ययाती - भाग 1 - अतृप्त इच्छांचा अनंत प्रवास

ययाती : एक साहित्यिक, मानसिक आणि तात्त्विक शोधभाग १ : अतृप्त इच्छांचा अनंत प्रवासलेखक : अविनाश भिमराव ढळे | एक अश्वत्थामा_____________________________________________माणसाच्या आयुष्याचा सर्वांत मोठा विरोधाभास कोणता असेल, तर तो म्हणजे सुखाच्या शोधात निघालेल्या माणसाला सुख मिळाल्यानंतरही त्याचा शोध संपत नाही. इच्छा पूर्ण होतात, अपेक्षा वास्तवात उतरतात, स्वप्ने सत्यात येतात; तरी मनाच्या एखाद्या अज्ञात कोपऱ्यात अपूर्णतेची जाणीव शिल्लक राहते. माणूस पुन्हा नव्या इच्छेचा हात धरतो, नव्या स्वप्नामागे धावतो आणि आपल्या असमाधानाचे कारण बाह्य परिस्थितीत शोधत राहतो. परंतु कधी कधी त्याच्या असमाधानाचे मूळ परिस्थितीत नसते, तर इच्छांकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनात असते. मानवी मनाच्या याच गुंतागुंतीचा शोध घेण्यासाठी वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’