Naate Janmapalikdache in Marathi Love Stories by lekhani books and stories PDF | नाते जन्मापलिकडचे - भाग 13

The Author
Featured Books
Categories
Share

नाते जन्मापलिकडचे - भाग 13

काही दिवसांपूर्वी..
वैदेहीला शिवचा मेसेज आला.
"हेय... फ्री आहेस?"
"अ.... मी तुला काही वेळानी करते मेसेज.. सध्या माझा अभ्यास चालू आहे"
"ठीके "

शिवच्या मनात :-
"मी बरोबर करत आहे ना? जिथे या जगात मला कोणावरच विश्वास नाहीये तिथे हिने माझा विश्वास जिंकून घेतलाय.. मला वाटलं होतं या जगात मी एकटा आहे, कोणीच समजून घेणारं नाहीये..."सुस्कारा सोडत.."पण मला समजून घेणारी व्यक्ती माझ्याच जवळ होती हे माहित नव्हते "चेहऱ्यावर हलकेच स्मित आले."एवढ्या लहान वयातच ती mature आहे.. आणि मुख्यतः या जगात, या कली युगात लगेच सापडणार नाही.. अशी pure soul आहे 😊.. कदाचित म्हणूनच तिला या गोष्टी पटकन समजतील... पण कोण आहेस तू? का मी तुझ्याकडे आकर्षित होतोय एवढ्या तीव्र भावनेने??"तिचा चेहरा आठवत त्याच्या ओठांवर हसू उमटले...

" तूझ्या अस्तित्वाचा शोध हा लवकरच सुरु होईल वैदेही..!!"
तेवढ्यात वैदेहीचा मेसेज त्याला येतो..
"आता फ्री झाले मी.. तो बोलू शकतोस"
"बरं मी जे सांगेल ते नीट ऐकशील बरं का "
"हा "
"तू मला हे share करण्यासाठी जास्त विश्वासू वाटलीस म्हणून हे मी तुला सांगत आहे आणि ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील.. तू इतर कोणालाही सांगणार नाहीस " "😮‍💨"

"हे बघ वैदेही मी माणूस नाहीये...माझं शरीर जरी माणसाचं असलं तरी ते... माणसासाठी काम करत नाही..."तो थांबला.अदृश्य शक्ती त्याला खुणावून गेली कि दमानं घे "तात्पुरतं तू एवढंच समजून घे... बाकीचे मी हळू हळू सांगेलच "तो लगेच ऑफलाईन गेला..

वैदेही मात्र अजिबात थक्क नव्हती..
"हा असं मला सांगून गेला खरं पण मग मी शांत का आहे?? साधारणपणे कोणताही माणूस थक्क होईल... पण मग मी का असं वागतेय?? जणू मला ठाऊक होते हे तो बोलणारच आहे!" या अनाकलनीय विचारत ती गढून गेली..

पुन्हा शिवच्या घरात..
"तुम्ही मला का थांबवलत?"
ती अदृश्य शक्ती "कारण एके वेळेस सगळं सांगणं योग्य नाही... तिच्यात जरी ती गोष्ट असली तरी ती अजून अजान आहे... आता तरी मला दिसतंय कि ती यामुळे मुळीच धक्क्यात नाही गेलीये... ती जाणार पण नाही... पण तिला या बाबतीत तयार करण्यासाठी तुला प्रत्येक गोष्टीशी ओळख करून द्यावी लागेल आणि ती हळू हळू "शिव फक्त मान डोलवत होता.
"जसं तुम्ही सांगाल 🙏"ती शक्ती त्याच्या डोक्यावर हात ठेवून गायब झाली.

तो हलकाचं हसला त्याने वैदेहीच्या मनात झाकायचा प्रयत्न केला.. ती फक्त विचार करत होती.. ती शक्ती म्हणाली तशी ती शांत होती.

पण त्या सोबतच त्याला आणखी एक गोष्ट तिच्या मनात दिसली.. त्याने भुवयी आक्रसली.

"ही काय वेगळी भावना तिच्या मनात आहे?? आणि ती देखील इतकी pure??एवढी purity कधी मी बघितली नाहीये..वरतून ती माझ्या बद्धलच हा विचार करत आहे. एकदा तिच्या नजरेतून बघायला हवे "त्याने तिच्या नजरेतून बघायचा प्रयत्न केला.. पण तो मागे लोटला जातं होता...
"मी का नाही बघू शकत आहे.. माझ्यासाठी काही अशक्य नाहीये.. पण तरी तिच्या नजरेतून मी स्वतःला का नाही बघू शकत??"

शिवाची ही स्तिथी बघून ती शक्ती देखील हलकीच हसली.. "शिव, तुला देखील प्रवास करायचा आहे या बाबतीत आणि बऱ्याच इतर गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत... तू या बाबतीत खूप अजान आहेस... पण या बाबतीत वैदेही मात्र खूप जाणकार आहे..तिच तुला हे सगळं शिकवेल....."वैदेही कडे मायेने बघत शक्ती बोलली.

पुढे काय होईल या साठी वाचत राहा. ✨🙏
माफ करा हा भाग जरा जास्तच लहान आहे.. पण वेळ मिळेल तसं मी लिहायचा प्रयत्न करते.. पुढे जास्त लहान भाग मी टाकणार नाही हे माझे वचन आहे.
माझी दुसरी कथामालिका 'Miss'tery देखील वाचा ✌️आणि तिक्क देखील रेटिंग द्या ज्याने करून ती कथा आणखी वाचकांपर्यंत पोहोचेल ✨✌️