पत्रसुमने...सुहाना सफर - भाग 25

  • 2.2k
  • 768

प्रिय सोना..असेच एकदा आपण टूर वर गेलो होतो सिमला कुलु मनाली तिथे फिरायला लहान लहान गाड्या होत्या रस्ते वळणावळणाचे , एकदम उंच एकदम खोल आठवडा भर हा प्रवास झाल्यावर तुला त्याचा त्रास झाला शेवटच्या दिवशी आपण चंदिगड येथे आलो आणि तुला उलट्या सुरू झाल्या स्वतःच डॉक्टर असल्याने तू स्वतः औषधोपचार सुरू केलास पण डी हायड्रेशन झाल्याने तुला अशक्तपणा आला मी रात्रभर जागीच होते सकाळी आपले विमान होते विमान मुंबईत पोचल्यावर मी ताबडतोन कॅब बुक केली तुला कोल्हापूरला सुखरूप नेल्यावर माझ्या जिवात जीव आला ही आठवण तू नेहमी काढत असे आपली ही नॉर्थ ईस्ट टूर पुरी झाल्यावरआणि माझे आजारपण झाल्यावर मी पुन्हा पूर्वव्रत झाले आपण दोघे जाऊन सगळ्या देवळात पेढे वाटून आलो सुखरूप या संकटातून बाहेर