भाग : पहिली कंप्लेंटDescription:_ 210 दुकानं झाली, आता 500 चा टार्गेट. पण यश बघवत नाही लोकांना. जयवर पहिली पोलिस कंप्लेंट होणार आहे.अण्णांनी 1 लाखाचं बंडल हातात ठेवलं आणि मी सुन्न झालो. आयुष्यात पहिल्यांदा एवढे पैसे एकत्र बघितले होते.मी घरी गेलो. आईला बंडल दाखवलं. आई रडायला लागली. म्हणाली, "जय, आता बस झालं, हे पैसे बँकेत ठेव."मी म्हणालो, "आई, हे पैसे बँकेत नाही, बाजारात लावायचे आहेत."दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये गेलो तर वातावरणच वेगळं होतं.भाऊसाहेब माझ्याकडे बघून हसला नाही. तो रागात होता. त्याच्या हातात एक कागद होता.अण्णा म्हणाले, "जय, ये इकडे."मी गेलो.अण्णा म्हणाले, "भाऊसाहेबला काय वाटतं सांगू दे त्यालाच."भाऊसाहेब म्हणाला, "अण्णा, ह्याने कंपनीचे