मंचकराव आपल्या घराबाहेर बसले होते, तेव्हा भुजंगराव त्यांच्याकडे आले. मंचकराव भुजंगरावांना 'भुक्कड भुजंग' म्हणून ओळखत होते, कारण त्यांना भुजंगरावांचा वारंवारचा वैताग सहन करायला आवडत नव्हता. भुजंगरावांनी वामनच्या घरात झालेल्या गमतीदार घटनांची माहिती दिली, ज्यात वामन आणि त्याची बायको यांच्यात प्रेमाचा अभाव होता. या गप्पांमुळे मंचकरावांच्या मनात 'नवरा-बायकोत प्रेम हवे' हा विचार आला. त्यांनी गिरिजाबाईलाही प्रेमाची विचारणा केली, पण ती लाजून घरात पळून गेली. मंचकराव विचारात पडले आणि खंडोबाला विचारले की बायका त्यांच्या नवऱ्यावर कशा प्रेम करतात. खंडोबाने त्यांना सल्ला दिला की दारू पिऊन पाहावे. या सर्व गप्पा आणि विचारांनी मंचकरावांच्या मनात प्रेमाच्या विषयावर प्रश्न निर्माण झाला. मंचकमहात्म्य -शेजार आणि प्रेम ! by suresh kulkarni in Marathi Short Stories 1.8k 3.5k Downloads 10.9k Views Writen by suresh kulkarni Category Short Stories Read Full Story Download on Mobile Description मंचकराव घराबाहेर, आपल्या मिशीच्या टोकाला वाती सारखा पीळ देत बसले होते. तेव्हड्यात त्यांचे शेजारी भुजंगराव आले. शेजारी भाडेकरू असेल तर, तो बदलून नवा शेजार येऊ शकतो, पण जर स्वतःहचे घर बांधून रहात असेल तर, तो मधुमेहा सारखा आयुष्याला चिटकलेला असतो. मरणा शिवाय सुटका नाही, त्याच्या किंवा आपल्या! हा भुजंग त्यातलाच. "काय मंचक, निवांत बसलाय."न मागता मिळालेला वैताग म्हणजे 'भुजंगराव', असे मंचकरावांचे व्यक्तिगत मत होते. म्हणून ते भुजंगरावांच्या माघारी त्यांचा उल्लेख 'भुक्कड भुजंग' असा करीत. " आमचे नाव मंचकराव आहे.!" जमिनीवरच्या आपल्या कोल्हापुरी खेटरा कडे पहात, आपल्या उजव्या मिशीवरून, डावी पालथी मूठ फिरवत मंचकराव खर्जात म्हणाले. भुजंगाला आपली चूक कळाली. या मंचकला एकेरी संबोधले More Likes This द्वितिय महायुद्ध - भाग 1 by Siddhesh Chaudhari भिकारी ( भाग १ ) by suchitra gaikwad Sadawarte मुक्ता....??️ - 3 by sabdhpriyaa भज्यांची आमटी by Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 by sabdhpriyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 by Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 by Vrishali Gotkhindikar More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories