स्टॅम्प पेपर भाग 7

स्टॅम्प पेपर  पात्र परिचय प्रशांत.               वाड्याचा मालक विशाखा               प्रशांतची बायको. विजय राघव           प्रशांतचा  मित्र आणि बिल्डर जयसिंग              भाडेकरू. मल्हार               भाडेकरू. अप्पासाहेब            भाडेकरू. विश्राम               आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश                भाडेकरू सुधाकर               भाडेकरू    भाग  ७      भाग ६   वरुन पुढे वाचा........ “त्यामध्ये फ्लॅट आणि ५० लाख देण्याचा उल्लेख होता त्या बद्दल तुम्हा लोकांची काय प्रतिक्रिया होती?” – घोलप. प्रशांत साहेबांनी आमच्या साठी इतकं काही केले की त्यांना पैसे मिळताहेत बघून आम्हाला पण बरंच वाटलं.” - अप्पासाहेब. ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. “युअर ऑनर, २००२ मधे अमृतलाल आणि प्रशांत यांची ओरियंट हॉटेल मधे भेट झाली.