माऊली सेवानिवृत्तीच्या काळातील नेहमीसारखाच आजचा हा दिवस. सकाळी नऊ वाजता ची वेळ असेल. मी निवांत बसलो होतो. मी सहजच म्हटले`, "अगं, काही फराळाचं केलं आहे का?" पत्नी खेसकावून म्हणाली, "रिकाम टेकड्यांनाच जास्त भूक लागलेली असते, त्यांनाच अधिक खावं-खावं सुटत असते." पण तिचे हे म्हणणे, मी काही फारसे मनावर घेतले नाही. कदाचित सकाळ ते संध्याकाळ पर्यंतच्या दैनंदिन कामात व्यस्त राहत असल्याने व वयोमान झाले असल्याने असे समजून,