Ideal teacher in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | आदर्श शिक्षक

Featured Books
Categories
Share

आदर्श शिक्षक

आदर्श शिक्षक या पुस्तकाविषयी

        आदर्श शिक्षक ही माझी कादंबरी. ही कादंबरी शिक्षक दिनालाच साकार झालेली असून साहित्यातील एक वेगळाच वलय व अनुभव घेवून आलेली कादंबरी आहे. यात पुरस्कार कसा मिळू शकतो. याचं उहापोह करणारं कथानक या कादंबरीत आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार हे आदर्श शिक्षकांना मिळणारच. परंतु खरा आदर्श शिक्षक कोण? हे या कादंबरीतून नक्कीच समजून येवू शकतं. 
         या कादंबरीतील कथानक थोडंसं वेगळंच असून यात काही भावनाप्रधान दृश्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हेच भावनाप्रधान दृश्य वा कथानक वाचकांना खिळवून ठेवू शकतील. कधीकधी रडवूही शकतील, ते दृश्य त्यांनाच रडवू शकेल की जे खरंच मूळरुपात भावनाप्रधान आहेत. हे तेव्हाच घडेल. जेव्हा आपण ही कादंबरी मन लावून वाचाल. एकंदरीत सांगायचं झाल्यास आपण ही कादंबरी वाचावी व वाचून झाल्यावर आपण एक फोन करुन अवश्य प्रतिक्रिया द्यावी ही विनंती. 

                                             आपला नम्र 
                                      अंकुश शिंगाडे नागपूर 
                                           ९३७३३५९४५०
*********************१******************

आदर्श शिक्षक (कादंबरी)
                        अंकुश शिंगाडे

        उषा, एक सुसंस्कारीत मुलगी होती. ती घरातील एकुलती एक मुलगी होती व तिला तशा मैत्रीणीही कोणीही नव्हत्या. त्यामुळंच तिचा एकलकोंडा स्वभाव बनला होता. 
          तिचा मित्र होता सोहेल. सोहेल हा एकलकोंडा नव्हता. तसाच त्याचा स्वभाव धीटच होता. तसे त्याचेवर घरातून बरोबर संस्कारही झालेले नव्हते. त्याचं कारण होतं, त्याच्या घरातील वातावरण. घरामध्ये त्याला जन्म देणारी आई जीवंत नसल्यानं त्याची आबाळच झाली होती लहानपणापासून. 
        सोहेलला तीन बहिणी व तो एकच भाऊ. असे ते एकुण चारजणं. तसा तो मोठा, परंतु सावत्र, आपल्याला मुलगी नको, मुलगी वंशाचा वारस नाही अशी म्हणणारी त्याची दुसरी आई. तिलाही नंतर मुलीच झाल्या. त्या आपआपल्या घरी गेल्या व त्या स्वतःच्या आईची सेवाही करायला कठीण झाल्या. शेवटी मुलगाच वंशाचा वारस असतो. हे गृहीत धरुन त्याच्या आईनं त्यालाच शेवटच्या क्षणात आपला मुलगा मानलं होतं. तसं त्यानंही तो मोठा होताच आपल्या सावत्र आईला टाकून दिलं नव्हतं.
         सोहेल घरातील सर्वात मोठा असल्यानं व सावत्र असल्यानं त्याचा घरामध्ये लाड नव्हताच. ज्यातून तो जी कृती करेल, त्या सर्व कृतींना समर्थन प्राप्त होत नसे. आज सोहेल त्याच वातावरणात लहानाचा मोठा झाला होता.
         सोहेलचं वय लहान होतं व त्याचा स्वभाव सुसंस्कारीच होता. कुणालाही शिव्या देणे, विनाकारण कुणालाही काही बाही म्हणणे, कुणालाही विनाकारण मारणे. या कृती तो करीत नसे. कधीकधी तो मुलांमध्ये जेव्हा खेळत असे. जेव्हा मुलंही त्याला विनाकारण त्रास देत असत व त्याच्यावर खोटे आरोप करीत असत त्या बालवयातच. ज्या त्याच्या खोट्या कृत्याची कुरघोडी सवंगड्यांकडून ऐकून त्याची आईही परेशानच असायची. त्यातच त्याच्या कृत्याची दखल घेवून त्याच्या घरी त्याची तक्रार केल्यास त्याची आईही त्याला मारत असे. भांडण करीत असे. ज्याचा दुरगामी परिणाम त्याचेवर होत चालला होता.
         उषा त्याच गावात नाही तर त्याच्याच घराजवळ राहात होती. तिला त्याच्या क्लृप्त्या दिसायच्या. तेव्हा ती त्याला समजवायचीही. परंतु तो काही समजत नव्हता. कारण त्याच्या मनात सावत्र आईचा राग होता. कधीकधी तो राग काढायचा निष्पाप जनावरांवर. कधी रानातील निष्पाप जनावरांना तो मारायचा. उषा त्यावर त्याला रागवायची. मात्र त्यानं तिला कधीच रागावलं नाही.
         सोहेल हा लहानपणापासूनच चिडखोर, भांडखोर वृत्तीचा. तसं पाहिल्यास त्याचं घरंच वातावरण तसं होतं. त्याचं कोणाशी पटत सुद्धा नसे. कधीकधी तर खेळावरुनच भांडणं व्हायची. ज्यात कधीकधी तो मारही खात असे, आपल्या सवंगड्यांचा. 
          सोहेलच्या घरी विश्वकोटीचं दारिद्र्य होतं. वडील शिकलेले असले तरी त्याची दुसरी आई अशिक्षीतच होती. तिला शिक्षणाचा तेवढ्या प्रमाणात गंध नव्हताच. त्यातच देशात साक्षरतेचे वारे वाहात असतांना घरातील मुलींना तिनं शिक्षणाचे बाळकडू पाजलंच नाही. आईचं वागणं. तिचं अशिक्षीतपण. त्याचा परिणाम घरातही होऊ लागला होता. तसं पाहिल्यास आता घरात वडील हे जास्त प्रमाणात दारु प्यायला लागले होते. त्यामुळंच घरात सुखशांती नसायचीच आणि पैसाही पुरायचा नाही. आता घरात तीन मुली लागोपाठ झाल्यानं एकतर खाणारी तोंड जास्त आणि कमाई कमी अशी अवस्था झाली होती घराची. 
           वडील जेवढं कमवायचे. त्यातील अर्धाअधीक पैसा दारुतच टाकायचे. दररोज सायंकाळी त्यांना थोडी तरी दारु लागायचीच. त्यामुळं घरामध्ये उपासतापास ठरलेलाच असायचा. घरी दारूमुळे व खाणाऱ्या तोंडांमुळं स्वयंपाक बनवतांना त्याची पत्नी आता थोडीशी डाळ व गंजभर पाणी टाकून स्वयंपाक बनवायची. कधी पातळ खिचडीच बनवायची. शेवटी पैशाच्या अभावानं उपाय नव्हता. अशातच त्यांची मोठी मुलगी सहा वर्षाची झाली. जी चांगल्या स्वभावाची निपजली. परंतु घरातील दारिद्रता पाहून त्यांनी तिला शाळेत न टाकता शेतातील कामाला मोलमजूरीनं नेणं सुरु केलं. मग काय, त्यांची मोठी मुलगी शिक्षण शिकण्याऐवजी मोलमजूरीची कामं शिकू लागली आणि तिचा तोच वसा इतर मुलींनी चालवू नये म्हणून त्या दोन बहिणींना शाळेत टाकलं होतं. मात्र मोठी मुलगी मोलमजूरीच्या कामाला जात असल्यानं त्यातून घरखर्च चालत होता. 
          सोहेल सहा वर्षाचा झाला होता. त्यातच भावावरही बहिणींचं अतोनात प्रेम होतंच तो सावत्रभाऊ असला तरी. त्या बहिणी त्याचेवर प्रेम करायच्या. जरी त्यांची आई सोहेलला त्रास देत असली तरी. त्या बहिणी लहान असूनही आपल्या सावत्र भावाला घासातून घास लपूनछपून आणून द्यायच्या. अन् त्यानंही त्या लहान असल्यानं त्यांना सांभाळायची जबाबदारी ही स्विकारलीच होती. सोहेल शाळेत गेल्यावर तीन बहिणींपैकी एक बहिण, जी सर्वात मोठी होती. ती बहिण, इतर लहान बहिणींना सांभाळायची. तिनंच सहा वर्षापर्यंत घरी राहून त्यांना सांभाळलं होतं. अन् आता त्यांचं शाळेत जाण्याचं वय झाल्यानं त्यांना शाळेत टाकलं होतं. ज्यातून ते सकाळी दहाला शाळेत जायचे व सांजच्याला साडेपाचला शाळेतून घरी परत यायचे.
         सोहेलची एक बहिण शिकलीच नाही. ना ही तिला शिक्षणाचं महत्व वाटत होतं, ना ही तिला कधी शिक्षणाचं महत्त्व वाटलं. फक्त कुटुंब पैशाशिवाय चालत नाही, हे गृहित धरुन ती शेतातच काम करीत राहिली व सोहेलच्या शिक्षणविषयक लालसेला ती लहान असूनही हवा देत राहिली. अन् अशाच प्रकारात सोहेल मोठा होत गेला. तो शिकत गेला व त्यानं उच्चशिक्षण घेतलं. कधी त्याला पैशाची जेव्हा अडचण भासायची. तेव्हा हीच लहान बहिण त्याला लपूनछपून कामातून आलेले पैसेही द्यायची. ज्यातून त्याचं शिक्षणाचं शुल्क निघत असे.
           आज त्याच सावत्र बहिणीचे उपकार होते त्याचेवर. जी शिकली नसली तरी तिनं एका सावत्र भावाचं भविष्य ती स्वतः लहान असूनही घडवलं होतं. ती सावत्र बहिण व त्यातच ती लहान असूनही एका सख्ख्या बहिणीसारखं कर्तव्य तिनं पार पाडलं होतं. त्याच फलश्रुतीतून त्यानं तिला शेवटपर्यंत अंतरही दिलं नव्हतं.
         उर्मिला तिचं नाव. तिच्यामध्ये संस्कार होते. कारण ती घरातून मोठी होती. तिचे वडील कमवायचे आणि तिची आईही घरी कमवायची. सुरुवातीला तिची आई कमवायला जात नसे. परंतु जेव्हा तिचे वडील दारु प्यायला लागले. तेव्हा घरात उपासमार घडायची. ते पाहून आईही कामावर जायला लागली आणि सोबतच तिनं आपल्या मोठ्या मुलीलाही कामावर नेणं सुरु केलं होतं. अशातच उर्मिला आवर्जून आपल्या बहिणीकडे लक्ष द्यायची. त्यांची हौस भागवायची. त्यातच आपल्या बहिणी ह्या संस्कारी निघायला हव्या, असं तिलाही वाटायचं व ती त्यावर विशेष लक्ष ठेवून असायची. ज्यातून त्या बहिणीही संस्कारच शिकत चालल्या होत्या.
           उर्मिलाच्या शेजारीच आणखी दोन मुलं राहायची. त्यांचं नाव सुनील व संदीप होतं. त्यांचे आईवडील सरकारी नोकरीवर होते. आई शिक्षिका होती व वडील बँकेत होते. त्या दोघांचीही नोकरी बाहेरगावी होती. दोघंही सकाळी आठ वाजताच घरातून निघायचे. जे सांजच्यांना सात आठ वाजता घरी यायचे. तेव्हा मुलंमुली झोपलेली असायची.
          ती मुलं सकाळी त्यांचे आईवडील दिवटीवर निघतेवेळेस झोपलेले असायचे व आईवडील घरी आल्यावरही उठलेले नसायचेच. ज्यातून आईवडील आणि ती मुलं यांचा संवाद होत नसे. फक्त पैशालाच महत्व देणारे ते आईवडील. ज्या आईवडीलांच्या पैशालाच महत्व दिल्यानं मुलांवर संस्कार होत नव्हते. ती मुलं फक्त त्यांना सांभाळण्यासाठी ठेवलेल्या आपल्या दाईलाच ओळखत होते. तिच्याशीच संवाद साधत होते. 
         लहानाची मोठी झालेली ती मुलं. ज्यांचे आईवडील सरकारी नोकरीवर होते. त्यांनीही आपल्या दोन्ही मुलांना गावातच शाळेत शिक्षणासाठी टाकलं. ज्या शाळेतून सोहेलच्या बहिणी शिकत होत्या. काळ झपाट्यानं पुढं सरकला व केव्हा ते मोठे झाले हे कळलंच नाही व सोहेलच्या शिकणाऱ्या त्या दोन बहिणींनी त्या दोन्ही मुलांवर प्रेम केलं व एक दिवस घरी कुणालाही न सांगता त्या दोन्ही मुली त्या दोन्ही भावांसोबत पळून गेल्या होत्या. पुढं त्यांनी प्रेमविवाह केला आहे. हे कळलं होतं. त्या आपआपल्या संसारात खुश होत्या. मात्र त्यांचं आज आपल्या आईकडे अजिबात लक्ष नव्हतं. पुढं उर्मिलाही विवाहबद्ध झाली. तिलाही ती शिकली नसूनही चांगला जोडीदार मिळाला व तीही आपल्या संसारात रममाण झाली होती.  

*********************२************************

          ती जिल्हापरीषदची शाळा. त्या शाळेत आजमितीस मुलं जास्त होती. तसे त्या शाळेतील जे मुख्याध्यापक होते. त्यांचं राहणीमान साधं होतं. परंतु त्यांचे विचार उच्च होते. ते मुख्याध्यापक कडक शिस्तीचे होते व त्यांच्या कार्यकाळात शिक्षकही वेळेवर व दररोज शाळेत यायचे. त्यातच चांगले शिकवायचे सुद्धा. परंतु काळ झपाट्यानं बदलला. ती मुलं जेमतेम शाळेत गेली होती. अशातच एक बदल झाला व त्या शाळेतील मुख्याध्यापक असलेले गृहस्थ निवृत्त झाले. त्याजागी नवीन मुख्याध्यापिका आल्या. ज्या फॅशनेबल होत्या.
          ती शाळा व त्या शाळेतील त्या फॅशनेबल मुख्याध्यापिका. त्यांनी शाळेत काय सोयी कराव्या लागतात. याकडे मुळात लक्षच दिलं नाही. लक्ष दिलं आपल्याच शरीराच्या सौंदर्याकडे. तिला वाटत असायचं की मुलंही चांगलं वागणं शिकायला हवीत. तसं त्यांचं बरोबर होतं. ज्यातून मुलं फॅशन शिकली होती. ज्या मुलांचे आईवडील सरकारी नोकरीवर होते व श्रीमंत होते. परंतु ज्या मुलांच्या घरी विश्वकोटीचं दारिद्र्य होतं. त्यांची मुलं. त्यांच्या भावना दुखावल्या जात होत्या. शिवाय तिचा तो कार्यकाळ डबघाईस आणणारा ठरला. 
          ती मुख्याध्यापिका शाळेतच येत नव्हती. हे ते कारण सांगून ती जिल्ह्यातच राहायची. त्याचबरोबर तिला एक असिस्टंट शिक्षकही लागायचा. जो शिक्षक तिला ने आण करायचा, तिच्याकडे गाडी नसल्यानं. तिला गाडी चालवताच येत नव्हती व तिच्याकडे गाडीही नव्हती. याच वस्तुस्थितीतून त्यांना असलेल्या दोन वर्गांना शिक्षक मिळत नव्हते. ते वर्ग सद्यस्थितीत लावारीश असल्यासारखेच होते. तसंच त्या वर्गाचं अतोनात नुकसानच होत होतं. ज्या वर्गात उर्मिलाच्या बहिणी होत्या व सोहेलही त्याच शाळेत वरच्या वर्गात होता. 
          सोहेल वरच्या वर्गात होता. ज्या वर्गाला तेच शिक्षक शिकवीत होते. जे शिक्षक त्या मुख्याध्यापिकेच्या सोबत असायचे. बाकीचे शिक्षक शाळेत यायचे व तेही वर्गावर जातांना विचार करायचे की आपणच या शाळेचा ठेका घेतला काय? तेही शाळेत शिकवायचे नाहीतच. शिवाय त्यातीलही काही शिक्षक त्या मुख्याध्यापिकेला विश्वासात घेवून सुट्टी मारायचे. अशातच दररोज पुर्व मुख्याध्यापकाच्या काळात शाळेत नियमीत असणारे शिक्षक बरेच दिवस तालुका व शहरातच पडून राहायचे, सुट्टीशी संबंधीत मुख्याध्यापिकेला विश्वासात घेवून. एक शिक्षक असाही होता की त्याची जेव्हा तिथं बदली झाली. तेव्हा तो एकच दिवस शाळेत आला होता. परंतु तद्नंतर त्यानं शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. तरीही त्याचं वेतन नियमित निघायचं. त्याचं कारण होतं, त्या शिक्षकांचे असणारे राजनेत्याशी संबंध. त्याचा मोठ्या भावालाच त्या त्या तालुक्यात आमदारकी होती. ज्या तालुक्यात ती शाळा होती. त्याचाच फायदा तो घेत असे व तो सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांवर दबाव आणून शाळेतच जात नसे.
          पुर्व मुख्याध्यापकाच्या काळात भरभराटीवर असलेली शाळा. त्या शाळेला आज ग्रहण लागलं होतं. त्या शाळेतील नियुक्त असणारे शिक्षक नियमीतपणे शाळेतच येत नसल्यानं त्याचा परिणाम गावावर होत चालला होता. शेवटी गावातील लोकांनी या गोष्टीचा विरोध केला. परंतु त्या शाळेतील एका शिक्षकाचा मोठा भाऊच त्या तालुक्याचा आमदार असल्यानं काहीही झालं नाही. शेवटी गावानं ठरवलं. गावानं शेवटी ठरवलं की आपली मुलं या शाळेतून काढावीत व लगतच्या दुसऱ्या गावात नेवून टाकावीत. जिथं मुलांना शिकवायला नियमीत शिक्षक मिळेल. ज्यात सोहेलचा समावेश नव्हता. उषाच्या समावेश होता. उषाच्या वडीलानं शेजारच्याच एका खाजगी शाळेत आपली मुलगी शिकायला नेवून टाकली होती व तो नित्यनेमानं आपल्या मुलीला त्या शाळेत नेवून देत असे. शेवटी मुलीलाही शिक्षण हवं होतं. 
            उषाच्या वडीलानं जे केलं. तीच पुनरावृत्ती काहीशा वेगळ्या स्वरुपात सोहेलच्या वडीलानंही केली. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडलं नाही. परंतु त्यानं आपल्या मुलाला शहरात टाकलं अन् राहण्याची सोय म्हणून वसतीगृहात ठेवलं. त्यानं आपलं मुलं शहरातील शाळेत नेवून टाकलं. आज त्यांच्या मुलाला सांभाळायला तो नव्हता तर त्याचा सांभाळ वसतीगृह प्रशासनच करु लागलं होतं. मात्र उषाच्या वडीलांजवळ पाहिजे त्या प्रमाणात पुरेसे पैसे असले तरी ती मुलीची जात असल्यानं ती शेजारच्या शाळेत शिकायला जाऊ लागली होती. ती दूर शहरातील शाळेत वसतीगृहात शिकायला जाऊ शकली नाही. 
         आज त्या गावातील शाळेची अवस्था खस्ता झाली होती. एका काळात भरपूर मुलं असलेली व नावाजलेली ती शाळा, आता तिथं मुलांची संख्या नव्हती. दोनचार मुलं होती, ज्यांच्या आईवडीलांजवळ पुरेसा शिकवायला पैसा नव्हताच. अशी मुलं काटकसरीनं शिकत होती, त्याच शाळेत. आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. परंतु त्या शाळेत उज्जवल भविष्य नव्हतं आता विद्यार्थ्यांचं. जी शाळा कालांतरानं बंद झाल्यानं सोहेलच्या दोन्ही बहिणींचं शिक्षण गेलं व उषाही गावाकडे पुरेशा उच्च शिक्षणाच्या सोयी नसल्यानं ती दहावी पास होवूनही जास्त शिकू शकली नाही. 
         सोहेलच्या तिनही बहिणींचे विवाह झाले होते. त्या आपआपल्या घरी गेल्या होत्या. आता फक्त तोच एक बाकी राहिला होता व तो आणि त्याची आई आपल्या गावाकडील घरात राहात होते.
          उषाही वयात येवून विवाहीत झाली नव्हती. तीही अविवाहितच होती. आता सोहेलही मोठा झाला होता व तो एका खाजगी शाळेत नोकरी करु लागला होता. ज्यात त्याची नोकरी कायम स्वरुपाची झाली नव्हती. त्यातच त्याला आपल्या नोकरीची कायम स्वरुपाची होण्यासाठी प्रतिक्षाच होती. अशातच राहण्याची सोय नसल्यानं तो गावावरुनच सायकलनं जाणं येणं करीत होता आणि त्यातच वडील मरण पावल्यानं आपल्या सावत्र आईचाही सांभाळ करीत होता.
        मीना....... मीना आज जिल्हापरिषद शाळेत होती. एकदा अशाच एका शैक्षणिक कार्यशाळेदरम्यान तिची व सोहेलची मुलाखत झाली. मीनानं त्याची गुणवत्ता तपासली व ती त्याची गुणवत्ता पाहून हुरळून गेली. तिच्यावर त्याचा प्रभाव पडला. तसं पाहिल्यास दोघंही महाराष्ट्रातील व एकाच शहरातील होते. तिही दुःखी कष्टीच होती. सोहेलचं बालपण एका सावत्र आईच्या सानिध्यात गेलं होतं. तर तिचं बालपण एका शेतकरी कुटुंबात. ज्याचा इतिहास महाभयंकर होता.
           तिचे वडील शेतकरी होते व तिच्या वडिलांकडे असलेली शेती ही गहाण होती सावकाराकडे. शेतात एकतर धान्य पीकत नव्हतं आणि पिकलंच तर ते धान्य त्यांना अवजत नसे. त्या संपुर्ण धान्याची जी रक्कम यायची. ती सर्वच रक्कम सावकाराच्याच घशात जायची. कधी चांगलं पीक यायचं. दोन पैसे घरी खर्च करु वाटायचं. परंतु पुढल्याच क्षणी सावकार आठवायचा व आपलं कर्ज पुरेसं कमी होईल. या विचारानं त्या उभ्या पिकांचे पैसे सावकाराला जात. कधी अकस्मात दुष्काळ पडलाच तर पोट जगलं पाहिजे, असा विचार करुन. असा दुष्काळ पडलाच तर पंचक्रोशीत हाताला काम नसायचं. तेव्हा तोच सावकार कर्जरुपात पैसे द्यायचा. ज्यातून पोट जगायचं.
            मीनाच्या घरचं पोट जगायचं. त्याचं कारण होतं, त्यांच्या परीवाराचं कामाला जाणं. अख्खा परीवारच आपल्या घरच्या शेतात तर राबायचा आणि आपल्या शेतात काम करता करता इतर लोकांच्या घरीही कामाला जायचा. ज्यातून घरच्या शेतीच्या पैशाचा लाभ त्यांना होत नसला तरी दुसऱ्याच्या शेतातून आलेल्या पैशानं त्यांचा लाभ व्हायचा. त्यांचं घर चालायचं. 
            ते गाव व त्या गावातील सावकार. त्याचंच राज्य होतं त्या गावात. गावातच नाही तर पंचक्रोशीत. अगदी गावातील मुखिया असलेला सरपंच देखील त्याला दबेल होताच. तोही कधीकधी त्या सावकाराकडून कर्ज घ्यायचा. त्यामुळंच दाद मागायची कोणाकडे यावर पर्यायच नव्हता. गावातील खटलेही जेव्हा ग्रामसभेत दाखल होत. तेव्हाही अख्खं गाव त्या सावकाराच्याच बाजूनं बोलायचं. तेव्हा तारांबळ उडायची. एवढंच नाही तर गावात त्याचाच वरदहस्त असल्यानं त्याचे तरुण झालेले मुलंही गावातील तरुण असलेल्या मुलींवर अत्याचार करीत असत. अशातच त्यांनी बऱ्याच मुली नाशवल्या होत्या. 
          मीना ही घरातील तिसऱ्या क्रमांकाची मुलगी. तिच्यापेक्षा वयानं दोन बहिणी मोठ्या होत्या. तसंच त्या दोघींनाही त्याच सावकाराच्या मुलांनी नाशवलं होतं. मीनाही आज तसं पाहिल्यास तरुणच होत आली होती. त्यातच त्या सावकाराच्या मुलांची मीनावरही कुनजर ती होतीच.
           मीनाला दोन मोठ्या बहिणी होत्या. शिक्षणाची सोय गावात नसल्यानं व घरात पैसा पुरेसा पूरत नसल्यानं त्या शिकल्या नव्हत्या. मात्र त्यांना आपल्या बहिणीला म्हणजेच मीनाला शिकवायचं होतं. वाटत होतं की शिक्षणानं घराची इज्जत वाढेल व ती जर शिकली तर ती सावकाराच्या जाळ्यातून आपल्याला सोडवेल. शिवाय त्यांच्यासमोर ही देखील चिंता होती की जर ती गावातच राहिली तर उद्या त्याच सावकाराची तरुण मुलं आपल्या गरीबीची व मजबुरीपणाची शिकार करतील व आपल्यासारखंच मीनालाही नाशवतील. शेवटी त्या बहिणींनी निश्चय केला. मीनाला गावापासून दूर अशा शहरात वास्तव्याला ठेवायचं शिक्षणासाठी. परंतु ठेवायचं कुठं? विचार होता. शेवटी विचार झाला. तिला आपल्या आत्याकडे ठेवायचं. जी शहरात राहात होती.
            गावातून शहरात मीनाला शिकवायला पाठवायचं. असा विचार करताच व ठेवायचं कुठं? असा प्रश्न पडताच तिला आपल्या आत्याकडं ठेवायचं. हाही विचार करण्यात आला. कारण वसतीगृहात ठेवलं तर ती मुलीची जात. तसं पाहिल्यास मुलगी वसतीगृहातही सुरक्षीत नव्हतीच. अशा घटना बऱ्याच प्रमाणात ऐकायला येत होत्या. विचारांती आत्याकडे ठेवायचं, हा विचार झाल्यावर तो विचार त्यांनी आपल्या वडीलांना बोलून दाखवला. परंतु त्यावर वडीलांनी नकार दर्शवला. तरीही मीनाच्या बहिणी मानल्या नाहीत. त्यांनी आपल्या वडीलांकडे तकादा लावला व ठरल्याप्रमाणे मीनाला तिच्या आत्याकडे शिकवायला ठेवायचं. याचा विचार तिच्या वडीलांच्या मनानं पक्का केला व ती आत्याकडे शिकायला गेली शहरात.
           सुरुवातीला मीनाच्या आत्यानं नकारच दिला होता तिला ठेवण्यासाठी. परंतु नंतर वडीलांनी तिला खडे बोल सुनवताच ती तयार झाली. त्यानंतर मीना आपल्या आत्याकडे शिकायला गेली होती.
            मीना शहरात शिकायला होती. त्यातच ती आत्याकडे होती व ती आत्या तिचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करीत नव्हती तर तिला तिच्या रुपात एक चांगली मोलकरीण अगदी फुकटात सापडली होती. मग काय, ती मीनाला एवढं काम करायला लावायची की तिला त्रासच वाटायचा. ती अगदी वैतागून जायची. परंतु उपाय नव्हता. कारण शिकायचं होतं व उच्चशिक्षणही घ्यायचं होतं तिला.
          मीना आत्याच्या घरी होती व तिला कामाचा पाहिजे त्या प्रमाणात त्रास वाटायचा नाही. परंतु त्रास वाटायचा आत्याच्या वात्रट बोलण्याचा आणि काही चुकलंच तर अंगावर हात उचलण्याचा. मग डोकं खराब व्हायचं. तशीच आत्याची मुलंही तरुण होतीच. तीही तिच्यावर कुनजर टाकायचीच. कधी तिला स्पर्श करायचे. तो स्पर्श तिला सहन व्हायचा नाही.  
        मीनाला एक प्रकारचा मार परवडत होता. परंतु ती तिच्या आत्याच्या मुलांची कुनजर, ते त्यांचं अंगाला हात लावणं व ते उकारे, पाकारे. तेही तिच्याच आईवडीलांचे. ते काही सहन होत नव्हतं. तसा एकही दिवस जात नव्हता की ज्या दिवशी तिची आत्या तिच्या वडीलांची इज्जत काढणार नाही व ती इज्जत वेशीवर टांगणार नाही. अन् त्यावर काही म्हटल्यास बेदम मार. शेवटी ती कंटाळली व ती एक दिवस तिथून पळून गावाला आली. मग शोधाशोध. शेवटी ती गावात आलेली आहे पळून, हे माहित होताच तिच्या आत्यानं तिला आपल्या जवळ ठेवण्याचं नाकारलं.
           आत्यानं मीना शिक्षणासाठी ठेवण्याचं नाकारताच आणखी एक प्रश्न तिच्या परीवारासमोर उभा राहिला. मग काय, आता तिचं शिक्षण होईल की नाही, असंही वाटायला लागलं होतं. शेवटी नाईलाजास्तव ठरवलं की आता वसतीगृहात टाकावं. ज्यातून तिच्या राहायचा प्रश्न सुटेल. 
          विचारांचा अवकाश. लागलीच तिला पुढील शिक्षणासाठी राहायची सुविधा करीत असतांना वसतीगृहात टाकण्यात आलं. आता ना तिच्यावर तिच्या आत्याचं दडपण होतं. ना तिच्यावर तिच्या आत्येभावाची कुनजर असायची. वसतीगृहात कधी अनैसर्गिक कृत्यही चालत असत. परंतु तिला त्याचा संसर्ग जाणवला नाही. ती शिकत राहिली उच्च शिक्षण. ज्यातून ती आता शिक्षिका बनली होती व आपल्यातील गुणानं विद्यार्थ्यांचा विकास करीत होती.

