मिसटेकन आयडेंटिटी भाग ४ अनपेक्षित वळण

  • 258

मिसटेकन आयडेंटिटी भाग ४   अनपेक्षित वळण “मी आमच्या मागील दहा–पंधरा वर्षांच्या शोध न लागलेल्या केसेस तपासतो. विशेषतः तरुण मुलींच्या खुनांच्या केसेस. कारण ही क्लिप स्वतः काही सिद्ध करत नाही. पण ती तपास सुरू करण्यासाठी पुरेशी आहे.” – विसपुते. “हो. आणि राजा कोसलेचा सध्याचा पत्ता, पार्श्वभूमी, कॉलेजमधील काळ — हे सगळं शोधून काढावं लागेल.” - भोसले म्हणाले, “म्हणजे आत्ता आपण एका संशयापासून सुरुवात करतोय… गुन्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी.” विसपुते म्हणाले, “आणि कधी कधी भोसले साहेब… अशाच संशयातून दहा वर्ष जुने सापळे बोलायला लागतात.” – ACP शेंडे. “तुमच्या त्या खबरीला चांगलं बक्षीस द्या.” “साहेब मी लगेच कामाला लागतो. बघतो कोणच्या केसचा संदर्भ या गोष्टीशी