अनामत.

(2)
  • 213
  • 0
  • 948

संध्याकाळचे सात वाजले होते. जोशींच्या घरात सगळे हॉल मध्येच बसले होते. सुरेंद्र जोशी त्यांच्या नेहमीच्या जागेवर वर्तमानपत्र वाचत बसले होते. चेहऱ्यावरचा कडकपणा अजूनही तसाच होता. मुख्याध्यापक म्हणून आयुष्यभर त्यांनी शिस्त पाळली होती. घरच्यांकडूनही तीच अपेक्षा होती. शैलजा स्वयंपाकघरातून चहाचे कप घेऊन येत होत्या. धाकटी जाऊ सुषमा भाजी निवडत बसली होती. महेंद्र.. सुरेंद्र जोशींचा धाकटा भाऊ मुलगा देवर्षय सोबत ऑफिस मधून आल्यावर काही बोलत बसले होते. गार्गी... महेंद्र आणि सुषमाची धाकटी मुलगी मोबाईल मध्ये गुंतली होती.

1

अनामत - भाग 1

भाग १संध्याकाळचे सात वाजले होते. जोशींच्या घरात सगळे हॉल मध्येच बसले होते.सुरेंद्र जोशी त्यांच्या नेहमीच्या जागेवर वर्तमानपत्र वाचत बसले चेहऱ्यावरचा कडकपणा अजूनही तसाच होता. मुख्याध्यापक म्हणून आयुष्यभर त्यांनी शिस्त पाळली होती. घरच्यांकडूनही तीच अपेक्षा होती.शैलजा स्वयंपाकघरातून चहाचे कप घेऊन येत होत्या. धाकटी जाऊ सुषमा भाजी निवडत बसली होती. महेंद्र.. सुरेंद्र जोशींचा धाकटा भाऊ मुलगा देवर्षय सोबत ऑफिस मधून आल्यावर काही बोलत बसले होते. गार्गी... महेंद्र आणि सुषमाची धाकटी मुलगी मोबाईल मध्य ...Read More

2

अनामत - भाग 2

भाग २खोलीचं दार बंद होताच खोलीत शांतता पसरली. श्रीजा दाराजवळच उभी होती. तिची नजर खाली होती. हात अजूनही थरथरत शिवांशने तिच्याकडे पाहिलं."बस."ती बेडच्या एका टोकाला जाऊन बसली. शिवांश टेबलजवळ गेला. जारमधून ग्लासमध्ये पाणी ओतलं. तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला."हे घे."श्रीजाने त्याच्या हातातला ग्लास घेतला. पाणी प्यायलं. पण तिच्या डोळ्यातलं पाणी मात्र थांबत नव्हतं. तिची अवस्था पाहून शिवांशने तिच्या खांद्यापर्यंत नेलेला हात पुन्हा मागे घेतला. त्या दोघांमध्ये अजूनही एक अनोळखी अंतर अजूनही होतं. तो काही क्षण शांत होता. मग तिच्याकडे बघून म्हणाला,"श्रीजा.... शांत हो.""गोष्टी अशा घडल्यात की सगळं लगेच सहज स्वीकारलं जाईल असं नाही.""आत्ता जे काही खाली घडलं.... ते मनाला ...Read More