Patrasumaane...Sweet Journey - Part 9 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ९

Featured Books
Categories
Share

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ९

प्रिय सोना..
तुझा कोल्हापुरात असलेला दवाखाना बंद करण्याच्या formality पूर्ण करीत इकडे बदलीच्या गावी सोबत घेऊन जाण्याच्या सामानाची आवरा आवर तू सुरू केलीसलगेच हजर व्हायचे असल्याने थोडे तरी सामान घेऊन जायला लागणार होते राहायला घर मिळाल्यावर उरलेले संसाराचे सामान न्यायला लागणार होते माझ्यापेक्षा तुझीच गडबड जास्त चालली होती तुला एक उत्साह ही होता शिवाय मी माझ्या  ट्रेनिंग कामात पुण्यात व्यस्त असल्याने वेळ देऊ शकत नव्हते तुझे प्रत्येक गोष्टीचे प्लॅनिंग उत्तम असायचे शिवाय पॅकिंग करण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नव्हते तिकडे मुलगा सुन यांना पण तू कळवले होतेस पण ना त्यांना माझ्या प्रमोशनचे कौतुक ना माझ्या बदलीशी देणे घेणे आपली नाती हळूहळू वीसविशीत होत होती किती सावरायचं म्हणले तरी जमत नव्हते मी ट्रेनिंग हून परतल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी आपण गाडी घेऊन सांगोला गावी रवाना झालो पोस्टिंग जरी वाटंबरे असले तरी राहण्यासाठी जागा आपल्याला सांगोल्यात पाहायची होती दोन दिवस तिथल्याच एका बऱ्या हॉटेल मधे बँकेच्या मॅनेजर ने सोय करून दिली आणि आपण घर पहायला सुरुवात केली तेव्हा ते गाव छोटे होते त्यामुळे गावात आपण येण्याची बातमी आधीच पसरली होती आपल्याला तीन खोल्यांचे एक घर लगेच मिळाले खाली मालक त्यांची बायको एक कुत्रा व त्यांची छोटी मुलगी रहात होते वरचा मजला आपल्याला दिला छान छोटेखानी जागा होती शेजारी एक टॉकीज होते माझी शाखा पंधरा वीस किलोमीटर होती मला बसने जावे लागणार होते बस स्टँड जवळच होता लगेच येणाऱ्या रविवारी आपण जाऊन लागणारे घरचे सामान घेऊन आलो ते उन्हाळ्याचे दिवस होते.सांगोल्यात कडक उन्हाळा होता आपल्याला तितका उन्हाळा सोसण्या सारखा नव्हता लगेच घरात एक छोटा जुना फ्रीज आणि कूलर घेऊन टाकला त्या भागात या दोन गोष्टी शिवाय माणूस जगूच शकणार नाही तरीही रात्री भयंकर उकडत असे गादीवर झोप येत नसे मग आपण दोघे रात्री तिसऱ्या मजल्यावर गच्चीत गारवा येण्या साठी जाऊन गप्पा मारत बसत असू शेजारच्या टॉकीजचा रात्रीचा शो साडे बारा वाजता संपत असे सिनेमातले सगळे डायलॉग स्पष्ट ऐकू येत त्यावेळी टायगर श्रॉफ चा हिरोपंती सिनेमा तिथे लागला होता त्यातली गाणी खूप गाजत होती संपूर्ण सिनेमा संपला तरी आपल्याला उकाड्याने झोप लागत नसे जरी वाटंबरे गावी जायला बस असली तरी तुझा बसने जायला नकार होता मी तुला आणायला सोडायला येईन मला काय काम आहे असे तुझे म्हणणे होते तिथेच तुझे जुने कॉलेजचे मित्र होते त्यांनाही आपण भेटून आलो त्यांनी आपल्याला तिथल्या पत्रकारांची ओळख करून दिली मी लेखन करते हे समजल्यावर त्यांनी मला त्यांच्या पेपर साठी कॉलम लिहायची ऑफर दिली दर रविवारी मी “अवती भवती “हे सादर तिथे लिहू लागले यात छोट्या कथा काही सामाजिक गोष्टी व्यक्तिचित्र अशा गोष्टी असत लोकांना ते खूप आवडू लागले आपण सकाळी नेहेमीच्या सवयी प्रमाणे फिरायला जात असू रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म वर तीन चार चकरा मारत असू त्या गावाच्या इतिहासात महिला ऑफिसर म्हणून आलेली मी पहिलीच होते संपादकांनी माझी मुलाखत घेऊन पेपर मध्ये छापून आणली