Miss'tery - भाग 15

त्या लोकांना आधीच माहित होते कि तिथे रेड पडणार होती.. त्यांच्या मेन कंट्रोल नेच सांगितले होते. म्हणून पूर्वीच सगळी तयारी करून त्यांनी ठेवली होती..""काय..?""त्यांनी ते ड्रग्स चे पॅकेट आणि उरलेले ड्रग्स सगळे जमिनीच्या खाली टाकले.. जसे लोकांसाठी गुपित भुयार होते तसेच ड्रग्स लपवण्यासाठी त्यांनी जमिनीत एक गुप्त कॉम्पर्टमेन्ट बनवले आहे.. ते काही सापडले नाही.""पण तुम्हाला कसे माहित कि जमिनीत गुप्त जागा आहे?" दुर्गाने सवाल केला." त्या लोकांनीच सांगितले.. पण त्या लोकांना.. ते कसे केले जाते हे माहित नाही. कारण फक्त विश्वासू लोकांना तो कॉम्पर्टमेन्ट सांभाळण्याची जबाबदारी आहे. फक्त त्या लोकांनाच माहित आहे कि ते कसे उघडायचे.. मला संशय आहे कि