भाग :- घरचा शत्रू500 चा आकडा ऐकायला सोपा वाटतो, पण करायला नर्क होता.मी दिवसाला 20 दुकानांना भेटत होतो. सकाळी 6 ला घरातून निघायचो, रात्री 11 ला यायचो. माझे चप्पल फाटले होते, पण मला कळतही नव्हतं.राम म्हणाला, "भाऊ, तू आता माणूस राहिला नाहीस, मशीन झालास."मी म्हणालो, "मशीनच व्हायचं आहे, माणूस राहिलो तर भाऊसाहेब सारखा होईन."21 व्या दिवशी आमच्याकडे 483 दुकानं झाली होती. फक्त 17 बाकी.त्या रात्री ऑफिसमध्ये पार्टी होती. अण्णांनी सगळ्यांसाठी जेवण आणलं होतं. भाऊसाहेब पण होता, पण तो कोपऱ्यात बसला होता. तो जेवला नाही.मी त्याच्याजवळ गेलो. म्हणालो, "भाऊसाहेब, जेवण घ्या."तो म्हणाला, "मला भूक नाही. तुला भूक लागली असेल, तू खा.