नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच होता. तेवढ्यात फोन वाजला. पाच मिनिटे उशिरा जर फोन आला असता तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो ऑफिस मधून निघून गेला असता.. पण आज त्याचं भाग्य तेवढं नव्हतं त्याने फोन उचलला. रात्रीच्या वेळेला त्याच्या ऑफिसची अशी पद्धत होती की फोन उचलला की लगेच त्याचं रेकॉर्डिंग सुरू होत असे. मनात ती जाणीव ठेवूनच त्याने फोन उचलला.
तिजोरी - प्रकरण 1
तिजोरीप्रकरण १नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच तेवढ्यात फोन वाजला. पाच मिनिटे उशिरा जर फोन आला असता तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो ऑफिस मधून निघून गेला असता.. पण आज त्याचं भाग्य तेवढं नव्हतं त्याने फोन उचलला. रात्रीच्या वेळेला त्याच्या ऑफिसची अशी पद्धत होती की फोन उचलला की लगेच त्याचं रेकॉर्डिंग सुरू होत असे. मनात ती जाणीव ठेवूनच त्याने फोन उचलला.“अभेद्य सेफ कॉर्पोरेशन” तो यांत्रिकपणे म्हणाला.“मी हितेंद्र कपूर” फोन मधून एक उद्धट वाटणारा आवाज आला. रोज अनेकांचे फोन घेऊन वज्रला आवाजावरून त्यांचं व्यक्तिमत्व कसं असेल याचा बरोबर अंदाज ...Read More
तिजोरी - प्रकरण 2
प्रकरण २मधे किती काळ गेला कोणास ठाऊक, वज्रला आता अस्पष्ट असा आवाज यायला लागला होता. शब्द कळत नव्हते.एखाद्या मैलभर बोगद्याच्या पलीकडच्या टोकापासून हे आवाज आल्याचा भास होत होता. त्याचे डोळे आता अर्धवट उघडायला लागले होतं.आपल्या अवती भोवती काही माणसं जमल्येत आणि आपल्यावर ओणवी होऊन बघताहेत अशी जाणीव वज्रला झाली. बहुदा उपचार करणारे डॉक्टर असावेत.“ अगदी थोडक्यात वाचला हा.” एक आवाज.“ याला फार लागलं नसेल तर घेऊ का याला उभा आडवा?” दुसरा आवाज.“ घाई नको करू.अजून थोडा जरी डाव्या बाजूला पडला असता तरी मेला असता हा.” पहिला आवाज.“ त्याला मी ताब्यात घेतला की मेलो असतो तर बर झालं असतं असं ...Read More
तिजोरी - प्रकरण 3
प्रकरण ३दुपारी सव्वाचार वाजता वज्र थकून भागून एका टेकडीच्या उतारावर झाडाखाली पहुडला होता.बघता बघता त्याने बऱ्यापैकी अंतर कापलं होतं. मिरपूड लावण्याची कल्पना त्याला पॅपिलॉन कादंबरी वरून सुचली होती आणि ती फळाला आली होती. कुत्रे मागावर आले नव्हते.बंदिष्टी ला मारल्यानंतर सगळे पहारेकरी परत गेले होते. कदाचित एकच कैदी पाळला असं वाटल्यामुळे असेल किंवा वज्र न सापडल्यामुळे त्यांनी नाद सोडला असेल.पुन्हा गिनती केल्यावर त्यांच्या लक्षात येईल की दोन जण पळाले, एक मेला पण एक निसटला.एव्हाना सगळीकडे बातमी पोचवून जवळच्या पोलीस स्टेशन्स ना सावध केलं गेलं असेल. अत्ता वज्र जिथे विसावला होता तिथून रेल्वे स्टेशन पाच किमी होतं.पण अंधार पडे पर्यंत तो ...Read More
तिजोरी - प्रकरण 4
