देवाचे ठाणे १( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.) आज मी आपणहून एका संशोधनासाठी बाहेर पडली होतो.रत्नागिरी जिल्ह्यातील 'देवाचे ठाणे ' इथल्या कातळ शिल्प याबद्दल मी व्हिडिओ पाहिले होते व वाचलेली होते.माझ्या पुरातन वस्तूसंग्रहालयाची जबाबदारी मी आईवर सोपवली होती. आईला सुद्धा पुरातत्त्व विषयाची आवड होती. ती सहंग्रालयाला भेट देणाऱ्या लोकांना छान माहिती देते.अर्थात काही वस्तु माझ्या जवळ कश्या आल्या हे मी आईलाही सांगितले नव्हते.ते कळले असते तर तिने मला संशोधनच बंद करायला लावले असते. " तूझ्या सोबत काम करायला लवकरच हक्काचा माणूसआण." ही नेहमीची सूचना करायला ती विसरली नाही.मी हसलो व म्हणालो.." हल्लीच्या मुलींना अश्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत."" कोणीतरी असेलच ना? मी किती दिवस हे सांभाळणार?" मी काहीच न बोलता बुलेटला किक मारली.गाडीच्या डिकीत मी माझे कपडे ठेवले होते तर गाडीला बांधलेल्या कापडी बॅगेत माझं नेहमीच सामान ठेवले होते.त्यात फोल्डींगचा टेन्ट ,ब्रशेस्, छोटं फावड,छोटं टिकाव काही यंत्रेजी मॅग्नेटिक क्षेत्र समजण्यासाठी मदत करतील इ.मी कोल्हापूरहून रत्नागिरी गाठले. तिथून गणपतीपुळे या इतिहासकालीन गणपती मंदिरला भेट दिली. तिथले प्रसन्न वातावरण बघून मी आनंदित झालो.इथून पुढे आरे - वारेरस्त्यावरून जाताना सुसाट वारा... उजवीकडचा फेसाळता पांढरा किनारा...वळणा वळणाचा रस्ता कापत मी रत्नागिरी येथे पोहचलो. मी तिथून पावस वरून राजापूरचा मार्ग पकडला.मला लवकर देवाचे ठाणे येथे पोहचायचे होते. दुपारी मी देवाचे ठाणे येथे पोहचलो.वाटेत सतत ऊन पावसाचा खेळ चालू होता.त्यामुळे प्रसन्न वाटत होते. ऑगस्टचा शेवटचा आठवडा होता.श्रावणाचे दिवस होते अखेर दुपारी तीन वाजता मी परशुराम मंदिरा जवळ पोहोचलो.श्री परशुरामांच दर्शन घेतले व बाहेर सभामंडपात बसलो.तिथे बाहेर काही मुले क्रिकेट खेळत होती.मी त्यातल्या एकाला कातळशिल्पाबद्दल विचारले." रस्त्याला लागून जो चि-यांचा रस्ता जातो.तिथून विस मिनिटेचालल्यावर सडा लागतो त्यावर कातळ शिल्प आहे."" गाडी जाते?"" फोर व्हीलर जात नाही.टू व्हिलरने जाता येईल पण चिरे वर खाली आहेत व चढ आहे."मी देवळातून बाहेर आलो.तेवड्यात एक उघडी जीप वेगात देवळाच्या बाजूला येवून थांबली.रस्त्यावरचे पाणी माझ्या अंगावर उडाले. मी वैतागून ड्रायव्हरकडे पाहिले.पण तो, तो नव्हता तर ती होती.एक उंच ..बॉयकट केलेली गोरी तरुणी उडी मारत खाली उतरली.एक फाटकी तुटकी जिन्स...वर मळक्या रंगाचा टि्शर्ट...त्यावर चित्रं - विचित्र आकृत्या कोरलेल्या होत्या. टि शर्ट वर पाठीमागे ' लूक ॲट मी 'असं इंग्रजीत कोरलेले होते.तिच्या बाजूला एक हडकुळा...हनुवटीवर बोकडासारखी दाढी असलेला...तरुण होता.त्यानेहॉफ पॅन्ट व वर लूज असं रंग बेरंगी शर्ट घातला होत. त्यांचे केस बायंकासारखे मऊ व मानेपर्यंत वाढलेले होते.एकंदरीत त्याचा अवतार बूजगावण्या सारखा दिसत होता.दोघ पंचवीसीतली वाटत होती." सुजा, लूक ...जुनं मंदिर दिसतंय.." हडकुळा तरुण म्हणाला." येस्, रॉकी...चल दर्शन घेऊया." " अहो माझ्या अंगावर पाणी उडाल.गाडी जरा बघून चालवा." मी त्या तरुणीला वैतागून म्हणालो." सॉरी....रेनी सिझन आहे ना...!"ती खांदे उडवत तुटकपणे बोलली. दोघांनी डोक्यावर गोलाकार हॅट घातल्या व माझ्याकडे न बघताच ती दोघं मंदिराच्या आवारात शिरली.मी उजवीकडच्या रस्त्याकडे पाहिले.सात ते आठ फूट रुंदीचा रस्ता होता.पण तो जांभा दगडाने बनविलेला होता.ते दगड एक पातळीत नव्हते. साधी मोटरसायकल घेऊन वर जाणे जिकिरीचे होते.पण मला माझ्या बुलेटवर व माझ्या चालवण्यावर भरवसा होता. मी बुलेटला किक् मारली...व तो हलका चढ चढायला सुरुवात केली.गाडी चक्क उड्या मारत...थडथडत रस्ता पार करत होती. वाटेत माकडांचा एक कळप रस्ता ओलांडताना दिसला. भली मोठी माकड त्या कळपात होती.दोनही बाजूला आंबा..फणस तसेच साग...ऐन अशी झाड होती.आठ एक मिनिटात मी एका माळावर पोहोचलो.तिथे एक उंच निशाण उभारले होते.तिथून चारी बाजूला नजर जाईल तिथपर्यंत विस्तिर्ण माळरान पसरलं होते. समोरच नजरेचे प्रारणे फेडणारे दृश्य बघून मी स्तब्धपणे बघतच राहिलो.संपूर्ण माळ हिरव्या रंगाच्या छटांमध्ये रंगला होता.हाताभर उंचीच्या हिरव्या गवताला असंख्य पांढरी , गुलाबी व निळी जांभळी फुले फुललेली दिसत होती.वारा आला ही फुले हलत होती व एक मंद गंधसगळीकडून पसरत होता.मध्ये मध्ये कातळावरपाणी साठल्यामुळे स्वच्छ पाण्याचे डोह बनले होते.उजव्या बाजूला दोन बायका पांढरी फुले तोडून छोट्या पिशवीत भरताना दिसत होती. माझ्या गाडीचा आवाज ऐकून त्यांनी माझ्याकडे मान वर करुन बघितले.पुढे गाडी नेणे शक्य नव्हते.मी गाडी तिथेच लावली.मी चालत त्या बायकांजवळ पोहोचलो." ही फूल कोणती ? नाव काय त्यांच ?" या पांढऱ्या फुलांना दिपकाडी म्हणतात. दिव्यासारखीदिसतात अगदी रात्रीच्या काळोखात सुध्दा दिसतात."एक तरुण स्री म्हणाली.तिचे नुकतंच लग्न झालं असावं." तुम्ही यांचं काय करणार?"" यांच्या सुंदर पात्या ( गजरे) तयार करतो व माळतो.आम्हीपलिकडच्या गावातून आलोत.ही फुले फक्त इथेच मिळतात."दुसरी स्त्री म्हणाली .ती थोडी वयस्कर होती.मी पलिकडच्या गुलाबी थरथरणार्या फुलांकडे बोट करत विचारले..." त्या फुलांना काय म्हणतात.?"" कापरी कमळ."अर्थात हे स्थानिक नाव होतं. प्रत्येक हिरव्या दांड्याला एक चार पाकळ्यांच गुलाबी फूल होत व त्यावर अनेक पिवळे पुंकेसर होते.मंद वा-यातही फूले थरथरत होती ...सगळं दृश्य विलोभनीय होत. मी काही काळ कोणत्या कामासाठी आलोय तेच विसरून गेलो.एवड्यात वरून पोपटाचा एक थवा शिळं घालत गेला तसा मी भानावर आलो." ताई ,इथं कातळ शिल्प कुठं आहे?"" ते बघा तिथे दगड रचलेल दिसतील तिथे." उजवीकडे बोट करत नवविवाहित तरुणीं म्हणाली. मी त्या दिशेने चालू लागलो. तेवढ्यात थोडी गडबड ऐकू आली मीमागे वळून पाहिले. मघाची येडपट जोडी त्या स्रीयांजवळ उभी होती.ती तरुणी अक्षरशः टाळ्या पिटत नाचत होती.तिला ती फूले बघून खूप आनंद झाला होता.सोबतच्या तरुणाने दोन फूल तोडून दोन्ही कानात खोवलेतर एक फूल आपल्या केसात अडकवले." काय छान दिसतोस रे तू."तिने त्याचा एक फोटो काढला.मी हसत हसतच त्यांच्यावरच लक्ष काढलं.मी त्या वर्तुळाकार दगड रचलेल्या ठिकाणी पोहचलो होतो. एका मोठ्या सलग कातळावर एका उभ्या मानवाची आकृती खोदलेली दिसली. पाच ते सहा फूट उंचीचे ते खोदकाम होत.डोक्याकडचा भाग अस्पष्ट दिसत होता.मी पाठीला लटकवलेली बॅग काढली व बाजूच्या कातळावर ठेवली.एव्हाना सायंकाळचे साडेचार वाजले होते.सावळ्या ढगांआढून सूर्य डोकावला होता.पिवळे तांबूस उन सर्वत्र पसररल होते.वातावरण प्रसन्न वाटत होते.मी बॅगेतून माझी चुंबकीय क्षेत्र पकडणारी यंत्रे काढली.अर्थात एक अडचण होती.शिल्पावर व अवती भोवती पाणी साचले होते.पाणी स्वच्छ व नितळ होत त्यामुळे शिल्प स्पष्ट दिसत होतं पण मी तिथ वावरल्यास पाणी गढूळ होणार होतं.म्हणून मी प्रथम माझा कॅमेरा काढला व झूम करून त्या शिल्पाचे वेगवेगळ्या कोनांतून फोटे काढले.नंतर मी एक चुंबक सूची त्या आकृतीच्या डोक्याजवळ व दुसरी पायाजवळ ठेवली.पण दोन्ही चुंबकसूची उत्तर - दक्षिणच स्थिर राहिल्या होत्या. मग मी तिसरी चुंबककसूची हळूहळू पायापासून कमरेपर्यंत फिरवत नेली. शिल्पाच्या कमरेजवळसूची जाताच अचानक ती गर्रकन फिरली व नव्वद अंशातूनवळली आता उत्तरेची जाग पूर्व दिशेने घेतली होती.माझे डोळे विस्फारले.जे ऐकले होते ते सत्य होते.पण हे कसं शक्य होत? माझी अन्य उपकरणे काही विचित्र निरीक्षणे दाखवत होती. तिथलं चुंबकीय क्षेत्र सतत वेगाने बदलत होते.पृथ्वीचे जेनैसर्गिक चुंबकीय ध्रुव आहेत ते सुध्दा या ठिकाणी बदलल्यासारखे दिसत होते. मुळात त्या तेवढ्या जागेत दिशांना काही अर्थ नव्हता.मी माझी वही उघडून निरीक्षणे नोंदविली.मी मानवाच्या त्या शिल्पाचे स्केच करायला सूरूवात केली.मी समोर बघून स्केच करत होतो व फोटो झूम करून त्यातले बारकावे टिपत होतो. मला असं वाटल की त्या मानवाच्या हातात काही तरी गोल वस्तू असावी तसेच डोक्यावर शिरस्त्राण व त्यावर दोन त्रिकोणी उंचवटे असावेत.सध्या ते स्पष्ट दिसत नव्हते.कदाचित ते उंचवटे लहरी पकडणारी संवेदनशील यंत्रे असावीत.मी माझ्या कामात गढून गेलो होतो.तेवड्यात मला आवाज ऐकू आला." ऐ, इथे वेड्या सारखा काय करतोस?"आवाज येताच मी मागे वळून पाहिले.ती मघाचीच येडपट जोडी कातळ शिल्पा जवळ आली होती.त्या मग्रूर मुलीने मला प्रश्न विचारला होता.त्या मुलीच्या हातात एक डायरी होती.गळ्यात अत्याधुनिक कॅमेरा होता." मी ह्या कातळ शिल्पाचा अभ्यास करतोय."मी हसत म्हणालो." कुठे आहे कातळ शिल्प ? त्याचा काय अभ्यास करायचा ?"तो बोकड दाडीवाला बोलला." गाढवाला गुळाची चव काय?"" व्हाॅट डू यू मीन, मी गाढव आहे?"" तू...!छे..!. तुम्ही या माळावर कशाला आलात?"" लूक.सुजा माझी कझीन् आहे.ती वनस्पती शास्त्रज्ञ आहे."" अरे वा !चांगली गोष्ट आहे. मग त्या फुलांचा अभ्यास करा.इथं कशाला कडमयताय."मी वैतागून म्हणालो." ऐ,तू ऑर्किओलॉजीस्ट आहेस..."" हो."" ई..ई...असल्या जुन्या दगडात ,अवशेषात रमण मला नाही आवडत." ती तरुणी नाक मुरडत म्हणाली." सांगितलंय कोणी...? त्या फुला- पानातच रमा मला माझंकाम करु द्या." मी म्हणालो." व्हेरी बोअरींग मॅन."असं बडबडत ती दोघं पुन्हा फुलांच्या परीसरात गेली.मी हसतच पुन्हा एकदा माझ्या कामात गढून गेलो.एवढ्यात सिस्मोग्राफची टिक टिक ऐकू आली.मी कागदावर उमटणा-या आलेखावर नजर टाकली.सामन्यपणे भूगर्भात सतत हालचाल असतेच पण आता त्या शिल्पाच्या कंबरेजवळ जमिनीखाली जोरात हालचाली सुरु असल्याचे त्या कागदावरच्या या आलेखावरून कळत होते.हे सगळं असामान्य होत. या परीसरात काहीतरी वेगळं घडत होतंहे नक्की!----------******------------*******--------****-----भाग१ समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026