भाग 3 वरून पुढे दिवसेंमागून दिवस जात होते. त्या तरुणाला भेटून अदितीला जवळपास एक सप्ताह झाला होता. त्याच्या भेटीसाठी अदितीचे मन सैरभैर होत होते ." इंद्रधनुष्या तूझ्या या सप्तरंगासारखा त्यालाही घेऊन ये माझ्या खिडकीजवळ" आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याला बघून अदिती म्हणाली. " काय मॅडम कुणाशी बोलताय...कि एकट्याच बडबड करायला लागल्याय आता " खोडी काढत मेघा म्हणाली. " नाही ग सहजच " अदितीने लाजून तोंड लपवले . सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला होता.साधारणतः सायंकाळचे 6 वाजले असेल . सर्व परिसर तांबूस किरणात न्हाहून निघाला होता. जणू अस्ताला जाणारा सूर्य सर्वत्र पिवळे सोने पसरवीत आहे असेच भासत होते. अदिती खिडकीत कॉफीचा कप घेऊन