प्रकरण ४कोलाघाट ला आल्या नंतर बंगली भाषेतली एक भली मोठी पाटी वज्रला पाहायला मिळाली.त्याचा अर्थ काय म्हणून वज्रने विचारलं, ने त्याचा अर्थ सांगितला, त्या नुसारजरा विसावाअसं त्या धाब्याचं नाव होतं.हा शेवटचा धाबा आहे, इथे तुमच्या आणि वाहनाच्या खाण्या पिण्याची सोय आहे.पुढे दीडशे किमी पंप किंवा हॉटेल नाही.असा मजकूर होता.एका बाजूला वळण घेऊन घाट रस्ता जात होता आणि उजव्या बाजूला दरीच्या काठाला खूप मोठा प्लॉट होता त्यावर पंप, सर्व्हिस स्टेशन, एक बऱ्यापैकी मोठं आणि अतिशय स्वच्छ रेस्टॉरंट, त्यामागे बंगला, आउट हाउस, आणि त्या सगळ्याच्या मागे असलेल्या खूप मोकळ्या जागेत भंगार माल ठेवायची जागा.पलाश ने ट्रक थांबवला आणि गेट उघडण्यासाठी हॉर्न ...Read More
तिजोरी - प्रकरण 5
प्रकरण ५एका दिवशी सकाळी वज्र उठला आणि आपलं आवरल्यावर रेस्टॉरंट मधे गेला.चहा, नाश्ता ची काय सोय होतं आहे हे सांझी तिथे किचन ओटा साफ करत होती.“ गुड मॉर्निंग ” वज्र म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागली.“ मी मदत करू का तुम्हाला?” त्याने पुन्हा विचारलं.“ मला लागलं तसं काही तर सांगेन मी.” तुटकपणे ती म्हणाली.“ मला चहा हवा होता.” वज्र म्हणाला.“ बाहेर बस.” पुन्हा ती फटकन पणे बोलली.ती खरंच सुंदर होती. अत्ता काम करतांना तर जास्तच छान दिसत होती.वज्र तिच्याकडे बघतच राहिला.“ काय बघतो आहेस माझ्याकडे टक लावून ?”“ नाही... काही नाही.. म्हणजे..” गोंधळून तो म्हणाला.तिने हाताने ...Read More
तिजोरी - प्रकरण 6
प्रकरण ६रात्रीचे पावणे दोन वाजले होतं वज्र अजूनही तिची वाट बघत पेट्रोल पंपा जवळ एक खुर्ची टाकून बसला होता सिगरेट पेटवून त्याचे झुरके घेण्यात मग्न होता. कोणतीच वाहनं आता येत नव्हती.अचानक त्याला ती बाहेर आलेली दिसली. आपण नेमकं कुठे बसलो हे तिला कळावं म्हणून हातातल्या सिगरेटची ठिणगी तिला दिसेल अशा पद्धतीने त्याने हात हलवला. ती त्याच्या शेजारी येऊन खुर्चीत बसली."तू गोंधळात टाकलंस मला. तू बोगस माणूस आहेस हे माझ्या लक्षात आलं होतं पण तू तिजोरी फोडणारा दरोडेखोर असशील आणि तुरुंगातून पळून आलेला कैदी असशील हे मला नवीनच होतं. तू एकदम सेलिब्रेटीच झाला आहेस.""जोपर्यंत मी इथे माझी नोकरी करतोय आणि ...Read More
तिजोरी - प्रकरण 7
प्रकरण ७पलाश घोषने सुद्धा तिच्याकडे चमकून पाहिलं.त्याचा विश्वासच बसला नाही.“ याला एक छदाम सुद्धा घेऊन देणार नाही.सगळी रक्कम माझी ही.तू मला थांबवू शकशील असं मनातही आणू नको.”“ मूर्ख बये, आपल्या दोघांसाठी हे पैसे मी साठवले आहेत.सगळ्या जगाची सफर तुला घडवायची असं माझ्या मनात होतं. ते रिव्हॉल्व्हर भरलेलं आहे.खाली टाक ते आणि विचार कर शांतपणाने.” –पलाश“ खाली टाकण्यासाठी मी ते हातात घेतलेलं नाहीये. मी पोलिसांना सांगते की एका दरोडेखोराला तू आश्रय दिला आहेस आणि तिजोरीतलेते पैसे दोन नंबरचे आहेत. त्या पैशावर तू टॅक्स भरलेला नाहीस. गुमान माझ्या मार्गातून दूर हो नाहीतर गोळी घालीन मी तुला.” सांझीने दम भरला.वज्र अजूनही तिजोरीच्या ...Read More
तिजोरी - प्रकरण 8
