निषाद पर्व भाग५
आम्हां निषादांची बोली म्हणजे पैशाची! नियमादिंचेकसलेही बंधन नसलेली आम्हा निषादांची ती आदिम बोली! आतानगरजनांशी क्वचित येणाऱ्या संपर्कातून गीर्वाण भारती-देववाणी मधील काही शब्द मला अवगत आहेत इतकेच. त्यातहीआश्चर्याचा काही भाग नाही की कसले रहस्यही नाही. अर्जुनाभाषा हा तर मानवाचा सहजाविष्कार...तो विशिष्टजनसमूहापुरता मर्यादित कसा राहणार? त्यामुळे कदाचितमाझ्या बोलीने तिच्या मर्यादा ओलांडिल्या असणे संभवते."
"पण अर्जुना! धर्माज्ञाओलांडून, जनक्षोभ पत्करून आम्हा निषादांना देववाणी,मंत्रविद्या अन् अस्त्रविद्या शिकवायला तरी कोण गुरू धजावेल?खेरीज एकदा गुरू द्रोणांनी मला शिष्यत्व नाकारील्यावर कोणाज्ञानवंताचा अनुग्रह प्राप्त होईल अशी अपेक्षा तरी मी कशी बरे करू धजावेन?वाक्पटू अर्जुना, वनामध्ये विहारकरणारे म्हणून आम्ही वनचर अशी उपाधी देववाणी पारंगत असलेला तू...मोठ्या मानभावीपणाने देत आहेस. पणअर्जुना, निषाद असलो तरी मीही मनुष्यदेहधारीचअसल्यामुळे मनुष्याची समस्त मूलगामी लक्षणे माझ्यामध्येही स्थित आहेत.
अज्ञानाचे सोंग पांघरून 'नागर'ऐवजी 'जानपद'अर्जुन असे संबोधन करावयाचे चातुर्य एकलव्याकडेही आहे हे तूविसरू नकोस. तर पूर्व अनुभवावरून शहाणपण आले असता पुन्हामागचीच चूक करून अस्त्रविद्येच्यापाठी जाण्याचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही.हे सत्य आणि सत्यच आहे रे अर्जुना!"
"स्वतःला मोठा धनुर्धर म्हणविणारा तू!पण लक्ष्यवेध, शब्दवेध या पलीकडेहीशरसंधानातील काही कौशल्ये असू शकतात;असू शकतील, एवढी साधी शक्यता गृहित धरण्याचे,विद्या साधनेने सहज येणारे नम्रत्वही तुजपाशी नाही.म्हणूनच पाशुपतास्त्र, पर्जन्यास्त्रअशी अवजड नावे उच्चारुन अस्त्राविना धनुर्विद्या जणू निरर्थक आहे असे ठरवू पाहणारेतुझे ज्ञान हेच मुळी घोर अज्ञान आहे. कदाचितयोद्ध्याला, वधकाला सामर्थ्यसंपन्न बनविणारे हे शब्दभ्रमविशिष्ट वेळी, विशिष्ट स्थळी, विविक्षितकाळापुरते अन् विशिष्ट मर्यादेपर्यंत धनुर्विद्येतील मुलभूत किमयांपेक्षापरिमाणकारक असतीलही. कदाचित त्यांच्याप्रलयंकारी स्वरूपामुळे स्वतःच्या सामर्थ्याचा डिंडिभ वाजवीत अखिल विश्वात सामाज्यपसरवू इच्छिणारे शासक त्यांना अधिक महत्व देत असतीलही पण म्हणून काही त्यांचेश्रेष्ठत्व थोडेच सिद्ध होते? अस्त्ररूपशब्दभ्रमांचे स्वामित्व किती अशाश्वत अन् तकलादू आहे हे का मी तुला सांगण्याची गरजआहे? पार्था! प्राणसंकटगुदरले असता ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी कर्णाला कसे फशी पाडले हे तुझ्या बाबतीत 'चक्षुर्वेःसत्यम्' आहे आणि एवढे दूर तरी कशाला जायला हवे?अवघ्या काही घटिकांपूर्वी तुला निःष्प्रभ करून त्यांनी कसेतोंडघशी पाडले हे तू अनुभविले आहेस अन् मी सुद्धा त्या समग्र घटनेचा साक्षीदार आहे."
