भाग १: रक्ताचे ठसे आणि तोमुंबईत सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता...रात्रीचे अडीच वाजले होते...साऊथ मुंबईच्या एका जुन्या , ओसाड गोदामाबाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजत होते आणि लाल-निळे दिवे पावसाच्या पाण्यात चमचमत होते..."मॅडम , प्लीज सांभाळून... आत खूप चिखल आणि रक्त सांडलंय..," कॉन्स्टेबलने पिवळी गुन्हेगारी तपासणीची पट्टी वर करत म्हटले...चोवीस वर्षांची काव्या सावंत आपल्या अंगावरचा लाँग रेनकोट नीट करत आत शिरली... काव्या मुंबई पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमची सगळ्यात तरुण आणि हुशार अधिका