स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर जयसिंग भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग ८ (अंतिम) भाग ७ वरुन पुढे वाचा........ “तुमच्या माहिती साठी सांगतो, खोटी साक्ष दिलीत तर ७ वर्षांची जेल होऊ शकते. त्यामुळे जे सत्य आहे तेच सांगा. कोणाच्या दबावाखाली खोटं बोलू नका. त्रास तुम्हालाच होईल.” – निंबाळकर. आता रतनकुमार पुरता ढेपाळला. तो कोर्टाकडे वळून म्हणाला, “साहेब मी प्रशांत साहेबांना कधीच भेटलो नाही. त्यांना पैसे पण दिले नाही मी फक्त ऑफिस मधे