*********************३************************

          'माझ्याशी विवाह करशील.' सोहेलनं मीनाला केलेला प्रश्न.
         ती चूप बसली. तिनं उत्तर दिलं नाही. तसा त्यानं आणखी तिला तोच प्रश्न केला. परंतु तरीही ती बोलली नाही. तसा तो चूप बसला व काय समजायचं ते तो समजला. मात्र बोलणं सुरुच होतं त्यांचं. काही समस्याच आली तर तो धावून जायचा. परंतु लग्नाविषयी विचारलं तर ती चूप असायची. उत्तरच द्यायची नाही.
          तसे ते दोघंही एकाच महाविद्यालयातील. परंतु तिनं त्याच्या विवाहाच्या प्रश्नावर नकार दिला. कारण तिला आपल्या परीवाराला कर्जाच्या विळख्यातून सोडवायचं होतं. त्यासाठी शिकणं व नोकरीला लागणं महत्वाचं होतं. 
          दोन वर्ष झाले होते व तो लवकर नोकरीला लागला एका खाजगी शाळेत. ज्या शाळेतील संस्थाचालक त्याचा आईच्या माहेरचा होता. त्याचीही एक शाळा होती. अन् त्यानं आपल्याच शाळेत त्याच ओळखीनं सोहेलला नोकरीवर नियुक्त केलं होतं. अशातच त्यानंही मीनासारखीच जिल्हापरीषदेच्या नोकरीसाठी फॉम भरला. ज्यातून तो त्या नियुक्तीसाठी असलेली परीक्षा पास झाला. परंतु मॅनेजमेंटनं त्याला जावू दिलं नाही. म्हटलं की जिल्हापरीषद शाळेत जायच्या व राहायच्या पुरेशा सोयी नसतात. त्यानं जावू नये. शेवटी सोहेल आपल्या जुन्याच शाळेत राहिला व मीनाला पर्याय नसल्यानं मीना जिल्हापरिषद शाळेत रुजू झाली होती.
          मीना सुरुवातीला ज्या शाळेत लागली. ती शाळा नावारूपास आलेली नव्हती. ना ही त्या शाळेत पुरेशी पटसंख्या होती. ती शाळा आदिवासी भागात होती व त्या शाळेत पुरेशा सोयीसुविधा नव्हत्या. साधं बाथरुमकडे जायचं असेल तर उघड्यावर जावं लागायचं. ज्यातून बिबट्या व वाघाचा वावर असल्यानं जीव जाण्याची भीती असायची. कधीच एकटं रानावनात फिरता येत नसे. त्याचंही कारण होतं, हिंस्र जनावरंच. कधी केव्हा ही हिंस्र जनावरं उचलून नेतील. याचा नेम नव्हता. पावसाळ्यात मात्र त्रेधातिरपीटच उडायची.
          तो पाऊस व तो पावसाळा. त्या पावसाळ्यात साधं रस्त्यावरुन चालता येत नव्हतं. रस्त्यावरुन चालतांना नवीनवीन कापडाला चिखल लागायचा. ज्या चिखलातून पाय उपसतांना कधीकधी त्रेधातिरपीटच उडायची. वाटायचं की आपण या ठिकाणी शिकवायला राहूच नये. नोकरी सोडायची. परंतु नोकरी तरी कशी सोडणार? एक नोकरी सोडली तर दुसरी नोकरी कशी मिळणार? वैगेरे प्रश्न होते आणि ते प्रश्न तिला वलयांकित करीत होते. शिवाय घरही पाहिजे त्या प्रमाणात सक्षम नव्हतं. घरात विश्वकोटीचं दारिद्र्य होतं आणि नोकरी करुन तिला आपल्या परीवारालाही सावकाराच्या कर्जातून व तकाद्यातून सोडवायचं होतं.
         मीनानं निर्धार केला. आपण नोकरी करायची. जशी जमेल तशी. जुळवून घ्यायचं परिस्थितीशी. तसा तिनं निर्धार करताच ती जुळवून घेवू लागली परिस्थितीशी. अशातच दिवसामागून दिवस जात राहिले व अशातच आला तो सुकाळ. गावं न् गाव विकसीत करण्याच्या मोहिमेत तिच्याही नोकरीच्या गावाचा समावेश झाला व गावाचं डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली व त्या गावाचं डांबरीकरण होताच ते गाव मुख्य रस्त्याला जोडलं गेलं. आता तिच्यासमोर कोणताच प्रश्न उभा राहिला नाही.
         मीना जेव्हा नोकरीला लागली. तेव्हा तिच्यासमोर उद्देश होता सावकाराच्या कर्जातून आपल्या परीवाराला मुक्त करण्याचा. ज्यासाठी ती पैसा पाठवीत होती गावाला. परंतु कर्जमुक्ती होतच नव्हती. अशातच एक दिवस ठरवून ती गावाला गेली. तिनं सावकाराच्या वहीचं खातं तपासलं. त्या वहीत हिशोबच लिहिला नव्हता तिच्या वडीलांनी घेतलेल्या कर्जाचा. फक्त हिशोब होता तोंडी. कारण सावकारही काही शिकला नव्हता व त्याची मुलं जरी शिकली असली तरी त्यांना वडीलांच्या व्यवसायाकडे पुरेसं लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता. शेवटी ती सावकाराशी बोलली. ज्यातून तिच्या लक्षात आलं की सावकाराला तिच्या परीवाराकडून भरपूर पैसा गेलेला आहे व तिचा परीवार आता सावकाराच्या पैशाचे देणे लागत नाही. तीच गोष्ट मनात धरुन तिनं सावकाराला अगदी स्पष्टपणे सांगीतलं व तिनं आपल्या परीवाराची कर्जातून मुक्ती केली. 
         मीनाच्या परीवाराच्या गावचीही परिस्थिती आज सुधारली होती. आता गावाची गाव सुधार मोहिमेनं प्रगती झाल्यानं सुधारलं होतं. त्यातच आता कर्ज बँकेतून मिळत होतं. सावकारावर अवलंबून राहावं लागत नव्हतं. शेतातील पिकांवरही येत असलेल्या कीडीची माहिती झाल्यानं त्या कीडींचं व्यवस्थापन लगेच करता येणं शक्य होतं. शिवाय पाण्याचा बंदोबस्त करतांना नद्याजोड प्रकल्प सरकार राबवीत असल्यानं तोही प्रश्न सोडवला गेला होता. एकंदरीत गाव सुजलाम सुफलाम झालं होतं. मात्र शाळा आजही तशाच होत्या. त्यासाठी लागत होती जनजागृती आणि पैसा.
         मीना ज्याठिकाणी शाळेत लागली. त्याठिकाणी मुलं सुरुवातीपासूनच कमी होती व तो आदिवासीच भाग असल्यानं तिथं शाळेबद्दल तेवढ्या प्रमाणात जाणीवजागृती नव्हती. शिवाय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे गावाला कळत नव्हतं व उमगतही नव्हतं. अख्खं गाव निरक्षर होतं व अशा गावाला शिक्षणाचं महत्वाचं सांगणं म्हणजे आपण मुर्ख असण्याची ती एक खुण होती. तरीही तिनं शिक्षणाचा विडा उचलला व ज्या गावात साक्षरतेचं बीजच अंकुरीत होत नव्हतं. त्याच गावात तिनं साक्षरतेची वटवृक्ष उभी केली. गावातील शाळा आपल्याला मिळणाऱ्या वेतनातून बराच पैसा खर्च करुन डिडीटल केली. ज्यातून मुलं शाळेत येवू लागली. बसू लागली व टिकू लागली आणि त्यातच ती मुलं शिकू लागली होती. आज तिची तीच शाळा नावारूपास आली होती व पंचक्रोशीत तिचीच शाळा, सरकारी स्तरावर डिजीटल शाळा म्हणून ओळखली जावू लागली होती. मात्र अजुनही तिला सरकारकडून शाळा सुधार या नावावर सरकारी मदत मिळत नव्हती. ना ही गावकरी तिला सरकारी मदत देत होतं. मात्र गावातील मुलं आज तिच्या शिक्षणानं उच्चस्तरावर जात राहिले.
           मीनाची शाळा आज तिच्या प्रयत्नानं सुधारली होती. ती डिजीटल बनली होती व पंचक्रोशीत तिचं नाव झालं होतं. अशातच तिच्या शाळेतील मुलंही उच्च शिक्षण घेवू लागले होते व तिच्या वर्गातील मुलांची श्रेणी पाहता ती एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जावू लागली होती. अशातच मीनाला एक दिवस वाटलं की आपणही आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळविण्याचा फॉम भरावा. तसा तिनं फॉम भरला. परंतु तो फॉम भरल्यानंतर तिला समजलं की तिथं फक्त चापलूस वर्गालाच स्थान आहे. तसंच दुसरं स्थान मंत्र्याच्या ओळखीतील लोकांनाच आहे व त्यांनाच आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळू शकतो. ते माहित होताच तिनं त्याचा नाद सोडला व ती फक्त आपलं पाहिजे तेवढं कर्तव्य करु लागली होती.   
          आदर्श शिक्षक पुरस्कार. सोहेल आज आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पाहिजे त्या प्रमाणात तळपत नव्हता. परंतु कधीकधी वाटत होतं की आपल्यालाही आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा. परंतु आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविण्याची पाहिजे तेवढ्या प्रमाणात इच्छा नसल्यानं आजपर्यंत त्यानं अर्जच भरला नव्हता. 
          सोहेलही एक शिक्षक होता नव्हे तर तो एक लेखकही होता. तसा त्यानं आपल्या जीवनात बराच संघर्ष केला होता आणि संघर्ष करुन करुन तो आज आदर्श पुरस्काराच्या अर्जापर्यंत पोहोचला होता.
           सोहेलनं पाहिलं होतं की आदर्श शिक्षक पुरस्कार हे आपल्याला अर्ज भरुन मिळतात. तसे ते मिळायला नकोत. जर लोकांचं कार्य चांगलं असेल तर ते चांगले कार्य दाखविण्यासाठी त्याला अर्ज भरायची गरज नसावीच. ते कार्य लोकांना दिसावं. परंतु आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत तसं होत नव्हतंच. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवायचा असेल तर शिफारस लागत होती आणि शिफारस तिही मंत्र्यांची लागत होती.
         सोहेलजवळ सर्वकाही होतं. परंतु शिफारस तेवढी नव्हती. ना ही त्याचे कोणी नातेवाईक मंत्रीमंडळात होते. ना ही त्याची कोणत्या मंत्र्याशी वा नेत्याशी ओळख होती. तसं त्याला आवडतही नव्हतं आणि ते त्याला माहितही नव्हतं. अशातच त्यानं आदर्श शिक्षक पुरस्काराचा फॉम भरला. तसं त्याला मुलाखतीचं एक दिवस पत्र आलं. परंतु यावेळेस त्यानं मुलाखतीला जाणं टाळलं होतं. 
         सोहेल मुलाखतीला गेला नाही. कारण होतं, त्याच्या मनातील विचार. त्याला वाटत होतं की प्रस्ताव मी का पाठवावा? माझी ओळख मीच का दाखवावी? माझी ओळख त्यांनाच असावी व त्यांनीच माझा शोध घेत घेत यावं माझ्याकडे. परंतु तसं न झाल्यानं व त्यालाच प्रस्ताव पाठवावा लागल्यानं त्यानं मुलाखतीला जाणं टाळलं. परंतु लागलीच त्याच्या ओळखीतील एका शिक्षिकेचा त्याला फोन आला. जिचं नाव मीना होतं. ती म्हणाली,
           "सर, आपण मुलाखतीला दिसले नाहीत."
           ते तिचं बोलणं. त्यावर उत्तर देत तो म्हणाला,
           "अं, सहजच." 
           त्यानं उत्तर दिलं. तशी ती म्हणाली,
          "सर, आपण एखाद्यावेळेस तरी मुलाखतीला येवूनच पाहा आणि तेथील मजा पाहा. खरंच वास्तविकता पाहा."
           ते तिचं बोलणं. लागलीच वेळ गेला. लागलीच वर्ष झालं व एक वर्षानंतर परत आदर्श शिक्षक पुरस्काराची जाहिरात निघाली. ज्या जाहिरातीत त्यानं यावर्षी आवर्जून फॉम भरला. तसा फॉम भरल्यानंतर तो त्या शिक्षिकेच्या बोलण्यानुसार आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मुलाखतीला गेला.
         ती आदर्श शिक्षक पुरस्काराची मुलाखत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून बरीच शिक्षक मंडळी आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा म्हणून आली होती. चांगला मेळावाच भरला होता. त्यातच त्यांनी आदर्श शिक्षक प्रस्तावाची पुर्णपणे तयारीही केली होती. ज्यात त्या त्या शिक्षिकेच्या प्रस्ताव बनविण्यानुसार त्यांनाच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळेल असं वाटत होतं. तसं सोहेलजवळ बरंच काही होतं. परंतु त्याला प्रस्ताव कसा तयार करतात. हे काही माहित नव्हतं व त्यानं त्या पद्धतीनं पुरस्कारही तयार केला नव्हता. तशी त्यानं कशीबशी मुलाखत दिली व तो बाहेर येवून बसला. तोच एका शिक्षिकेचा प्रस्ताव त्याच्या दृष्टीस पडला व तो त्यांना म्हणाला,
         "मॅडम, आपणाला बेस्ट ऑफ लक."
          "का बरं?"
          "आपण सुंदर प्रस्ताव तयार केलाय. आपल्याला नक्कीच पुरस्कार मिळू शकतो."
          ते त्याचं बोलणं. त्यावर तिचं उत्तर होतं.
          "सर, जिल्हापरीषदेमध्ये एकशे एक लोकं माझ्यासारखीच आदर्श शिक्षक पुरस्काराची फाईल तयार करतात. ही तर काहीच नाही. परंतु तरीही त्यांना पुरस्कार मिळत नाही."
           सोहेलनं ते ऐकलं. परंतु त्याचा त्यावर विश्वास बसला नाही. तसं थोडं काहीतरी समजलंच. तरीही तो चूप बसला. कारण सत्य असत्यता ती त्याला निकालानंतर कळणारच होती. 
         काही दिवस निघून गेले. तसा सोहेलला प्रश्न पडला होता निकालाचा. निकाल लागला होता. ज्या निकालात त्यानं ज्या शिक्षिकेला शुभेच्छा दिल्या होत्या, त्या शिक्षिकेची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी वर्णी लागली नव्हती. निकालात भलत्याच शिक्षकांची वर्णी लागली होती. ज्यांचा कोणत्याच स्वरुपाचा गवगवा नव्हता. ते सर्व मंत्र्यांच्याच शाळेतील होते. अशातच त्याला मीनाचा फोन आला.
           "हॅलो, मी मीना."
           "हॅलो, मी सोहेल बोलतोय."
          "हॅलो, सर, मी मीना बोलतेय."
           "बोला."
           "आदर्श शिक्षक पुरस्काराचा निकाल लागलाय."
           "होय, कळलंय."
           "पाहिलंत का आपण त्यात कुणाची वर्णी लागलीय ते?"
           "होय. कोण आहेत ते?"
           "एक आहे, मंत्र्याच्या शाळेतील शिक्षिका व दुसरी आहे, त्या मंत्र्याचं शिफारस पत्र आणणारी महिला."
          "हो का."
          "होय."
           "मग आपला चांगला प्रस्ताव बनविण्याला व चांगलं कार्य करण्याला काहीच इज्जत नाही तर......."
           "हो ना. अगदी तसंच."
           ती थोडी थांबली. तसा तोही थांबला. तोच काही वेळानं ती म्हणाली,
            "सर, माहित आहे, ज्या शिक्षिकेनं शिफारस पत्र आणलं. तिचं कार्य कसं आहे ते?"
           "सांगा ना."
          "सर, तिच्या शाळेत दोनच मुलं आहेत व दोन शिक्षक. एक शिक्षक नुकताच नियुक्त झाला आहे व ही बाहेर बाहेरच असते शाळेच्या."
           "म्हणजे?"
           "सर, ही शाळेत जातच नाही."
           "मग?"
           "ही मंत्र्याच्याच घरी पडलेली असते."
           "हो काय?"
            "तिचीच वर्णी लागलीय."
            "हो का. छान, छान. परंतु त्याला काही अर्थ?"
            "सर, वेतन वाढतं. आणखी समाजात रुतबा. मला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालाय."
            "होय. परंतु आत्मीक समाधान. ते नसतंच ना."
            "त्याला कोण पाहातं सर. सर, दरवर्षी असंच घडतं. कधी मंत्र्याच्या शाळेतील शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतात, तर कधी मंत्र्यांचं शिफारस पत्र आणणाऱ्या शिक्षकांना. जर या पुरस्काराची आधीपासून चौकशी केली ना. तर सत्य बाहेर येईल व आदर्श शिक्षक पुरस्कारातही घोटाळा होतो. हे सिद्ध होईल." 
            मीनानं आपली खंत व्यक्त केली. तसा तो म्हणाला,
           "हो ना. अगदी खरं आहे आपलं बोलणं." 
           तो म्हणाला. तसं बोलणं बंद झालं. मीनानं फोन ठेवला होता.
            काही दिवस निघून गेले होते. सोहेल घराच्या ओसरीत बसला होता. तोच त्याला विचार आला. तो विचार करु लागला.
             'पुरस्कार हे प्रस्तावावरुन नकोच. काही लोकं असेही असतात की त्यांचं कार्य मागे वळून पाहिल्यास शुन्य असतं. त्याची गतकाळातील पाश्वभुमी विचारात घेतल्यास त्याला तशा स्वरुपाचा पुरस्कार कसा मिळाला याचा विचार येतो व ती पाश्वभुमी तसा विचार करायला भाग पाडते.
           काही लोकं असेही असतात की ते फक्त कार्य करतात. त्यांच्याबाबतीत सांगायचं झाल्यास ते फळाची अपेक्षा करीत नाहीत. फक्त कार्य करतात. कार्याला प्राधान्य देतात. परंतु अलिकडील काळात एक फॅड आलं आहे. ज्याला जेवढा मोठा पुरस्कार. त्याचा तेवढा उदोउदो. लोकं त्याला डोक्यावरच घेवून नाचतात. जर त्याच्या मागे वळून पाहिलं वा त्याचा गतकाळ तपासून पाहिला. तर विचार येतो की तशा स्वरुपाचा पुरस्कार त्याला कसा मिळाला असेल.'
          सोहेल विचार करु लागला. तोच त्याला एक प्रसंग आठवला. ज्या प्रसंगात एका कार्यशाळेत तो सहभागी झाला होता. अनेक नामवंत आले होते त्या कार्यशाळेत. ते नामवंत मी अमुक अमुक कार्य केलं. असा परीचय देत होते. असा परीचय देत असतांना त्यांच्या बोलण्यात अभिमान होता आणि तसा अभिमान असतोच, एखादे मोठे कार्य आपल्यासोबत असेल तर..... त्यातच एक व्यक्तीही आला होता की ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार होता. त्यानंही आपल्याला कसा पुरस्कार मिळाला. याचं वर्णन केलं होतं. तसा त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त असल्यानं त्याला त्या कार्यशाळेत जास्त भाव देण्यात येत होता. अन् बाकीच्या लोकांना तेवढा भाव नव्हताच. अन् तो पुरस्कार त्याला कसा काय मिळाला? हे इतर सर्वांना माहित होतं. परंतु बोलण्याची व सत्य उघड करायची कोणाची हिंमत होत नव्हतीच. तेव्हा एक स्री सोहेलला म्हणाली की सर, तुम्ही आपलं कार्य सांगा विचारपीठावरुन. मला या पुरस्कार प्राप्त व्यक्तीला या लोकांनी जे डोक्यावर घेतलेलं आहे. ते हानून पाडायचं आहे. 
         ती महिला सोहेलला म्हणून गेली. परंतु सोहेलला ती बाब समजली नाही व त्यानं त्या मॅडमला म्हटलं की तो व्यक्ती लायक असेल, म्हणूनच त्याला तशा स्वरुपाचा पुरस्कार मिळाला असेल. त्यावर ती म्हणाली की सर, हे सत्य नाही. त्यावर सोहेलनं विचारलं की सत्य काय आहे. त्यावर ती म्हणाली, सर, ज्या गोष्टीनं या व्यक्तीला पुरस्कार देण्यात आला. ती गोष्ट या व्यक्तीनं केलीच नाही. त्यावर सोहेलनं म्हटलं की त्या व्यक्तीला मग पुरस्कार कसा मिळाला? सर, चापलुसी व मंत्रालयाशी संबंध. तो व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो. ज्यासाठी त्याची नियुक्ती आहे. त्यासाठी त्याला काम करणे गरजेचे आहे. परंतु तो तिथं काम करीत नसून फक्त मंत्रालयातच पडलेला असतो. ज्यातून त्याला पुरस्कार मिळालाय. त्या शिक्षिकेनं सोहेलसमोर सत्य उघड केलं होतं व मग सोहेलनं त्याचा परीचय द्यायला सुरुवात केली व सांगीतलं की मला पुरस्कार नाही. फक्त कार्य करतो व ते कार्य मला पुरस्कार मिळो अगर न मिळो, सुरुच राहणार आहे. सोहेल विचार करु लागला पुरस्काराबाबत.
            'मिडिया....... सध्या जोरात मिडिया वापरणे सुरु आहे. लोकं मिडियाचा वापर एवढा करु लागलेले आहेत की त्यातून पैसा मिळवणे हा त्यांचा उद्देश होवून गेलेला आहे. काही लोकं फेसबुकवर रील टाकतात. ज्यातून कितीतरी लाईक येतं व त्यातून पैसा कमवता येतो. पैसा जर कमविण्याचा उद्देश असेल तर ते कार्य हे सामाजिक कार्य होवू शकत नाही वा ते कार्य सन्मानाचं कार्य होवू शकत नाही आणि त्या कार्याला पुरस्काराचा दर्जाही देता येत नाही. परंतु जो खरंच असे सामाजिक प्रबोधनाचे व्हिडीओ बनवतो. त्यातून पैसा मिळाल्यास जो केवळ त्या पैशाचा उपयोग सामाजिक कार्य करण्यासाठी करतो. त्या व्यक्तीला जर पुरस्कार देण्यात आला, तर काही नवलं नाही. परंतु असा व्यक्ती पुरस्कारापर्यंत जात नाही व लोकं अशा लोकांना पुरस्कारापर्यंत जावूही देत नाहीत. लोकं पुरस्कार अशांनाच देतात की जे पैशानं पुरस्कार विकत घेतात. जे प्रस्ताव पाठवून आपल्यालाच पुरस्कार मिळावा. यासाठी प्रयत्न करतात व त्याचा गवगवाही करतात.
           पुरस्काराचा क्रम लावतांना जसं रीलच्या माध्यमातून लोकांचं कार्य दिसतं. तसंच कार्य दिसतं वर्तमानपत्रातून. वर्तमानपत्रातून काही लोकांचे रोजचेच लेख दिसतात. ते लेख सामाजिक प्रबोधनात्मक स्वरुपाचे असतात. जे खरंच वाचले की माणसात माणूसकीचं परीवर्तन होत असतं. ते लेख लोकांवर होत असलेल्या अन्यायावर वाचा फोडणारे असतात. परंतु अशांना पुरस्कार देण्यात येत नाही. कारण ती मंडळी कधीच प्रस्ताव पाठवीत नाहीत. अर्थातच जो प्रस्ताव पाठवेल, मग तो खोटा नाटा, बनावट स्वरुपाचा प्रस्ताव असला तरी चालेल. पुरस्कार देण्याचे ठरवले जाते. याच रीघमध्ये आता सरकारी पुरस्कार सुद्धा देण्यात येत आहेत. ही शोकांतिकाच आहे. तशीच काही मंडळी अशीही आहेत की जे आपल्याला मिळालेला पुरस्कार नाकारुन ते सोशल मिडियावर टाकून आपलाच जयजयकार करुन घेत आहेत. हेही तेवढंच खरं आहे.'

**********************४*********************

          सोहेल विचारच करीत होता. तोच त्याला आजही मीनाचा फोन आला. प्रथम इकडच्या तिकडच्या चर्चा झाल्या व नंतर थेट मुद्द्यावर येत ती फोनवर बोलती झाली. म्हणाली,
           "सोहेल, अलिकडील काळात पुरस्कार हे ठरलेले असतात. कोणाला द्यायचे. कोणाला नाही. हे सगळं ठरलेलं असतं. अगदी अलिकडील काळातील सरकारी दर्जाचे पुरस्कारही. तेही विकावू दामात मिळत असतात. असं चित्र दिसतं. पुरस्काराचा विचार करीत असतांना एक व्यक्ती मला असाही आढळला की त्यानं चक्कं पुरस्कारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता असते म्हणून त्यानं प्रमाणपत्र विकत घेतली होती आणि सरकारी पुरस्कार मिळवला होता. काहीजण असेही असतात की ते मंत्रालयाशी सेटींग करतात व पुरस्कार मिळवतात. ज्याची जेवढी ओळख. तेवढे त्याला पुरस्कार. तसंच जो चापलूस असेल. त्याच्या खोट्या कामालाही प्रधानता व महत्व प्राप्त होते. काही लोकं असेही असतात की जे दिखावा करतात. जसं एखादं छोटंस कार्य केलं जातं व त्याची बातमी सर्वच वर्तमानपत्रातून जाहिर केली जाते. ज्यात अमूक अमूक व्यक्ती अभिनंदन जरी करीत नसेल तरी अमूक अमूक व्यक्तीनं अभिनंदन केलं. असं जाहीर केलं जातं. ती वर्तमानपत्रातून आलेली बातमी आता सोशल मिडीयाच्या जगात एवढ्या प्रमाणात व्हाट्सअपवर, फेसबुकवर, इंन्ट्राग्राम, ट्विटरवर एवढी व्हायरल केली जाते की तोच व्यक्ती जगातील पहिल्या क्रमांकाचा आहे. त्याच्याएवढा जगात पहिल्या क्रमांकाचा व्यक्तीच नाही."
        "होय. अलिकडील काळात लोकांचं पुरस्कार घेण्याचं वलय व वेड पाहून अनेक शासन मान्यताप्राप्त संस्था निव्वळ पुरस्कार देवू लागल्या आहेत. ते पुरस्कार देण्याचा धंदाच करु लागले आहेत. ज्याचे ते पैसे घेतात व पुरस्कार देतात. कोणाच्या हस्ते तर सिने अभिनेते. मातब्बर राजकारणी, यांच्या हस्ते. आता लोकांनाही वाटते की आपल्याला अमूक अमूक सिनेअभिनेत्याच्या हस्ते पुरस्कार मिळत आहे. आपण अशा पुरस्कारासाठी आपलं नाव सुचवावं. अशावेळेस त्या अर्जदाराचं कार्य जरी नसेल तरी पुरस्कारासाठी ते आपलं नाव सुचवतात. बस, काम फतेह. अर्थात पैसे भरा व पुरस्कार घ्या ही गंमत. परंतु या पुरस्काराच्या स्पर्धेत नामी व योग्य व्यक्ती डावलला जातो. त्याचं काय ? ही विचारात घेण्यालायक बाब आहे."
          "सध्याचा काळ तर असा आहे की मला अमूक अमूक पुरस्कार द्या. असं सांगावं लागतं. पुरस्कारासाठी अर्ज भरावा लागतो. नाव सुचवावं लागतं. प्रसंगी पैसे द्यावे लागतात. हेच धोरण सरकारी पुरस्काराच्या बाबतीतही दिसून येतं. निदान सरकारनं तरी पुरस्काराच्या बाबतीत असं करु नये. म्हणजेच कोणाचे अर्ज भरुन घेवू नये. कोणाकडून शिफारस घेवू नये, पुरस्काराच्या बाबतीत."
         "पुरस्कार..... कसा द्यावा ? कोणाला द्यावा? यासाठी निकष आहेत. पुरस्कार अशा व्यक्तीला द्यावा की ज्याचं खरोखरच चांगलं कार्य आहे. ज्याला अर्ज भरायची गरज नाही. ज्याला तशा स्वरुपाचा अर्ज भरावा लागू नये."
          "अलिकडील काळात एक फॅड आलं आहे सोशल मिडीयाचं आणि ते वाखाणण्याजोगं देखील आहे. त्याद्वारे एखादा व्यक्ती जर इमानीइतबारे कार्य करीत असेल तर तर तेही दिसतंच. तसं पाहिल्यास कार्य करणारे भरपूर दिसतातच. परंतु असेही व्यक्ती समाजात असतात की जे कार्य करतात. ते कार्य दिसतं आणि त्या कार्याचा गवगवा इतरांमार्फत आपल्याला सोशल मिडियाच्या माध्यमातून दिसतोच. बस, सरकारनं अशा लोकांच्या नावाचा विचार त्याची सहमती न घेता वा त्याला विचारात न घेता करावा. त्यासाठी समीती स्थापन करावी. त्यानंतर नावाची निवड एकदा झाली की मग एक सुखद धक्का अशा निवड झालेल्या व्यक्तीला द्यावा. म्हणजेच कळवावे. जेणेकरुन त्यालाही आनंद वाटेल व त्या पुरस्काराचाही सन्मान होईल. जर पुर्वनियोजीत प्रकारानं पुरस्कार मिळविण्यासाठी अर्ज केला गेल्यास त्याची गरिमा राहात नाही. असा पुरस्कार मिळाला नाही तर बरं. असं वाटतं."
         "पुरस्कार हा जर पूर्वनियोजित पद्धतीनं जर असेल तर ते पुरस्कार मिळवतांना त्यांनाच आनंद वाटतो. जे प्रलोभनानं वा पैसे घेवून पुरस्कार मिळवीत असतील. परंतु तो आनंद क्षणभर असतो. अन् जो पूर्वनियोजित पद्धतीनं पुरस्कार नसतो. त्यावेळेस अशा कार्य करणाऱ्याला पुरस्कार मिळाल्यास जो आनंद असतो. तो खरोखरच वाखाणण्याजोगाच असतो."
        "माहित आहे, देशाचे जे सर्वोच्च पुरस्कार असतात. त्याही पुरस्कारात प्रस्ताव लागतो व प्रस्ताव मागवला जातो. असे बर्‍याच लोकांना प्रस्ताव मागवून घेवून पुरस्कार दिले गेले आहेत. परंतु जी मंडळी खरं कार्य करतात. त्यांना कोणाच्याही शिफारशीची आवश्यकता नसते व त्यांना कुणाच्या पुरस्कार घेण्याची गरज नसतेच. मी तर असेही व्यक्ती पाहिले की सरकारचं मानधन सुरु व्हावं म्हणून लोकांना पोवाडा लिहून मागतात व मीच लिहिला पोवाडा असं सांगून व जाहिर करुन सरकारचं मानधन सुरु करुन घेतात. याही वर जावून असेही व्यक्ती पाहिले की ज्यांनी कुणाला मिळालेल्या शिल्डचे व्हाट्सअपवरील फोटो काढून ते मानधन मिळविण्यासाठी जोडले व सरकारी मानधन मिळवले. हा घोटाळाच आहे. पुरस्कार घोटाळा. अर्थातच आजही असे लोकं दिसतात की ज्यांना मोठमोठे पुरस्कार असतात. त्यांच्याकडे कार्य मात्र शुन्य असतं. ज्यांना नीट लिहिता येत नाही. नीट बोलताही येत नाही. त्यांच्या कार्याकडे मागं वळून पाहिल्यास त्याला तशा स्वरुपाचा पुरस्कार कसा मिळाला? याची कीव येते. खरंच अशा लोकांना खाजगी संस्था पुरस्कार देतात, ठीक आहे. परंतु सरकार जर अशा लोकांना केवळ प्रस्तावाच्या आधारावर पुरस्कार देत असेल तर शंकाच व्यक्त होते आणि या पद्धतीनं जर पुरस्कार मिळत असेल तर असे पुरस्कार देण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा पुरस्कार न मिळालेले बरे. शिवाय असे पुरस्कार न मिळाल्यास निष्काम कार्य करणाऱ्यांचं काहीच अडत नाही. त्यांचं कार्य अखंड अविरत सुरु असतं. मग त्यांना पुरस्कार मिळो अगर न मिळो."
         "खरं आहे तुमचं म्हणणं. पुरस्कारही देण्यात यावा. त्यासाठी एक वेगळी समीती असावी. तो प्रस्तावावर आधारीत नसावा. त्यासाठी भेदक अशी नजर असावी. ज्याप्रमाणे आकाशात उंचीवर उडत असलेल्या घारीला जमीनीवर चालत असलेलं लहानसंही भक्ष तिच्या तीक्ष्ण नजरेनं दिसतं व ती टिपते. तसंच तीक्ष्ण लक्ष पुरस्कार देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या समीतीचं असावं. तिनं प्रस्ताव न मागवता शोध घ्यावा व त्याचीच शिफारस करुन त्यालाच पुरस्कार प्रदान करावा. जेणेकरुन त्याला देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल कोणीच ताशेरे ओढणार नाहीत. पुरस्कार स्विकारणाऱ्यालाही समाधान वाटेल व पुरस्कार देणाऱ्यालाही समाधान वाटेल. त्यातच त्या पुरस्कारालाही समाधान वाटेल. यात शंका नाही. जर असा पुरस्कार एखाद्याच्या हातून कार्य न घडता देण्यात आला तर निश्चितच तो व्यक्ती आनंदी होईल. अन् त्यानं पुरस्कार देणाऱ्यालाही आनंद होईल. परंतु त्या पुरस्काराला आनंद होणार नाही. हे तेवढंच खरं."
          "आदर्श शिक्षक पुरस्कार नेमका कोणाला आणि का द्यावा. याचेही काही नियम वा निकष असावेत."
         ते त्यांचं बोलणं. बोलणं संपलं होतं. तोच त्याला गतकाळ आठवला. ज्या काळात आदर्श शिक्षक पुरस्काराची तयारी सुरु होती. तसा तो विचार करु लागला.
         'आदर्श शिक्षक पुरस्काराची तयारी सुरु आहे व पुरस्कार वास्तवतेवर धरुन असावेत. यावर भर दिला जात आहे. त्यानुसार पडताळणी सुरु आहे. परंतु कोण आदर्श? हा प्रश्न आहे शिक्षकांसमोर. असे शिक्षक की जे सुसंपन्न भागातील शाळेत शिक्षक आहेत. ज्यांना तारेवरची कसरत करावी लागत नाही. तसेच असे शिक्षक की ज्यांच्या शाळा सुसंपन्न सोयी नसलेल्या आदिवासी भागात आहेत. जिथं तारेवरची कसरत करावी लागते. तरीही ते शिक्षक तारेवरची कसरत करतात. असे शिक्षक की ज्यांच्या शाळा झोपडपट्टीत आहेत. त्याही ठिकाणी तारेवरची कसरत होते. खरं तर पुरस्कार अशाच शाळेचा विचार करुन अशाच शाळेतील शिक्षकांना द्यावा की ज्यातून अशा पुरस्कारालाही स्वतःचं समाधान वाटेल. सध्या राज्यात सावित्रीबाई फुलेंच्या नावानं शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत व प्रस्तावावरुन रणकंदन आहे. अर्ज भरावा लागणार आहे व अर्ज भरल्यावर त्याची छानणी होणार आहे. खरंच त्या प्रस्तावानुसार संबंधीत व्यक्ती त्या पुरस्काराच्या लायक आहे काय? अर्थात तो संबंधीत पुरस्काराच्या पात्र आहे काय? हेही तपासले जाणार आहे व त्याची सुरुवात झालेली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार. त्याची तपासणी करीत असतांना अधिकारी वर्ग अगदी डोळ्यात तेल घालून तपासत आहेत की त्या शिक्षकांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्या वर्गात किती ज्ञान प्राप्‍त आहे? सर्वच मुलांना वाचता येते काय? ती मुलं भाषा आणि गणित विषयात निपुण आहे काय? त्या मुलांचा मागील पाच वर्षातील रेकॉर्ड कसा आहे? ती मुलं मागील पाच वर्षांत किती प्रतिशत प्राविण्यपात्र झालीत? म्हणजेच ती मुलं नव्वद टक्क्याच्या वर प्राविण्यपात्र आहेत का? असतील तर त्या शिक्षकाला पाच गुण मिळणार आहेत. अन् वर्गात घेतलेल्या निपुण चाचणीत सर्वच मुलं जर प्राविण्यपात्र आढळलीत की त्यावर पंधरा गुण आहेत. उरले अंशी गुण. यामध्ये त्या शिक्षकांनी शाळेत शिकवीत असतांना इतर प्रकारचे कोणते तीर मारले. त्याचंही मूल्यांकन आहे. याच अंशी गुणांच्या आधारे शिक्षक आदर्श ठरणार आहे. आता पाहुया की कोण यावर्षी आदर्श ठरेल ते. परंतु या आदर्शतेच्या कसोटीत काही बाबी सांगणे क्रमप्राप्त ठरेल.'
           तो त्याचा विचार. त्यानं आवंढा गिळला. तोच पुन्हा नवीन विचार त्याच्या मनात आला. 
           'पुरस्काराचाही घोटाळा होतोच. मीना खरंच बोलत होती. इथे जो आदर्श नसतो. त्याला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळतात. आता देशाचीच बाब घेवू. देशात सत्तेवर बसलेले असेही नेते आहेत की ज्या नेत्यांवर डाग आहेत. डाग याचा अर्थ गुन्ह्यांचा डाग. गुन्हे अर्थात ज्यांनी बलात्कार केला. ज्यांनी खुन केले. ज्यांनी दंगे घडवून आणले. त्या लोकांवर शासनानं गुन्ह्यांची नोंद केली. परंतु त्यांना पक्षानं तिकीट देवून जे निवडून आले. असे डाग लागलेले नेते. हे नेते डाग असूनही सत्ता चालवतात. हे देशाचं चित्र आहे. असे असतांना देशातील आदर्शपणाचा पुरस्कार आदर्श कसा ठरवायचा? ही देखील विचार करण्यालायक बाब आहे.'
        'आदर्श शिक्षक पुरस्कार. त्याची तयारी ही पाच वर्षापासूनच केली जाते. आपल्या शाळेतील अमूक अमूक शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवून घ्यायचा. मग साऱ्याच स्वरुपाचं सेटिंग. पाच वर्षाचा रेकॉर्ड मागतात ना, शिक्षकांच्या शिकविण्याचा. विद्यार्थी अ श्रेणीतच पाहिजे ना. मग आधी अधिकारी वर्गाला विश्वासात घेतलं जाते. त्यानंतर पेपर घेतले जातात. आकारीक मूल्यमापन हे शिक्षकांकडेच असल्यावर गुण वाढवून भरले जातात. जरी त्या मुलांना बरोबर येत नसेल तरीही. राहिला पेपरचा प्रश्न. तर तेही पेपर विद्यार्थ्यांना चक्कं फळ्यावरच सोडवून दिले जातात. ज्यात फक्त पाहून लिहायचं सांगीतलं जातं. जे फळ्यावरचं लिहिलेलं विद्यार्थी बरोबर तंतोतंत पाहून लिहू शकतात. जे कितीही कोणत्याही विषयात अक्षम असले तरी. त्यातच आणखी एक गंमत म्हणजे काही विद्यार्थ्यांचे पेपर हे त्याला लिहिता न आल्यानं त्याच्या बाजूच्याच मुलांकडून लिहून घेतले जातात. ज्यात मुलांची गुणवाढ होते व ते अ श्रेणीत येतात. परंतु यातही काही शिक्षक असेही आहेत की ते वास्तवांवर भर देतात. आपल्याला आदर्श पुरस्कार मिळो अथवा न मिळो. त्यांना त्या पुरस्काराशी काही घेणदेणं नसतं. ते आपलं कार्य करीत असतात. जे आपल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवीत नाहीत. ना आकारीकचे गुण वाढवत ना वर्गात घ्यायच्या लेखी पेपरचे गुण वाढवत. ज्यातून अशा शिक्षकांची बरीचशी मुलं क अथवा ब श्रेणीत येत असतात. यात सत्यत्वावर व वास्तविकतेवर जो शिक्षक चालतो. त्या शिक्षकांनी आपलं कसब कितीही पणाला लावलं तरी पळसाला पानं तीन या पद्धतीनं मुलांना गुण कमी पडतीलच. यात शंका नाही. म्हणूनच क व ब श्रेण्या. यावरुन तसा शिक्षक आदर्श नाही. हे ठरवता येत नाही. दुसरा महत्वपुर्ण मुद्दा. आदर्शतेच्या कसोटीत अशाही काही शिक्षकांच्या शाळा आहेत की त्या शाळेत सुशिक्षीत पालकांची मुलं आहेत. जे सुशिक्षीत पालक आपल्या विद्यार्थ्यांना घरीही शिकवतात. त्यातच त्यांना शाळेतून घरी आल्यावर वेगळ्या अशा शिकवणी वर्गाला पाठवतात. तसंच शाळेतही त्यांचा अभ्यास व्यवस्थित होतो. अशा शाळेतील शिक्षकांनी स्वतः थोडंसं कमी शिकवलं तरी त्यांची मुलं प्राविण्याच्या रांगेत नक्कीच जातीलच. त्यावरुन अशा शिक्षकांना आदर्श ठरवता येवू शकेल काय? नाही. कारण अशा शाळा या सुशिक्षीत पालकांच्या सुसज्ज भागात असल्यानं विद्यार्थीही सुसंपन्न स्वरुपाचे असणारच. यात शंका नाही. मात्र त्या शाळेतील शिक्षक नाहीत.'
         'महत्वाचं म्हणजे शिक्षकांच्या गुणांकणाची तपासणी करतांना एक बाब पाहिली जाते. ती म्हणजे त्या शिक्षकांच्या वर्गाचा मागील पाच वर्षाचा निकाल किती आहे. तो अ श्रेणीत आहे काय? अ श्रेणी अर्थात त्या शिक्षकांच्या वर्गातील मुलांना नव्वद प्रतिशत पेक्षा गुण जास्त आहेत का? याबाबत विचार करतांना काही शिक्षक याचा विचार आधीपासूनच करतात व ते आपल्याला आदर्श पुरस्कार मिळावा यासाठी सदर विद्यार्थ्यांना घडविण्याऐवजी फक्त आपल्या विद्यार्थ्यांचे गुण कसे वाढतील यावर जास्त भर देत असतात. अ श्रेणीतच मुलांना आणायचं आहे ना. मग ते शिक्षकांसाठी सोपं काम आहे. शिक्षकांच्या हातात असलेले आकारीकचे गुण वाढवा. त्यातच बरेचसे शिक्षक हे लेखी पेपरचेही गुण वाढवू शकतात. कारण तेही पेपर शिक्षकांच्या हातातच असतात. विद्यार्थ्यांकडून शिक्षक पेपर सोडवून घेत असतांना संबंधीत वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना अगदी फळ्यावर लिहून पेपर दिला जातो व तो लिहायला सांगीतलं जातं. जरी त्या शाळेत कोणी त्या काळात अधिकारी वर्गभेटीला येत असेल तरी त्यालाही मॅनेज केलं जातं. हा झाला शिक्षकांच्या आदर्शपणाचा इतिहास. पुढं त्या शिक्षकांनी केलेलं इतरही खाजगी काम पाहिलं जातं. जे खाजगी काम सेवेच्या स्वरुपात असेल तर ते धरलं जातं. अर्थात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संसोधन केलं काय? काही पुस्तकं लिहिली काय? काही उपक्रमं राबविलीत काय? काही नवसाक्षरतेचे वर्ग घेतले काय? काही वर्तमानपत्रातून लेखन केलं काय? काही अभ्यासक्रम निर्मितीची कामं केलीत काय? त्यात सहभाग घेतला काय? अन् एखादा सरकारी पुरस्कार मिळाला काय? मात्र यातच शिक्षक गळतो व तो आदर्श ठरत नाही. काही काही तरतातही. जे घोटाळेबाज असतात. ते शिक्षक तर चक्कं प्रमाणपत्रच पैशाच्या जोरावर विकतही घेतात. याही वर जावून काही काही शिक्षक एखाद्या लहानशा शुल्लक बाबींचा एवढा गाजावाजा करतात की त्यांच्यासारखा जगात कोणीच नाही. हे जरी खरं असलं तरी याही पुढं एक जग आहे. ते म्हणजे वास्तविकतेवर जगणं. असेही काही शिक्षक आजही समाजात आहेत की त्यांना असा गाजावाजा करण्याशी काही संबंध नाही. त्यांचं जगणं वास्तविकतेवर असतं. त्यांना पुरस्कार मिळो अगर न मिळो, ते आपलं कार्य अगदी इमानीइतबारे करीत असतात. ज्यांचा विचार माणसं जरी करीत नसले तरी या पृथ्वीतलावरील ती एक शक्ती करते. जी दिसत नाही. तीच सन्मान मिळवून देते. जन्माच्या वेळेस नाही तर मृत्यूनंतर, बऱ्याच वर्षांनी. ज्यातून कुणाला मरणानंतर भारतरत्न मिळतो. ज्यातून मरणानंतर एक हजार वर्षानं मुकुंदराज दिसतो. ज्यातून मरणानंतर तुकाराम महाराज. या मातीत संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई व सोपानदेव होवून गेले. याच मातीत कितीतरी संत महात्म्ये व थोर पुरुष होवून गेले की त्यांनी फक्त कार्य केलं. ते जीवंत असतांना फळाची अपेक्षा केली नाही.'
          'विशेष म्हणजे आदर्श शिक्षकांचेही पुरस्कार देण्यात यावेत. परंतु कोणाला? त्या आदिवासी भागातील शिकविणाऱ्या सर्वच शिक्षकांना की ज्यांचा शिकविण्यासाठी कस लागतोय. बिचारे पाण्यापावसात. हिंस्र श्वापदांच्या सावटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दररोज शाळेत जातात. तसेच काही शिक्षक पाण्यात नदीला पूर असतांना त्या पुरात पोहून शाळेत जात असतात. त्यांच्या वर्गातील विद्यार्थी प्राविण्यपात्र नसतातच. परंतु ते शिक्षक त्याच्या वर्गातील विद्यार्थी शिकला पाहिजे, यासाठी कार्य करतात. यावरुन त्या शिक्षकांच्या गुणांकणाचा दर्जा ठरवता येत नाही. तसाच आदर्श शिक्षकाचा पुरस्कार त्यांना द्यावा की ज्या शाळेत झोपडपट्टीतील मुलं असतात. ज्यांचे मायबाप पोट भरण्यासाठी सकाळी आठला घरुन निघून रात्री आठला घरी येतात, सर्व विश्वास शिक्षकांवर टाकून. अशा शाळेतील शिक्षक स्वतःच त्या मुलाचे आईबाप बनून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यासाठी बराच कस लागतो. खरं तर सुसंपन्न, सुसंस्कृत, सुसज्ज व सुशिक्षीत भागातील विद्यार्थ्यांना शिकविणं सोपं आहे. त्यांना प्रगत करणंही सोपं आहे. परंतु खरी कसरत असते, झोपडपट्टीतील मुलं शिकविण्यात व आदिवासी ग्रामीण भागातील मुलं शिकविण्यात. ज्या मुलांना कितीही वारंवार पटकावून सांगीतलं तरी लिहिणं वाचणं येत नाही. त्यांना लिहिणं वाचणं लवकर शिकवता येत नाही. खरं तर त्यांनाच शिकविणारे शिक्षक हे आदर्शवादी असतात. परंतु ते कधीच पुढं येत नाहीत. शासन आणि कोणीच त्यांना पुढं येवू देत नाहीत. ते त्याच मातीत जगतात. त्याच मातीला ते आपलं समजतात व त्याच मातीतील मुलांना घडवतात, आपल्या प्रामाणिकपणानं. तशीच त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराची गरज नसतेच. ना ते कोणत्याही स्वरुपाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविण्याचा प्रस्तावही सादर करत. खरं तर शासनानं याचीच दखल घ्यावी व आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव न मागवता अशाच शिक्षकांना शोधावे व पुरस्कार द्यावा. जेणेकरुन त्या पुरस्कारालाही सन्मान वाटेल. परंतु असे घडत नाही. पुरस्कार मिळाल्यानंतर तो पुरस्कार शेवटच ठरतो पुरस्कार्थीसाठी. एकदा तो पुरस्कार मिळाला की आदर्श पुरस्कार मिळविलेली मंडळी अवकाशातील पॅसिडान या ग्रहाप्रमाणे अदृश्यच होवून जातात. तसेच ज्यांच्या खिशात अधिकारी, पदाधिकारी असतात आणि अंगात साम, दाम, दंड व भेद वापरण्याची कला असते. त्यांनाच आजच्या काळात पुरस्कार मिळतात. हे बरोबर आहे.'
          सोहेल विचार करीत होता. त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. ते प्रश्न त्याच्या मनात विचारांचं काहूर माजवत होते. डोकं भारी वाटत होतं. तोच त्याला वाटलं की ही बाब आपण मीनाला सांगावी. कदाचित भारी झालेलं डोकं हलकं तर होईल. तोच त्यानं फोन लावला. तशी मीना फोनवर आली. बोलकी झाली. 