प्रकरण ८ड्रायव्हरने शिट्टी का मारली म्हणून वज्रने तिच्याकडे पाहिलं.तिने एक टंच दिसेल असा टी शर्ट आणि हाफ पँट घातली काय चाललंय हे?” वज्रने तिला विचारलं.“ तू नोकर आहेस इथे.तू कोण मला विचारणार?” सांझी म्हणाली.“ आता आपल्या दोघांत काय नातं आहे हे महत्वाचं नाही.आपण दोघेही एकाच संकटात सापडलोय.तुझ्याकडे बघून त्याने शिट्टी वाजवली तू ऐकलीस ना? पुढची व्यवस्था लागे पर्यंत आपण दोघंच इथे राहणार आहोत.आपल्या संबंधाबद्दल कोणीही शंका घेणे किंवा वावड्या उठवणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं.” वज्र म्हणाला.“ किती दिवस?”-सांझी.“ मला अत्ताच सांगता येणार नाही. मला लपण्यासाठी मी जागा शोधतोय. ती मिळाली की मी निघून जाईन आणि तुला तिजोरीतले सर्व पैसे ...Read More
तिजोरी - प्रकरण 9
प्रकरण ९सकाळी सहा वाजेपर्यंत सांझी तिथेच होती.ही आपल्याला गुंडाळायचा प्रयत्न करत असेल तर ते आपण होऊन द्यायचं नाही. वज्रने निश्चय केला. सकाळी सात- सव्वा सात वाजता वज्र उठला. आपले प्रातर्विधी आटोपून तो किचन कडे जायला निघाला. आज शिरताच त्याला आम्लेटचा खमंग वास आला. कालच्या प्रसंगा नंतर सांझी नेमकी काय प्रतिक्रिया देईल याचा अंदाज वज्र करू लागला. त्याची अपेक्षा होती की नेहमीप्रमाणे किचनचं दार तिने बंद केलं असेल परंतू ते उघडच होतं. आत मध्ये सांझी आम्लेट करत होती. त्याला बघताच ती मागे वळली. त्याच्या गळ्यात आपले हात टाकून तिने विचारलं,“काल रात्री जे घडलं त्याबद्दल काही पश्चात्ताप वाटतोय?”“नाही.” वज्र म्हणाला. क्षणभर ...Read More
तिजोरी - प्रकरण 10
प्रकरण १०वज्र आणि अथांग दोघं एकमेकांकडे पाहत उभे राहिले.अथांग पहिला सावरला. त्याच्या चेहऱ्यावर उडलेला रंग पुन्हा चढला, त्याच्या चेहऱ्यावर जुनी, उपहासात्मक हास्यरेषा उमटली, जी वज्रला चांगलीच परिचित होती. तो धावत वज्रच्या दिशेने येऊ लागला."वज्र! खरंच तू आहेस का? तुला पाहून किती आनंद झालाय!"याच क्षणी वज्रला पूर्णपणे जाणवलं की तो त्याला किती मिस करत होता.कित्येक महिने त्याच्या सोबतीशिवाय किती एकटा पडला होता.."अरे माझ्या वाघा!" वज्र म्हणाला. आणि त्याला मिठी मारली. त्याने वज्रची सर्व चौकशी केली वज्रने सुद्धा त्याला पोलिसांच्या तावडीतून कसं निसटलो ते सांगितलं. पण काही गोष्टी हाताच्या राखून.त्याने ते पेपरात वाचल होतं.वज्रने त्याला विचारलं की तो इथे कसा काय ...Read More
तिजोरी - प्रकरण 11
प्रकरण ११नाश्ता करत असतानाच वज्रने अथांगला उदित उपाधीबद्दल सांगितले. तू त्याच्यापासून सावध राहा, वज्र म्हणाला.. तो नेहमी येतो. तो काल आला होता, आणि त्याने मला इतका चिडवलं की मी त्याला मारलं. ते करणं खूप मूर्खपणाचं होतं, पण मी ते केलं. तो पोलिसांकडे जाण्याबद्दल बोलत होता. अथांगने चमकून वर पाहिलं. पोलीस? का? त्याने मला आणि सांझीला एकत्र शारीरिक लगट करताना पाहिलं. घोष एखाद्या बाईसोबत निघून गेला आहे हे त्याला माहीत नाही. त्याला मला शोधून त्रास द्यायचा आहे. अथांगने आपला कॉफीचा कप रिकामा केला आणि सिगारेट पेटवली. सांझी अजून उठली नव्हती. सांझी त्याला का सांगत नाही की घोष परत येणार नाही? एक तर, हा त्याचा विषय नाही, वज्र ...Read More
