मिसटेकन आयडेंटिटी भाग ३ सर्प्राइज इंपॅक्ट

  • 1.1k
  • 366

मिसटेकन आयडेंटिटी भाग ३  सर्प्राइज इंपॅक्ट   पाहाता पाहता वर्ष उलटलं. सुरवातीला पाटील  चौकशी करत होते पण त्यांनीही आता येणं बंद केलं होतं. अशीच दोन तीन पाच आणि १० वर्ष उलटली. दर वेळेस नवीन  इंस्पेक्टर साहेब आले, की पेंडिंग केसेस चा गठ्ठा उघडायचे आणि हाती काही लागलं नाही की परत ठेवून द्यायचे. १० वर्षा नंतर अशी एक घटना घडली की ज्यामुळे केस पुन्हा ओपन झाली. घटना तशी सामान्यच होती पण तिने चौकशीला चालना दिली. भाईंदर च्या एका बार मधे तिघं मित्र बसले होते. बऱ्याच दिवसांनी भेटले म्हणून गेट टु गेदर दारू पिऊन साजरा करत होते. बार गच्च भरला होता. शेजारचं