********************५*******************

           पुरस्कार खरे ठरावेत. सोहेलचं म्हणणं. तसा पुरस्काराचा मेळावा लागला होता. तसं बोलणं सुरु झालं. 
          "मीना, आज पुरस्कार कोणालाही मिळू लागले आहेत. फक्त त्यासाठी थोडीशी ओळख असायला हवी व थोडासा पैसा. कारण आजचा काळच आहे, पैसे फेक व तमाशा देखसारखा. पुरस्काराची आज पाहिजे त्या प्रमाणात गरिमा राहिलेली नाही. किंबहुना, सरकारी पुरस्कार सुद्धा, आजचे पुरस्कार तशाच स्वरुपाचे देण्यात येत आहेत. पुरस्काराची आज जर थोडीशी चौकशी केली तर सत्य काय ते आढळून येईल. मग घोटाळाही सिद्ध होवू शकेल. कारण काही काही ठिकाणी पुरस्कार हे कार्यावरुन नाही तर वशिलतेबाजी, ओळख व पुरेश्या पैशानं विकत घेतलेले आहेत."
        "सोहेल, खरं आहे, तुमचं म्हणणं. आज पुरस्कारासाठी चढाओढ नाही. पुरस्काराची गरिमा नाही. कोणालाही मिळतात असे पुरस्कार. सरकारी पुरस्कार देखील. एखाद्या पुरस्काराची लिंक आली की मग सामान्य लोकंही हवसे, नवशे, गवश्यासारखे ती लिंक भरत असतात. विचार करतात की समजा बोली लागलीच तर आपण बोली बोलू. ज्यातून आपले नावही होईल आणि आपल्याला शासनाकडून पुरेशी रक्कमही मिळेल. जी रक्कम जनता कररुपात पुरस्कारार्थीसाठी गोळा करीत असते. त्यामुळं निदान शासनाचा पुरस्कार तरी अशा व्यक्तींना देण्यात यावा की ज्याचं तशा स्वरुपाचं कार्य आहे. मात्र अशा लिंक भरणाऱ्याच्या यादीत देशातील अशी अशी मंडळी दिसतात की ज्यांचं कार्य हवं तसं, तशा स्वरुपाचं दिसत नाही. मग प्रस्ताव मागविण्यात आल्यानुसार वशिलतेबाजीतून शासनाकडून संबंधीत व्यक्तींना पुरस्कार प्राप्त होतो व तो आनंदी होतो. परंतु समजा अशा व्यक्तीच्या घरी एखादा पत्रकार गेला आणि त्यानं त्याच्या पुर्वाश्रमीच्या कार्याची चिरफाड केली तर निश्चितच त्या पुरस्काराचा घोटाळा लक्षात येवू शकतो. परंतु अलिकडील काळात कोणत्याच पत्रकाराजवळ एवढा वेळ नाही की जो पुरस्काराचा घोटाळा उघडकीस आणू शकेल. त्यातूनच झाकली मूठ सव्वालाखाची हे घडत असतं. मात्र असा पुरस्कार मिळविणारे व्यक्ती हे देशासाठी घातक ठरु शकतात. हे तेवढंच खरं."
         "मीना, हे झालं इतर पुरस्काराच्या बाबतीत. सध्या आदर्श शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबरला देण्यात येतो. संबंधीतांचे प्रस्ताव आलेले आहेत. ज्यात हवशे, नवशे व गवशेही आहेत व प्रत्येकाला वाटतं की माझी वर्णी लागावी. तसं पाहिल्यास शिक्षणक्षेत्रात असेही कोणी मातब्बर आहेत की ज्यांनी तशा स्वरुपाचे प्रस्ताव भरलेले नाहीत. परंतु त्यांचं विशेष कार्य आहे. आदर्श शिक्षकांच्या रांगेत असेही काही व्यक्ती आहेत की ज्यांनी विद्यार्थ्यांचं नंदनवन फुलवलय. परंतु पुरस्काराची अपेक्षा नाही. अन् ते मागणारही नाहीत वा कोणत्याच पुरस्काराच्या लिंकही भरणार नाहीत वा प्रस्ताव पाठविणार नाही. तसंच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवायचा असतो. हेही त्यांना माहित नाही. अशातच ते मागे राहतात व भलत्याच व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतात. जे अहित करु शकतात. हे आतापर्यंत होत गेलं आणि होत जाणार. कारण ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहेत. त्यातील बहुतेक जणांनी पैसे कमविण्यासाठी शाळेतील शिक्षकांना पुरेशी दयामाया न दाखवता व त्यांच्या एकंदर शिकविण्याबाबत विचारविमर्श न करता त्यांना कमकुवत दाखवून त्यांना निलंबित करण्याच्या कार्यात संस्थाचालकांना मदतच केलेली आहे. हे वास्तव चित्र आहे." 
         "सोहेल, कोणतेही पुरस्कार हे पुरेसे पैसे कमविण्यासाठी नसतातच. त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. मात्र असे पुरस्कार मिळविणारे व्यक्ती समाजात वावरतांना एक प्रकारचा अहंभाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसतो. आम्ही विशिष्ट व्यक्तीमत्व. आमच्यासारखा दुसरा कोणीच नाही. असा आविर्भाव. ज्यातून तो एक विशिष्ट व्यक्ती आहे. हे सिद्ध होतं. मात्र एकंदर त्या व्यक्तीचा पुर्वइतिहास तपासून पाहिला तर त्याचं कार्य शुन्य दिसतं व लोकांना तोंड फुटतं की त्याला पुरस्कार कसा मिळाला? त्याचं कार्य तर काहीच दिसत नाही. निदान शिक्षणक्षेत्रातील पुरस्काराबाबत असं होवू नये. कारण या क्षेत्रातील पुरस्काराला एक वलय आहे. एक विशिष्ट प्रकारचं महत्व आहे. ज्याला हा पुरस्कार मिळेल. त्याच्याबद्दल इतरांना नक्कीच वाटायला हवं की व्वा, यावर्षी शासनानं योग्य व्यक्तींची निवड केली व योग्य व्यक्ती निवडला गेला."
           "मीना, शिक्षणक्षेत्र व या शिक्षणक्षेत्रातील पुरस्कार कोणाला द्यावेत? असा प्रश्न पडतो. तर तो द्यावा, जो शिक्षक अनाथ, आदिवासी, अक्षम, मतीमंद, अपंग, शोषीत, गरजवंत मुलांसाठी कार्य करतो. त्यांना आपल्या वेतनातून पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देतो. त्यांच्या पुरेसे समोर जाण्यासाठी नव्हे तर प्रगत होण्यासाठी प्रयत्न करतो. कारण प्रगत मुलांना आणखी प्रगत करणे. हे पुरस्काराचे कार्य ठरुच शकत नाही. परंतु आज असे पुरस्कार देतांना त्या शिक्षकांचं वास्तविक कार्य तपासलं जात नाही. तपासलं जातं, त्यानं प्रस्तावात काय काय जोडलं आहे. तपासलं जातं, त्या शिक्षकांच्या वर्गातील विद्यार्थी किती प्रगत झालीत. त्यासाठी त्या शाळेचं ठिकाणही तपासलं जायला हवं. जे तपासलं जात नाही. मग प्रस्ताव जरी बनावट असेल, तरी प्रस्तावात जोडले ना कागदपत्र. मग पुरस्कार. आपल्या खिशातून काय जातं? शासनाचं जातं ना. ही भावना. ज्यातून संभाव्य स्वरुपात पुरस्काराचा घोटाळाच दिसतो. मुद्दा एवढाच की तो पुरस्कार कसाही मिळो. उजेडात येत नाही. म्हणूनच सारंच खपतं. मात्र पुरस्कारातही सन्मान असावा. पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करणे म्हणजेच भीक मागणे, असा उद्देश पुरस्काराचा होवू नये."
         "सोहेल, पुरस्काराची चौकशी व्हायला हवी. असं काही लोकांचं म्हणणं. तसं लोकांचं म्हणणं खरंच आहे. कारण आज पुरस्कार जर पाहिजे असेल तर प्रस्तावाला अतिशय महत्व आहे. खरा कलावंत कोण? हे ओळखणं काटकसरीचं काम असल्यानं आयोजक खरा कलावंत शोधत नाही. तो प्रस्ताव मागवतो व त्याच प्रस्तावातून ज्यांचं कार्य चांगलं असेल, त्याला पुरस्कार प्रदान करतो."
          "मीना, आदर्श शिक्षक पुरस्कार हा भीकेचा एक प्रकारच वाटतो मला. असं काहींचं म्हणणंही आहे. कारण ज्याप्रमाणात भिक्षेकरी मंडळी जेवनासाठी रांगेत लागतात व जेवन घेतात. तशीच आजच्या काळात पुरस्काराने पुरस्कारार्थीची गंमत करुन टाकलेली आहे. ज्याला पुरस्कार पाहिजे, त्यानं प्रस्तावाची रांग लावायची. मग आम्ही त्यांना पुरस्कार देवू. मग ज्याप्रमाणात एका रांगेत असलेल्या सर्वच भिक्षेकऱ्यांना जेवन मिळत नाही. तसेच पुरस्कारही सर्वांनाच मिळत नाहीत. ही वास्तविकता आहे."
          "सोहेल, पुरस्काराबद्दल आणखी सांगायचं झाल्यास एका तत्ववेत्यानं म्हटलं की पुरस्कार जसा घेणारा योग्य असायला हवा. तसाच तो देणाराही योग्य असायलाच हवा. आता तर असं आहे की पुरस्कारासाठी बोली लागलेली आहे. तीस तीस ते चाळीस चाळीस हजार रुपये बोली आहे सद्यकाळात. एक प्रकरण तर असं आहे की पुरस्कारामध्ये एका व्यक्तीला विचारपीठावरुन पंचवीस हजार रुपये रक्कम देण्यात आले व ते जाहिरही करण्यात आले व नंतर त्या व्यक्तीचे विचारपीठावरुन खाली उतरताच ती रक्कम परत मागण्यात आली. काही ठिकाणी पॉकीट बंद करुन पंचवीस हजार रुपये दिल्याचं जाहिर केलं जातं व पॉकिटात पंचवीस हजार रुपये राहात नाहीत. कमी असतात. त्या व्यक्तीला आधीच सांगीतलं जातं की त्यानं ते जाहिर करुन आयोजकाची बदनामी करु नये. नाहीतर त्यांचं नाव पुरस्कारासाठी घेण्यातच येणार नाही. मग जुळवाजुळव. पुरस्कार पाहिजे ना. मग जुळवाजुळव करावीच लागणार. एवढी लाचारी झाली आहे, आज पुरस्कार मिळवातांना. काही पुरस्कार असेही आहेत की पंचवीस हजार रुपये द्या. आम्ही तुम्हाला विचारपीठावरुन दहा हजार रुपये देवू. त्यानंतर पंधरा हजार रुपये आयोजनासाठी ठेवू. मान्य असेल तर पुरस्कारासाठी हो म्हणा. नाहीतर नाही." 
          "मीना, हे विचार झाले पुरस्काराच्या बाबतीतील. आता मानद डॉक्टरेटचं पाहू. अलिकडे मानद डॉक्टरेट अथवा तत्सम मानद स्वरुपाची पदवी देण्याचेही प्रसंग घडतात. आता काही लोकं मानद डॉक्टरेट देवू लागले आहेत. त्याचे तीस - तीस, चाळीस - चाळीस हजार रुपये घेवू लागले आहेत. ज्यातून कुणालाही डॉक्टरेट दिली जाते व ज्याला डॉक्टरेट मिळते. तो व्यक्ती डॉक्टरेटसाठी पात्र नसतो. ना त्याचं कार्य असतं. ना त्याचं थेसीस असतं. ना कोणतं संशोधन. ना कोणतं त्यांचं लेखन असतं. तसाच डॉक्टरेट देणारा व्यक्तीही त्याच्या लायक नसतो. जसा की तो कुलगूरु नसतोच कोणत्याच विद्यापीठाचा. तरीही तो व्यक्ती डॉक्टरेटची पदवी बहाल करतो. हा भाग विसंगत वाटत असतो. तरीही डॉक्टरेट. ती डॉक्टरेट ज्याला मिळतो. फक्त त्यालाच आनंद होतो. इतरांना होत नाही. कारण अशा व्यक्तीला डॉक्टरेट कशी मिळाली. हे सर्व संबंधितांना माहित असतं."
         "सोहेल, शासनही कधीकधी अशाच स्वरुपाचे पुरस्कार देत असतात. ज्यातून अशा पुरस्कारात शासन पैसेही देतात, पुरस्कारार्थीला. परंतु तो जर लायक नसेल तर त्या पुरस्काराची गरिमा संपते. हे खरं आहे व त्यातून नक्कीच पुरस्कार घोटाळा सिद्ध करता येवू शकतो. जसं असा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला मिळाल्यास त्या पुरस्काराबाबत एखाद्यावेळेस एखाद्या पत्रकारानं मुलाखत घेतली आणि त्या पत्रकाराला मुलाखतीदरम्यान संबंधीत व्यक्तीचं कार्यच दिसलं नाही. तर नक्कीच हा घोटाळा झाला. असं सिद्ध होतं. कारण बरेचसे पुरस्कार असेच देण्यात येत आहेत आजच्या काळात. पुरस्कार भरपूर आहेत. परंतु त्यामानानं तशा स्वरुपाचं कार्य दिसत नाही. ना एखाद्यावेळचे सामाजिक कार्याचे फोटो दिसत, ना एखाद्या सामाजिक कार्याचा व्हिडीओ. ही वास्तविकता आहे. जर शासनही अशा स्वरुपाचे पुरस्कार पुरस्कारार्थींना प्रदान करीत असेल, ज्याचे सामाजिक कार्य नसेल. तर अशा पुरस्काराने शासन जनतेची दिशाभूल करीत आहे. हे लक्षात येते. कारण पुरस्कारासाठी शासन जी रक्कम वापरते. ती रक्कम ही जनतेचीच असते. जनता तीच रक्कम कररुपात शासनाकडे गोळा करीत असते."
         "मीना, महत्वाचं म्हणजे पुरस्कार हे भीक संबंधाने नसावे. त्याचा विशिष्ट असा दर्जा असावाच. कारण समजा ज्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात आले. त्या व्यक्तींना लोकांनी त्या पुरस्काराच्या स्वरुपात सन्मान द्यावा. हे तेवढंच खरं. जेणेकरुन पुरस्काराची गरिमा टिकून राहिल. मग त्या पुरस्काराची चौकशी केली तरी तो पुरस्कार अवैध ठरणार नाही. वैधच ठरेल? यात शंका नाही."
        खरंच शिक्षक आदर्श नाहीत काय? सोहेलचाही तो विचार. तसा विचार येताच तो त्यावरही तिच्याशी बोलू लागला.
        "मीना, आदर्श शिक्षक पुरस्कार...... शिक्षकांच्या आदर्शपणाला सिद्ध करणारी परिक्षाच. तसं पाहिल्यास बरेचसे शिक्षक इमानीइतबारे काम करतात. ते सर्वच आदर्श असतात. परंतु अलिकडील काळात शिक्षकांना आपलं आदर्शपण सिद्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा लागत आहे. ज्यातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतात. हे जरी खरं असलं तरी काही शिक्षक आदर्श शिक्षकांच्या पुरस्कारासाठी अर्ज सादर करतात. ज्यात थोडा तरी स्वार्थ असतोच. असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही."
           "सोहेल, शिक्षक आदर्श नाहीत. असं शासनाचं म्हणणं. ज्यातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळू लागले आहेत आणि शासन ते देत आहे. अन् ते म्हणणं खरंही आहे शासनाचं. कारण बरेचसे शिक्षक तांदळातील खड्यासारखे शाळेत दारु पिवून जातात. कोण्या आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार करतात. कधी खुनही करतात. बरेचसे शिक्षक शाळेलगतच पानटपरीवर जावून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ खातात. यावरुन शिक्षकांच्या आदर्शपणाबाबत शंकाच येते व ही वास्तविकताच आहे."
         "मीना, अलिकडील काळात शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आदर्श शिक्षक पुरस्काराची योजना आहे. जो शिक्षक आपल्या शाळेत, आपल्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करतोय. त्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतात. "
        "सोहेल, आदर्श शिक्षक पुरस्कार. तसं पाहिल्यास तांदळात जसे दोन चार खडे असतात. तसे दोन चार खडे जर सोडले तर प्रत्येकच शाळेतील सर्वच शिक्षक हे आदर्श असतात. परंतु नेमक्या दोनचारच शिक्षकांना केवळ प्रस्तावाच्या आधारावर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतात. ही शोकांतिकाच आहे. पुरस्काराबाबत सांगायचं झाल्यास तांदळातील काही दोनचार शिक्षक सोडल्यास सर्वच शिक्षक हे आदर्श शिक्षक असतात. त्याचं कारण आहे, ते करीत असलेली कामं."
         "मीना, एका शिक्षकाच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक शिक्षक शाळेतील अनेक कामे करतात. ते एस आय आर ची कामं करतात. जनगणना करतात. शिक्षकांना प्रशिक्षण देतात. लोकांच्या शौचालय बांधकामास मदत करतात. श्वान मोजतात. शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना शाळेत आणतात. निवडणूक आल्यास त्याची जबाबदारी पार पाडतात. मतदानाबाबत जनजागृती करतात. विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करुन घेतात. ऑनलाईन कामंही करतात. एवढंच नाही तर शिक्षक कोरोनासारखी विपरीत परिस्थिती देशात निर्माण झाल्यास त्या काळातही काम करतात. ही सर्व कामं बरेचसे शिक्षक करीत असतात. त्या व्यतिरिक्त शाळेत खिचडी बनविण्याचे वा त्याकडे सातत्यानं लक्ष देण्याचेही काम शिक्षक करतात. त्यातच मुलांची उंची वजन मोजून त्याचे तक्तेही बनविण्याचे काम शिक्षकांकडे असते."
         "शिक्षकांच्या कामाच्या बाबतीत आणखी सांगायचं झाल्यास बरेचसे शिक्षक सकाळी जेव्हा कामाला जातात व आपल्या कार्याला सुरुवात करतात. तेव्हा सकाळपासून त्याच्या मागे कामाची रेलचेल असते. ज्यातून त्यांची त्रेधातिरपीट उडते. त्यातच आता थोडीशी पटसंख्या कमी झाल्याने एकाच शिक्षकाला एकापेक्षा जास्त वर्ग पाहावे लागतात. त्यातच ऑनलाईन कामं. वरुन पेपर घेणं आणि ते तपासून त्याचा निकाल जाहीर करणं. अभ्यासक्रम लेखन, पाठनियोजन लिहिणं. वेतनाची बिलं, खिचडीची बिलं तयार करणं. विद्यार्थ्यांना वाचता लिहिता यावं व तो सर्वच विषयात निपुण व्हावा म्हणून वेगवेगळी उपक्रम घेणं. ही देखील कामं करीत असतात व त्याची फलश्रुती ही त्याच्या अध्यापनात व विद्यार्थ्यांच्या अध्ययनात उतरत असते. फरक एवढाच की अशी वेगवेगळी कामं करीत असतांना बरेच शिक्षक, त्यांनी केलेल्या कार्याची नोंद ठेवत नाही. कारण शिक्षकच असा घटक आहे की त्याला फक्त कार्य करता येतं. तो फळाची अपेक्षा करीत नाही वा दिखावा करीत नाही. तो विद्यार्थ्यांच्या नोंदी प्रसंगी ठेवेलही. परंतु स्वतःच्या कर्तृत्वाच्या नोंदी ठेवत नाही वा त्या बाबतचा प्रस्ताव तयार करुन दिखावा वा गाजावाजा करीत नाही. प्रस्तावही तयार करुन शासनाकडे पाठवीत नाही. कारण त्याला तेवढं करायला वेळच मिळत नाही. जो शिक्षक इमानीइतबारे आपल्या कार्यक्षेत्रात कार्य करतो त्याला."
         "शिक्षकांनाही पुरस्कार असावेत. परंतु कोणत्या? जे प्रस्ताव तयार करुन पाठवतात त्यांना की जे प्रस्ताव तयार करीत नाहीत. परंतु कार्य करीत असतात, फळाची अपेक्षा न करता त्यांना. साहजीकच उत्तर असेल की जे फळाची अपेक्षाच करीत नाहीत, त्यांना पुरस्कार मिळायला हवा. परंतु त्यांना पुरस्कार कसा मिळेल? जे प्रस्ताव तयार करुन पुरेसं शासनाच्या लक्षातच आणून देत नाहीत. मग शासनाला तरी कुठं समजेल त्यांचं कार्य? कदाचित ते शिक्षक त्यातूनच मागं राहतात व मागं पडतात. असे निःस्वार्थ हेतूनं आपले चांगले, वा उत्कृष्ट कार्य करणारे बरेचसे शिक्षक प्रत्येकच शाळेत आहेत की जे विद्यार्थ्यांसाठी झटतात. आपले विद्यार्थी पुढे गेले की त्यांना आनंद होतो आणि तेव्हा जास्त आनंद होतो. ज्यावेळेस त्यांच्या हातून शिकलेली मुलं मोठमोठ्या हुद्द्यावर गेलेली असतात आणि त्यापेक्षाही मोठा आनंद म्हणजे ती मुलं जेव्हा त्यांना भेटायला येतात व त्यांच्या पायावर नतमस्तक होतात. एवढंच नाही तर काही विद्यार्थी जेव्हा असा शिक्षक व्याधीनं रुग्णालयात दाखल झाल्यावर व मुलानं त्यांना औषधपाण्याचं टाळून दिल्यावर त्याच शिक्षकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर रुपात मिळतात. त्यातच ते अगदी निःशुल्क आपल्या शिक्षकांवर उपचार करतात. तेव्हा तर फारच आनंद होतो शिक्षकांना. अन् त्यावरुनही जास्त आनंद म्हणजे वृद्धाश्रमात खितपत पडलेल्या आपल्या शिक्षकांना त्यांचे विद्यार्थी जेव्हा उपकाराची परतफेड म्हणून घरी नेवून त्यांची सेवा करतात. हे शिक्षकांच्या आनंदाचे प्रकार. अशा प्रकारच्या आनंदाचे क्षण एका शिक्षकांच्या जीवनात येणे. याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणे म्हणता येणार नाही काय? फरक एवढाच की आदर्श शिक्षक पुरस्कार हा शासनातर्फे मिळतो आणि अशा प्रकारच्या सेवेतून आनंदाचे पुरस्कार हे त्यांच्या विद्यार्थ्यांकडून मिळतात." 
          "प्रस्ताव...... प्रस्ताव कोण तयार करतो? ज्या शिक्षकाच्या मनात थोडासा तरी स्वार्थ असतो. वाटतं की माझं वेतन पुरेसं वाढावं. कारण शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळताच इंन्क्रीमेंटमध्ये वाढ होते. वाटतं की मला पुरस्कार राशी मिळावी. कारण त्या पुरस्कारात एक लाख रुपये बक्षीस राशी असते. वाटतं की माझं नाव व्हावं. कारण त्या पुरस्कारानं पंचक्रोशीत नाव होतं की अमूक अमूक व्यक्तीला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय. अन् त्यातूनही मोठा स्वार्थ म्हणजे पैसे कमवता येणं. जर एखाद्या खाजगी संस्थेला एखाद्या चांगल्या शिक्षकाला निलंबित करायचे असेल तर त्यावर आदर्श शिक्षकाची स्वाक्षरी लागते. ज्यात त्या शिक्षकाला मोठी व तगडी रक्कम दिली जाते. हे पैसे कमविण्याचं साधनच झालं नव्हे तर स्वार्थ. ज्यातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविण्यासाठी बरीचशी शिक्षक मंडळी धजतात नव्हे तर हिरीरीनं प्रयत्नही करतात."
          "काही शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार हा शासनाचा मिळतोय. जर प्रस्ताव चांगल्या सुनियोजित पद्धतीनं तयार केलेला असेल तर...... कारण अलिकडील काळात उत्कृष्ट कार्यापेक्षा कागदाला जास्त महत्व आहे. इथं बहुतांश कामगाराला कितीतरी प्रकारचा व वर्षाचा अनुभव असेल, तरी तो अनुभव चालत नाही. तसंच त्याला प्राधान्य मिळत नाही. पदवी महत्वाची ठरते. जरी पदवीधारकांना त्या व्यवसायातील पात्रतेचा पात्र अनुभव व्यवस्थित नसेल तरी. तसंच आदर्श शिक्षक पुरस्काराच्या प्रस्तावाला महत्व आहे. प्रस्ताव कसा तयार केला. याला महत्व आहे. मात्र या प्रस्ताव तयार करण्यातून साचेबंदपणा दिसतो. हा सांचेबंदपणाचा प्रस्ताव उत्कृष्ट शिक्षकांच्या सीमा बंदीस्त करीत असून यातून उत्कृष्ट शिक्षक बाहेर पडतात व भलत्याच व्यक्तींना साचेबंद प्रस्तावातून पुरस्कार मिळतात. हे तेवढंच खरं." 
           "काही शिक्षक खरंच आदर्श आहेत की ज्यांच्यामुळे शाळा नावारुपाला येते. जशी पुण्यातील वावडेवाडीतील शाळा व त्या शाळेतील सरकारी मुख्याध्यापक. त्यांनी वावडेवाडीच्या शाळेत नंदनवन फुलवलंय. परंतु शासन तशांची दखल घेत नाही. अन् समाज त्यांनाच धारेवर धरुन त्यांनाच बदनाम करतं. ही वास्तविकताच आहे. अशा बर्‍याच शाळा आहेत की ज्या नावारुपाला आल्या. हे कार्य केवळ एका शिक्षकांमुळं घडत नाही. तर अनेक शिक्षकांमुळं घडतं."
          "महत्वाचं म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार हे प्रस्ताव तयार करण्यातून नसावेच. ते वास्तविकरुपात एखाद्या शिक्षकांच्या अमोल व अमोघ कार्यातून असावे. जे शिक्षक फळाची अपेक्षा न करता आपल्या विद्यार्थ्यांसाठी हिरीरीनं कार्य करतात. हवं तर त्यांचा शोध घेण्यात यावा. अन् द्यायचंच असेल तर तसं दरवर्षी शासनानं शिक्षकदिनाच्या दिवशी विशिष्ट शिक्षकांनाच पुरस्कार न देता सर्वच शिक्षकांना पुरस्कार द्यावा. जे शिक्षक प्रस्ताव तयार करुन पाठवत नाहीत व जे पाठवतात त्यांनाही. ज्यातून देशातील सर्वच शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल व देशातील सर्वच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी निःस्वार्थ हेतूनं कार्य करु शकतील. त्यांना स्वतःच्या आदर्शपणाला सिद्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा लागणार नाही."
           सोहेल एक शिक्षक होता. तसा तो लेखकही. जो नियमीत लेख लिहायचा व त्याचे भरपूर लेख रोजच वर्तमानपत्रातून झळकायचे. त्यानं असे बरेच लेख लिहिले होते वर्तमानपत्रातून. ज्यातून त्यानं कितीतरी लोकांवर होत असलेल्या अन्यायावर वाचा फोडलेली होती. परंतु अद्यापही त्याला कोणतेच पुरस्कार नव्हते. ना त्यानं आतापर्यंत कोणत्याच पुरस्कारासाठी अर्ज केला होता.

