सरताज... कथा वेड्या प्रेमाची.

(2)
  • 75
  • 0
  • 762

"शर्वाणी, पुन्हा रात्रीचे दोन वाजलेत." आईचा आवाज आला तशी शर्वाणीने लॅपटॉपवरून नजर वर केली. टेबलवर पुस्तकांचा, कागदांचा आणि नोट्सचा अक्षरशः पसारा झाला होता. कॉफीचा कप कधीच रिकामा झाला होता. स्क्रीनवर अजूनही तोच दस्तऐवज उघडा होता.

1

सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 1

भाग १"शर्वाणी, पुन्हा रात्रीचे दोन वाजलेत."आईचा आवाज आला तशी शर्वाणीने लॅपटॉपवरून नजर वर केली.टेबलवर पुस्तकांचा, कागदांचा आणि नोट्सचा अक्षरशः झाला होता. कॉफीचा कप कधीच रिकामा झाला होता. स्क्रीनवर अजूनही तोच दस्तऐवज उघडा होता."गुन्हा, शिक्षा आणि अपराधभाव : एक मानसशास्त्रीय अभ्यास"शर्वाणीने कपाळ चोळलं."हो आई... पाच मिनिटं."आई तिच्या खोलीत आली. टेबलवरचे कागद बघितले आणि नेहमीसारखीच हसली."हे पाच मिनिटं मागच्या दोन तासांपासून ऐकतेय मी."शर्वाणी हसली."उद्या जेलमध्ये जायचं आहे. पहिल्यांदाच "आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला."झोप आता. उद्या फ्रेश डोक्याने जा."शर्वाणीने मान हलवली. आई आत गेली. पण तिची नजर पुन्हा स्क्रीनवर स्थिरावली. तिने दस्तऐवज बंद केला आणि बाजूला ठेवलेल्या फाईलकडे हात वाढवला. उद्या भेटायच्या ...Read More

2

सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 2

भाग २रात्रीचे साडेअकरा वाजले होते.खोलीत फक्त टेबल लॅम्पचा पिवळसर प्रकाश होता. शर्वाणी लॅपटॉपसमोर बसली होती. स्क्रीनवर कालच्या निरीक्षणांच्या नोट्स एक कैद्यांची नावं. त्यांच्याबद्दलच्या नोंदी.वागणं.बोलणं.प्रतिक्रिया.सगळं व्यवस्थित.तिची नजर खाली सरकत गेली. आणि एका नावापाशी येऊन थांबली.कैदी क्रमांक ४१२ — सरताज सिंगपानावर फारसं काही नव्हतं. तीच गोष्ट तिला खटकत होती.दिवसभरात तिने दहा-बारा कैद्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.पण सर्वात जास्त वेळ तिच्या डोक्यात कोण राहिला होता?तो.....जो एक शब्दही बोलला नव्हता.शर्वाणी खुर्चीत मागे रेलली. ज्याच्याशी एक वाक्यही बोलणं झालेलं नाही...त्याच्याबद्दल एवढा विचार का करायचा? तिने लॅपटॉप बंद केला.पण झोपायला गेल्यावरही तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा तेच दृश्य आलं.खिडकीतून येणारा उजेड.पुस्तक धरलेला हात.आणि काही क्षणांसाठी सावलीतून बाहेर आलेली ...Read More