"अर्जुना! आतातूच सांग, ही अस्त्रे म्हणजे अळवावरच्या पाण्यासारखीभ्रामक अन् क्षणभंगूरच नव्हेत काय? तुला ज्ञात झालेलीधनुर्विद्येतील कसबे म्हणजे हिमनगाच्या जलप्रवाहा बाहेर दिसणाऱ्या भागा एवढी अल्पआहेत असे का समजेनास. परंतु आपण साध्यकेलेले ज्ञान हाच चरम सीमेचा बिंदू आहे असे मानून त्या बेभरवशी अस्त्रांच्या मागेतू लागलास. तुझी आयुष्यभरची धनुर्विद्या साधना म्हणजेकेवळ नृशंस नरसंहार आहे. रक्त पिपासू अर्जुना...अंगठ्याचा वापर न करताही तीर सोडता येईल की नाही?एकदा या गोष्टीचे प्रत्यंतर तरी घेऊया.... एवढासाधा विचार जरी एखाद्या बेसावध क्षणी तुला सुचला असता तरी धनुर्विद्येतील अनंतरहस्यांचे दालन आपोआप उलगडले असते तुझ्यापुढे! आणिएका यःकश्चित निषादाच्या सामान्य कसबाचे अप्रूपही नसते वाटले तुला.डोळ्याला झापडे बांधून उभी हयात घाण्याच्या चाकोरीत फिरणारानिर्बुद्ध वृषभ आणि प्राप्त झालेल्या अत्यल्प ज्ञान संपुष्टात बंदिस्त राहून त्यापलिकडच्या अज्ञात, अस्पर्शज्ञानकक्षांचा विचारही न करणारा तू अल्पतुष्ट अर्जुन...! दोघांमध्येश्रेष्ठ कोण अन् कनिष्ठ कोण हे मजसारख्या पशूवृत्तीने राहणाऱ्या निषादाने कसेठरवावे?"
वनामध्ये स्वच्छंद विहरणारी रानपाखरे अन् त्याच वृत्तीनेजीवनाला सामोरे जाणारे आम्ही निषाद सुद्धा त्याच रानाची लेकरे!स्वतःच्या अंगभूत, निसर्गदत्तमर्यादांमध्ये आम्ही राहतो.... पण स्वतंत्र बाण्याने!प्रत्यही येणाऱ्या विविध अनुभवांना सामोरे जाताना सहजस्फुरणाऱ्या कल्पना स्वबलावर वास्तवात आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो.कारण आपण कसे जगावे हे दुसरा सांगू शकत नाही आणि आपणाला कायआवडते याची खातरजमा त्रयस्थाला विचारुन करायची नसते हे आमचे सरळ सोपे तत्वज्ञान!अर्जुना कोणतीही जीवनविद्या कोण कुणाला देऊ शकत नाही.ती कोणीही दुसऱ्याकडून घेऊही शकत नाही. तीमूलतः जशी स्वयंभू असते तशी तिची प्राप्ती सुद्धा स्वयंभूच असते..."एक दीर्घ श्वास घेऊन दस्यू लुटारुंच्या कोंढाळ्याभोवतीफिरणाऱ्या शरचक्रातील मंदगती तीरांच्या जागी नवे तीर सोडून माघारी येऊन जमिनीतरूतलेले तीर सावधपणे उपसून पाठीवरच्या भात्यात ठेवल्यावर एकलव्याचे खंडित झालेलेकथन पुढे सुरू झाले.
"अर्जुना हे ज्ञान मला हस्तिनापुरात अपमानितहोऊन माघारी वनाच्या दिशेने जाताना प्राप्त झाले. मीज्ञान प्राप्तीसाठी मोठ्या लालसेने गुरूद्रोणांचे शिष्यत्व पत्करायला हस्तिनापुरातआलो. त्यावेळच्या घटनांचे तुला विस्मरणही झालेअसेल. अर्जुना! द्रोणांचीभेट होईपर्यंतच्या काळात माझे समवयस्क असलेले तुम्ही कौरव-पांडवादीराजपुत्र मोठ्या एकतानतेने धनुर्विद्येतील पूर्वपठित भागावर प्रभूत्व संपादनकरण्यासाठी सराव करीत होता. वस्तुतः तुमचा तोसराव म्हणजे कंटाळवाणे अधांनुकरण आहे हे उमगलेल्या स्वतंत्र वृत्तीच्या या निषादपुत्राचा चांगलाच भ्रमनिरास झाला होता. कौशल्यहे का निरर्थक आवृत्त्या करून मिळते? हेध्यानी येउन त्याच वेळी नीरस अध्ययन आपणाला रमवू शकणार नाही.हे ओळखून जरी मी माघारी आलो असतो तरी आयुष्यभर डागण्या देणारापुढचा तो अवहेलनेचा प्रसंग आणि हे एकलकोंडे जिणे तरी टळलेअसते.इतक्या प्रदीर्घ काळानंतरही त्या आठवणींनी एकलव्याचे नेत्रआर्द्र होऊन त्याच्या घशात हुंदका दाटून आला (क्रमश:)