************************६*******************

          सोहेलला आठवत होता तो प्रसंग. आदर्श शिक्षक पुरस्काराचा फॉम भरतेवेळेसचा प्रसंग. आदर्श शिक्षक पुरस्कार....... एकदा त्यानं वर्तमानपत्रातून आदर्श शिक्षक पुरस्काराची बातमी वाचली. त्या वर्तमानपत्रात एक लिंक आली होती. जी भरायची होती व त्यानुसार प्रस्ताव मागविण्यात आले होते. जे तयार करुन आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवायचा होता. त्यातच अशा आदर्श शिक्षक पुरस्काराची लिंक त्यानंही भरली. वाटलं की इतर लोकं काही विशेष नसूनही आदर्श शिक्षक पुरस्कार उचलतात. आपण का नाही मिळवू शकत आदर्श शिक्षक पुरस्कार. अशातच त्याला त्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मुलाखतीला बोलावले व त्यानुसार तो मुलाखतीला गेला.
         सोहेल आज गरीब नव्हता. तो आदर्श शिक्षक पुरस्काराच्या लायक होता. तो हुशारच होता व त्याचं कार्यही आदर्श शिक्षक पुरस्काराला लागणाऱ्या दस्तऐवजापेक्षा मोठे होते. त्याचे दररोजच अन्यायावर वाचा फोडणारे लेख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत होते. ज्या लेखांची संपादक महोदय निवड करुन रोजच आपल्या वर्तमानपत्रात छापत होते. तोच छापून येणारा लेख त्याच्यासाठी पुरस्कार होता आणि संपादक महोदय त्याला तसा पुरस्कार देणारे आयोजनकर्ते. कारण संपादक महोदयांनी पत्रकारीतेत हयात घालविलेली असायची. ज्या हयातीमध्ये अनेक लेखकांच्या लेखनीचा अभ्यास त्यांनी केला असायचाच. 
           सोहेल ठरल्याप्रमाणे आदर्श शिक्षकाच्या पुरस्काराच्या मुलाखतीला गेला. त्यानं पाहिलं की तो आदर्श शिक्षक पुरस्कार. अनेक शिक्षक रांगेत होते. सर्वजण आपली मुलाखत देत होते. त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रश्न होते. ज्या प्रश्नांची उत्तरं ते देत होते. त्याच रांगेत सोहेलही होता. शिवाय बऱ्याच जणांनी प्रस्ताव तयार करुन आणले होते. ज्या प्रस्तावाचं रेखीवपण काळजाला भिडणारं होतं. ते प्रस्ताव पाहूनच वाटत होतं की त्यांनाच कदाचित पुरस्कार मिळेल. एवढं प्रस्तावाचं देखणेपण. मात्र त्या प्रस्तावाच्या सुबकतेच्या रांगेत सोहेल नव्हताच. 
            सोहेल त्याबद्दल विचार करीत होता. तोच त्याचं कुणीतरी नाव उच्चारलं, 
          "सोहेल आलेत काय? मॅडमनं बोलवलंय."
           सोहेल विचारच करीत होता. तोच त्याच्या कानावर सोहेल आलेत का. मॅडमनं बोलावलंय. हे शब्द कानावर पडताच सोहेल भानावर आला व तो मुलाखतीसाठी मॅडमसमोर गेला. तसं मॅडमनं त्याला पाहिलं. त्याचा अस्ताव्यस्तपणा अनुभवला. ती साधी राहणी अनुभवली. त्यातच त्याला पाहून तो शिक्षक असेल, असंही जाणवत नव्हतं. तसा त्याला पहिला प्रश्न विचारल्या गेला. किती शिकलात?
          पहिला प्रश्न. किती शिकलात. सोहेल थोडा गोंधळलाच. त्याचं कारण नेमकं उत्तर सांगायचं कोणतं. बारावी डी एड की पुढील अर्हता. सोहेल गोंधळून गेला. तसा तो एम ए शिकलेला होता. ज्याचे काही गुण वाढणार होते. परंतु गोंधळलेल्या अवस्थेत लागलीच उत्तर आलं. बारावी शिकलो जी.
          जी...... सोहेलनं जी म्हटलं. तशा आयोजक मॅडम आणखी विस्मयानं सोहेलकडे पाहात राहिल्या. विचार करीत होत्या की जी म्हणणं अडाणी भाषा. जी एका शिक्षकाला शोभत नाही. तरीही त्यानं आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज केलाय. 
          सोहेल एक साधारण व्यक्ती. गरीब घरचा. त्यानं गरीबी अगदी जवळून पाहिली होती. तीच शोषली होती. मात्र आज तो शिक्षक बनल्यानं व त्याची गरीबी संपल्यानं व त्याला भरपूर वेतन मिळत असल्यानं त्याची गरीबी संपली होती. परंतु नोकरी लागण्यापुर्वी गरीबी शोषल्यानं त्याचं वागणं बदललेलं नव्हतं. ना ही त्याची भाषा बदललेली होती. 
            सोहेलकडे पाहात आयोजक मॅडम विस्मयचकित नजरेनं स्तब्ध होत्या. त्यांना कळलं होतं की सोहेल बारावीच शिकलेला असेल. तो काही जास्त शिकलेला नाही. म्हणूनच त्याचं स्तब्धपण. 
           सोहेल कसाबसा गरीबीवर मात करीत एका खाजगी शाळेत नोकरीवर लागला. ज्या शाळेत त्याच्या कलागुणांना वाव नव्हताच. त्यातच त्या शाळेत असलेले गोपनीय अहवाल ना त्यांना कळवत असत. ना त्यांना त्याच्या सांक्षांत्कित प्रती देत असत. अशातच सोहेलचे गोपनीयतेचेही गुण कमी झाले. जेव्हा तोही प्रश्न त्याला विचारल्या गेला. मग आले इतर प्रश्न. अशा प्रश्नांच्या वेळेस उत्तर देतांना सोहेलची तारांबळ उडाली. उत्तरादरम्यान क्षणभर डोक्यात विचार आला की जर मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तर मला आदर्शपणातच जीवन घालवावं लागेल. यंत्रणेला जे हवं तेच लिहावं लागेल. यंत्रणेच्या विरोधात जावून लेख लिहिताच येणार नाही. मग कुणावर जरी अन्याय झाला तरीही त्यावर वाचाही फोडण्यासाठी लेख लिहिता येणार नाही.
         तो सोहेलच्या मनातील विचार. नकोय पुरस्कार, अन् ते आदर्शपणही नको. जे आदर्शपण कुणावर होत असलेला अन्याय मुकाट्यानं सहन करायला लावतंय. तसा विचार येताच त्यानं ओबडधोबड कशीतरी उत्तरं दिली व शेवटी जड अंतःकरणानं त्यानं आयोजक मॅडमला सांगीतलं की मॅडम नकोय मला असा पुरस्कार. आपण सर्व प्रश्नात मला शुन्यच गुण टाकावे. 
         मुलाखत संपली होती. तो मुलाखतीतून बाहेर पडला. पुन्हा त्या मुलाखतीस न येण्याचा व लिंक न भरण्याचा विचार करीत. कारण ती मुलाखत व ते आदर्शपण त्याच्या वास्तववादी जगण्यावर कुठंतरी अडथळा निर्माण करणारी होती.
         आज सोहेल नियत वयोमानानुसार म्हातारा झाला होता व नियत वयोमानानुसार तो निवृत्तही. आज सोहेलला पुरस्कार नव्हता. परंतु तो आनंदीत होता. कारण त्यानं कितीतरी लोकांना आज आपल्या लेखनीच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला होता. त्यानं विद्यार्थ्यांसाठीही कार्य केले होते. त्यांनी स्वतः आत्मनिर्भर व्हावं म्हणून. परंतु त्यानं तसं करीत असतांना कधीच आपल्या कार्याचा गाजावाजा वा देखावा केला नव्हता. अगदी आज निवृत्त होईपर्यंत त्याचं राहाणं साधं होतं. मात्र विचार उत्कृष्ट दर्जाचे होते. जे त्याच्यातील माणूसकी असलेल्या माणूसपणाचे द्योतच होते. ज्यातून आज त्याला माणूसकी जपण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं होतं.
           सोहेलला आठवत होतं बालपण. बालपणाचा त्याचा काळ काही रमणीय नव्हताच. त्याला शाळेत शिकत असतांना फारच त्रास होत असायचा. तसं पाहिल्यास घरात विश्वकोटीचं दारिद्र्य होतंच. घरात असलेले भाऊबहिण. त्या भावाबहिणींना सुग्रास अन्न खायला मिळायचं. परंतु त्याला नाही. त्याचं कारण तो घरातील सावत्र भाऊ होता.
           सोहेल जेव्हा जन्मास आला. तेव्हा त्याच्या आईनं त्याला जन्म तर दिला. परंतु त्याला जन्म देताच त्याची आई मरण पावली होती. त्यामुळंच तो अनाथ झाला. त्यातच वडील तरुण असल्यानं त्याच्या वडीलानं आपलं दुसरं लग्न केलं. परंतु घरात आलेली नवीन आई ती काही त्याला सांभाळून घेत नव्हती. कसाबसा तो दोन वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या सावत्र आईनं त्याला कामाला लावलं. तसं त्याचं खेळण्याचं वय संपलं. 
          सोहेल काम करु लागला स्वतःच्याच घरात एका नोकरासारखा. बदल्यात त्याला आईच्या हातचा मार मिळण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. अशातच तो सात वर्षाचा झाला व त्याचं नाव शाळेत टाकण्यात आलं.
          सोहेल घरी काम करायचा त्या लहानग्या वयातही. तसे वडील त्याला शाळेत सोडून देत. परंतु आणायला जात नसत. कारण सोहेलचे वडील जे दिवसाला कामाला जात असत. ते रात्री उशिरा कामावरुन येत असत. परंतु सोहेल हा सांजच्याला शाळा सुटली की घरी यायचा. पर्याय नसायचा. अन् जसा तो घरी यायचा. तशी आईची वटवट सुरु व्हायची. शिवाय कामाची रीघही. ते बोलणे ऐकले की जीव कासावीस झाल्याशिवाय राहायचा नाही. जीवच द्यावासा वाटायचा त्याला. परंतु तरीही ते सगळं सहन करुन तो चूप बसायचा.
           सोहेल जेव्हा शाळेत जायचा. तेव्हा अगदी बरं वाटायचं त्याला. कारण शाळेत त्रास नसायचाच. त्यातच त्याला त्याची शिक्षिका आवडायची. जी त्याचा लाड करायची. शिवाय मार वाचायचा. त्यामुळंच त्याला शाळेत बरं वाटायचं व तो दररोज शाळेत जायचा. त्याला शाळेत जाणं आवडत होतं. 
          दिवसभर घरी नसणारा सोहेल, त्याचा मार तो शाळेत असल्यानं वाचत असे शाळेतील वेळेपर्यंतच. वडील सकाळी घरी राहात. त्याला स्वतः सकाळी शाळेत नेवून देत. त्याची नजर असायची सोहेलवर व त्याच्या आईवर. समजा एखाद्यावेळेस त्याची आई त्याचेवर रागावलीच तर तो तिला त्याचा जाब विचारायचा. त्यामुळंच त्याची आई त्याला बोलत नसे. परंतु सायंकाळी तिच्याकडे मोकळं रान असायचं. मग काय, थोडसं जरी त्याचं चुकलंच तर त्याची आई त्याला धू धू धुवायची. त्यावेळेस त्याला आईला अडविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पर्याय नसायचाच. 
         आईला काहीही न म्हणणारा सोहेल. आईचाच मार वाचविण्यासाठी दररोजच शाळेत जायचा तो. त्यातच तो दररोज शाळेत गेल्यावर अभ्यासही करीत असे. ज्यातून तो हुशार बनला होता. अशातच तो कसाबसा दहावी पास झाला. पुढे बारावीही झाली व एका शाळेत खाजगी शिक्षक म्हणून तो नियुक्त झाला होता.

************************७********************

             मीनाचं व त्याचं बोलणं मध्यंतरी बंद होतं. तसे बरेच दिवस झाले होते की मीना त्याला भेटली नव्हती. ना तिची हालचाल त्याला समजली होती. ना तिची हालचाल त्याला समजत होती. परंतु योगायोग आला व मीना त्याला एका शैक्षणिक कार्यशाळेदरम्यान भेटली. मग तिनं त्याला ओळखलं व त्यानंही तिला ओळखलं. आता जुने दिवस आठवायला लागले त्यांना व त्यांच्या जुन्याच दिवसाच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. तिला विवाह करशील का. हा प्रश्न विचारल्याचा क्षण. तोच त्याला आठवला, तिच्या नकार दिल्यानंतरचा प्रसंग.
             सोहेलला आठवत होती त्याची प्रेमकहाणी. उषा तिचं नाव होतं. उषा गरीबच होती. परंतु पाहायला सुंदर होती. ती त्याच्याच घराजवळची मुलगी होती. जेव्हा तो नोकरीला लागला. तेव्हा त्याला नोकरीवर राहूनही वेतनापर्यंत पोहोचायला बराच वेळ लागला होता. त्याला नोकरी लागली होती. परंतु त्या नोकरीला स्थिरता मिळालेली नव्हती. ज्या अस्थिरतेनं त्याला आपला विवाह कसा आणि केव्हा करावा. हे काही कळत नव्हतं. ना ही तो विवाहाच्या भानगडीत पडू पाहात होता. अशातच त्याला त्याच काळात मदत केली, ती उषेनं. उषा ही त्याच्या जीवनात आशेची किरण बनून आली होती. 
          सोहेल नोकरीवर नियुक्त झाला होता. संस्थापकाच्या म्हणण्यानुसार तो जिल्हापरीषदेची सरकारी नोकरी करण्यासाठी गेला नाही. इथंच कायम नोकरी देवू असं आश्वासन संस्थाचालकानं त्याला दिलं होतं. अशातच बरीच वर्ष जात राहिली. संस्थाचालकानं त्याला कायम नियुक्त केलं नव्हतं नोकरीत. अशातच दिवसामागून दिवस जात राहिले.
           सोहेल ज्यावेळेस शाळेत नोकरी करीत होता. तेव्हा त्याचदरम्यान त्याचे वडीलही मरण पावले होते. शिवाय तो दिवसा नोकरी करीत असल्यानं त्याला बाकी वेळेस काम मिळत नव्हतं. अशातच जवळचा होता, नव्हता, तोही पैसा निघून गेला होता. त्यामुळंच तोही काळ त्याचा पराधिनतेचा गेला. त्याही काळात त्याला काही दिवसं उपासमारीतच काढावी लागली. अशाच काळात उषा त्याचं सांत्वन करायची. 
          उषेचं प्रेम व तिचा त्याचेसोबत असलेला वावर. ते प्रेम वाटत होतं काही लोकांना. त्यातच लोकंही म्हणत असत की त्यानं तिच्याशीच विवाह करुन टाकावा. परंतु विवाह करणार कसा? आपण कसं पोषू तिला. आपल्याला तर नोकरी नाही आणि आहे तर तीही कायम स्वरुपाची झालेली नाही. शेवटी तो विचार करीत होता. अशातच त्याला आठवलं ते महाविद्यालयातील जीवन. ज्या महाविद्यालयात शिकत असतांना त्यानं मीनाला माझ्याशी विवाह करशील का? हा प्रश्न विचारला होता व तिनं त्यावर काहीच उत्तर दिलं नव्हतं. तसंच आपण वागायचं. हे त्यानं ठरवलं होतं. 
           सोहेल उषेशी बोलत होता आणि तीही त्याचेशी बोलत असायची. त्यांचं प्रेम वृद्धींगत होत चाललं होतं. सोहेललाही वाटायचं की आपण हिच्याशी विवाह करायचा. परंतु कायम स्वरुपाची नोकरी झाल्यावर. परंतु त्या नोकरीला कायम स्वरुपाची व्हायला वेळ होता. केव्हा होईल याची शाश्वती नव्हती. अन् जेव्हा ती नोकरी कायम स्वरुपाची होईल, तेव्हाच आपण तिच्याशी नोकरी करु असं त्याला वाटत होतं. अशातच तो एक दिवस उजळला व त्या दिवशी तिला पाहायला पाहुणे आले.
         उषेचं सोहेलवर निरतिशय प्रेम. ती काही जास्त शिकली नव्हती. तो तिच्याशी विवाह करेल की नाही. याचीही तिला माहिती नव्हती. ना ही तिला शाश्वती होती आणि ना ही विश्वास. अशातच तिला पाहायला आलेले पाहुणे व सुसंस्कारीत असलेली ती. तिच्यासमोर एक प्रश्न उभा राहिला होता. तो म्हणजे विवाह करणे. नेमका कोणाशी विवाह करायचा? सोहेलशी की आपल्याला पाहायला आलेल्या पाहुण्याशी. जो पाहुणा सुसंपन्न वाटत होता.
          उषेला पाहायला आलेला पाहुणा. जेव्हा तो पाहायला आला. तेव्हा परीवारानं त्याला विचारलं. 
           "काय करताय?"
           "पानठेला आहे."
           "किती कमवताय?"
           "दहा हजार."
           "किती शिकलात?"
           "दहावी."
           "पानठेला स्वतःचा आहे की दुसऱ्याचा."
           "स्वतःचाच म्हणा की."
            पाहुणे बोलत होते व तिचं लक्ष पाहुण्यांच्या बोलण्याकडं होतं. ते काय काय बोलत आहेत. हे ती न्याहाळत होती. अशातच पाहुण्यांनी पानठेला आहे, असं म्हणताच तिचा ट्यूबलाईट लागला. विचार आला की जो व्यक्ती पानठेला चालवत असेल, त्याच्या पानठेल्यावर बदमाश अदमाश लोकं नक्कीच येत असतील. बदमाशा चालत असतील. मग मारधाड, चाकू तलवारी, या साऱ्याच गोष्टी. तसं तिनं बरेचवेळेस पानठेले चालविणारे व्यक्ती कसे असतात. हे ऐकलं होतं. शेवटी तिनं ठरवलं. यापेक्षा सोहेलच बरा. जरी नोकरी नाही लागली आणि त्यानं जास्त नाही कमवलं आणि दोघांचीही थोडीशी मिळकत असली तरी आमचं चांगलं चालू शकेल. शिवाय आपल्याला आपल्या आवडीचाच मुलगा पती म्हणून मिळेल. तो पाहिला देखलाही आहे व त्याला वात्रट स्वरुपाचे शौकही नाहीत. ना तो दारु पीत, ना खर्रा खात. परंतु खरंच तो माझ्याशी विवाह करेल काय? तो कुठं व मी कुठं. मी दहावी शिकलेली आणि तो एक शिक्षक. परंतु विचारायला काय हरकत आहे. जर तो माझ्याशी विवाह करायला तयार झालाच तर मी नक्कीच करेल त्याच्याशी विवाह. 
          उषेचा विवाहाचा निर्धार. पाहुणे पाहून जाताच ती एक दिवस संधी साधून सोहेलला भेटली. तसं तिला त्याचेशी विवाहाबद्दल बोलायचंच होतं. परंतु हिंमत होत नव्हती. तसा तिनंच विषय छेडला. म्हणाली,
          "सोहेल, तुला माहित आहे, मला पाहुणे आले होते पाहायला."
           "होय. माहित आहे."
           "अन् हेही माहित असेल की पाहुण्यांनी मला पसंत केलंय."
           "नाही. हे काही मला माहित नाही. परंतु आता एक प्रश्न उद्भवलाय."
            "कोणता?"
            "तू आता विवाह करुन जाणार वाटतं."
           "तुला काय वाटतं?"
           "मला काय वाटणार. मलाही वाटतं की तुझा विवाह चांगल्या घरी व्हावा. तू सुखी राहावीस."
            "परंतु मला नाही आवडला तो."
           "का बरं?" 
           "तो पानठेला चालवतो."
           "मग काय झालं?"
           "पानठेलेवाले बदमाश असतात."
           "मग काय झालं."
           "एक विचारु का?"
           "विचार."
          "तू माझ्याशी विवाह करशील?"
          तो तिचा प्रश्न. त्यावर काय उत्तर द्यावं. हे त्यालाही समजेनासं होतं. तोही काय करु शकणार होता. म्हणूनच तो चूप बसला होता. तशी ती परत त्याला म्हणाली,
           "तू सांगीतलं नाही सोहेल. पुन्हा विचारते, तू माझ्याशी विवाह करशील?"
           तिचा तो प्रश्न. तो विचार करु लागला. तोच विचारांती तो बोलला,
           "अगं, मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे. परंतु........"
            "परंतु काय परंतु?"
            "परंतु मला नोकरी नाही. आहे ती कायम स्वरुपाची झालेली नाही. मग घर कसं चालवायचं?"
            त्याचा तो प्रश्न. ती विचार करु लागली. तशी विचार करताच ती उत्तरली.
            "हे बघ, तुझी नोकरी पक्की होईपर्यंत मी कामाला जात जाईल. आता तर करशील ना माझ्याशी विवाह?"
            "होय. परंतु समजा मला नोकरीच लागली नाही तर?"
            "तर जीवनभर मी स्वतः कामधंदा करेल व आपल्या संसाराला हातभार लावेल. आता तर ठीक आहे ना."
            त्यानं ते ऐकलं. तसा तो चूप बसला. तशी तीच थोड्या वेळानं म्हणाली,
           "वेड्या, तू सांगीतलं नाही अजून?"
           तिचं ते बोलणं. त्यावर तो ताबडतोब वेळ न दवडता म्हणाला,
            "तू जर माझ्या सर्व अटी पाळायला तयार आहेस तर मी कसा काय नकार देवू. माझा होकारच समज आपल्या विवाहाला. परंतु एक आणखी गोष्ट?"
           "आणखी कोणती गोष्ट आहे पुन्हा?"
           "मी तुला विवाहाला होकार दिला. परंतु तुझ्या आईवडीलांना मनवणं व तयार करणं तुझ्या हातात आहे. माझं सोड. माझ्या घरी मला कोणीच काही म्हणणार नाही. मी स्वतःच तयार आहे, स्वतःचा निर्णय घ्यायला."
           ते त्याचं बोलणं. तसा तिनंही होकार दिला व ती तिथून निघून गेली. तोही आपल्या घरी रवाना झाला होता.
           ते त्यांचं बोलणं. त्याच बोलण्यानुसार उषेला आपल्या वडीलांना तयार करायचं होतं. तशी ती त्याची संधीच पाहात होती व त्याच संधीनुसार तिला आपल्या विवाहाबद्दल बीलायचंही होतं, आपल्या वडीलांना. ती एक नामी संधी तिच्यासमोर चालून आली. 
          तो गोकुळाष्टमीचा दिवस होता. चांगली धामधूम सुरु होती. सर्व पक्वान बनले होते. तोच तिच्या आईनं तिलाही कामं सांगीतले होते आणि ती कामे करीतच होती. अशातच संधी साधून ती आपल्या आईला म्हणाली,
          "आई, मी गेल्यावर तू कशी कामे करणार?"
          "कुठं जाणार आहेस तू?"
          "अगं, लग्न करुन जाणार नाही का मी माझ्या घरी."
          "हो खरं आहे."
          "पण केव्हा होईल माझा विवाह?"
         "म्हणजे? अगं पाहुणे आले होते ना तुला पाहायला. त्यांनी होकार दिला तर होईल तुझा विवाह."
          "आई, मला विवाह लवकर करायचाय."
          "हो ना. विवाह करण्यासाठीच तर आले होते ना पाहुणे."
           "मला त्यांच्याशी विवाह करायचा नाही."
          "मग? मग कुणाशी विवाह करायचा आहे तुला?" आईनं आश्चर्यानं विचारलं.
          "सांगू. तू रागवशील तर नाही ना."
           "नाही रागवणार. जर चांगला असेल तर."
          "अगं आई, तो चांगलाच आहे आणि माझ्यापेक्षाही जास्त शिकलेला आहे."
           "परंतु तो आपल्या जातीचा आहे का?"
           "होय. आपल्याच जातीचा आहे."
           "अन् त्याचा होकार आहे का?"
           "होय, होकारही आहे. त्यानंच आपल्या घरी विचार असं म्हटलं."
           "हो. परंतु तो आहे तरी कोण?"
           "कशी सांगू तुला. माझी हिंमत होत नाही."
           "अगं सांग ना. त्यात काय एवढं घाबरायचं."
           "तू रागावणार नसशील तर सांगते."
           "अगं मी आई आहे तुझी. कशी रागवणार तुझ्यावर."
           "तर मग ऐकच तू. तो राजकुमार आहे आपला सोहेल. जो शिक्षक आहे शहरात. परंतु त्याची नोकरी पक्की झाली नाही."
           "अगं पण ती पक्की तरी होईल का?"
           "आई, पक्की होणारच आहे ती नोकरी आणि हो, आता त्याची नोकरी पक्की नाही. म्हणूनच त्यानं होकार तरी दिला असेल. विचार कर की समजा त्याची नोकरी पक्की झाली तर तो माझ्याशी विवाह तरी करायला तयार होईल का. नाही ना."
           "होय, खरं आहे तुझं म्हणणं. परंतु तो तयार आहे का तुझ्याशी विवाह करायला की त्यानं तुझी गंमत केलीय."
           "नाही आई, मी त्याला चांगल्याप्रकारे ओळखते. तो बोलला तसं. तो खोटं बोलणारच नाही."
          "ठीक आहे, तो खरंही बोलला असेल. परंतु विवाह झाल्यावर समजा त्याची नोकरी पक्की झाली आणि त्यानंतर त्यानं तुला सोडलं तर?"
            "आई, मग ते माझं नशीब समज. माझ्या नशिबात जे लिहिलं असेल ते होईलच. कदाचित असंही होवू शकते की त्याला असलेली नोकरी पक्की नाही झाली तर. तर मला जीवनभरच काम करावं लागेल अन् पक्की झाली तर महाराणी सारखं तरी बसून खाता येईल. बसून खाता येईल की नाही?"
            "होय खरंय. मी तयार आहे तुझ्या विवाहासाठी. परंतु हाच प्रश्न तू तुझ्या वडीलांना विचार व तयार कर आपल्या बाबाला."
            "आई, तेवढी हिंमत नाही माझ्यात. म्हणूनच तुला सांगीतलं आणि हं, सोहेल हा त्या पानठेला चालविणाऱ्या मुलापेक्षा कितीतरी पटीनं चांगला. ना त्याला दारु पिण्याची सवय अन् ना त्याला कोणता खर्रा खाण्याची सवय. याऊलट तो पाहुणा. बिचारा पानठेला चालवतो म्हणतोय. माहित आहे. पानठेल्यावर वेगवेगळे गिऱ्हाईक येतात. ज्यात बदमाश लोकंही येतात. तसेच पानठेला चालविणारेही बदमाशच असतात. समजा एखाद्यावेळेस त्याचा खुनच झाला तर....... तर मला विधवेचं जीवन जगावं लागेल आयुष्यभर. तेव्हा कसं वाटेल तुला."
           "हो खरं आहे तुझं म्हणणं. मी सांगेल तुझ्या वडीलांना आणि तयारही करेल तुझ्या विवाहाला होकार देण्यासाठी. म्हणेल की सोहेल हा पाहिला देखला मुलगा आहे. दुसऱ्या मुलाशी आपण रिश्ता केला आणि दुसरा मुलगा चांगला निघाला नाही तर...... हेही म्हणेल. मलाही वाटतं की ही बातमी ऐकून तुझ्या वडीलांना आनंदच होईलच. वाईट वाटणार नाही."
          "ठीक आहे आई." ती म्हणाली व ती मुकाट्यानं कामं करु लागली.
            
*********************८***********************

             रात्र झाली होती. तसे घरचे सर्वजण झोपी गेले होते. मुलबाळं झोपली होती. त्याचबरोबर उषआही झोपली होतीच व उषेची आई आणि वडील जागत होते. तशी संधी नामीच होती. 
           ती संधी व त्या संधीचं सोनं बनविण्याच्या नादात असलेली उषेची आई तिच्या प्रिय पतीला म्हणाली,
           "अहो, एक गोष्ट सांगू काय?"
           "सांग."
           "आपली उषा तरुण झालीय व लवकर विवाह करावा लागेल."
           "हो कळतंय मला. म्हणूनच तर मी सर्वांना सांगून ठेवलंय पंचक्रोशीत. अन् हो, त्यादिवशी आला होता ना एक पाहुणा मुलगा तिला पाहायला."
           "हो बरोबर. परंतु तो पानठेला चालवतोय व तुम्हाला माहित असेल की पानठेला कोणती मुलं चालवतात ते?"
         "कोणती मुलं चालवतात?"
         "बदमाश. गुंड मुलं चालवतात पानठेला."
         "होय. परंतु सगळीच पानठेला चालविणारी मुलं गुंड व बदमाश नसतात." 
          "होय, परंतु कोणाच्या पोटात शिरुन पाहिलं काय आपण?"
            "मग आपण आणखी कोणता मुलगा पाहू?"
            "मी सुचवू का. एक मुलगा आहे."
            "कोणता?"
            "आपला सोहेल. सोहेलशी बोलणी केली तर."
            "हो करता येईल आपल्याला बोलणी. परंतु त्यात नि आपल्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो किती शिकला आहे व आपली मुलगी दहावी. खरंच मागेल काय तो?"
           "ते फक्त माझ्यावर सोडा. मी तयार करेल त्याला."
           "परंतु लोकं काय म्हणतील? म्हणतील की हे लव्ह मॅरेज आहे. त्याच्या मुलीला मुलगा मिळत नव्हता म्हणून फासली सोहेलच्या गळ्याला."
           "नाही म्हणणार. अहो, पुर्वी गावातल्या गावातच विवाह होत होते ना."
          "हो, खरं आहे."
          "मग हाही विवाह असाच समजा."
           "ठीक आहे तर. तो जर तयार होईल तर आपणही तयार होवू. अन् तो जर तयार नसेल तर आपणही नकार देवू. समजलं."
           "हो समजलं. अगदी नीट समजलं." ती म्हणाली व चूप बसली.
           दुसरा दिवस उजळला होता. सकाळ झाली होती. तसे वडील कामाला निघून गेले होते. तशी वेळ न दवडता उषेची आई उषेला तो वडीलांचा संदेश सांगण्यासाठी आतूर झाली होती. तोच ती दिसताच तिची आई म्हणाली,
            "बाळ, उषा, तुझे वडील तयार आहेत, तुझं लग्न सोहेलसोबत लावून द्यायला. आता तूच त्याला तयार कर बरं का?"
           उषेनं तो वडीलांचा संदेश पुरता ऐकला व ती आनंदावली. त्याचबरोबर ती लवकर तयार झाली, तोच संदेश सोहेलला सांगायला. आता तिला वाटत होतं त्या संदेशाविषयी की जो संदेश ती त्याला केव्हा सांगते. तो संदेश सांगण्यासाठी ती आतूर झाली होती.
          आज उषा घरीच होती. तिचे वडील जसे कामाला निघून गेले होते. तशीच तिची आईही कामावर निघून गेली होती. अशातच दुपार झाली व ती त्याला भेटायला गेली. तसा तो भेटताच तिनं तोच संदेश लगबगीनं त्याला सांगीतला व लवकरच ती घराकडे रवाना झाली होती.
          तो संदेश. तो संदेश ऐकताच आनंदावलेला सोहेल. त्यानं आपल्या आईला त्याबद्दल सांगीतलं. तशी त्याची आईही कोणत्याही प्रकारचा आढेवेढेपणा न घेता तयार झाली त्याचा विवाह करण्यासाठी. अन् शेवटी त्याचा विवाह अगदी थाटामाटात साजरा झाला.
          उषेचा विवाह सोहेलसोबत झाला होता. त्यातच उषा सोहेलच्या घरी आली होती. परंतु आज तिला विचार होता. विचार होता जगायचा. कारण सोहेलला वेतन नव्हतंच. त्यामुळंच तिला घर जगविण्यासाठी कामाला जाणं आवश्यक होतं व ती नित्यनेमानं त्याला मदत म्हणून कामावर जात होती नव्हे तर ती काबाडकष्टही करीत होती. तशी तिच्या कामाला जाण्याची त्यालाही मदत होत होती.
         दिवसामागून दिवस जात होते. तशी घरची उपासमारही होत होती. परंतु त्यावर मात करुन ते जोडपं जगत होतं. आशेचा तो प्रकाशमान किरण पाहण्यासाठी. परंतु आशेचा कोणताच किरण त्याच्या जीवनात उजळत नव्हता. तसा तो एक दिवस उजळला व त्या दिवशी अचानक बातमी कानावर पडली. त्याची नोकरी कायम स्वरुपाची झालीय. 
        ती बातमी व ती बातमी ऐकताच त्याला अगदी हायसं वाटलं. त्याचबरोबर तिलाही हायसं वाटलं होतं. आता त्यांचे उपासमारीचे दिवस संपले होते. आता त्याच्या जीवनात सुखमय दिवस आले होते. त्यातच त्यानं आपल्या पत्नीलाही कामगार पाठवणं बंद केलं होतं. ज्यातून तिच्याही आयुष्यात सुखमय जीवनाची सुरुवात झाली होती.
           ती खाजगी शाळा. ती खाजगी शाळा त्याच्या लायक नव्हतीच. तिथं एक मॅनेजमेंट होतं व ते मॅनेजमेंट त्याच्या स्वविकासाच्या आड येत होतं. तसं पाहिल्यास तो एक लेखक असल्यानं त्याला लेखनाचा छंद होता. परंतु तसं त्यानं लेखन करावं. ही इच्छा मॅनेजमेंटची नव्हती. मग आदर्श शिक्षक पुरस्कार त्याला कुठून मिळणार. तसा तो त्यासाठी प्रयत्नही करीत नव्हता.
        सोहेल प्रामाणिक होता व हे प्रामाणिकपणाचं बाळकडू त्याला परिस्थितीनं शिकवलं होतं. तो आईचा मार वाचविण्यासाठी जे दररोज शाळेत जायचा. त्यातून त्याच्या मनात वक्तशीरपणाची सवय जडली होती. ज्यातून त्याच्या सवयीत नियमीतपणा आला होता. त्यातच वडील दररोजच सकाळी शाळेत नेवून देत असल्यानं वक्तशीरपणा कुटकूट भरला होता. तो तसा शाळेत जास्त सुट्ट्या मारत नसे व ना ही जास्त सुट्ट्या मारावाशा वाटत असे त्याला. तसंच त्याला वाटत असे की ही मुलं आपल्यासारखीच असून सर्वच मुलं दुःखी आहेत. अशा या बालवयातील मुलांना खुश कसं ठेवायला हवं. त्यामुळंच तो त्यांना सुंदरतेनं व सहजतेनं कृतीतून शिकवायचा. कधी त्यांच्यासोबत नाचूनही दाखवायचा. कधी संवाद साधायचा. मुलांना ते आवडायचं व त्याच्या वर्गातील मुलं सर्वच गोष्टीत पारंगत झाली होती.
          ती शाळा व त्या शाळेत विद्यार्थी विकासाच्या गोष्टी करीत असत. परंतु शिक्षकांना तेवढा सन्मान दिसत नसे. त्यातच शिक्षकांना किती त्रास द्यायचा. असा विचार त्या शाळेत केल्या जात होता. 
          शिक्षकांना त्रास होता. तो त्रास विद्यार्थी शिकविण्यातून नव्हता. तो त्रास होता, पैसे कमविण्यातून. तसे त्या शाळेत तीन गट होते. पहिला गट होता, शाळेतील नातेवाईक मंडळींचा. जी मंडळी मॅनेजमेंटच्या नात्यातील लोकं होते व ती मंडळी शाळेतील विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात शिकवीत नसत. ज्यानं विद्यार्थी गुणवत्ता मार खाल्ली जात होती. ही मंडळी कुरघोडी स्वभावाची होती. दुसरा गट होता, चापलूस लोकांचा. हा गटही विद्यार्थ्यांच्या विकासावर भर देत नव्हता. हा गट देखील कुरघोडी स्वभावाचाच होता. तसं पाहिल्यास शाळा चालवायला पैसा लागत होता व तो पैसा गोळा करीत असतांना जी नातेवाईक मंडळी होती. ती पैसा देत नसे. मग पैसा कोणाकडून गोळा करायचा? हा प्रश्न असल्यानं साहजीकच तो पैसा इतर नातेवाईक नसलेल्या शिक्षक मंडळींकडून गोळा केल्या जायचा. ज्यातून वर्गणीची रक्कम जास्त प्रमाणात वाट्याला यायची.    
          सुरुवातीचा काळ व सुरुवातीला सोहेलनं तशी वर्गणी म्हणून पैसा मॅनेजमेंटला दिला. परंतु जसजसा काळ गेला. तसंतसे सोहेलचेही विचार बदलले. जर मॅनेजमेंटच्या नात्यातील शिक्षक मंडळी काहीच पैसा देत नसतील शाळा चालवायला तर आपणच का म्हणून पैसा द्यावा? असा विचार त्याच्या मनात आला. शिवाय त्यात शिकविण्याच्याही समस्या होत्याच. मॅनेजमेंटच्या नात्यातील असलेली मंडळी ही अजिबात शिकवीत नव्हती. ज्यातून विद्यार्थी विकास होत नव्हता. विद्यार्थी विकास हा बाहेरच्या आलेली शिक्षक मंडळींकडूनच होत होता. तेच शल्य बोचलं सोहेलला व तो त्याच गोष्टीचा पैशातून विचार करायला लागला. शिवाय विद्यार्थी विकास करीत असतांना शिक्षकांचाही विकास होणे गरजेचे होते. परंतु मॅनेजमेंट शिक्षकांच्या हिताचं नव्हतंच. फायदा जर करायचा असेल तर मॅनेजमेंट आपल्या नातेवाईकांचा व चापलूस लोकांचा फायदा करीत असे. जे शाळा चालवायला पैसा देत असत. ते जरी चापलूस नसले तरी त्यांचा फायदा मॅनेजमेंट करीत नसत.
         वर्षामागून वर्ष गेले. सोहेलला शाळेत बारा वर्षाचा काळ झाला व बारा वर्ष झाल्यानंतर सोहेलला लागणारी बारा वर्षाची सेवा अधिगृहित धरुन बारा वर्षाची वेतनश्रेणी लावायचा प्रसंग उद्भवला. ज्यात त्यानं विनंती केली की त्याला बारा वर्ष झालेले असून वरीष्ठ वेतनश्रेणी लावावी. 
         तो सोहेलचा वरीष्ठ वेतनश्रेणीबाबत प्रस्ताव. परंतु मॅनेजमेंट त्याला ती वेतनश्रेणी लावायला कुचराई करीत होतं. ज्यात त्याला वाटत होतं की मीही शाळा चालवायला पैसे देतो ना. मग मला बारा वर्षाची लागणारी वरीष्ठ श्रेणी का नाकारायला हवी? तो त्याचा प्रश्न. परंतु त्यावर मॅनेजमेंट उत्तर द्यायला तयार नव्हतं. उलट मॅनेजमेंट म्हणत होतं की त्यानं तशी अपेक्षाच करु नये. ज्यातून वाद झाला व वाद एवढा विकोपाला गेला की सोहेलनं मॅनेजमेंटला शाळा चालवायला देत असलेले पैसेच देणं बंद केलं. ज्याची परीयंती त्याला महाभयंकर त्रास देण्यात झाली होती.
           विद्यार्थी विकासाआधी शिक्षक विकास महत्वाचा. सोहेलचं तेच म्हणणं. त्याला वाटत होतं की शाळेत विद्यार्थी विकास होत असतो. त्यापाठोपाठ शाळेचा विकास होत असतो. परंतु शिक्षकांचा विकास होत नाही. तसं पाहिल्यास शाळेचा विकास व विद्यार्थी विकास करण्यासाठी शिक्षकांचा विकास करणे वा होणे अतिशय महत्वाचे आहे. वरीष्ठ वेतनश्रेणी आपल्याला लागणं, हा आपला विकासच. परंतु अलिकडील काळात तेच घडत नाही. ही वास्तविकताच आहे. शिक्षकाला जर उच्चशिक्षीत व्हायचं असेल तर उच्चशिक्षण घेण्यासाठी परवानगी मिळत नाही. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळवायची असेल तर ती टाळली जाते व नातेवाईकांना पदोन्नती दिली जाते. थकीत वेतन हवे असेल तर संस्थेचा ठराव लागतो. त्यासाठी देण द्यावी लागते. जिला खंडणी असं नाव आहे. ही खंडणी स्वार्थी हेतुतून निर्माण झालेली एक अनैतिक, सांसर्गिक कलाकृती आहे. 
         खाजगीकरण ही वैयक्तिक विकासाला लागलेली कीडच. सरकार अलिकडील काळात खाजगीकरणाच्या दिशेनं पाऊल टाकत चाललेले असून बऱ्याचशा श्रेत्राला सरकारनं खाजगी करुन टाकलेले आहे. ज्यातून वैयक्तिक स्वरुपाची गुणवत्ता मारली जाते. त्यात मॅनेजमेंट तर आणखीच गुणवत्ता मारते शिक्षकांची. त्यांना आपल्या स्वविकासाच्या संधी देत नाही. 
         खाजगी शाळा व त्याचं संचालन सुरु असतांना सेवाजेष्ठ यादीला व गुणवत्तेला काही महत्व दिसत नाही. त्यातच अशा संस्थेत वेतन व थकीत वेतन मिळेलच याची शाश्वती नसते. ना पदोन्नती मिळत, ना कोणत्याच प्रकारचा शिक्षकांचा गौरव होत. तिथं गौरव होतो, नात्यातील माणसांचा आणि जे चापलुस असतात, लावालावी करतात त्यांचा. याच धोरणामूळं अलिकडील काळात बऱ्याचशा खाजगी शाळाही लयास जातांना दिसत आहेत. 
           खाजगी शाळेतही बरेच गुणवान शिक्षक असतात. परंतु त्यांच्यातील गुणवत्तेला पाहिजे त्या प्रमाणात वाव दिला जात नाही. शिक्षकाने उच्चशिक्षण घेतो म्हटलं तर त्याला परवानगी मिळत नाही. शिवाय एखाद्यावेळेस त्यातील एखादा शिक्षक सेवाजेष्ठ असला आणि त्याला वेतनबढती देण्याचा प्रसंग येत असेल, तर ती बढती सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी त्याला संस्थेच्या विरोधात जावं लागतं आणि संस्थेच्या जर विरोधात गेलं तर वेतन बंद, भत्ते बंद, निलंबन, नोटीस, एफ आय आर, बदनामी या साऱ्याच गोष्टी पाचवीला पुजलेल्या असतात. जरी तो शिक्षक इमानदार असेल, गुणवंत असेल तरीही. त्याची बदनामी करण्याचं आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रयत्नांची पायाभरणी करण्याचं काम संस्था करीत असते. बऱ्याच खाजगी शाळा या अशाच स्वरुपाच्या असतात. विरोधात जावून कामं होत नाही. सेवाजेष्ठ असूनही साधं मुख्याध्यापक बनू शकत नाही. त्याला संस्थेची परवानगी लागते व तशी परवानगी फक्त संस्था आपल्या नातेवाईकांशिवाय इतरांना देत नाही. आज खाजगी क्षेत्र जर पाहिलं तर बऱ्याचशा खाजगी शाळेत शिक्षक सेवाजेष्ठ असूनही, सेवाजेष्ठ असलेले शिक्षक हे मुख्याध्यापक बनलेले नाहीत. कारण असते भीती. एकतर संस्थेचे ते नातेवाईक नसल्यानं त्यांना मुख्याध्यापक बनवलं जात नाही. अन् ते स्वतःही पुढे जावून मुख्याध्यापक बनत नाहीत. कारण संस्थेच्या हाती निलंबनाचं हत्यार असतं व त्यांना मुख्याध्यापक बनविल्यानंतर त्यांनी संस्थेच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाला होकार दर्शवला नाही तर थेट निलंबनच. याठिकाणी विद्यार्थी विकास व शाळा विकास महत्वाचा नसतोच. खंडणी व स्वार्थ महत्वाचा असतो. संस्थामंडळाच्या खिशातील नव्हे तर तिजोरीतील पैसा वाढणे महत्वाचे असते. मग हीच भीती बऱ्याच सेवाजेष्ठ शिक्षकांना वाटत असल्यानं बरेचसे शिक्षक मुख्याध्यापक पदापासून वंचीत राहतात. तसं पाहिल्यास खाजगी शाळेत शिक्षक सेवाजेष्ठ असो की नसो, त्याला बढती दिलीच जात नाही. त्याला वेतन आणि भत्ते दिलेच जात नाही. त्याच्या गुणवत्ता विकसनासाठी प्रयत्न केलेच जात नाहीत. जे काही करायचं असते. ते संस्था व नातेवाईकच करतात. त्यात इतर शिक्षकांना वाव नसतोच.
          आता विचार येईल की असे जर आहे तर मग बाहेरची मंडळी का नियुक्त केली जातात शाळेत वा संस्थेत? त्याचं उत्तर आहे अनुशेष. बिंदू नामावली ही खाजगी संस्थेलाही पुर्ण करावी लागते. म्हणूनच आरक्षणाच्या जातीतील उमेदवार घेतले जातात. कदाचित आरक्षण नसतं तर....... तेही उमेदवार घेतले नसते. हे शंभर प्रतिशत खरं. तसंच इतर जातीतील काही लोकं हे पैसे मिळविण्यासाठी नियुक्त केले जातात. कारण नातेवाईक संस्थेत नियुक्त होण्यासाठी पैसे देतच नाहीत. तसं पाहिल्यास बऱ्याच संस्थेत बाहेरचे व नातेवाईक अशी पदं समान पातळीवर असतात. शाळा चालवतांना कुणाला निलंबित करायचे असेल तर नातेसंबंधातील व्यक्ती महत्वाचा. म्हणूनच नातेवाईकांची नियुक्ती. मग ती निःशुल्क करावी लागली तरी चालेल. हे संस्थेचं धोरण. ज्यात असे नातेवाईक शाळेत शिकवो अगर न शिकवो. सारंच क्षम्य. 
          शालेय खाजगी संस्था जेव्हा उभी होते, त्याची काही प्रमाणात पद्धती आहे. संस्था दोनचार लोकं निर्माण करतात. त्याची नोंदणी करतात. मग आपले काही भांडवल टाकून कशीबशी संस्था उभी करतात. त्यानंतर त्या संस्थेत काही शिक्षकांची नियुक्ती करतात. सरकारचा पैसा अनुदान रुपात घेण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि असं अनुदान मिळण्यापुर्वी संस्था चालवायला पैसे लागत असल्यानं असं संस्थामंडळ विद्यार्थ्यांकडून, सेवाभावी संस्थांकडून आणि नियुक्त होणाऱ्या शिक्षकांकडून पैसा मिळवतात. त्यानंतर अनुदान लागू झालंच तर संबंधित शिक्षकांकडून महिन्याला देण म्हणून पैसे घेतात. ज्यातून इमारत उभी होते. अन् सरकारी अनुदान प्राप्त होवूनही विद्यार्थ्यांकडून पैसे फीच्या रुपात सुरुच असतात. एवढंच नाही तर सरकारचं अनुदान प्राप्त होवूनही शिक्षकांकडूनही पैसे सुरुच असतात, शाळा चालविण्याचा उद्देश ठेवून. त्यानंतर समजा किरकोळ वर्षाला होणारी वेतनवाढ पाहिजेच असेल तर त्याचेही पैसे मोजावे लागतात. बढतीसाठीही पैसे. बढतीही सहजासहजी मिळत नाहीच. ती जर हवी असेल तर त्यासाठी नातेवाईक बनावं लागतं. चापलुसांनाही त्यासाठी जागा नसतेच. कधी एखाद्यावेळेस थकीत वेतन काढायचं असेल तर ठराव म्हणून संस्थेचं पत्र हवं असतं. ते पत्रंही संस्थेच्याच नातेवाईक शिक्षकांना अगदी सहज मिळतं, इतर शिक्षकांना नाही.
         संस्थेत असलेल्या सर्वच बाहेरच्या शिक्षकांना संस्थेत शिकविण्याचं काम करीत असतांना अगदी भीतभीतच काम करावं लागतं. त्यांच्यावर सतत अन्याय होत असतो. तरीही ते निमूटपणानं अन्याय सहन करीत असतात. कारण असतं पोट. प्रत्येकाला जसं पोट असतं, तसंच पोट शिक्षकांनाही असतं. शिवाय दुसरी महत्वपुर्ण गोष्ट असते, त्यांच्या जीवनात. ती म्हणजे जबाबदारी. घरच्या पत्नीच्या पालनपोषणाची आणि लेकरांच्या पालनपोषणाची जबाबदारी असते. त्यातच घरच्या मुलामुलींचं शिक्षण असतं. मग आपल्यावर अन्याय होत असेल, आपल्याला बढती मिळत नसेल, तरी ते अन्यायाविरुद्ध कुठेची अर्वाच्च्यता करीत नाहीत. चूपच बसतात, अन्याय सहन करीत करीत. ज्यातून त्यांचा जीव घुटमळतो. परंतु पर्याय नसतोच.
          लोकं म्हणतात की अन्याय सहन करणे हा गुन्हाच आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. परंतु काय करणार? जेव्हा घरच्या जबाबदारीचा विचार येतो ना आणि स्वतःच्या पोटाचा विचार येतो ना. तेव्हा कळतं की अन्याय सहन करायचा की नाही ते. संस्थेत जर व्यवस्थित काम करायचं असेल तर अन्याय सहन करावाच लागतो. नाहीतर निलंबन पक्कं अन् वेतन बंदही पक्कं. इमानदारीला व गुणवत्तेला थारा नाही. अशी आजची अवस्था. विद्यार्थ्यांचा विकास व शिक्षण गेलं खड्ड्यात. शिवाय दुसरा विचार असतो, इमानदारीवर बदनामीचा डाग पडण्याचा. त्या आगीच्या भट्टीत इमानदार शिक्षक हा इमानदार असूनही त्याचेवर बदनामीचा डाग लागतोय. जो कधीच धुता येत नाही. 
           खाजगी संस्थेत काम करीत असतांना रोजच शिक्षकांवर अन्याय होत असतो. त्यांना दररोजच बदनामीच्या समोरे जावे लागते. त्यांच्या गुणवत्तेला चालना नसते. समजा त्यानं आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर वरीष्ठांकडे तक्रार दाखल केलीच तर त्याला पिसाळून सोडलं जातं. अन् वरीष्ठही त्याच्या तक्रारीची दखल घेत नाहीत. ते उलट संस्थेतील पदाधिकारी वर्गाला दाबण्याऐवजी जो तक्रार करतो. त्यालाच दाबतात. न्यायालयातूनही बऱ्याचशा केसेसवर सुनावणी व्यवस्थित केली जात नाही. अशातच जीव मेटाकुटीस येतो व त्यातून आत्महत्येसारखे प्रकार. काही शिक्षकांच्या आत्महत्या उजेडात येतात. काहींची प्रकरणं दाबली जातात, आत्मीयता व सहानुभूतीच्या शस्रानं. कधीकधी धमकीनंही. समोरची वाट चालाल तर पाहून घेवू अशी धमकी. कारण संस्थेतील पदाधिकारी तेव्हा संबंधित शिक्षकांकडूनच संस्था चालविण्यासाठी लागणारे पैसे टक्केवारीनं खंडणी स्वरुपात घेवून गब्बर झालेले असतात. अशा गैरमार्गानं का असेना. मिळविलेल्या पैशाची गर्मी आलेली असते संस्थेतील पदाधिकारी वर्गाला. मग शिक्षकांच्या आत्महत्या घडूनही न्याय अजिबात मिळत नाही. ही वास्तविकताच आहे.
          विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे असं का घडावं संस्थेत काम करणाऱ्या इतर शिक्षकांबद्दल? इतर बाहेरच्या, नातेवाईक नसलेल्या शिक्षकांवर अन्याय का व्हावा? ते सन्मानाचे भागीदार नसतात का? खरंच त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वरीष्ठांकडे तक्रार दाखल केल्यास त्यालाच वरीष्ठांनी काही बाही म्हणावं काय? कधी न्यायालयानंही न्यायसंगतीच्या विरोधात निर्णय द्यावे काय? अन् या सर्व त्रासातून कंटाळून शिक्षकांना आत्महत्या कराव्या लागाव्यात काय? अन् आत्महत्या करुनही अशा आत्महत्याग्रस्त शिक्षकांच्या परीवारालाही धमक्या मिळाव्यात काय? खरंच यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहितांना त्या संविधानाची नियमावली संस्थेच्या बाजूची लिहिली काय? जर अन्यायग्रस्त शिक्षक असाच भीतीयुक्त वातावरणातून व संस्थेच्या दहशतीतून खाजगी संस्थेत काम करीत असेल, तो आपल्यावरच होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कुठेही दाद मागू शकत नसेल, अन् हे सरकारला दिसत असेल, सरकारच्या लक्षात येत असतील या बाबी. तर अशा संस्था बंद करुन टाकलेल्या बऱ्या. जेणेकरुन इतर चांगल्या शाळेतील चांगले संस्थाचालक त्यापासूनच बोध तरी घेतील. ते शिक्षकांना त्रास देणार नाहीत. ज्यातून सर्वच शिक्षकांना शाळेबद्दल आत्मीयता वाटेल व ते शाळेसाठी प्रयत्न करुन शाळा नावारूपास आणतील.
          महत्वाचं म्हणजे शाळा नावारूपास याव्यात. अन् ती येते, प्रत्येक शिक्षकांच्या प्रयत्नातून. आपली शाळा नावारूपास यावी. असं संस्थेतील प्रत्येक शिक्षकांनाच वाटते. त्यासाठी प्रत्येक शिक्षकच प्रयत्न करतो. झटतोही. परंतु जर अशा शिक्षकांना सन्मान मिळत नसेल संस्थेत, त्याला बढती मिळत नसेल, त्याची कोणत्याही बिलाची थकीत रक्कम निघत नसेल तर मग शिक्षकांचा हिरेमोड होतो. मग वाटतं की आपल्या शाळेचा विकासच व्हायला नको. ही शाळा लवकरच नेस्तनाबूत व्हावी. ज्यातून तो आपल्याच शाळेच्या अधोगतीसाठी प्रयत्न करीत असतो.
         विशेष म्हणजे शाळेचा विकास जर करायचा असेल तर विद्यार्थी विकास महत्वाचा आणि विद्यार्थी विकास जर करायचा असेल तर शिक्षक विकास महत्वाचा. शिक्षकांना सन्मान हवाच. हेतुपुरस्सरपणे त्यांना त्रास देवू नये. नातेवाईकांचं नातेपण संस्थेत जोपासण्याऐवजी गुणवान वा सेवाजेष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदी बसवून त्यावर अन्याय होवू नये याची काळजी घ्यायला हवी. प्रत्येक शिक्षकांचे थकीत वेतन कोणताही मनात किंतू, परंतु न बाळगता काढायला हवे. त्यातच शक्यतोवर देण म्हणून शिक्षकांकडून खंडणी वसूल करु नये. असं जेव्हा घडेल, तेव्हाच सर्व शाळा या भरभराटीस येतील व विद्यार्थी विकास तर होईलच. त्यापाठोपाठ शाळेचाही विकास होईल. अन् संस्थेचाही विकास होईल. हे तेवढंच खरं.
          सोहेलला तसंच वाटत होतं आणि ते आजुबाजूच्या शाळेत घडतही होतं. परंतु तो चूप बसलाच नाही. आपण चांगलं शिकवतो ना. आपण प्रामाणिक आहोत ना. मग मॅनेजमेंट जर भेदभाव करीत असेल तर आपण तटस्थ राहावं. त्यानंतर जे काही परिणाम होतील. ते भोगायलाही तत्पर राहावं. असा निर्धार जणू त्यानं मनात केला होता.
         सोहेलनं मॅनेजमेंटला शाळा चालवायचे पैसे देणं बंद केलं होतं. ज्याची परियंती मॅनेजमेंटनं त्याचं वेतन त्याच्यावर गैरवाजवी आरोप लावून बंद केलं होतं. दोन वर्ष तब्बल त्याचं वेतन बंद होतं. त्यावेळेस त्याच्यावर व त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली होती. कधीकधी वाटत राहायचं की आत्महत्याच करुन टाकावी. तसा तो विचार करायचा. परंतु दुसरा विचार मनात यायचा. आत्महत्येनं आपलाच जीव जाणार. आपलाच परीवार रस्त्यावर येणार. मॅनेजमेंटचं काय जाणार. त्यांना एक जागा रिकामी झाली म्हणून आणखी लाखो रुपये कमवता येणार. नाही, आपण आत्महत्या करु नये. आपण लढावं. त्वेषानं लढावं. एक ना एक दिवस असाही येईल की ज्या दिवशी सुर्याचा संपूर्ण प्रकाश आपल्यालाही मिळेल. 
         सोहेलचं वेतन बंद होतं व तो दिवसेंदिवस खचत चालला होता. तो नित्यनेमानं दररोज शाळेत जात असे अगदी वेळेवर आणि दिवसभर, जरी वेतन मिळत नसलं तरी इमानीइतबारे विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवीत असे.
          ज्यातून आजही त्याच्या वर्गातील विद्यार्थी पारंगतच होते. परंतु मॅनेजमेंटनं केवळ त्याचं वेतन बंदच केलं नव्हतं तर ती मॅनेजमेंट त्याला व्यवस्थित शिकविता येत नाही. असाही आरोप करीत होतं. ज्यातून त्याला दुःख वाटत होतं. परंतु उपाय नव्हता.
         ते दोन वर्ष....... ते दोन वर्ष अतिशय कष्टात व कठीण परिस्थितीत काढावे लागले त्याला. कधी घरात पाणी पिवूनच रात्रही काढावी लागली होती त्याला. तसं पाहिल्यास तो काळ त्याच्या जीवनाच्या परिक्षेचाच काळ होता. खाल्लेलं अन्न अंगाला लागत नव्हतं. धीर खचत चालला होता. कधी एखाद्यावेळेस चेहर्‍यावर हास्य नसलंच तर मॅनेजमेंटला खुशी व्हायची. तेच टिपलं होतं सोहेलनं. त्यामुळंच तो जरी घरी उपाशी राहात असला तरी त्यानं मॅनेजमेंट समोर हात पसरला नाही. लोटांगण घातलंच नाही. लढत राहिला धीरानं. अशातच तो आपल्याला मॅनेजमेंट त्रास देत असल्याची तक्रार वरच्या अधिकारी वर्गाकडे करायचा. परंतु काहीच उपयोग होत नव्हता. अधिकारी वर्गाला मॅनेजमेंटकडून अतिरिक्त पैसा पुरवला जायचा. ज्यातून अधिकारी वर्ग दबावात होता, मॅनेजमेंटच्या. मग ते कसे सोहेलला न्याय देतील. शेवटी विचार केला. इथंच बाहेर कागदी घोडे लढवून काही उपयोग नाही. आपण न्यायालयात जायला हवं व कायद्याचा आधार घेवून आपण न्यायालयीन लढाई लढायला हवी. तसा विचार करुन त्यानं त्या गोष्टीची तक्रारही न्यायालयात दाखल केली व तो कायद्याची न्यायीक लढाई लढण्यासाठी सज्ज झाला. 

**********************९**********************

       एक वर्ष झाला होता. सोहेल कायद्याची लढाई लढायला सज्ज झाला होता. परंतु सोहेलबद्दल मॅनेजमेंटला वाटत होतं की तो न्यायालयीन लढाई लढणार नाही. कारण त्याचेजवळ आता याघडीला पुरेसा पैसा नाही. कायद्याचीही लढाई लढायला पैसा लागतो. वकील करावा लागतो. तोही महागडा वकील करावा लागतो. तरच केस निघते. आपल्याजवळ भरपूर पैसा आहे. आपण याला पाहून घेवू. याच्याजवळ पुरेसा पैसाच नाही. त्यामुळंच याचं जीवन आपण उध्वस्त करु. याला आपण नोकरीवरुन काढून फेकू. परंतु सोहेलचा आपल्या इमानदारीवर व प्रामाणिकपणावर विश्वास होता.
           सोहेलचं वेतन बंद होतं. तसा तो आधीपासूनच नास्तीक स्वभावाचा होता. देवावर त्याचा विश्वास नव्हताच. तसं पाहिल्यास त्याच्या शाळेतील मॅनेजमेंटनं केवळ पैशाच्या भरवशावर त्याचं वेतन बंद केलं होतं. तेही त्याला माहितच होतं. त्यामुळंच पैसाच हा देव आहे. असं त्याला वाटत होतं. अशातच तो एक प्रसंग घडला. 
         तो प्रसंग. तो त्याच्या जीवनात आलेला प्रसंग. देव आहे व देवाचं अस्तित्व आहे, हे सिद्ध करणारा प्रसंग. 
          सोहेलचं वेतन मॅनेजमेंटनं बंद केलं होतं. ते केव्हा निघेल व कसं निघेल, यावर उत्तर नव्हतं व पर्यायही नव्हताच. मात्र त्याची पत्नी धार्मिक होती. ती देवाची पुजापाठ करायची. तो मात्र नास्तिक. 
          सोहेलचं ज्यावेळेस वेतन बंद झालं होतं. त्यावेळेस पर्याय म्हणून उपजीविकेसाठी त्यानं एक लहानसं गोळ्याबिस्कीटचं दुकान टाकलं होतं. तसं ते दुकान जास्त चालत नव्हतंच. परंतु घरखर्चापुरता पैसा तेवढा निघत होता. तो जास्त निघायचा नाही. परंतु त्या पैशानं घरखर्च चालायचंच. त्याच्या जवळ पैसा नव्हताच. अशातच त्याच्या मुलीच्या शाळेतील पैसे भरायचे होते. तेवढे पैसेही त्याचेजवळ नव्हते. काय करावं? कुणाला मागावं? यावर उपाय नव्हता. शेवटी त्याची पत्नी घरातच जे मंदीर होतं. त्यात जे देव होते. त्याचेसमोर बसली. अगदी शांत मनानं, मनात अन्यायाच्या वेदना गृहीत धरुन. 
         तो प्रसंग. त्या दिवशी ती एकटीच आपल्याच घरी मंदिरात देवासमोर बसली होती. पाच ते दहा मिनीट ध्यानस्थ अवस्थेत. विचार होता की मुलीच्या शाळेचा कसा पैसा भरायचा. तोच चमत्कार झाला. तिथंच ती बसली असतांना साधं दहा पाच रुपयाचं दररोज सामान घेणारा एक ग्राहक आला. त्यानं आवाज दिला व ती धावतच दुकानात आली. त्यावेळेस त्याच ग्राहकानं एवढ्या रुपयाचं सामान घेतलं की तिच्या मुलीच्या शाळेचे शुल्क निघून गेले. 
         तो चमत्कार. तो चमत्कार तिनं आपल्या पतीला सायंकाळी सांगताच त्याच्या मनातील नास्तिकपण निघून गेलं व तोही देवाची त्यादिवशीपासून पुजाअर्चना करु लागला होता.
         वेतन बंदला एक वर्ष झाला होता. त्यातच एक वर्षानंतर त्याला आपली केस टाकायची होती व त्याच देवाची कृपा की काय, जी वकील मंडळी केस लढतांना आधीच पन्नास हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपये मागायचे. त्याला त्याची केस लढायला असा वकील मिळाला होता की ज्यानं केस लढतांना केस टाकण्यापुर्वी पैसेच मागीतले नाही व केस जिंकतपर्यंतही पैसे मागीतले नाहीत. ही देवाचीच कृपा झाली आहे आपल्यावर असं त्याला वाटत होतं. एका पाषाणात असलेल्या मुर्तीनं त्याच्या जीवनात चमत्कार घडवून आणला होता नव्हे तर त्याला पाषाणरुपी देवावर विश्वास ठेवायला लावला होता. 
         देव आहे की नाही. हा वादाचाच विषय होता. त्याबद्दल लोकांमध्ये बरेच मतमतांतरे होती. परंतु आता सोहेलनं देव मानायला सुरुवात केली होती व तो देवाचं अस्तित्वही मान्य करीत होता.
          सोहेल विचार करीत होता. देव मोठा की पैसा. पैशानं सारंच करता येतं. साऱ्याच लीला घडवता येतात. पाषाणातील देव पैसेवाल्यांचं ऐकतो. परंतु असंही नाही की तो देव केवळ पैसेवाल्यांचंच ऐकतो. तो गरीबांचंही ऐकतोच. अन् देव जरी पाषाणात असला आणि ती अंधश्रद्धा वाटत असली तरी देव आहे व तो सर्वत्र फिरत असतो. 
         सोहेल विचार करु लागला की पैसा...... पैसा अतिशय महत्वाची गोष्ट. तो आजच्या काळात रंकाला राजा व राजाला रंक बनवू शकते. देवाचंही दर्शन घ्यायचं असेल तर पैसा लागतोच.
         देव आहे ही अंधश्रद्धा आहे व तो पाषाणात आहे ही मोठी अंधश्रद्धा आहे. असं लोकं म्हणतात व मानतातही. परंतु यावरुन देवाचे अस्तित्व नाकारता येत नाही. कारण त्याबाबत प्रत्यक्षात पुरावे आहेत. वारा, वादळ, पूर, महापूर निर्माण होणे, भुकंप येणे, एखादा जीव सजीव राहणे, पाऊस येणे, वीज कडकडणे, या सर्व गोष्टी देवाच्या अस्तित्वाचे प्रत्यक्षात पुरावे आहेत. हे नाकारणे अशक्य आहे. देव जर पाषाणात मूळ अवस्थेत असता तर माणसानं देवाची पुजा केली नसती. तर तो अतिशय घाबरला असता. हे नाकारता येत नाही. म्हणूनच देव हा पाषाण अवस्थेत असूनही दिसून पडत नाही.
          अलिकडील काळात देव हा पैशासमोर झुकतांना दिसत आहे. तो श्रीमंतांच्या हातचा कळसुत्री बाहुलाच वाटत आहे. कारण श्रीमंत लोकं पैसे देवून देवासमोर लवकर पोहोचतात. तसं पोहोचायला गरीबांना भरपूर वेळ लागतो. तसंच देवाच्या दरबारात श्रीमंताची इज्जत पाहिजे त्या प्रमाणात भरपूर होते. तशी इज्जत गरीबांची होत नाही. 
           पैसा...... पैसा अतिशय महत्वाची गोष्ट. ती आजच्या काळात रंकाला राजा व राजाला रंक बनवू शकते. देवाचंही दर्शन घ्यायचं असेल तर पैसा लागतोच. जशी तिरुपती बालाजीची रांग. त्या रांगेत जो जास्त पैसा देईल. त्याला तिरुपतीचं लवकरात लवकर दर्शन घडतं. अन् ज्याच्याजवळ पैसा नाही. त्याला त्याच रांगेत दर्शन घ्यायला कितीतरी वेळ लागतो. त्याच्यासाठी दर्शनवेळेची मर्यादाच नाही. आता ही दर्शनरांग का लावली जाते. हे विचारु नये. 
         देव..... मग तिरुपतीचा बालाजी देव का असेना, तो कधीच असा जास्त पैसा द्या व माझं लवकर दर्शन करुन घ्या, असं म्हणत नाही. तसा कोणताच देव तसं म्हणत नाही. मग तरीही तिरुपतीमध्ये दर्शन रांगेसाठी असं शुल्क. अशा प्रकारचं शुल्क आंध्रप्रदेशातील बऱ्याच मंदिरात आहे. जो जेवढे पैसे मोजेल. त्याला तेवढ्या लवकर दर्शन होतं देवाचं आणि हा पैसा देवदर्शनासाठी आलेल्या गरीबांच्या जेवणाची व राहण्याची सोय लावण्यासाठी खर्च केला जातो. 
        देव..... देव आहे की नाही, हा वादाचा विषय. तसा देव नाही, असं समजून पर्यटन करणाऱ्याला काहीच वाटत नाही देवाचं. असा व्यक्तीही देवाच्या गाभाऱ्यात जातो. भक्तीभावानं नाही तर हौसमौज करण्यासाठी. अशी हौसमौज करीत असतांना शालीनतेनं तो वागत नाही. शालीनतेचा पोशाख परिधान करीत नाही. तर काय करतो? तोकडे कपडे वापरतो. महिला असतील तर लिपस्टीक, केशसज्जा याला जास्त महत्व देतात. अन् पुरुष पुर्णतः बरमुड्यात दर्शनाला जातो. शिवाय त्यांचं आचरणही व्यवस्थित नसतंच दर्शन घेतांना. जसा पुरुष त्या स्रीचा, ती एखादी बालक आहे, असे समजून हात पकडून नेतो. तिही त्याच्या खांद्यावर आपली मान ठेवून दर्शन रांगेत उभी असते. अन् तोही तशाच अवस्थेत. देव मात्र साधा भोळा. त्याच्या दरबारात कुणीही या. तो सर्वांनाच काहीच बोलत नाही. तो सर्वांनाच विनाकुरकूर करत दर्शन देतो. कारण त्यालाही माहित आहे की त्याला माणसानंच बनवलं. देवरुप दिलं. त्यामुळंच आपण बोलू नये. बोललो तर ज्या माणसानं आपल्याला देवरुप दिलं. तो माणूस आपल्यालाच नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. अन् होतं तसंच. बऱ्याचशा मंदिरात देवांना दागदागीने घालून दिले जातात व हे दागीणे चोरीला जावू नयेत. म्हणून देवालाच कुलूपबंद करुन टाकलं जातं. देवाचे दागीणे चोरीला जावू नये व देवानं फिरायला कुठेच जावू नये म्हणून कुलूपबंद अवस्था. त्यातूनच त्याचं दर्शन रात्रंदिवस. त्याला उसंतच दिली जात नाही. क्षणभरही सवड नसते देवाला. कधी थकवा जाणवलाच आणि झोपायची इच्छा झालीच तर झोपही बंद. कधी लुटक आलीच झोपेची तर भक्त दुरुनच त्याच्या अंगावर बेल, फूल फेकतो. मग झोपमोड होते. बरं झालं की देव हा आपण पाषाणात पाहिला आहे व आपण पाषाण पुजून त्यात देव आहे असं संबोधून त्याची पुजा करतो म्हणून. जर तो साक्षात असता तर त्यानं काय केलं असतं, याची आपण कल्पनाही करु शकत नाही. 
         सोहेलला विचार आला. जर देव पाषाणात नसता. प्रत्यक्ष जीवंत स्वरुपात असता तर खरंच त्यानं बेलफुल, दुधाचा अहोरात्र अभिषेक स्विकार केला असता काय? त्यानं आपली कुलूपबंद अवस्था स्विकार केली असती काय? त्यानं एकाच जागी अहोरात्र स्तब्ध राहाणं स्विकार केलं असतं काय? खरंच त्यानं आपल्याला कुलूपबंद अवस्थेत दर्शन दिलं असतं काय? याचा अर्थ नाही असाच आहे. अन् हेही स्विकारलं नसतं की त्याचे गरीब भक्त त्याच्यासाठी ताटकळतच राहावे. त्यांनीही बारा बारा तास आपल्या भेटीसाठी स्तब्ध उभं राहावं. तो तर अशा भक्तांसाठी ताबडतोब लगबगीनं आला असता आपल्या जागेवरुन हलून. जसा देव कोलबा स्वामीला भेटायला गेला तसा आणि पुंडलिकाला भेटायला गेला तसा. देवानं स्वतः कुलूपबंद अवस्था स्विकारलीच नसती. कारण ती अवस्था त्याला गुलामीची वाटली असती. 
          देव आहे की नाही. याबाबतीत बरेच वाद विवाद आहेत. तसाच देव हा नेमका कोणाला पावतो. याबद्दलही बरेच वाद आहेत. देव हा जो दर्शन रांगेत जास्त प्रमाणात पैसे मोजतो, त्यांनाच जास्त पावतो. असे नाही आणि असेही नाही की जी मंडळी दर्शन रांगेत पैसेच मोजत नाही त्यांना पावत नाही. तो सर्वांनाच पावतो. 
          देव आहे किंवा नाही. हे पाहात असतांना काहीजणं नक्कीच म्हणतील की देव नाही. कारण देव जर असता तर तो कुलूपबंद अवस्थेत राहिला नसता. तो फिरला असता. लोकांना दिसला असता. त्याचं संचलन दिसलं असतं. अशा घटकाला नास्तिक घटक म्हणता येईल. दुसरा घटक आहे, आस्तिक. जो घटक देव असल्याची अनुभूती करतो. त्याचं अस्तित्व मानतो. त्याची निरंतर सेवा करतो व त्याचेकडून सर्व मिळविण्याची अपेक्षा करतो. देव मात्र भेदभाव करीत नाही. तो फक्त परिक्षा घेतो. मग नास्तिक जरी व्यक्ती असला तरी त्याचेवरही देव हा तेवढंच प्रेम करतो. त्यालाही तेवढंच देतो. जेवढं त्याच्या भाग्यात लिहिलं असेल आणि जो देवाला भजतो. त्यालाही तेवढंच देतो. जेवढं त्याच्या भाग्यात असेल.
        भाग्य...... भाग्य चांगलं बनतं, ते त्याच्या मनातील चांगल्या विचारानं. त्याच्या मनातील दयेच्या भावनेनं व त्याच्या मनातील सेवाभावी वृत्तीनं. जर ती सेवाभावी वृत्ती प्रखर असेल व तो नास्तिक असेल तरीही देव त्याला भरभरुन देतो. त्याच्यातील दयेची भावना व सेवाभावी वृत्ती पाहून. देव दर्शन रांगेत कोणता भक्त किती पैसा मोजतो. याकडे पाहात नाही. पाहतो, त्याच्या दर्शनाला येणारा व्यक्ती ही कशा प्रकारची आहे. त्याचं आचरण कसं आहे. त्यानं रस्त्यातून येतांना कोणाकोणाला मदत केली. कशाकशातून मदत केली. मदत व सेवा ही केवळ पैशातूनच करायला हवी असे नाही. चांगल्या बोलण्यातूनही मदत व सेवा करता येते. जसे, एखाद्याला रस्ता माहित नसेल तर त्याला रस्ता सांगणे. जसे एखाद्याला कोणती अडचण आली तर त्याची अडचण आपल्या कृतीतून दूर करणे. त्याचा उपहास न करणे. शिवाय एखादा भिकारी जरी रस्त्यावर विव्हळत असेल तर त्याला दिलेले दोन रुपये आपल्या भाग्याचं कितीतरी करोडो रुपयाचं संकट दूर करु शकतात. हेच कृत्य आवडतं देवाला. आवडत नाही त्याच्याकडे जात असतांना रस्त्यावर भेटलेल्या माणसांची केलेली विभित्सना. तो उपहास आणि त्याबद्दल आपल्या मनात व आपल्या विचारात असलेला अहंकार.
         देवाची प्रतिमा ज्या परिसरात पाषाण स्वरुपात असते. त्या ठिकाणी देव वास करतो. तो वास आपल्याला जाणवतो. कधी थंडगार हवेतून. तर कधी मेघ नकळत आपल्या जवळून जात असतात त्यातून. असं वाटतं की देवच आपल्याला जणू स्पर्श करीत आहे की काय? कधी देव जाणवतो आपल्या अगरबत्ती व फुलाच्या सुगंधातून. वाटतं की देवंच आपलं मन प्रसन्न करायला आलेला आहे की काय? कधी तेथील निसर्गरम्य वातावरणातून देव आपल्याला दिसतो. कारण तेथील वातावरण निसर्गरम्य असतं. जे वातावरण आपल्या घरी आपल्याला पाहायला व अनुभवायला मिळत नाही. ते वातावरण पाहिलं व अनुभवलं की आपलं मन प्रसन्न होतं. तोच अनुभव म्हणजे देव असतो. असं वाटतं की देव हा तिथंच वसला असावा.
            देव पाषाण अवस्थेत असतो असे नाही. ज्याला आपण सोन्यानाण्यानं मढवतो. ते सोने चोरीला जावू नये म्हणून कुलूपबंद अवस्थेत त्याला ठेवतो. परंतु पाषाण अवस्थेत फक्त त्याची प्रतिमा असते. तो नसतोच तिथं. तशीच कुलूपबंद अवस्थेत त्याची प्रतिमा असते. तो नसतो. तो सर्वत्र फिरत असतो व जो सात्विक असेल, त्यालाच तो अनुभवता येतो. कधी नास्तिक व्यक्तीलाही त्याचा अनुभव येतो. परंतु नास्तिकपण आड येत असल्यानं त्याचं अस्तित्व नास्तिकांना दिसत नाही आणि त्याचं अस्तित्व कोणत्या नास्तिकानं मानलं नाही तरी तो देव त्याचेवर रागावत नाही. अन् पैसा हा काही देव नाही. परंतु आजची मंडळी ही पैशालाच देव मानतात. पैशानंच सगळं होतं असं मानतात. अन् घडतंही तसंच. कारण आजच्या काळात नोकरीला लागायचं असेल तर पैसाच मोजावा लागतो. सुखसोयी मिळवायच्या असतील तर पैसाच मोजावा लागतो. देवाचं दर्शनही लवकर घ्यायचं असेल तर पैसाच मोजावा लागतो. म्हणजे पैशानंच सर्वकाही मिळतं. अगदी देवही, फक्त पाषाण रुपातील. परंतु प्रत्यक्ष स्वरुपातील देव हा पैसेवाल्यांना कधीच मिळत नाही. तो पैसेवाल्यांचा फायदा कधीच करीत नाही. याची अनुभूती तेव्हा येते. कधीकधी भरपूर पैसा असतो. तरीही जमानत होत नाही, एखाद्यावेळेस एखाद्या खटल्यात आणि अगडबंब पैसा असून देखील कधीकधी असा असाध्य आजार जडतो की त्या पैशानं असा जडलेला असाध्य आजार दुरुस्त होत नाही. त्यावेळेस वाटतं की पैशात देव नाही. अन् आणखी अनुभूती तेव्हा येते, जेव्हा डॉक्टर सांगतात की मी सारेच प्रयत्न केले. आता देवाच्या हातावर आहे. आपण त्याचा धावा करा. मग आपल्याला काहीही सूचत नसल्यानं आपण देवाचा धावा करतो. कधी काही कबूल करतो. अशातच अकस्मात चमत्कार होतो व जे न घडायचं. ते घडतं. त्यावेळेस आपल्याला देवाची खरीखुरी अनुभूती येते व आपल्याला वाटतं की देव आहे. अन् देव पाषाणातच आहे.
         महत्वाचं म्हणजे देव पाषाणात नाही. देव हा चराचरात आहे. तो वस्तूच्या कणाकणात आहे. तो त्यालाच दिसू शकतो. जो सात्विक आहे, दयाळू आहे व सेवाभावी आहे. इतरांना देव दिसूच शकत नाही. दिसू शकणार नाही. कारण ती मंडळी ही स्वार्थी, क्रूर व अहंकारी असतात. ते इतरांना हीन समजतात. देवाला भेटायचं असेल तर आपण आपला अहंकारीपणा सोडायला हवा. स्वार्थपण सोडायला हवं. सत्य बोलायला हवं. अहिंसा बाळगायला हवी. तरंच देव भेटेल आणि पावेलसुद्धा. देव पाषाणात नाही असं जरी लोकं मानत असले व ही अंधश्रद्धा वाटत असली तरी देव नक्कीच आहे व ती अंधश्रद्धा नाही. हे तेवढंच खरं. आपण त्याला शोधायला हवं. तरंच देव दिसेल आणि भेटेलसुद्धा.
         वेतन बंदच्या केसला दोन वर्ष झाले होते. सोहेल खटला जिंकला होता व त्यानुसार त्याला दोन वर्षाचा पैसाही मिळाला होता. आता तो देव देवभक्तीचे गोडवे गात होता व तो त्याबद्दल लोकांनाही सांगत असे. तसाच तो आता दरवर्षी यात्रेलाही जात असे. 
          देव मिळवायचा असेल तर......... सोहेलला प्रश्न पडला. देव हा फक्त पुजेमध्ये नाही. देव हा फक्त पैशामध्ये नाही. तर देव भक्तीत आहे. कोणाची सेवा जो कोणी उत्तमप्रकारे करीत असेल, त्यालाच देव पावतो. असं त्याला वाटायचं. अन् त्याबद्दल तो सांगायचाही. 

