मिसटेकन आयडेंटिटी भाग ५ टर्निग पॉइंट त्यानंतर राघव किंवा आत्माराम तुम्हाला केंव्हा भेटला होता?” – शेंडे. “हां आठवलं. स्वाती आली त्याच दिवशी दुपारी राघव आला होता. मी आनंदात होतो, त्याला पण ही बातमी दिली आणि गुलाब जाम पण खिलवला. बस.” – राजा. परत पोलिस स्टेशन वर जातांना विसपुते म्हणाले, “साहेब, हे तर अनपेक्षितच घडतंय. आता पुढे काय? त्या बार मधल्या दोघा जणांना चौकशीला बोलवायचं का? जो कोणी बोलला असेल त्यालाच आपल्या पद्धतीने विचारू. कदाचित तो बोलेल.” – विसपुते. “करेक्ट भोसल्यांनी दोघांचा फोटो आणि भाईंदरचा पत्ता दिलाच आहे. तुम्ही कोणाला तरी भाईंदरला पाठवा आणि त्या आत्मारामला भेटून राघवचा पत्ता फोन नंबर