रेल्वेच्या खिडकीतून तो बाहेरचा परिसर न्हाहाळत होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसवर त्याने एक कटाक्ष टाकला. मनात कितीतरी प्रश्न झिंज्या पसरून नाचत होते. विचारचक्रांच्या जाळ्यात तो घेरला होता. विचारचक्रही अधिकच क्लिष्ठ बनत चालले होते. उलट - सुलट विचारांचा अग्नी भडकू लागला होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसची योग्य विल्हेवाट लावून त्याने चेहऱ्यावर थंडगार पाणी मारलं. तो दिसायला सहा फूट उंचीचा, देखणा, रुबाबदार, अतिशय गोरापान चेहरा, लांब वाढलेल्या दाढी मिश्या, अंगात पांढर टी -शर्ट आणि काळा पॅन्ट. त्यावर असलेली काळ्या रंगाची हुडी त्याच्या व्यक्तिमत्वाला अधिकच आकर्षण बनवत होती. सुटलेल्या बुटाची लेस बांधून तो रेल्वेच्या बाहेर पडला. रेल्वे स्टेशनवर लोकांची बरीच गर्दी होती. आपल्या हुडीची टोपी डोक्यावर घेऊन तो त्या गर्दीतून वायुवेगाने मार्गक्रमण करू लागला. विचाराच्या क्लिष्ठ गुंतेत तो परत अडकत चालला होता. इतक्यात एका तरुणीचा त्याला धक्का लागला.
Complicated Love - 1
Complicated Love ( भाग 1) रेल्वेच्या खिडकीतून तो बाहेरचा परिसर न्हाहाळत होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसवर त्याने एक कटाक्ष मनात कितीतरी प्रश्न झिंज्या पसरून नाचत होते. विचारचक्रांच्या जाळ्यात तो घेरला होता. विचारचक्रही अधिकच क्लिष्ठ बनत चालले होते. उलट - सुलट विचारांचा अग्नी भडकू लागला होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसची योग्य विल्हेवाट लावून त्याने चेहऱ्यावर थंडगार पाणी मारलं. तो दिसायला सहा फूट उंचीचा, देखणा, रुबाबदार, अतिशय गोरापान चेहरा, लांब वाढलेल्या दाढी मिश्या, अंगात पांढर टी -शर्ट आणि काळा पॅन्ट. त्यावर असलेली काळ्या रंगाची हुडी त्याच्या व्यक्तिमत्वाला अधिकच आकर्षण बनवत होती. सुटलेल्या बुटाची लेस बांधून तो रेल्वेच्या बाहेर पडला. रेल्वे स्टेशनवर लोकांची ...Read More
Complicated Love - 2
भाग 1 वरून पुढे " सत्यमेव जयते..सत्याचाच नेहमी विजय होवो. सत्यप्रकाशाचे किरण या समग्र विश्वात पसरून सर्वत्र शांतता नांदो प्रतापरावांच्या मनाच्या सप्तद्वारात पडघमांचे कटू सत्य बोल घुमत होते. काळाच्या पाठलागावर असतांना नेहमीच त्यांचा सत्यासाठी प्रदीर्घ असा संघर्ष राहिला होता. पण आता परिस्थिती जरा वेगळी होती. प्रतापराव देसाई हे रिटायर्ड IPS अधिकारी होते. अतिशय धिप्पाड , उंचपुरे ,दिसायला साधारणतः गहूवर्णीय रंग ,लांबसडक नाक ,वाढलेल्या दाढीमिश्या कुणाचंही लक्ष्य वेधून घेईल असं मजबूत व्यक्तिमत्व .आपल्या नौकरीच्या किंवा जनसेवेच्या कारकिर्दीत प्रतापराव देसाई हे नाव ऐकतांच कितीतरी गुन्हेगाराच्या काळजात धडकी भरत असे. याला कारण म्हणजे कुठेही तडजोड नाही. वारा वाहायला कधीच कुणाच्या परवानगीची ...Read More