*******************१०**********************

          सोहेल आता आस्तिक बनला होता. अशातच तो यात्राही करु लागला होता. श्रावण महिना तो पाळू लागला होता. त्या महिन्यात असलेला सणांचा गोडवा त्याला चांगला वाटत होता. त्याबद्दल तो लोकांना सांगायचा.
           एकदाचा असाच प्रसंग. त्यावेळेस एका सापानं सहा मुलींना दंश केला होता. ज्यात त्या सहाही मुली मरण पावल्या होत्या. ती बातमी वर्तमानपत्रातून आली होती. तसा मीनाचा फोन आला. तसं मीनाशी बोलता बोलता त्यानं श्रावणाची महिमा तिला सांगीतली.
           "श्रावण महिना..... या महिन्याची ओळख सणांचा महिना म्हणून आहे. कारण या महिन्यात भरपूर सणं असतात. या महिन्यात सापाला जास्त महत्व दिलं जातं. त्याची पुजा केली जाते. त्यासाठी यात्रा केली जाते. ते या महिन्यात जास्त निघतात. कारण त्यांच्या अधिवासाचे ठिकाण या महिन्यात येणाऱ्या पावसानं भरलेले असतात. मग ते वर जमीनीवर येवून कुठंही अधिवास करीत असतात. ज्यातून वर्तमानपत्रातून आलेल्या बातमीनुसार याच सापानं सहा मुलींना दंश केला व त्यातील तीन मुली मरण पावल्या. साप चावू नये वा त्याचा दंश होवू नये म्हणून श्रावण महिना व्यवस्थित पाळला जातो. त्या निमित्यानं यात्रा वैगेरे केल्या जातात. घरी श्रीकृष्णाच्या मातीच्याही मुर्तीचं पुजन केलं जातं. तरीही एखाद्या वेळेस गालबोट लागतंच व श्रावण बदनाम होत असतो. तसं पाहिल्यास श्रावण महिन्याचे जसे तोटे आहेत. तसाच तो पाळण्याचे अनेक फायदेही आहेतच." 
         "होय, श्रावण महिना दोन पद्धतीनं सुरु होतो. पहिली पद्धत आहे, पौर्णिमेपासून सुरुवात होणे. जसे उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, छत्तीसगड अशा काही राज्यातील लोकं श्रावण महिन्याची सुरुवात ही पौर्णिमेपासून करतात. याचाच अर्थ महाराष्ट्र प्रदेशात राहणाऱ्या हिंदी भाषिक लोकांच्या श्रावणाची सुरुवात ही पंधरा दिवस आधीच म्हणजे पौर्णिमेपासून होते व तो महिना रक्षाबंधनच्या दिवशी असलेल्या पौर्णिमेला समाप्त होतो. तसं महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात या महिन्याची सुरुवात दिपपुजेपासून होते. तसाच या महिन्याचा शेवट पोळ्याच्या दिवशी होतो. याचं कारण महाराष्ट्रात पंचाक नावाचं पंचांग मानलं जातं. श्रावण मासात दिपपुजेनंतर नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन व पोळा हे सणं येतात. आपण फक्त महाराष्ट्रात श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती पाहूया."
          "होय, सांगच मला. श्रावणाची माहिती. मी तसाही अनभिज्ञच आहे, आध्यात्मिक गोष्टींपासून." सोहेल म्हणाला. तशी ती त्याला सणांची माहिती सांगू लागली. 
          "हे बघ, श्रावण मासात पहिला सण येतो जीवती. दिपपुजा वा जीवती. हा सण आला वेद व्यासांपासून. वेद व्यास हे केवळ एक ऋषीच नव्हते तर ते गुरुही होते. त्यांना असलेलं ज्ञान ते इतरांना निःस्वार्थपणे शिकवीत असत. त्यांच्याच हाताखाली महाभारत कालीन संजय, ज्याला पहिला पत्रकार म्हणतो, तो शिकला. त्यांनीच आषाढी पौर्णीमेला गुरुचं पुजन करावं लागतं याची सुरुवात केली. तो काळ........ त्या काळात काही काही शिष्यांना ज्ञान हवं असायचं. तेव्हा ते शिष्य कोणत्याही गुरुजवळ केव्हाही जात व त्या गुरुंना गुरु बनवून त्यांच्याकडून केव्हाही ज्ञान प्राप्त करुन घेत. परंतु वेद व्यासांनी त्याचा विचार केला व शिक्षणात सुत्रबद्धता आणली. कोणत्याही शिष्याला जर ज्ञान मिळवायचं असेल तर त्यानं आषाढी पौर्णीमेला गुरुजवळ यायचं. त्या गुरुचं पुजन करायचं. त्यांचा यथोचीत सन्मान करायचा व त्यांची यथोचीत सेवा करायची. त्यांच्या पुर्वचाचणीत पास व्हायचं. मग गुरु ठरवेल की त्याला शिक्षण द्यायचं की नाही. या प्रक्रियेला पंधरा दिवसाचा अवधी म्हणजे आषाढ पौर्णीमा ते जिवतीपर्यंत वेळ लागायचा. त्यातच असा शिष्य त्या गुरुंच्या परीक्षेत पास झाला की श्रावण महिण्याच्या पहिल्या दिवसापासून त्या शिष्यांच्या शिक्षणाची सुरुवात करायची, अर्थातच दिपपुजन करायचं. दिपपुजन यासाठी की त्या गुरुनं जे ज्ञान मिळवलं आहे. ते ज्ञान त्या शिष्यानं प्राप्त करावे व ते ज्ञान त्या शिष्यानं पुढं जावून गुरु बनून आपल्या शिष्यांना द्यायचे. तसं पाहता ते कार्य आपला शिष्य विसरु नये यासाठी असा गुरु एक तेलाचा दिवा लावायचे व ते आपल्या शिष्याच्या हाती देवून ठामपणे व स्पष्टपणे सांगायचे की हा तुझ्या हातातील दिवा सतत तेवत ठेवायचा. जसा विवाह सोहळ्यात वधूकडील लोकं वराकडील लोकांच्या हातात दिवा देतात तसं. त्याचा अर्थ वंश वाढो असा व या दिपपुजेचा अर्थ ज्ञानाचं वृद्धींकरण व्हावं असा आहे. ते बोलणं लक्षात घेत तो शिष्य या दिपपुजेच्या दिवसापासून आयुष्यभर त्या दिव्याला जपत राहायचा. तसाच तो दिवा तेवत ठेवत असे. पुढे यात अध्यात्मपणा आला व त्याला अंधश्रद्धेचं स्वरुप प्राप्त झालं व दिपपुजन ही प्रथा पडली."
          "दिपपुजा अर्थात जीवतीचं महत्व कळलं. आता नागपंचमीची महिमा सांग." सोहेलनं म्हटलं.
          "हे बघ, दिपपुजेनंतर दुसरा श्रावण मासातील सण येतो नागपंचमी. त्यात मुख्यत्वे शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या नागाला जास्त मानलं जातं. ही पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असते. विदर्भातील नागपंचमी उत्सवाचं वर्णन केल्यास विदर्भातील लोकं नागपंचमीला नागद्वारच्या यात्रेला जातात. जी यात्रा अतिशय कठीण असून जीव घेणारी वाटते. या यात्रेत एवढे भावीक आपल्या जीवावर उदार होवून येतात की त्याची कल्पना करता येत नाही. जणू या यात्रेतील भावीक पाहिले की कल्पना येते भाविकांच्या भक्तीभावपणाचा. या यात्रेत हवशे, नवशे व गवशेही असतात. त्यातील बरेचजण दारुही पितात. परंतु या टेकडीचा मालक असलेला स्वामी नागराज त्यांनाही काहीच होवू देत नाही. तसं पाहिल्यास या ठिकाणी चालणं म्हणजे तारेवरची कसरत असते. असे बरेचसे भावीक असतात की जे या ठिकाणच्या गोटाळ भागात पायात चप्पल न वापरता चालतात. तसं त्यामागं एक शास्रीय कारणही आहे. आपल्या पायात जे दाबबिंदू असतात, ते दाबबिदूं आपल्या पायी चालण्यानं खडे, गोटे रुतून सक्रिय होतात. ज्यातून आपल्या जुन्यातील जुन्या व्याधीतही सुधारणा होत असते. तसंच आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्यात जो कोलेस्टेरॉल गोळा होतो. त्या कोलेस्टेरॉलनं आपल्या रक्तवाहिन्या जाम झालेल्या असतात. त्या रक्तवाहिन्या या ठिकाणी अनवाणी चालण्यानं नव्हे तर केवळ चालण्यानं खुल्या होतात. एकंदरीत सांगायचं झाल्यास जशा गडरच्या नाल्या पावसाचं सांडपाणी व्यवस्थीत वाहून जावं म्हणून आपण रस्त्यावरच्या नाल्या साफ करीत असतो. तसंच शरीरातील रक्त व्यवस्थित वाहावं वा त्या रक्ताला रक्तवाहिन्यातून व्यवस्थित वाहता यावं म्हणून अशा टेकड्या चढणं म्हणजेच रक्तवाहिन्या साफ करण्यासारखं आहे. त्यानुसार या नागद्वार यात्रेची गरज व त्याचं नियोजन आपल्या पुर्वजांनी करुन दिलेलं आहे. कमीतकमी वर्षातून एकदा तरी ही यात्रा करावी. असं आपल्या पुर्वजांनी आपल्याला शिकविलंय. त्यामुळं आपण दरवर्षी नागद्वार यात्रेला नक्कीच जात असतो. तिथं चालणं कठीण असलं तरी. आता राहिला प्रश्न भाविकतेचा. तर आपल्या पुर्वजांनी या नागद्वार यात्रेमध्ये दुरदर्शिपणा लक्षात घेऊन भाविकता जोडली आणि भाविकतेत अंधश्रद्धा. जर ती भाविकता आणि अंधश्रद्धा आपल्या पुर्वजांनी त्यात शिरवली नसती तर कोणताच व्यक्ती नागद्वारसारखी कठीण यात्रा करायला गेलाच नसता. नागद्वार यात्रा ही श्रावण महिन्यातच येते. त्याचं कारण आहे पाऊस. पाऊस जर असेल तर नागद्वारची यात्रा करणं अतिशय सुलभ असतं. त्रास वाटत नाही कोणत्याही पद्धतीचा. वरुन भाविकताही सोबतीला असते आणि अंधश्रद्धाही. त्यामुळं थकवा देखील पुरेसा जाणवत नाही. अशाच चालण्यानं शरीराची झीज होते. वाढलेलं वजन कमी होते. त्यानंतर असे व्यक्ती परत आले की कसनी करतात. कसनी अर्थात वेगळं राहाणं. त्याचंही एक कारण आहे. आपल्याला कुणाचा सव्वा महिने स्पर्श नको. कुणाच्या हातचं पाणी पिता येत नाही. अन्न खाता येत नाही. ज्या अन्नपाण्यात पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतात. ते कुणाला स्पर्श केल्यास वा त्यांच्या हातून पाणी व अन्न ग्रहण केल्यास आपल्याला रोग होवू शकतात. याचाच अर्थ असा की आपल्या पुर्वजांनी किती नियोजन बद्ध रितीनं श्रावण महिन्यात नागद्वार यात्रेची निर्मिती केली असावी."
          "ही झाली नागपंचमीची माहिती. आता रक्षाबंधनाची माहिती सांग."
        "श्रावण मासातील तिसरा सण असतो रक्षाबंधन. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जात असे, वेळात वेळ काढून. ती कशी आहे, कोणत्या हालअपेष्टेत आहे, याची विचारणा करण्यासाठी. त्यातच तो तिला काही भेटवस्तूही देत असे आणि तिच्या सुखी जीवनाची कामना करीत असे. एवढंच नाही तर तोच भाऊ तिच्या रक्षणासाठी तिच्या घरी आल्यावर एक प्रकारचं रक्षासुत्र बांधून घेत असे व तद्नंतर तिच्यावर कधी संकट आल्यास तिच्या जीवाच्या रक्षणासाठी तो भाऊ धावून जात असे. हाच भाग होता पुर्वीपासूनच. कारण बहिणीचा विवाह झाल्यानंतर बहिण कधीच जात नव्हती आपल्या भावाला भेटायला. तिचा भाऊच यायचा. परंतु आता काळ बदलला व आता बहिण भावाच्या घरी रक्षासुत्र बांधायला जाते आणि स्वार्थ मनात भावाकडून काही भेटवस्तूची अपेक्षा करते. त्यातच तामसी जेवनाचीही अपेक्षा करते. हा सण कोळी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असून याच महिन्यापासून कोळी बांधवांच्या व्यवसायाला सुरुवात होते. कारण त्यापुर्वी समुद्र भरलेला असतो. ज्यातून त्यांना मासेमारी करता येत नाही. परंतु राखीपासून पाऊस कमी होत असल्यानं समुद्रात व्यवस्थित मासेमारी करता येते. म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात."
           "ही झाली रक्षाबंधनाची माहिती. आता यानंतर येणाऱ्या सणाची माहिती काय आहे."
           "या महिन्यातील चौथा सण असतो श्रीकृष्णजन्माष्टमी. या दिवशी भावीक आपल्या घरी क्रिष्णाची मातीची मुर्ती प्रस्थापित करतात व त्या दिवशी ते सात्वीक आहार ग्रहण करतात. अर्थात चणे व घनोले, लोऱ्या व सातू खाण्याची पद्धती आहे. ज्या पदार्थाच्या खाण्यातून पोटातील जंत बाहेर पडून पोट साफ होत असतं. शिवाय हा दिवस साजरा करीत असतांना भावीक नाचगाणे करतात. ज्यातून शरीराला ज्या व्यायामाची गरज असते. तो व्यायाम होतो."
          "छानच. यानंतर येणाऱ्या सणाची माहिती सांग बरं."
         "श्रावण महिन्यातील शेवटचा सण असतो पोळा. हा सण मोठ्या माणसांसाठी, बैलांसाठी व बालकांसाठी अतिशय महत्वाचा सण. या दिवशी मोठी माणसं आपल्या घरच्या बैलाला धुतात. त्याला सजवतात व पोळ्यात मिरवणूकीनं नेतात. त्यातच त्याला मोहफुलाची पुरणपोळी खावू घालतात. ज्यातून बैलाला बळ येतं, अशी आख्यायिका आहे. तसंच दुसऱ्या दिवशी लहान बैलाचा पोळा राहात असून या दिवशी लहान मुलं आपल्या लाकडाच्या नंदीबैलाला पोळ्यात नेतात व मौजमजा करीत असतात. त्याही दृष्टीकोनातून हा महिना महत्वपुर्ण. याशिवाय ईद येते, पतेती येते. ते वेगळच. एकंदरीत सांगायचं झाल्यास महाराष्ट्रात श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असून आपल्या पुर्वजांनी अतिशय नियोजनबद्ध रितीनं या महिन्यात सणांची आखणी केलेली आहे. तसं पाहिल्यास या महिन्यात मांसाहाराला वज्र मानलं जातं. त्याचं कारण आहे, वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरात असलेले व पावसातून उद्भवणारे आजार. ते माणसाला होवू नये. यासाठी पाळला जाणारा मांसाहार वज्रचा नियम. शिवाय नागद्वार यात्रेतून शरीरातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण. चणे, सातू खाण्यातून पोट साफ होणं व लाह्या खाण्यातून शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणं या साऱ्याच गोष्टी. एवढंच नाही तर बैलाचीही प्रतिकारशक्ती वाढविण्याची गोष्ट. नागाला न मारण्याचा संदेश. या सर्वबाबी श्रावणच महिन्यात घडत असतात. त्यातच पर्यावरणाचं संवर्धन, संरक्षण आणि इतर बरंच काही याच श्रावण महिन्यात घडत असतं. एवढंच नाही तर या महिन्यात असंही आल्हाददायक वातावरण असतं की त्या वातावरणातून मन तरल होतं. याचाच अर्थ मनाचीही शुद्धता होत असते. हे तेवढंच खरं. अन् हे मन शुद्ध करण्यासाठी दिपपुजा, नागद्वार यात्रा, गोकुळाष्टमी, बैलाचं पुजन, रक्षासुत्र इत्यादी गोष्टी. वरुन सोबतीला पाऊस. या सर्वांच्या ताळमेळानं श्रावण सजतो नव्हे तर सजवला जातो. म्हणूनच महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम दिसतो."
            "म्हणतात की याच महिन्यात मारबतीचाहिमी सण येतो."
           "होय, परंतु तो फक्त नागपूमध्येच."
          "तिची माहिती आहे काय तुला?"
          "होय, मारबतीविषयी थोडंसं सांगते. मारबत....... मारबतीचा विशेष असा इतिहास असावा. मारबत हे एका स्रीचं संबोधन असावं. पुर्वी महिलांचा विवाह बालपणीच केल्या जात असे. जेव्हा विवाह करणाऱ्या मुलीला विवाह म्हणजे काय? हेही तिला समजत नसायचंच. मग अशा बालवयातच आपल्यापेक्षा कितीतरी वयाचा असलेला म्हातारा त्या स्रियांचा पती मरण पावताच तिला सती जाण्यासाठी मजबूर करीत असत. बऱ्याच स्रिया पती मरण पावताच स्वखुशीनं तयार होत असत. मात्र काही स्रिया अशाही होत्या की त्या पती मरणानंतर सती जात नसाव्यात. हे समाजाला खपत नसेलच. मग समाज हा तिला तिच्या पती निधनानंतर वारंवार छळत असेल की ज्यातून ती सती जायला तयार व्हावी. तद्नंतर ती सती जायला तयार होत असेल समाजाचा होणारा अत्याचार सहन न झाल्यानं. ती सती जायला तयार झालीच की तिची गावमिरवणूक काढली जात असेल. त्यानंतर गावातून तिची मिरवणूक संपली की गावच्या शिवेवर तिचं जीवंतपणीच दहन केलं जात असेल. हीच प्रथा पुढील काळात मारबत उत्सव म्हणून प्रसिद्ध झाली असावी. हाच मारबतीच्या उत्सवाचा पहिला प्रकार. अलिकडील काळात लोकं पोळ्याला मारबत हाकलतात. म्हणतात की जा गे मारबत. इडा, पीडा घेवून जा गे मारबत. त्यातच बडग्या बनवतात व त्यालाही हाकलतात.
          मारबत...... मारबतीबाबत लोकांना माहित नसेलच. म्हणूनच मारबतीच्या दिवशी लोकं तिला शिव्या देतात. काही बाही म्हणतात आणि तिचा वेगवेगळ्या लोकांशी संबंध लावतात. तिला काहीबाही म्हणणं, लोकांना आवडतं. तिला शिव्या देणं वा हसणं लोकांना आवडतं. ते या मारबतीच्या दिवशी असेही वागतात की जणू त्या मारबतीनं फार मोठा गुन्हाच केलेला आहे. ते लोकांचं वात्रट हसणं, ते वागणं अतिशय वाखाणण्याजोगंच असतं.
          मारबतीच्या उत्सवाचा दुसरा प्रकार म्हणजे मारबत हे एका देवीचं प्रतीक असणं. आदिवासी लोकांमध्ये ही मारबत परंपरा फार पुर्वीपासूनच चालत आलेली आहे. हे आताच्या पिढीलाही कदाचित माहित नसेलच. आदिवासी समुदायाचं मुख्य अन्न असायचं, शिकार व मासे खाणे. ते जंगलातील फळफळावळावर अवलंबून असायचे. परंतु पावसाळ्याच्या चार महिने त्यांना व्यवस्थित अन्नच मिळायचं नाही. कारण पावसाळ्यात ज्यावेळेस पावसाचं पाणी यायचं. त्यावेळेस खाली जमीनीवर दलदल असायची. त्यामुळंच प्राणी, पक्षी झाडावर अथवा गृहेत वास्तव्याला असायचे दिर्घकाळ. तेही अन्नासाठी विशेषतः गृहेच्या बाहेर पडायचे नाहीत. अशावेळेस जर काही कारणास्तव माणसे शिकारीच्या शोधार्थ जंगलात गेलेच तर ते भुकेलेल्या हिंस्र प्राण्यांचे शिकार व्हायचे. असं होवू नये म्हणून आदिवासी समुदाय, श्रावण संपताच एक मातीचा पुतळा तयार करायचे. त्या पुतळ्याला मारबत असं नाव द्यायचे. मग त्या पुतळ्याचं पुजन करायचे व म्हणायचे की इडा पीडा घेवून जा गे मारबत. असं म्हणून तिचं विसर्जन एखाद्या नदीत किंवा नाल्यात करायचे. त्यानंतर ते जंगलात जायचे. ह्या प्रतिकात्मक मातीच्या पुतळ्याचं पूजन करण्याची पद्धत आदिवासी लोकांमध्ये रुजली. त्याचं कारण होतं, इडा, पीडा घालवणे. इडा पीडा याचं अर्थ होता, माणसांवर येणारी नैसर्गिक आपत्ती. ज्याला नैसर्गिक विपदा वा संकट देखील म्हणता येईल. 
           मुळची आदिवासी परंपरेतील असलेली मारबत नावाची देवी. जी देवी म्हणून पुजली जायची व तीच देवी लोकांच्या समस्या दूर करते, अशी धारणा आदिवासी लोकांची होती. परंतु जेव्हा दिवसानंतर दिवस जावू लागले. तशी ही देवी आदिवासींच्या गोटूलामधून निघून सुशिक्षीत लोकांच्या परीसरात शिरली. मग याच आदिवासी देवीचं रुपांतरण एका महाभयंकर राक्षसीत केलं गेलं. असं होत असतांना व लोकं करीत असतांना लोकांनी या पुतळ्यातील देवीपण पाहिलं नाही. तिला देवीचं रुपडं प्रदान केलं नाही. तर त्यांनी स्वतःमधलंही माणूसपण पाहिलं नाही. कारण कृतयुगात जसं सूर व असूर यांचं राहण्याचं ठिकाण वेगवेगळी गावं होती अर्थात लोक होतं. जसं असूरलोक व देवलोक. त्रेतायुगात त्यांच्या राहण्याचं ठिकाण हे एकच गाव होतं, अर्थात एकच लोक होतं. द्वापारयुगात त्यांच्या राहण्याचं ठिकाण एकच परीवार आणि कलियुगात त्यांच्या राहण्याचं ठिकाण हे एकच देह आहे. याचाच अर्थ असा की आता एकाच देहात चांगले व वाईट असे दोन विचार असतात. ज्याचे प्रमाण जास्त झाले. त्यावरुन त्याचा वर्ग ठरवता येतो. म्हणूनच आजच्या काळातील माणसाचा एकीकडे चांगुलपणा दिसून येतो तर दुसरीकडे त्याचं वाईटपणही दिसून येत असतं. 
          माणसानं आपल्यातील माणूसपण पाहिलं नाही आणि तो इतरांनाच दोष देत राहिला. कारण ज्या माणसांमध्ये चांगले गुण नव्हते. चांगले काम करुच शकत नव्हता तो. तो माणूस इतरांत दोष शोधत होता. इतरांचे दोष दाखवत होता. हेच घडलं, मारबतीच्या बाबतीतही. काही माणसांनी तद्नंतर आदिवासींची मारबत परंपरा आपल्याकडे आणली व आपल्याकडेच मारबत परंपरा सुरु केली. ज्यात मारबती परंपरेतील चांगूलपणा संपला व तिला दोष देणे, तिला शिव्या हासडणे सुरु केले.
          सध्याच्या अवस्थेत मारबत ही पिवळ्या स्वरुपात सुरु आहे. ही पिवळी मारबत अर्थात त्या काळातील आदिवासी परंपरेतील प्रतिकात्मक मातीचा पुतळा असू शकतो वा ती स्री असू शकते. जिला सती जाण्यासाठी मजबूर केलं जात असेल. ज्यांचं पूजन करुन आदिवासी आपल्या संरक्षणपुर्ण जीवनासाठी कामना करीत असत.
         तिसरा प्रकार आहे, काळ्या मारबत परंपरेचा. पिवळ्या मारबतीबरोबरच काळी मारबत सुद्धा आता सुरु झालेली आहे अलिकडील काळात. जिला बाकाबाई म्हणतात. त्याचबरोबर बडग्या काढण्याची परंपरा सुरु झालेली आहे. ज्याला बाकाबाईचा पती म्हणतात. बाकाबाई म्हणजे राजे रघुजी द्वितीय यांची पत्नी. जेव्हा अप्पासाहेब भोसले गादीवर बसले. तेव्हा अप्पासाहेबांनी गादीवर बसतांना इंग्रजांशी संगनमत केलं होतं. परंतु तद्नंतर त्यांनी जनतेच्या मताप्रमाणे राज्य करीत असतांना इंग्रजी नीतीला विरोध केला. ज्यातून अप्पासाहेबांना इंग्रजांनी कैदेत टाकले व त्याचबरोबर त्याच्या विरोधात असलेल्या बाकाबाईच्या दत्तक मुलाला गादीवर बसवले. जो कमकुवत होता. परंतु तो कमकुवत जरी असला तरी त्याचे नावाने राज्यकारभार हा बाकाबाईनंच केला. ज्याला तिच्याच पतीनं मदत केली. यात तिनं इंग्रजांशी हातमिळवणी करुन आपल्या सर्व राजपरीवारातील वंशजांचं ऐहिक सुख पाहिलं. जनतेच्या इच्छा, आकांक्षा व सूख यावर पाणी फेरलं. म्हणतात की तिनंच नागपूरमध्ये प्रयत्न करुन १८५७ राष्ट्रीय उठाव होवू दिला नाही. याच बाबी जनतेनं धरुन पुढं १८८५ पासून काळ्या मारबतीची संकल्पना आली व तिला परंपरा समजून आपण तोच उत्सव मारबत उत्सव म्हणून साजरा करीत आहोत. आपल्याला मारबतीचा इतिहास माहित नसला तरी बाकाबाईवरील आपला बदला पुर्ण झालेला नाही. म्हणूनच हा मारबत उत्सव. काळी मारबत, अर्थात बाकाबाई व बडग्या अर्थात तिचा पती.
           विशेष म्हणजे वरील बाकाबाईच्या सर्व विवेचनातून आपल्याला मारबत आणि मारबतीला लोकं शिव्या का देतात? हे समजतं. त्याचं कारण आहे, बाकाबाईचा जनतेनं विरोध दर्शवणं. जे मनाला पटत नाही. त्याचा विरोध दर्शवणं म्हणजेच काळ्या मारबतीला शिव्या देणं आणि तिला जाळणं. लोकांना बाकाबाईच्या कर्तृत्वाचा एवढा राग आला की लोकं तिचा प्रतिकात्मक मारबत म्हणून पुतळा बनवून त्या पुतळ्याला शिव्या देतात व जाळतातही. सोबत तिच्या पतीचाही बडग्या नामक पुतळा बनवून त्याही पुतळ्याला शिव्या देतात व जाळतातही. असे असतांना खरंच जा गे मारबत म्हणत इडा पीडा घेवून जा गे मारबत अशी जनता आरोळी का ठोकते? त्या पुतळ्याकडून आपली इडा पीडा दूर हाकलण्याची गोष्ट का करते? शिवाय, आपल्याला त्रास देणाऱ्या सर्व घटकांना घेवून जा गे मारबत, अशी जनता अपेक्षा का करते? त्याचं कारण आहे, ह्या मारबतीत असलेलं देवत्वपण. खरंच मारबत ही देवीचं एक रुपकच आहे. मग ते आदिवासींच्या परंपरेचं रुपक का असेना. म्हणूनच मारबत अवश्य काढावी. त्याचा उत्सव अवश्य साजरा करावा. परंतु असा उत्सव साजरा करतांना पहिलं आपलं मन तपासावं. आपण कसे आहोत? हेही तपासावं. आपल्यात वाईट गुण आहेत की नाही? हेही तपासावं. मगच मारबतीला शिव्या द्याव्या. तिला जाळावं व असे करीत असतांना तिच्याकडून इडा पीडा, रोगराई दूर करण्याची अपेक्षाही करावी. जर चांगले गुण स्वतःत असतील तर...... अन् वाईटच गुण स्वतःत भरले असतील तर तिला जाळण्याचा अधिकार नाही. तिला शिव्या देण्याचा अधिकार नाही वा तिच्याकडून इडा पीडा घेवून जा म्हणण्याचा अधिकार नाही. हे तेवढंच खरं."
           "म्हणतात की मारबत म्हणजे क्रिष्ण काळातील पुतना मावशी. तिचा जेव्हा वध केला क्रिष्णानं. तेव्हा तिच्याही प्रेताची धिंड काढली होती मारबतीसारखी. तीच मारबत आहे. असं म्हणणं खरं आहे का?"
            "होय. हे म्हणणं खरंच आहे." मीना म्हणाली व एक दिर्घ श्वास घेवू लागली. तशी ती परत बोलकी झाली.
            "श्रावणात सर्व काही बरोबर होतं. परंतु काही अघटितही घडतंच."
           "परंतु काय. काही अघटितही घडतं का?"
           "होय, काही अघटितही घडतंच या महिन्यात. या महिन्यात पूरही येतात व येणारे महापूरं संपुर्ण मानवजातीला नेस्तनाबूत करीत असतात. मग काही लोकं श्रावणाला गालबोट लावतात."
          "म्हणजे?"
           "म्हणजे ते भलतेच विचित्र प्रकार करतात. जसं दहीहंडी अतिशय उंचावर लावणे. ज्याठिकाणी काळजी न घेतल्यानं पडून जीव जातो. नागद्वार यात्रेत दारु पिणे. ज्यातून पडून जीव जातो. तसंच श्रीकृष्णाची मुर्ती खोल पाण्यात शिरविणे. समुद्राला नारळ खोल पाण्यात नेवून अर्पण करणे. ज्यात काळजी न घेतल्यानं पाण्यात पडून जीव जातो. अशा विचित्र प्रकारानं श्रावण बदनाम होतो. दोष आपलाच असतो आणि आपण श्रावणाला बदनाम करीत असतो."
         "म्हणजे श्रावण महिना दरवर्षी येतो व या महिन्याचे नियम काटेकोरपणाने पाळले तर नक्कीच आपल्याला आणि आपल्या शरीराला फायदा होत असतो. परंतु आपण जर ते नियम व्यवस्थित पाळले तर..... नाहीतर हाच श्रावण क्रोधीत होवून आपल्यालाच त्रास देत असतो. ज्याची परियंती आपल्या मृत्यूत होते. म्हणूनच श्रावण व्यवस्थित पाळावा व आपल्या सुखी व दिर्घायू आयुष्याची कामना करावी. मग ही बाब अंधश्रद्धा म्हणून का असेना. पण हे सत्य आहे. यात शंका नाही. ही वास्तविकताच आहे तर......."
            "होय, हीच वास्तविकता."
            "असंच असतं लोकांचं. लोकं तिरुपतीचा बालाजीलाही भेदभाव करतो म्हणतात. खरंच तिरुपतीचा बालाजी भेदभाव करतो का?"
          "नाही रे, तिरुपतीचा बालाजीच नाही तर कोणताच देव भेदभाव करीत नाही. परंतु लोकंच ते. प्रत्येकाचे विचार वेगळेच. तिरुपतीचा बालाजी. आंध्रप्रदेशातील ऐतिहासिक धरोहर. ज्यात सत्व आहे. असे कितीतरी लोकं म्हणतात. अन् हेही म्हणतात की तिरुपतीचा देव भेदभाव करतो. गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव."
          "तिरुपतीच्या यात्रेला तसं पाहिल्यास भरपूर लोकं जात असतात. वर्षभर जात असतात आणि प्रचंड गर्दीही असते. तसाच या ठिकाणी पाऊस कमी पडत असेल व वातावरणाचा विचार केल्यास आल्हाददायक वातावरण आहे. कारण चेन्नईचा समुद्रकिनारा जवळच असून तेथे समुद्रात निर्माण होणारे वारे इथे वाहात असतात. त्यामूळं इथं वातावरण आल्हाददायक आहे."
          "होय सोहेल, तिरुपतीच्या ठिकाणी गर्दी प्रचंड असते. तसंच याठिकाणी आणि या परीसरात असलेल्या सर्वच देवालयात प्रचंड प्रमाणात गर्दी असते. भक्तांचा ओंढा एवढा येतो तिरुपतीला की रोजच इथं फार गर्दी होवून जाते. मग लॉकर घेणे व आपले साहित्य व्यवस्थित ठेवणे. इत्यादी गोष्टी सतत सुरु असतात. अशातच विषय येतो पासचा. तर पासबद्दल सांगायचं झाल्यास त्यात भेदभाव दिसतो. जसं पाचशे रुपयेची रांग. तिनशे रुपयेची रांग. हजार, पंधराशेचीही रांग असतेच. यालाच पैसे फेका व तमाशा पाहा असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाहीच. हा भेदभाव दिसतो लोकांना. खरंच देव असं करतो काय? तो दर्शन रांगेतून घ्या असं म्हणत नाही काय? मग हा पैसे फेका व लवकर दर्शन घ्या. हा काय विचित्र प्रकार आहे? मी करोडपती. मी जास्त पैसे मोजणार. ज्यातून गरीब वर्गाला देवाचं दर्शन घेतांना कितीतरी वेळ लागतो. अन् पाषाण मुर्तीतील देव अशा गरीब, सामान्य वर्गाच्या लोकांच्या दर्शनासाठी अख्खा एकच दिवस नाही तर जास्त दिवस लावतो. कारण देवाजवळ पैसे देवून जाणारे जे भक्त असतात. त्यांना आधी सोडावं लागतं. तिरुपतीबद्दल मत माडतांना देव भेदभाव करतो. असं काही लोकं म्हणतात. कारण दर्शनरांग. जो जास्त प्रमाणात पैसे मोजेल. तो लवकर देवाजवळ जाईल. अन् देवही त्यालाच पावतो. त्याच्याचजवळ जास्त पैसे येतात. कारण तोच व्यक्ती सामान्य लोकांच्या राहण्यासाठी व त्यांच्या जेवणासाठी व्यवस्था करीत असतो. तिरुपतीचा देव हा श्रीमंतांचा देव. तो पैसे अमाप प्रमाणात देतो. अशी लोकांची श्रद्धा. काय करणार मग देवासाठी वाट्टेल ते. तिरुपतीतील देव हा भेदभाव करतो का? कोणी म्हणतील करतोय तर कोणी म्हणतील की नाही. करतोय जो म्हणत असेल. तो देवाची दर्शन रांग लक्षात घेईल आणि जो करीत नाही म्हणेल. तो तेथील लागणारा खर्च विचारात घेईल."
          "होय, त्या दर्शनरांगेतील पैशावरुन तसंच वाटतंय."
          "परंतु असं नाही. तिरुपतीचा खर्च विचारात घेतांना नक्कीच येथील सेवा वाखाणण्याजोगी आहे. परीसरात कचरा नसतोच. तिथं वावरतांनाही कचरा अजिबात दिसत नाही. शौचालये वेळच्या वेळेस स्वच्छ ठेवली जातात. त्यासाठी मजूर वर्ग लावलेला आहे व हा मजूर वर्ग तिरुपती देवस्थानातील परीसर स्वच्छ करतात. ज्यांना त्यांचं वेतन मिळतं व ते वेतन साधारणतः पन्नास हजारच्या घरात आहे. असे भरपूर कर्मचारी आहेत व प्रत्येक तिरुपतीच्या भागातील मंडळींना दररोजच जेवन मिळतं. विशेष सांगायचं झाल्यास सगळी कामं अप टू डेट आणि ही सर्व कामं करायला भरपूर पैसा लागतो. मग असा पैसा उभारायचा कुठून? त्याचा विचारच मंदीर प्रशासनाला करावा लागतो. अर्थात ते प्रशासन हा विचार करतंच. मग व्यापार होतो. ज्यात दर्शन रांगेतूनही पैसा उभारला जातो. ज्यात देणगी स्वरुपातही पैसा उभारला जातो. घ्यायचंच आहे तर श्रीमंतांकडूनही तशा स्वरुपात पैसा घ्या. ज्यातून गरीब लोकांसाठी सोईसुविधा करता तरी येतील असं प्रशासनाचं मत."
         "खरं आहे तुझं म्हणणं. तिरुपतीत जो कर्मचारी वर्ग आहे. त्यांना वेतन असेलच. काही लोकांचं धन अर्थात वेतन राशी ही पन्नास हजार असेल तर काही लोकांचा पगार हा त्यापेक्षाही जास्तच असेल. शिवाय इथं येणाऱ्या सर्व भक्तांच्या राहण्याची सोय, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, लॉकरचा खर्च. इलेक्ट्रीक खर्च. या सर्व गोष्टी करण्यासाठी पैसा लागतो. तो पैसा गरीबांकडून घेतला जात नसेल. तो पैसा दर्शन रांग व दानराशी याच स्वरुपात घेतला जात असेल." 
          "होय. अगदी तसंच आहे. तिरुपतीतील देव भेदभाव करीत नाहीच. हा भेदभाव व अशा स्वरुपाचा भेदभाव करतं इथलं प्रशासन. कारण त्यांना इथं येणाऱ्या भक्तांसाठी उच्चदर्जाच्या सोयी कराव्या लागतात. ज्याला पैसा लागतो. तो पैसा दानराशीतून तेवढ्या प्रमाणात गोळा करता येत नाही. हो, ठीक आहे की इथं कितीतरी मूल्याच्या स्वरुपात दान येतो. परंतु समजा एखाद्यावेळेस नाही आलं तर..... कारण मंदीर प्रशासन कोणालाही दानाच्या स्वरुपात जबरदस्ती कधीच करीत नाही. जो दे उसका भी भला व जो ना दे उसका भी भला. असं मंदीर प्रशासनाचं काम. म्हणूनच दर्शनरांगेचा पैसा. परंतु हा भेदभाव वाटतो इतरांना. जी सेवाच असते. मात्र काही ठिकाणी दोघांचही चुकतंच."