तिजोरी - प्रकरण 12
प्रकरण १२“मी खरेदीसाठी हल्दियाला जाणारे तुमच्या दोघांपैकी कोणी माझ्या बरोबर येणारे?” दुसऱ्या दिवशी सकाळी सांझीने जाहीर केलं आणि कपडे आत गेली.वज्र ची वाट न बघता अथांग ने तिला तो येणार असल्याचं सांगून टाकलं. तो इथे राहायला आल्यापासून बाहेरच पडला नव्हता, त्यामुळे त्याला कंटाळा आला होता, शिवाय त्याला बारीक सारिक खरेदीही करायची होती.सांझीने आत जाता जाता त्यावर असा काही चेहेरा केला की तिला वज्र पेक्षा अथांग बरोबर जाण्यातच रस होता.वज्रने अथांगला तिच्या बद्दल सावध केलं. तुम्ही दोन तीन तास बरोबर असणार आहात, ती तुला गुंडाळू शकतं म्हणून स्पष्ट सांगितलं पण अथांग ने त्याला खात्री दिली की तीच नाही तर कुठलीच ...Read More
तिजोरी - प्रकरण 13
प्रकरण १३ सुलतान...? पांढरी टाय घातलेल्या माणसाचा, म्हणजे डॅडचा आवाज वज्रला ऐकू आला. पाठोपाठ एक फळी कुरकुरल्याचा आवाज आला. तिथे आहेस का,सुलतान? वज्रने दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला आणि हळूच दरवाजा उघडला.त्याने मागच्या बाजूला सरकत असताना,पिस्तूल ताठपणे धरून,स्वयंपाकघराच्या दाराकडेलक्ष्य साधलं होतं,बंदुकीचा चाप ओढला गेला.वज्रच्या केसांवरून जवळून गेलेल्या गोळीच्या जीवघेण्या सळसळण्याने त्याच्या हृदयाची धडधड वाढली आणि चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या.वज्रने तीन पायऱ्यांवरून खाली उडी मारली आणि अंधारात गुडघे टेकून बसला. सांझी आणि अथांग येई पर्यंत स्वत:ला वाचवण्यासाठी वज्रला पराकाष्ठेची धडपड करावी लागणार होती.पंपांवर चांदण्याचा उजेड पसरला होता. जेवणाची खोली आणि दुरुस्तीच्या शेडभोवती दाट अंधार होता. बंगलाही अंधारात होता,पण तिथे पोहोचण्यासाठी,वज्रलाचांदण्याच्या त्या उजेडातून जावे लागणार ...Read More
तिजोरी - प्रकरण 14 (शेवटचे प्रकरण)
प्रकरण १४त्या नंतर बरोब्बर आठ दिवसांनी ग्वाल्हेर- बंगलोर एक्स्प्रेस, बंगलोर रेल्वे स्टेशनच्या प्लॅट फॉर्मला लागली आणि त्यातून अथांग अहुजा उतरला. स्टेशन बाहेर पडताच रिक्षावाल्यांचा गराडा त्याच्या भोवती पडला. बाहेर येणाऱ्या सगळ्याच प्रवाशांच्या“ साब रिक्षा चाहिये क्या?” म्हणून सगळे मागे लागत होते. काय करावं याचा विचार करत असतांना एका रिक्षा चालकाने“हॉटेल चाहिये क्या” अशी ‘अॅड-ऑन’ ऑफर दिली आणि अथांग मोहात पडला.“ कौनसा अच्छा है हॉटेल है?” अथांग नं विचारलं.“ इधर तो बहोत सारे हॉटेल है, आपका बजेट बोलो, ये टुरिस्ट सिटी है” त्याच्या हातातील बॅग रिक्षात ठेवत ड्रायव्हर म्हणाला.“ बजेट का प्रोब्लेम नही लेकीन रेल्वे में मेरी पर्स से मेरा ...Read More