एक प्रेम कथा अशीही.... भाग 8 भाग 7 वरून पुढे " मग तुला तर ती दुसऱ्याच दिवशी भेटली असेल ना? " अनिकेतच्या त्या प्रश्नांनी हिरव्यागार बांबूच्या बनात काही काळ तरी अंधारात बुडून गेलेला अभिमन्यू भानावर आला. " नाही नंतर तिचा काही थांगपत्ताच लागला नाही. दुसऱ्या दिवशी माझे पाय आपोआपच तिच्या घराकडे वळले पण समोरच दृष्य पाहून माझा हिरमोड झाला. तिच्या घराला भलंमोठं कुलूप लावलं होत. अचानकपणे ती कुठे गायब झाली याच उत्तर तर फक्त तिच्याकडेच आहे. तिच्या प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन ती कुठे गेली आहे या प्रश्नांनी मी त्यांना भांडावून सोडल पण कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. कितीतरी रात्र तिच्या