        "हं, बरोबरच. इथं येणारे सर्व भक्त हे एकाच विचारांचे नसतात. काही भक्त असेही असतात की जे इथे असलेल्या सोईसवलतीचा गैरफायदा घेत असतात. ते इथं असणारं प्रसाद स्वरुपातील जेवन घेतात. परंतु जेवढं पोटाला लागतं. तेवढंच घ्यायला हवं. तसं इथं येणारे भक्त करीत नाहीत व ते जास्त अन्न ताटात घेवून खाणं न झाल्यास फेकून देतात. दुसरं म्हणजे विमल सारख्या गुटख्याच्या पुड्या घेवून जागोजागी थुंकत असतात. ही वस्तूस्थिती आहे. हे सर्व चालतं तिरुपतीमधील बऱ्याच देवस्थानात. परंतु जे मुख्य देवस्थान आहे. तिथं खर्रा, गुटखे न्यायला बंदी असते. दुसरी घाणेरडी सवय म्हणजे मोबाईलचा वापर. कुठेही फोटो काढणे. मंदीर प्रशासनानं त्यावरही बंदी घातली आहे व येथील प्रशासन मोबाईल सोबत ठेवूच देत नाही. फालतूची गोष्ट नको. असं मंदीर प्रशासनाचं म्हणणं. दुसरं कार्य म्हणजे ना फुल ना कोणतं पुजेचं साहित्य नेवू देत. फालतूचा कचरा नको. प्लॅस्टिकवर तर सर्वात जास्त बंदी आहे, मुख्य मंदिरात आणि मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे शालीनता. शालिनतेला भरपूर प्राधान्य दिलं जातं इथे. कोणत्याही मंदीरात आपल्याला तोकड्या कपड्यावर मुली मुलं दिसत नाहीत. ही विशेषता. शक्य झाल्यास पुरुषांसाठी लुंगी व कमीज आणि महिलांसाठी साडी किंवा सलवार सुट. बर्मूड्याला प्रवेशच नाही इथं. तसंच मंदीरात आणि मंदीरात कमी कपडे परीधान केलेल्या महिलांनाही प्रवेश दिसत नाही."
         "शालीनता अतिशय महत्वाची गोष्ट. ती सर्वात जास्त महत्वाची व आपला देश त्याच गोष्टीला मानणारा. सध्या बऱ्याच ठिकाणी लोकांनी मंदीराला बदनाम करुन टाकलंय. महिला व पुरुषांचे तोकडे कपडे. तो बिभत्सपणा. मग मोबाईल जिथं, तिथं फोटो काढत बसणे. या गोष्टी आपल्या संस्कृतीला शोभत नाहीत. प्रत्येक स्री ही मर्यादेच्या बाहेर या ठिकाणी दिसत नाही. परंतु एका गोष्टीचं वाईट वाटतं. ती गोष्ट म्हणजे पास घेण्याची रांग. जी रांग ऐन झोपेच्या वेळेस सुरु होते. त्यातच त्या रांगेत एवढे लोकं असतात की विचारता सोय नाही. ज्यात लहानलहान अगदी नऊ महिन्याची मुलं देखील असतात. काही कोमल, नाजूक महिलाही असतात. ज्या रांगेत अगदी चेपून जातात. तसं पाहिल्यास घटना व्हायला काय लागतं. एखाद्याचा दम घुटमळेल असा विलक्षण अनुभव. जे अशोभणीय असतं. तेवढी एक गोष्ट जर मंदीर प्रशासनानं विचारात घेतली तर आणि त्यात सुधारणा केली तर नक्कीच बरं होईल असं मला वाटतं. बाकी सर्व बरोबर आहे. मंदीर पाहण्यासारखं आहे व मंदिरांचं प्रशासनही छानच आहे. शिवाय आपल्याला जरी वाटत असेल की मंदिरातील देव हा भेदभाव करतो. परंतु तसं काहीच नाही. मंदीरातील देव हा पाषाण असतो. तो काहीच करीत नाही. तसंच मंदीर प्रशासन भेदभाव करीत नाही व तसं कोणीही समजू नये. ते करतं फक्त भक्तांच्या सोयीसाठी. लोकांची अंधश्रद्धा रुपी असलेली भक्ती विचारात घेऊन इथे येत असलेल्या अमाप गर्दीला रितसर पद्धतीनं चालविण्यासाठी मंदीर प्रशासन ज्या कोणत्या गोष्टी करीत असेल. त्या भेदभाव वाटत असल्या तरी त्या भेदभावदर्शक नाहीत. तसं कोणीही समजू नये हे तेवढंच खरं." 
            मीनाचं बोलणं बंद झालं होतं. तसा सोहेलला विचार आला. देवाला मिळवायचे असेल तर........ तो विचार करु लागला.
          'श्रावण लागला आहे व या श्रावणात प्रत्येक माणसं देवाच्या दर्शनाला जात आहेत. कोणी नागद्वार यात्रेला, कोणी महादेव यात्रेला, कोणी क्रिष्णाला भेटायला तर कोणी तिरुपती बालाजीला जात आहेत. अन् या महिन्यात असं जात असतांना काही लोकं शुद्ध आचरण बाळगून जात आहेत. परंतु काही महाभाग असेही आहेत की जे दर्शनाला तर जातात. परंतु अशा प्रकारचं शुद्ध आचरण ठेवत नाहीत. ते भटकतात व भटक्या अवस्थेत देव प्रसन्न होईल की नाही. याचा विचारच करीत नाही. मात्र एक विशेष की त्यांच्या दर्शनाला जाण्यानं जो महसूल गोळा होतो. तो महसूल देशाच्या नक्कीच कामात येतो नव्हे तर तो देवाच्याही कामात येत असतो. देव त्या पैशातून आपल्याकडे येणाऱ्या इतर गरीब भक्तांसाठी खाण्यापिण्याची सोय करीत असतो.
          आजकाल देवाच्या दर्शनाला जाण्याची पद्धत रुढ झालेली आहे व त्या दर्शनाला हवशे, नवशे व गवशे जात असतात. कोणी कोंबडं, बकरं कापून खात खात जात असतात. कोणी आपल्या मैत्रीणीलाही व्याभिचार करण्यासाठी नेत असतात. कोणी कुंभमेळ्यात जातात गंगेत स्नान करण्यासाठी. अन् गंगेत आंघोळ करतांना साबन लावून आंघोळ करतात. ज्या साबनात केमीकल असल्यानं ते पाणी गंगेत मिसळल्यानं कितीतरी जीव मरत असतात. हे पापच असतं. शिवाय प्लॅस्टिक गंगेत टाकून गंगेला अशुद्ध करीत असतात. देव शुद्ध. तशी गंगाही शुद्ध. तिच्या पाण्यात कधीच जंतू होत नाही.
           देव हा मनात असतो व तो शुद्ध आचरणात असतो. देवाचं दर्शन घेण्यासाठी कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. जर आपलं आचरण शुद्ध असेल तर देव आपल्यासाठी स्वतः धाव घेऊन येतो. जसं पुंडलिकासाठी देव विटेवर उभा राहायला तयार झाला, स्वतः तिथं येवून. देव स्वतः विहिरीतूनही प्रगट झाला कोलबा स्वामींसाठीही.
           पाप...... कोणतेही पाप हे पापच असते. साधी पायानं जरी अचानकपणे मुंगी मरत असेल तरी ते पापच असतं. तसंच पाप हे कधीच क्षम्य नसतं. त्याची शिक्षा होतेच.
          भिष्मानं केलेलं कृत्य नव्हे तर पापच. रस्त्यावरुन भिष्माचा रथ जात असतांना एक विशालकाय साप त्यांच्या जाण्याच्या वाटेत आडवा आला. त्यानं रस्ता रोखून धरला. तेव्हा सैन्यानं त्यांना सुचना दिली की आपल्या वाटेत एक अजस्र साप आहे. तो रस्ता सोडायला तयार नाही. काय करावे? त्यावर भिष्माचार्य म्हणाले की त्याला उचलून बाजूला करा. परंतु ते सैनिक, त्यांनी त्याला अधमरा केलं व दूरवर संकटाचा अंदाज न बांधता फेकून दिलं. त्यावर तो सर्प एका बाभळीच्या काट्यावर पडला. ते काटे त्याच्या संपुर्ण शरीराला बोचले. रक्त निघालं व तो सर्प रक्तबंबाळही झाला. पुढं त्याचं जास्त रक्त वाहात गेल्यानं ते मरण पावलं, तेही तळपत तळपत. परंतु असं मरत असतांना त्याच्या आत्म्यातून एक प्रकारची शापवाणी निघाली. ती शापवाणी होती की ज्यांच्या आदेशानं मला या यातना भोगाव्या लागल्या. त्या यातना अगदी तशाच पद्धतीनं तसा आदेश देणाऱ्या व्यक्तीलाही भोगाव्या लागतीलच. पुढं तसंच घडलं व आचार्य भिष्माला अर्जुनाच्या काटेरी बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. जे बाण म्हणजे बाभळीचे काटेच होते.
          पाप....... आपण जे पाप करतो ना. त्याचा बदला तशाच स्वरुपानं काढला जातो. मग आपलं पाप धुतलं जावं म्हणून कितीही शुद्धीकरण करा. त्याला काही अर्थ नाही. ही पापं धुण्याची प्रक्रिया याच जन्मात नाही तर वेगवेगळ्या जन्मात घडत असते. आता लोकं म्हणतात की पुढील जन्म कोणी पाहिले. तर त्याचं उत्तर आहे, आपला जन्म. प्रत्येकच व्यक्ती जन्म घेतो. परंतु प्रत्येकच व्यक्ती जन्म घेतांना सुखसोयी घेवून जन्म घेत नाही. बऱ्याच लोकांचे स्वभाव चांगले असतांना त्यांना अखंड आयुष्य गरीबीतच काबाडकष्ट करून घालवावे लागतात तर काही असेही महाभाग असतात की त्यांना काहीही न करता राजपद मिळतं. प्रभू श्रीरामाने जेव्हा क्रिष्ण जन्म घेतला, तेव्हा आपण पाहिलं की ज्या प्रभू श्रीरामाला त्याच्या जन्मकाळात जे मिळालं नाही. ते क्रिष्ण जन्मात मिळालं. अन् ज्या कैकेयीनं त्यांना चौदा वर्षाचा वनवास दिला. त्याच कैकेयीचा जन्म देवकी रुपात द्वापारयुगात झाला असेल हे नाकारता येत नाही व तिलाही चौदा वर्षाचा वनवास कंसाच्या कारागृहातून कापावा लागला असेल हेही नाकारता येत नाही. कारण ज्या रामाला चौदा वर्षाचा वनवास झाला व त्याची माता कैकेयी चौदा वर्ष दिसली नाही. तीच परिस्थिती द्वापर युगात घडली. इच्छा असतांनाही क्रिष्ण जन्मानंतर देवकीला क्रिष्ण चौदाच वर्ष दिसला नाही. याचाच अर्थ जसे आपले कर्म, तशीच फलश्रुती. आपण जसे कर्म करु. तसेच फळ आपल्याला मिळतेच. मग त्यासाठी वेगवेगळे जन्म घ्यावे लागले तरी. म्हणूनच कर्म हे चांगले करावे म्हणजे झाले.
         लोकं पाप करतांना त्याबद्दल विचारच करीत नाहीत की या पापाचं प्रायश्चित्त नाहीच. हं, अनवधानानं जरी पाप घडलं असेल भिष्माचार्यसारखं. तरी पाप हे पापच. त्याचा बदला हा निश्चितच ठरलेला असतो. त्याला शुद्धीकरण वा प्रायश्चित्त नाहीच. विष्णूच्या दरबारातील जयविजय नावाच्या द्वारपालाकडून जे पाप घडलं. त्या पापाचं शुद्धीकरण होत असतांना त्यांना तीन जन्म घ्यावे लागले. कोणी त्याला दंतकथा म्हणतात. परंतु अलिकडील लोकं सर्रास पाप करतात व शुद्धीकरण करण्यासाठी कुंभमेळ्यात जातात. गंगेत बुडी मारतात व समजतात की आपलं शुद्धीकरण झालं. कोणी तिरुपतीला जातात. कोणी जगन्नाथपुरीला जातात. कोणी महादेवाच्या यात्रेला जातात. तर कोणी वेगवेगळ्या मंदिरात जातात. अन् जाता जाता कोंबडे, बकरे खात खात जातात. त्यांची हिंसा आपल्यासाठी होत आहे व हे पाप घडत असते आपल्या हातून. आपण एका निष्पाप जीवाचा बळी घेत आहोत. ह्या पापातून आपली मुक्ती होणार नाही. हे माहित असतांनाही. खरंच असं करीत करीत देवाच्या दर्शनाला जाणं बरोबर तरी आहे काय? खरंच आपल्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी पशुबळी घेवून पाप करणाऱ्या व्यक्तीने कितीही वेळेस गंगेत डुबकी मारली, कितीही होमहवन केले. तरी त्याला खरंच देव माफ करेल काय? त्यांना देव माफच करणार नाही. मग कितीही वेळेस गंगेत डुबकी मारा. डुबकीनं फक्त अंगावरील मळ निघतो. मनातील मळ अगदी तसाच राहतो. देव त्यालाच पावतो. जो सात्विक असेल. जो सात्विक मनानं देवदर्शनाला जात असेल. आता आणखी एक नवीन प्रथा आली. लोकं देवदर्शनाला जातात. परंतु सोबत पत्नीला नेत नाहीत तर आपल्या मैत्रीणीला नेतात. जी गोष्ट पत्नीला माहित नसते. परंतु देवाला माहित असते. काहीजणं देवाच्याच मंदिरात हनीमूनला जातात. इथंच ब्रम्हचर्य तुटतं व त्याही भक्तांच्या तशा कृतीवर देव नाराज होतोच. तो पावत नाही. कारण देव हा पाषाणात आहे, असं लोकं मानतात. परंतु देव पाषाणात नाही. पाषाण फक्त माध्यम आहे. एक साधन आहे. देव साधनात नाहीच. देव आहे, साध्यात. आपलं आचरण म्हणजेच आपला देव. आपलं आचरण जर शुद्ध असेल तर देव आपल्याला पावतोच. तो आपल्या भेटीसाठी आपल्याच घरी येतो. कधी पुंडलिकाचा विठ्ठल बनून कधी कोलबास्वामीचा विठ्ठल बनून. 
           देव हा शुद्ध आचरण असणाऱ्यांना पावन होत असल्यानं आपण शुद्ध आचरण ठेवावे. तसंच देव हा शुद्ध आचरण असलेल्यांच्या घरी येत असेल, राहात असेल तर त्याला देवाच्या दर्शनाला जाण्याची गरज नाही. गंगेत बुडी मारायची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की आपण देवदर्शनाला जावू नये. देवदर्शनाला अवश्य जावे. कारण देवाच्या दरबारात देव पाषाणात जरी लपला असला तरी मन प्रसन्न होतं. त्याचीही दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे तेथील वातावरण. तिथं वातावरणही चांगलं असतं. मंदिरात सतत कापूर जळत असल्यानं त्यातून निघणारे घटक हे ऑक्सीजनशी संयोग पावतात व शुद्ध ऑक्सीजनची निर्मिती होते. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गरम्य अशा वनसंपत्तीने नटलेल्या परीसरात वृक्षाने श्वासोच्छ्वास घेत असतांना वातावरणातील कार्बनडायऑक्साईड कमी करण्यासाठी स्वतः शोषण करुन घेवून ऑक्सीजन हवेत सोडल्यानं त्या परीसरात ऑक्सीजन प्रचंड प्रमाणात असतो. ज्यामुळं मन अगदी प्रसन्न वाटतं. ज्यातून मन जरी प्रसन्न वाटत असलं तरी शुद्ध होत नाही. शरीर मात्र वरवरुन शुद्ध होतं. शिवाय थोडीशी मनाला शांती लाभते, सेवाभावातून. कारण कोणी कितीही कंजूष असला तरी थोडा ना थोडा पैसा दान करीत असतो देवाच्या दर्शनासाठी. तो दानपेटीत पैसा टाकतोच. ज्या पैशातून इतर गरीब भक्ताच्या पोटाची व दर्शनाची सोय करता येवू शकते. म्हणूनच प्रत्येकांनी देवदर्शनाला अवश्य जावे. परंतु तसं जात असतांना निदान थोडी तरी सात्विकता मनात बाळगावी. निदान तेवढ्यापुरतं तरी आचरण शुद्ध ठेवावे. जेणेकरुन तुमच्यावर कृपा करतांना वा आशीर्वाद देतांना देवाला जास्त विचार करावा लागणार नाही. देव जास्त विचार करणार नाही व देवच भरभरुन आशीर्वाद देईल, हे तेवढंच खरं.'
         देव भरभरुन देतो. हा सोहेलचा विचार. परंतु कोणाला? जो सात्विक असेल त्याला. ज्याच्या पदरात पुण्य असेल त्याला. कदाचित ते मागील जन्मातील तरी पुण्य असू शकते.     
          आजही काही लोकं सात्विक आहेत. देवदर्शनाला जातात. परंतु तरीही काही अशाही घटना घडतात की ते पापच वाटतं. त्यामुळंच तशा घटना घडू नये म्हणून आपलीच सुधारण्याची गरज आहे. 
         सोहेलची ती खंत. कारण सध्या नेपाळमध्ये महापूर आला होता व त्या महापुरामुळं कितीतरी प्रकारची हानी झाली होती व त्या हानीतून नुकसान. हे का घडलं असेल? असा प्रश्न सोहेलला पडला. त्याचं उत्तर होतं, ग्लेशिअरचं पिघलणं. ग्लेशिअर का पिघललं? तर त्याचं उत्तर होतं, वातावरण गरम झाल्यानं ग्लेशिअर पिघललं आणि वातावरण का गरम झालं? तर त्याचं उत्तर होतं, कारखान्यातून निघणाऱ्या विषारी वायूनं वातावरण गरम झालं. जो वायू हवेतील ऑक्सीजनशी संयोग पावला. ज्यानं शुद्ध ऑक्सीजनची मात्रा कमी केली? जो एका काळात सुर्याच्या अतिनील किरणांना थांबवत होता.
            पाऊस कदाचित ऑक्सीजनवर अवलंबून असेल का? सोहेलचा तो विचार. सोहेल विचार करु लागला. अलिकडील काळात पाऊस पडत नाही. त्याचं कारण लोकं म्हणतात की जंगलं कमी होणं. मानवी वस्ती साकारण्यासाठी लोकांनी जंगलतोड केली. ज्याचा परिणाम आज पाऊस पडत नाही. हे खरंही आहे.
         पुर्वी असं नव्हतं. जंगलं भरपूर होती व हवेत ऑक्सीजन जास्त होतं. त्यामुळंच पाऊस पडत असायचा. पुर्वी आठआठ दिवस पावसाच्या झडी चालत असत. आता मात्र तसं नाही. मात्र विचार येतो की असं का घडलं की पावसानं आज येणं बंद केलं असावं. मग प्रश्न असा पडतो की झाडं जरी कमी झाली असली तरी ती तेवढ्या प्रमाणात कमी झालेली नाही की ज्यातून पाऊस पडूच नये. 
         पाऊस येण्याला कारणीभूत आहे, वाऱ्यांचं वाहणं. हा निसर्गाचा एक खेळच आहे की बाष्प असलेले वारे त्या भागातून वाहतात. समुद्राच्या पाण्याची वाफ होवून ती वाफ ज्या दिशेने वाऱ्याच्या मदतीने वाहाते. त्या त्या भागात जर उंच पर्वत असेल तर त्याला ते बाष्प अडून तेथील वातावरणाचा त्यावर परिणाम होवून पाऊस पडतो. हे जरी खरं असलं तरी असलं तरी त्याचा झाडाशी संबंध काय? असाही एक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. यावरही लोकं म्हणतात की झाडं उंच वाढतात व त्याला हे बाष्प अडतं. ज्यातून प्रक्रिया होते व पाऊस पडतो. मग जिथं खोलगट भाग असेल, तिथंही पाऊस पडतो. तिथं तर झाडांची उंची कमी असते ना. मग बाष्प नेमकं कोणाला अडतं? 
         आपल्याला माहित असेलच की ज्या कोणत्या विधात्यानं सृष्टी निर्माण केली. त्या विधात्यानं सृष्टी निर्माण करतांना भेदभाव केलेला नाही. प्रत्येकालाच समान अधिकार दिला व प्रत्येकाचा विचार करुनच त्यानं ऑक्सीजन तेवढ्या प्रमाणात निर्माण केला. तो पुर्वी विपूल प्रमाणात होता. कारण झाडं जास्त प्रमाणात होती. अन् पुर्वी प्रत्येक भागात झाडं जास्त होती व पाऊसही जास्त पडत होता. आताही ज्या भागात जास्त झाडं आहेत, त्याच भागात आजही पाऊस जास्त पडतो. परंतु आज आपण त्याची मात्रा आपल्याच वागणुकीनं कमी केलेली आहे. जंगल वाचवणं, अलिकडील काळात काळाची गरज आहे. कारण जंगल जर वाचलं नाही तर भविष्यात येणारी पिढीही आपलं जीवन वाचवू शकणार नाही. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. 
          ती वास्तविकताच होती. लोकांनी जंगलं तोडली होती. त्यामुळंच पाऊस जास्त प्रमाणात येत नव्हताच.
          सोहेल पावसाबद्दल विचार करीत होता. यावर्षी पावसाळा लागल्याला बरेच दिवस झाले. काही ठिकाणी पूर आला व काही ठिकाणी महापूरही आला. परंतु काही भागात पावसाळा लागला की नाही, अशीच चिन्हं दिसत आहेत. एवढी उष्णता व पावसाचे प्रमाण कमी, त्यातच उन्हाळ्यासारखी रखरखीत ऊन बऱ्याच भागात आजही अनुभवावयास येते. हा पावसाळा आहे की उन्हाळा, असा प्रश्न पडतो. रात्री झोपतांना उन्हाळाच जाणवतो. असे असतांना काही ठिकाणी महापूर व पूर आलेत. त्याचं कारण काय असावं? जसं उदाहरण द्यायचं झाल्यास नेपाळचं देता येईल. नेपाळमध्ये पूर एवढा आला होता की सांगता सोय नाही. म्हटलं जातं की नेपाळमध्ये पूर हा ग्लेशिअर पिघलण्यानं आला. ग्लेशिअरचं पिघलणं. हेही उष्णता वाढण्याचाच एक प्रकार. उष्णतामान वाढलं आहे. त्याला कारणीभूत आहोत आपण. आपणच जंगलं तोडली व जंगल तोडल्यानं जमीनीची फारच मोठ्या प्रमाणावर धूप झाली. शिवाय अशा वाढलेल्या तापमानानं समुद्राच्या पाण्याची वाफ झाली आणि त्याचं बाष्पही बनलं आणि ते बाष्प थंड होवून पावसाच्या स्वरुपात खालीही आलं व तीच वाफ बर्फ बनून पडलीही. परंतु कुठं? जिथं उंच पर्वत आहेत तिथं, ते बाष्प बनून. 
          पाऊस पडण्याबद्दल लोकं सांगतात की पाण्याची वाफ बनते. ती वर जाते. ती वर गेल्यावर थंड होते व ती वाफ थंड झाली की त्याचे बाष्पाचे अर्थात बर्फांचे लहान लहान तुकडे बनतात व तेच तुकडे खाली आले व त्याला थोडी उष्णता लागली की त्याची अवस्था द्रव बनते. ज्याला आपण पाऊस म्हणतो. हे जरी बरोबर असलं तरी पाण्याच्या वाफेत ऑक्सीजन कमी प्रमाणात असतो. मात्र हायड्रोजनची मात्रा जास्त प्रमाणात असते. ती जेव्हा वर जाते. तेव्हा त्याचा संयोग वर असलेल्या ऑक्सीजनशी होतो. ज्यातून बर्फाचे पुंजके तयार होतात. ते वरुन जेव्हा खाली येतात. तेव्हा त्याचा संयोग उष्णतेशी होतो व पावसाचे कण तयार होतात. मग पाऊस पडतो. या साऱ्याच गोष्टी बरोबर असल्या तरी पाऊस पडण्याला मुख्य जबाबदार घटक आहे, तो म्हणजे ऑक्सीजन. ऑक्सीजन नसेल तर जिथं मानव व पशूपक्षी जीवंत राहू शकत नाही. तिथं पाऊस कसा पडू शकतो? मुख्य म्हणजे पावसाच्या येण्यालाही ऑक्सीजन जबाबदार असू शकतो. असं वाटतं. कारण झाडं ही श्वास घेतांना व अन्न निर्माण करतांना अर्थात प्रकाशसंश्लेषण क्रिया करतांना हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात व उत्सर्जन म्हणून ऑक्सीजन हवेत सोडतात. त्यामुळंच जिथं झाडं जास्त असेल, तिथंच पाऊस पडतो. इतर भागात कमी पडतो. याचाच अर्थ असा की पाऊस येण्याला जबाबदार घटक जो कोणता असेल, तो ऑक्सीजनच असू शकतो. मात्र त्याकडे शास्रज्ञांचे लक्षच गेलं नसेल. असं वाटतं.
           वाफेचं रासायनिक सुत्र आहे, 2(H2O), पाण्याचं रासायनिक सुत्र आहे, H2O व बर्फ ही पाण्याचीच अवस्था. त्याचंही सुत्र आहे, H2O. आता समुद्रालगतचा 2(H2O) अर्थात पाण्याची वाफ वर जाते. वर गेल्यावर ती वाफ तेथील थंड हवेनं थंड होवून त्याची बर्फ अवस्था बनते. अगदी लहान लहान बर्फाचे तुकडे. ते परत खाली येवू लागतात. ते H2O चे तुकडे जमीनीलगत आले, की ते डोंगर किंवा पर्वतीय भागात बर्फाच्या रुपात पडतात. ते पडतात फक्त बर्फाच्या पुंजकाच्या रुपानं. परंतु जर त्याला थोडीशी उष्णता लागली तर ते पाण्याच्या रुपातही पडतात. परंतु ही क्रिया डोंगर वा पर्वतालगत घडते. याचाच अर्थ असा की त्या बर्फाच्या पुंजक्याची पाणी अवस्था बनवायची असेल वा बर्फाला इतर भागात पडायचं असेल तर H2 हा विपूल प्रमाणात लागतोच. ज्याला हेलिअम असंही म्हणतात. हेलिअम याचा अर्थ हायड्रोजन या वायूची उच्चत्तम अवस्था. म्हणजेच वरुन खाली येणाऱ्या H2O चा खाली आल्यानंतर (H2) व (O) या वेगवेगळ्या वातावरणातील मुलद्रव्याशी संयोग होतो व मूळ रुपात असलेल्या पाण्याच्या बर्फाळ अवस्थेचं विपूल अशा पावसाच्या पाण्यात रुपांतरण होतं व विपूल प्रमाणात पाऊस येत असतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. याचाच अर्थ असा की हवेत, ज्या भागात जेवढा ऑक्सीजन असेल, त्या त्या भागात तेवढ्या जास्त प्रमाणात पाऊस येवू शकतो. यासाठीच झाडं विपूल प्रमाणात असणं अतिशय गरजेचं आहे. कारण झाडंच ऑक्सीजन विपूल प्रमाणात निर्माण करु शकतात. ऑक्सीजन हा घटक झाडाशिवाय इतर कोणीही निर्माण करु शकत नाही. 
          H2O चा H2 शी व H2O चा O शी संयोग होणं गरजेचं असते. जे ऑक्सीजन झाडातून वातावरणात प्रवाहीत होत असतं. मात्र अलिकडील काळात जंगलं नसल्यानं ऑक्सीजनची मात्राच जमीनीलगत कमी आहे. त्यातच जो ऑक्सीजन वातावरणात आहे. त्याचा वापर प्राणी, पशूपक्षी करीत असतात. अशातच वातावरणातील ऑक्सीजन कमी होतो व ऑक्सीजन कमी झाला की पाण्याचा ऑक्सीजनशी संयोग होत नाही व पाऊस इतर भागात पडत नाही. याचाच अर्थ असा की पाऊसही पडायला ऑक्सीजन हवा असू शकतो. जो जंगलं तोडल्यानं कमी झालाय. 
         माणसानं जंगलं तोडली. त्याचा दुष्परिणाम असा झाला की आता जंगलं नसल्यानं जंगलातील प्राणी अर्थात हिंस्र प्राणी मानवी निवाऱ्याकडे येवू लागलेले आहेत. ज्यातून मानवी वस्तीला धोका निर्माण झालाय. म्हणूनच जंगलं निर्माण करणं ही काळाची गरज आहे. आपण आपला स्वार्थ सोडून जंगल निर्माण करणं गरजेचं आहे. प्रत्येकांनी एक तरी झाड लावणं, तेवढंच गरजेचं आहे. ते जर नसेल तर ऑक्सीजन निर्माण होणार नाही व ऑक्सीजन नसेल तर पाऊसही पडणार नाही. अन् पाऊस पडला नाही तर एक काळ असा येईल की ज्या काळात ही सृष्टी दिसणार नाही. म्हणूनच झाडं लावणं व ऑक्सीजन निर्माण करणं गरजेचं आहे. कारण कदाचित पाऊसही ऑक्सीजनवरच अवलंबून असतो. यात शंका नाही. पावसाळा लागला की महापूर येणारच आणि त्यातून दुष्काळ निर्माण होणारच. 
         महापूर कोणत्या भागात येतो? या प्रश्नाचं उत्तर होतं, सखल भागात. डोंगराळ भागात तेवढा महापूर येत नाही आणि सखल भागात महापूर आलाच तर त्याच्या आजुबाजूची घरं, झाडे, पशूपक्षी, स्थावर मालमत्ता आणि इतर प्रकारची मालमत्ता, जीवीत व वित्तहानी होतच असते.
          महापूर जसा सखल भागात येतो. तसाच महापूर डोंगराळ भागातही येतो. सखल भागात येत असलेला महापूर हा त्या भागाला जर डोंगर वा झाडं लागून असतील वा समुद्र लागून असेल तर येत असतो. त्याला कारणही तसंच आहे. समुद्रालगत लाटांच्या तीव्र घर्षणानं जे वातावरण तयार होतं. त्या वातावरणावर सुर्याच्या उष्णतेचा परिणाम होतो व सुर्याच्या उष्णतेनं जसं समुद्रातील पाणी तापतं. तशीच समुद्राच्या पाण्यालगत असलेली हवाही कमीअधिक प्रमाणात तापते. ज्याचा संयोग हा हवेतील वातावरणाशी होतो व वारे तयार होतात. कधीकधी त्यातूनच वादळं तयार होतात. हे वारे वा ही वादळं जमीनीलगत दूरच्या प्रदेशापर्यंत वाहात जातात. त्या वाऱ्यात बाष्पाचे कण विपूल प्रमाणात असतात. हेच बाष्पाचे कण ज्या ठिकाणी विपूल प्रमाणात झाडं असतात वा डोंगरं असतात. त्या ठिकाणी अडतात व तिथंच ढगफुटी होते व तिथं ढगफुटी झालीच तर मग पूर अर्थात कधीकधी महापूरही. मात्र डोंगराळ भागातील ढगफुटीचं कारण वेगळंच असतं. तिथं ढग हे नसतातच. मग का बरं तिथं महापूर येतो? त्याचं कारण होतं, ग्लेशिअरचं खचणं वा पिघलणं. ग्लेशिअर अर्थात बर्फ. डोंगराळ भागात हवामान थंड असते. ते एवढं थंड असते की त्या ठिकाणी वर्षभर पाण्याची बर्फच अवस्था असते. परंतु सध्याच्या काळात त्याही ग्लेशिअरवर वातावरणाचा परिणाम होत असल्यानं त्या ग्लेशिअरचे जे उंच उंच पर्वत बनले आहेत. ते पिघलतात. मग काय, ते पिघलले की बस, कितीतरी प्रमाणात पाणी नदीतून ओसांडून वाहात असते. मग ते पाणी जिकडे जागा मिळेल, तिकडे वाहात जात असते. ते पाणी कुठं घरं आहेत की नाही आहेत. हे काहीही पाहात नाही. मग महापूर येतो. हा महापूर एवढ्या तीव्र स्वरुपाचा असतो की तो कितीतरी प्रमाणात मनुष्यहानी तसेच वित्तहानीही करतो. 
          सध्या नेपाळची अवस्था अशीच झालेली होती. मागे एकदा केदारनाथ व बद्रीनाथला महापूर आला होता. ज्यातून कितीतरी प्रमाणात त्या ठिकाणचं नुकसान झालं होतं. ज्याला ग्लेशिअरचं पिघलणं. हे कारण दिलं गेलं होतं आणि आता तब्बल तेराच वर्षानं म्हणजे जो महापूर आलेला दिसत होता नेपाळला. तोही अशाच स्वरुपानं आलेला दिसत होता. यातही ग्लेशिअरचं पिघलणं. हेच एकमेव कारण होतं.
         ग्लेशिअर का पिघलतो? त्याला कारण होतं, आजचं वाढलेलं तापमान. तापमान का वाढत आहे? त्याला कारण आहे वातावरण. अन् वातावरण का तापत आहे? त्याला कारण काय आहे, यावर सोहेल विचार करीत होता. त्याचं उत्तर होतं, लोकांचं राहणीमान. लोकं प्लॅस्टिकजन्य वस्तूंचा एवढा वापर करत की त्यानं जमीनीचं पर्युषण होत असे. शिवाय कारखान्यातून निघणारा सल्फर डाय ऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड हे दोन्ही विषारी घटक. त्यांच्या संयुगाचा वातावरणातील ऑक्सीजन, हायड्रोजन, नायट्रोजन या सर्वांशी संयोग होत असे. परिणामी ऑक्सीजन कमी होत असे. शुद्ध ऑक्सीजनचं रुपांतरण ऑक्साईड मध्ये होत असे. याचाच अर्थ ऑक्सीजन हा सुट्या स्वरुपात राहात नसे. तो कोणत्यातरी संयुगात मिसळत असे. त्यानंतर जो शुद्ध स्वरुपातील ऑक्सीजन सुर्याच्या अतिनील किरणाला अडवत नसे. त्याची मात्रा कमी होत असे व सुर्याच्या उष्णतेची अतिनील किरणं, थेट पृथ्वीवर येवून धडकत असत. ज्यातून जमीन तापत असे. तसंच पाणीही तापत असे. ज्यातून वारेच नाही तर वादळ निर्माण होत असे. अशी बाष्पाची वादळं की जी ढगफुटी करत. अन् असं तापमान वाढलं की ज्यातून ग्लेशिअर वितळून त्यात असलेल्या पाण्याच्या मात्रेनंही महापूर येत असे.
         सोहेलला वाटत होतं की महापूर हे भविष्यात भरपूर वेळेस येणारच आहेत. कारण आहे, आपलं नियंत्रण. आपण आजही सुधारलेलो नाही. आपण आजही अंधश्रद्धाळूच आहोत. आपल्याला पाऊस, महापूर, पूर कसा येतो. याचं गणित कळत नाही. पाऊस येणे वा महापूर येणे. या घटनांना आपण अंधश्रद्धाच मानतो. म्हणतो की देवच पाऊस पाडतो व देवच पूरही आणतो. त्यातच मरणाबाबतही आपल्या मनात महाभयंकर स्वरुपाची अंधश्रद्धा आहे. आपण विचार करतोय की आपल्याला काय करायचंय. मरणारे मेलेत. कारण त्यांच्या नशीबातच तिथंच मरणं लिहून होतं. आपली मरणाबाबत अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळं आपण स्वतः काय करतो आहोत. हे विचारात घेत नाही आणि स्वतःला सुधारणेच्या कक्षेत टाकत नाही की ज्यातून महापूर येणार नाही. ज्यातून पूर आपल्याला छळणार नाही. पुर येण्याला जबाबदार आहोत आपणच. आपणच कारखाने काढले ना. ज्याचा परिणाम म्हणजे सल्फर डाय ऑक्साईड व हायड्रोजन सल्फाईड त्यातून निघणे व त्यातील घटकांचे शुद्ध ऑक्सीजनशी संयोग पावणे. ज्यातून ऑक्सीजन कमी होणे व त्याची अकार्यक्षमता ही सुर्याला कळणे. हे आपलं नित्याचं काम. दुसरं आपलं काम आहे. अनावश्यक प्लॅस्टिकची उपलब्धता करणे. ज्याचा परिणाम झाडं न वाढणे. जमीन खराब होणे. वातावरण तापणे. ज्यातून ग्लेशिअर पिघलणे. यासारख्या आपल्या कृती. मग कसा पिघलणार नाही ग्लेशिअर? तो पिघलेलच व महापूर येणारच. विशेष म्हणजे आपली आज स्वतः सुधारण्याची गरज आहे. आपण जर स्वतः सुधारलो तर वातावरण सुधारेल. वातावरण सुधारले की पाऊस सुधारेल आणि पाऊस सुधारला की पूर व महापूर सुधारेल. अन् महापूर सुधारला की मग सबंधीत सर्व मानवी जीवन. त्यासाठी आपला त्याग महत्वपुर्ण. यात शंका नाही. परंतु जर आपण सुधारलो तर...... अन् आपण सुधारतोच नाही तर वरील घटकांपैकी कोणीच सुधारणार नाही व प्रत्येकजण आपलंच कार्य करेल व एकवेळ अशी येईल की ही सुष्टी नष्ट होईल. म्हणूनच आपलीच सुधारण्याची गरज आहे. तेव्हाच सुष्टी सुधारेल. नाहीतर सुष्टीही आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही. ही बाब तेवढीच लक्षात घेण्यासारखी आहे.
           सोहेलचा तो विचार. परंतु लोकं सुधारत नव्हते. हे विचार त्याच्या मनात त्यानं भोगलेल्या यातनेतून आले होते. मॅनेजमेंटनं त्याला दिलेला त्रास अनुभवत असतांना व आठवत असतांना अचानक त्याला आठवला स्वातंत्र्याचा उद्देश. कदाचित यासाठीच स्वातंत्र्य मिळालं काय आपल्याला आणि यासाठीच आपल्या वीर क्रांतीकारकांनी जीव दिला काय आपल्यासाठी? असे दोन प्रश्नही त्याच्या मनात उपस्थित झाले होते.