होती त्यामुळे थोड्या दिवसातच सगळ गाव आपल्याला ओळखु लागले कधी गावाबाहेर पण आपण फिरत असू जिथून सोलापूर कडे जायला रस्ते फुटत अनेक लोकांशी ओळख संवाद सुरू झाला आपण इकडे येण्यापूर्वी आपल्या आंब्याच्या झाडाला कोल्हापुरात भरपूर आंबे लागले होते माझ्या ट्रेनिंग च्या काळात तू ते सगळे काढून आढी घालून ठेवले होतेस हळूहळू ते पिकायला लागले होते आपण आठ दहा दिवसांनी जेंव्हा कोल्हापूरला जात असू येताना पिकलेले आंबे घेऊन येत असू बँकेत शेजारी पाजारी आजूबाजूला सगळी कडे ते आपण वाटत असू तुझ्या झाडांच्या काळजी घेण्याच्या निगुती मुळे आपल्या झाडाचे आंबे छान गोड रसाळ होते लोकांना ते खाताना खूप अप्रूप वाटत असे मी सकाळी साडे आठ नऊ पर्यंत दोघांचा सगळा स्वयंपाक करून माझा डबा घेऊन तुझे दुपारचे जेवण झाकपाक करून जात असे तत्पूर्वी आपण दोघेही एकत्र पोळी भाजी खाऊन घेत असू बँकेची वेळ सकाळी दहा ची होती आपण साडे नऊ वाजता निघत असू संध्याकाळी जरी बँकेची वेळ पाच असली तरी सर्व काम संपून मला साडेसहा वाजत असत तू मात्र पाच वाजल्या पासून गाडी घेऊन येत होतास आमच्या मॅनेजरने आत बोलावून सुद्धा तू कधी फारसा आत येत नव्हतास बाहेरच आला गेला, कस्टमर यांच्याशी बोलत राहायचा त्या छोट्याशा गावात एक फॅशनेबल पंजाबी ड्रेस घालणारी, लिपस्टिक लावणारी आणि केस कापलेली  मॅनेजर बाई आणि तिला रोज गाडीतून सोडायला आणायला येणारा तिचा डॉक्टर नवरा हा चर्चेचा विषय होतापण आपण दोघेही बोलके आणि माणसात वावरणारे बोलणारे होतो त्यामुळे थोड्या अवधीत त्यांना आपले कौतुक वाटू लागले ही शाखा छोटी पण काम भरपूर होते माझे बॉस तीस पस्तीस वयाचा मुलगा होता शिवाय दोन क्लार्क, एक शेती अधिकारी होते माझे बॉस या ना त्या कारणाने बाहेर असत पुष्कळ वेळ सांगोला इथे त्यांना कामासाठी जावे लागे अशा वेळी त्यांचे काम मला त्यांच्या केबिन मध्ये बसून करावे लागे मॅनेजरच्या खुर्चीत बसून काम करणे एक थ्रिल होते मी तर प्रथम नमस्कार करूनच या खुर्चीत बसत असे माझी सर्व्हिस कमी राहिल्याने मला मॅनेजर पद कधी मिळेल असे वाटत नव्हते पण भविष्यात मात्र खरेच मॅनेजर पद मिळाले मनात असणारी इच्छा आपोआप पुरी होणारी देवाचे आशीर्वाद कायम सोबत असणारी अशी मी होते याची प्रचिती आयुष्यात अनेक वेळा आली होती सांगोल्यात बदली झाली तेव्हाच आपण ठरवले होते की जेव्हा जेव्हा कधी कोल्हापूरला जाऊ तेव्हा प्रत्येक वेळेस सांगली रस्त्यावरील वेगवेगळ्या हॉटेल मध्ये जेवायचं आणि रस्त्यावरच्या प्रत्येक बागेत फोटो काढायचे मला फोटोची हौस तुला माझे फोटो काढायची हौस..त्या काळात सांगोल्यात एखादे मोठे हॉटेलमोठे थिएटर नव्हते आपल्या घरात पण टीव्ही नव्हता ज्या सुटीत आपण कोल्हापुरात  जात नसू तेव्हा मी घरीच लेखन करीत असे तू चांगली नाटके मोबाईल वर बघत होतास हळूहळू लोकांच्या ओळखी वाढीस लागल्या तसे आपण एकमेकांकडे गप्पा मारायला जाऊ लागलो लोकांना आपल्या घरी बोलावू लागलो आमच्या बँके समोर एक छोटे हॉटेल होते त्याच्याकडे गोल भजी छान मिळत आठवड्यात एका दिवशी तो गोडी शेव तयार करीत असे मला गोडी शेव आवडत असे तू पण येता जाता त्या दुकानात गप्पा मारत असे त्यामुळे दुकानदारांची ओळख वाढून तो गोडी शेव केली की मला बँकेत पोचवत असे आणि त्याचे पैसे घेत नसे.तिथेच समोर एक होजियरीचे दुकान होते रोज गेल्याने त्याचे मालक तुझ्या चांगल्या ओळखीचे झाले होते जणू काही तुझे त्यांचे लागे बांधे होते