*****************११*********************

          स्वातंत्र्याचा उद्देश, दडपशाही की मुक्तपण? सोहेल विचारात पडला होता. तसा त्यानं मीनाला फोन लावला व विचारलं,
          "मीना, स्वातंत्र्याचा नेमका उद्देश काय?"
          "म्हणजे?" मीनानं न समजल्यानं मीना म्हणाली. तसं अजून न समजल्यानं सोहेल तिला पुन्हा म्हणाला, 
           "अगं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकं सुधारण्याऐवजी व चांगले वागण्याऐवजी वात्रट पद्धतीनं वागतात. ते माणसाला माणूसच समजत नाहीत. बघ माझंच. मी गुणवान असूनही माझ्या शाळेत माझ्या गुणांची इज्जत होत नाही. तिथं पैशालाच मान आहे. जे पैसे देतात मॅनेजमेंटला. त्याचीच इज्जत आहे तिथं. ज्यातून विद्यार्थी विकास व विद्यार्थ्यांची गुणवत्ता मार खाते. अगं, त्यांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं काहीच करायचं नाही. करायचा आहे, आपला विकास. त्यांनी कमविलेल्या पैशाच्या भरवशावर त्यांना आणखी दोन चार शाळा उभ्या करायच्या आहेत. त्यात पैसे कमवीत असतांना दोन चार शिक्षक उपासमारीनं मेले तरी चालेल. ही अवस्था. माहित आहे, तिथं फक्त चापलूस व नातेवाईक असलेल्या लोकांनाच संधी."
         "हो, खरं आहे तुझं. अन् याचमुळं मराठी शाळा ओस पडत आहेत. त्या शाळा ओस पडत आहेत. जिथं गुणवान शिक्षकांची इज्जत नाही. जिथं गुणवान शिक्षकांची गुणवत्ता मार खातेय. अन् जिथं विद्यार्थी विकासाच्या नावावर व्यापार केला जातो. अन् माहित आहे, याचे परिणाम गंभीर स्वरुपाचेच निघतील. चांगले निघणार नाही."
         "माहित नाही मला, भारतीय स्वातंत्र्याचा उद्देश दडपशाही की मुक्तपण आहे ते. आजचं स्वातंत्र्य पाहिलं तर असा मुक्तपणा दिसत नाही. केवळ दडपशाहीच दिसून येते. या काळात देशात दोन घटक आहेत. एक खालचा घटक की जो स्वतःला कमजोर समजतो. ज्यातून त्याचेवर रोजच अत्याचार होत असतांना दिसतात. तर दुसरा घटक आहे वरचा घटक की जे घटक आजच्या काळात खालच्या घटकांवर अत्याचार करीत असतात रोजच. मग विचार येतोय की भारतीय शहिदांनी याचसाठी स्वातंत्र्य मिळवीत असतांना बलिदान दिलं की काय? स्वातंत्र्याचा उद्देश जर असा असेल तर याचसाठी विरांनी स्वातंत्र्य मिळविलं की काय? असा विचार प्रत्येकाला वारंवार येत असतो."
           "हं, भारतीय स्वातंत्र्यानं काय दिलं व काय करायला हवं. आपल्याला काय करायला शिकवलं. भारतीय स्वातंत्र्यानं आपल्याला शिकवलं की स्वातंत्र्य मिळविणं ही काही सहज सोपी गोष्ट नव्हती. ते स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले. शेकडोंना काळ्या पाण्याच्या शिक्षा झाल्या आणि शेकडोंचे इंग्रजांनी हाल हाल केले. एवढंच नाही तर त्यांच्या राज्यात कोणाला काहीच म्हणायचीही परवानगी नव्हती. असे असतांना शेकडो हुतात्म्यांच्या रक्तातून भारतीय स्वातंत्र्य साकार झालं व ते आपल्याला मिळालं. त्यामुळं आपलं स्वातंत्र्य आपल्याला सांगतं की आपण असं हौतात्म्यातून मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवा. आमच्या हौतात्म्य पत्करलेल्या विरांची जाण नाही ठेवली तरी चालेल. देशात अमन ठेवा. मग आम्हाला विसरलात तरी चालेल. देशातंर्गत गुन्हेगार बनू नका. गुन्हेगार कोणाला बनवू नका. असाच देश चालवा व अशाच कायद्याची अंमलबजावणी करा. हेच स्वातंत्र्याचं सांगणं."
          "मीना, स्वातंत्र्याबाबत विचार करतांना स्वातंत्र्यानं आपल्याला काय दिलं? याचाही विचार करणे गरजेचे आहे. भारतीय स्वातंत्र्यानं आपल्याला सुरक्षा प्रदान केली. विचारांचं स्वातंत्र्य दिलं. वागण्याचं स्वातंत्र्य दिलं. फिरण्याचं स्वातंत्र्य दिलं. खाण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि कामाचंही स्वातंत्र्य दिलं. याचाच अर्थ असा की आजच्या कोणत्याच व्यक्तीला उष्ट्या पत्रावळी चाटाव्या लागत नाहीत. जे मनात येईल, ते जिनस खाता येतात. कुठंही खाता पिता येतं. कुठंही केव्हाही फिरायला जाता येतं. कोणतंही काम केव्हाही स्विकारता येतं, करताही येतं. तसाच वेगवेगळ्या प्रकारचा विचार करता येतो. अन् रात्री अपरात्री जरी फिरत असू. तरी सुरक्षा प्रदान केलेली आहे भारतीय स्वातंत्र्यानं." 
         "सोहेल, भारतीय स्वातंत्र्यानं केवळ एका विशिष्ट व्यक्तीवर्गालाच स्वातंत्र्य दिलं नाही तर पुर्णच महिलावर्ग, पुर्णच बालवर्ग, पुर्णच वृद्ध आणि पुर्णच व्यक्तीसमुदाय, या सर्वांनाच स्वातंत्र्य दिलं आहे. त्यासोबतच सर्वच प्रकारचे प्राणीमात्रा, वृक्षवल्ली, साध्या किड्यामुंग्यांही, या सर्वांनाच स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे. साधी एक लहानशी मुंगीही कोणाच्या समोर मारता येत नाही. एवढी दुर्लभ गोष्टही भारतीय स्वातंत्र्यानं दिली आहे आपल्याला. शिवाय भारतीय स्वातंत्र्यानं आपल्याला धर्मनिरपेक्षता, जातनिरपेक्षता, पंतनिरपेक्षता, भेदभाव निरपेक्षता, पक्षनिरपेक्षता या सर्वच गोष्टी दिल्या. आता कोणी म्हणतील की ह्या सर्व गोष्टी प्रजासत्ताकानं दिल्या अर्थात संविधानात अंतर्भूत आहेत. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की स्वातंत्र्यच नसतं तर स्वतंत्र संविधान कुठून आलं असतं? त्यामुळंच अर्थातच या सर्व गोष्टी स्वातंत्र्यानं दिलेल्या आहेत. अन् महत्वाचं तत्व दिलं आहे सुरक्षा. ज्यातून कुणावर अन्याय झाल्यास न्यायालयातून दाद मागता येतं."
          "मीना, स्वातंत्र्यानं सुरक्षा प्रदान केलेली आहे. ती सुरक्षा सर्वांनाच प्रदान केलेली आहे. याचा अर्थ बालक अगदी गर्भात असलेलाही. त्यालाही मारता येत नाही. अर्थात भ्रृणहत्या गुन्हाच आहे. स्रियांनाही सुरक्षा प्रदान केलेली आहे. कोणत्याही स्रीची अब्रू लुटता येत नाही. तिला अपशब्द म्हणता येत नाही. तसाच कोणत्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं आपल्याला हनन करता येत नाही. ना इथे गरीब, श्रीमंतीचा भेदभाव चालत ना जात व धर्मावरुन भेदभाव चालत. इथे ना शेतकऱ्यांना डिवचता येत, ना बेरोजगारांना काही म्हणता येत. कारण स्वातंत्र्य आहे व स्वातंत्र्यानं आपल्या तेवढी व तशा प्रकारची सुट दिलेली आहे. याचाच अर्थ असा की स्वातंत्र्य हा आपला बाप आहे आणि प्रजासत्ताक ही आपली आई आहे. असे असतांना या दोघांची लेकरं म्हणजे येथील प्रजा. येथील प्रजेला आज त्या बापाबद्दल आणि आईबद्दल आदरच नाही असं दिसतंय. आजची ही प्रजा भरदिवसा कुणाचेही कोणत्याही शुल्लक कारणावरुन मुडदे पाडते. आजची प्रजा, त्या देशातील बहिणीसारख्या कन्येवर लहानपणापासूनच कुनजर टाकते आणि आपल्या हव्यासाची शिकार करते. आजची प्रजा म्हाताऱ्या लोकांनाही वृद्धाश्रमात टाकते व त्याच्या मयतीला न जाता फक्त व्हिडीओवर अंत्यसंस्कार बघते. अन् आजची प्रजा शेतकरी, कामगार वर्गालाही आत्महत्या करायला भाग पाडते. याचं कारण आहे येथील शकुनी मामाची आपल्या कौरवरुपी भाच्यांना अर्थात येथील प्रजेला असलेली शिकवण." 
           "सोहेल, आमच्या प्रजासत्ताक व स्वातंत्र्य या आईवडीलांचे दोन सख्खे भाऊ आहेत. एक म्हणजे ज्यांना नेता संबोधलं जातं तो व दुसरा भाऊ आहे न्यायालय. हे दोनही भाऊ येथील प्रजेला गुन्हे करण्यापासून रोखत नाहीत. ते हवा देतात. याचाच अर्थ असा की आज सत्तेवर जी मंडळी बसलेली आहेत. ते सर्वचजण, कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यानं लिप्त आहेत. तसंच न्यायालय. न्यायालयात जाणाऱ्या प्रत्येक खटल्यामध्ये पाश्वभुमी जरी सत्य स्वरुपाची असली तरी आरोपींनाही आपली बाजू मांडण्याची सोय असल्यानं आरोपी बाइज्जत बरी होतात. त्यानंतर ते इतर सर्वच प्रकारचे गुन्हे करायला मोकळे होत असतात. ज्यातून आणखी बरेच गुन्हे घडत असतात नव्हे तर गुन्हे केले जातात."
         "मीना, भारतीय स्वातंत्र्य व प्रजासत्ताक हे कोणत्याच व्यक्तीला गुन्ह्यांकडे वळवीत नाहीत. कारण कोणत्याच आईवडीलांना आपली मुलं ही वाईट निघालेली चालत नाही. परंतु मामांना आपल्या बहिणींची मुलं ही वाईटच निघायला हवी असं वाटतंय. कारण हा कलीयुगाचा काळ आहे. ज्यातून आजचे कौरव कोणत्याही स्रीवर बलात्कार करीत सुटलेय. ते येथील सर्व दौपदींच्या इज्जती लुटायला पाहतात. अन् येथील पांडव अर्थात पोलीसयंत्रणा तेवढी सक्षम नाही. ती फक्त गुन्हे घडायची वाट पाहात असते. लाचार असल्याचा दिखावा करून. खरं तर ते लाचार नाहीत. दुसरा मुद्दा आहे, आपल्याला एक खटला मिळावा. जसे पांडव द्युतातून हरल्यानंतर दुर्योधनाच्या कृत्याकडं फक्त पाहू शकत होते. काहीच करु वा बोलू शकत नव्हते. त्यातच येथील क्रिष्ण नावाचा विधाताही सक्षम नाही की जो येथील अब्रू लुटली जाणाऱ्या दौपदीला साडी पुरवेल? मात्र तो पदोपदी सांगतो की आपली सुरक्षा आपणच करावी. परंतु करणार कशी? कारण आजच्या काळात अब्रू लुटली जाणारी द्रौपदी एकच असते आणि तिच्या सभोवताल तिची अब्रू लुटणारे कौरव शंभर. कशी सुटणार ती या शंभर कौरवांच्या तावडीतून."
          "सोहेल, खरं आहे तुझं म्हणणं. तशी अराजकताच माजली आहे भारतात. जरी देश स्वतंत्र असला तरी. कारण येथील ध्रृतराष्ट्र अर्थात जनतेचा राजा लाचार, अकार्यक्षम आहे आणि त्याचे सर्वच मंत्रीगण येथील दुर्योधनाच्या दबावात आहेत. येथील विदूर फक्त विरोध करतोय, तोही थोडासा. (विदूर अर्थात देशातील काही चांगली मंडळी) मात्र त्याचं कोणी ऐकत नाही. ही शोकांतिकाच आहे. सर्व मामाश्रींची चाल व त्यात वाहावत गेलेली येथील कौरवांची जात. सर्व विचित्र आहे नाही का?"
         "मीना, भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालंय. हे सर्वांनाच माहित आहे व हे सांगण्याची गरज नाही. त्यातच भारतात २६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू झालंय. हेही सर्वांनाच माहित आहे. ज्यातून सर्व लोकं स्वातंत्र्याचा उपभोग घेतात तेही नियमानुसार चालून नव्हे तर वागून. असे असतांना काही लोकं नियम मोडतात व गुन्हे करीत असतात. तेही अतिशय गंभीर स्वरुपाचे गुन्हे की ज्या गुन्ह्यांना तोड नाही."
         "सोहेल, भारतीय स्वातंत्र्यानं काय दिलं? याचा विचार करीत असतांना स्वातंत्र्य दिलं. हे उत्तर असेल. असं स्वातंत्र्य की कुणालाही सहज आणि चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येतं. परंतु ना या काळात येथील महिला सुरक्षीत वाटत. ना कोणता कामगार. ना येथील शेतकरी सुरक्षीत वाटत, ना येथील लहान लहान बालकं. कोणाला केव्हाही धोका होईल आज. ते सांगता येत नाही. त्यातच आजचं आणखी एक चित्र म्हणजे येथील लोकांवर रोजच होत असलेला अत्याचार. रोजच वर्तमानपत्रातून बातम्या छापून येतात. अमूक अमूक ठिकाणी असं असं घडलंय. परंतु त्याचे खटले न्यायालयात गेल्यास ते टिकत नाहीत. शिवाय तारीखवर तारीख सतत चालत असते. ज्यातून आरोपीला गंमत वाटते आणि पक्षकाराची हिंमत खचते. मग आम जनता विचार करते की आपल्याला ना न्यायालयातून न्याय मिळत ना पोलीस स्टेशनमधून. त्यापेक्षा आपण कोणी आपल्या वाट्याला जरी गेला तरी चूप बसलेलं बरं. अन् सहन होत नसेल हा अन्याय तर आत्महत्या करुन मरुन गेलेलं बरं. हेच आजच्या भारतात घडत असलेलं चित्र आहे. खरंच याचं स्वातंत्र्य व प्रजासत्ताक सारख्या आईवडीलांना दुःख होत नसेल काय? त्यांच्या भावना काय म्हणत असतील? यासाठीच भारतातील ते शहीद लढले काय इंग्रजांशी. या सर्व बाबी विचार करणाऱ्या आहेत. महत्वपुर्ण बाब ही की भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यापुर्वी जे शहीद झाले. त्यांना अतिशय त्रास झाला. हे विसरु नये आपण. तसंच हेही विसरु नये की स्वातंत्र्य मिळवीत असतांना त्यात पुरुषच नाही तर बालकांचाही बळी गेला. ज्या लोकांनी आमचं बलिदान झालं तरी चालेल. परंतु आमच्या पिढीला स्वातंत्र्य मिळायला हवं. ज्यातून आमच्या पिढीची सुरक्षा होईल. असा विचार करुन हसतहसत त्यांनी आपल्या गळ्यात फास अडकवला. परंतु आपण काय करतो आज. आपण आज ते बलिदान विसरुन येथील द्रौपदींच्या इज्जती लुटतो. हे काही बरोबर नाही. ज्यात बलिदान देतांना महिलांचही योगदान होतंच." 
          "मीना, हे बघ, विशेष म्हणजे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे काही सहज सरळ पद्धतीनं मिळालेलं नाही. त्यासाठी बरंच काही करावं लागलं. हे विसरता येत नाही व विसरता कामा नये. तेव्हा हीच बाब लक्षात घेवून स्वातंत्र्य फक्त उत्सवापुरतं साजरं करु नये तर देशातील त्या तमाम नागरिकांना सुरक्षा मिळावी. असा स्वातंत्र्याचा हेतू असावा व तो हेतू साध्य करण्यासाठी देशातील सर्वच नागरिकांनी प्रयत्न करावे व तसं वागावं. तशाच पद्धतीनं वागावं, म्हणजे स्वातंत्र्याचा खरा उद्देश यशस्वी होईल. यात शंका नाही."  
            मीना व सोहेल. दोघांचेही विचार मिळतेजुळते होते. दोघांचेही एकमेकांना फोन यायचे व ते आपसात बोलत असत. ज्यातून त्यांचं ज्ञान वृद्धींकरण होत असे. मात्र मीना सरकारी शाळेत असल्यानं तिला मॅनेजमेंटचा त्रास नव्हता तर सोहेल खाजगी शाळेत असल्यानं त्याला मॅनेजमेंटचा फार त्रास झाला होता. होत होता.
         सोहेलला आठवत होते. आठवत होते, ते गतकाळातील त्याचे पुर्वाश्रमीचे दिवस. ज्या दिवसात त्याला त्रासच झाला होता. ज्या दिवसाची वाट चालतांना वाटेत बरेच काटे होते व ते बोचणारे काटे उपटत उपटत तो वाट चालत होता. कधी त्या वाटेवरुन चालतांना तो रक्तबंबाळही व्हायचा. परंतु त्यानं कधीच पर्वा केली नाही. वेतन बंद झाल्याचा खटला जिंकल्यावरही मॅनेजमेंट चूप बसलं नाही. त्यांच्या कुरापती सुरुच होत्या. खटला जिंकल्यावर त्याचं वेतन पुर्ववत झालं. परंतु आता वेतन सुरु होतं आणि शिकविण्यासाठी वर्गच नव्हता. आरोप केला होता की त्याला शाळेत शिकवताच येत नाही व तो शाळेत शिकवीतच नाही. 
           सोहेलच्या हाताला काम नव्हतं. तसा तो दररोजच शाळेत जायचा व दिवसभर शाळेत बसूनच राहायचा. कंटाळा यायचा, दिवसभर शाळेत बसून. परंतु त्यावरही काहीच उपाय नव्हता व उपाय निघत नव्हता. मॅनेजमेंट अगदी बदल्याच्याच भावनेनं वागत होतं, त्याचेसोबत. सोहेल मात्र वरीष्ठ अधिकारी वर्गाकडे तक्रार करीत होता. तशी एक दिवस तक्रारीची वरिष्ठांनी दखल घेतली व त्याला वर्ग दिला.
         सोहेलला वर्ग शिकवायला मिळाला. परंतु वर्ग दिल्यानंतरही मॅनेजमेंट चूप बसली नाही. त्यांनी आणखी एक नवीन फंडा आणला. त्यांनी एक नोटीस पाठवून त्याला ज्या काळात वर्ग शिकवायला दिला नव्हता. त्या काळात उचललेल्या वेतनाचा पैसा मागीतला होता. ज्यातून एक प्रकारची चिंताच त्याला लागून राहिलेली होती. परंतु त्यावरही मात करुन सोहेल लढत होता, मॅनेजमेंटशी. शेवटी त्यानं ठरवलं. ठरवलं की आपण यावर मात करायची आणि आवाज उचलायचा. कदाचित आपल्यासारखे दुःखी कष्टी भरपूर मंडळी आहेत, त्याही मंडळींसाठी आपण कार्य करायचं. आपल्याला आलेल्या अनुभवाचा त्यांनाही उपयोग व्हायला हवा. जेणेकरुन त्यांचं दुःख आपल्याला दूर करता येईल. असा मनानी निश्चय करुन तो पावले टाकू लागला. ज्यातून त्याचं थोडंसं दुःख दूर होत होतं आणि इतरांनाही त्याच्या अनुभवाचा फायदा होत असे.
         सोहेलनं सगळं भोगलं होतं. तो भोगतच होता, मॅनेजमेंट द्वारे मिळत असलेल्या यातना. मॅनेजमेंटनं मुख्याध्यापक नावाचा नातेवाईक मोहरा शाळेत तयार करुन त्याच्याकरवी ते सोहेलला त्रास देत होते. परंतु हिंमत हारली नाही सोहेलनं. अशातच एक दिवस त्याच शाळेतील मुख्याध्यापकाचा करुण अंत झाला. तो मरण पावला. 
          ती सोहेलची शाळा व त्या शाळेत मॅनेजमेंटच्या गुलामीच्या गर्तेखाली राहणारे सर्व शिक्षकगण. त्यांना मॅनेजमेंट कसा त्रास देते एखाद्या शिक्षकाला. हे सोहेलच्या रुपानं माहित होतं. कदाचित मॅनेजमेंट आपण मुख्याध्यापक बनल्यानंतर आपलं काही चुकलं तर आपल्यालाही त्रास होईल. हे इतर शिक्षकाला माहित होतं. शेवटी मुख्याध्यापक कोण बनावं? हा प्रश्न उद्भवला. मग त्यावर मॅनेजमेंट हे आपल्याच नातेवाईकांना मुख्याध्यापक बनवू पाहात होती. परंतु नात्यातील शिक्षक मंडळी मुख्याध्यापक बनू पाहात नव्हते, मॅनेजमेंट आपल्यालाही त्रास देईल असं वाटत होतं. शेवटी नात्यातील सेवाजेष्ठ शिक्षकांनी नकार देताच सोहेलची मुख्याध्यापक म्हणून वर्णी लागली व तो मुख्याध्यापक बनला. त्यानंतर मुख्याध्यापक बनताच त्यानंही मीनाप्रमाणेच शाळा सुधार उपक्रम राबवला व त्यानंही आपली शाळा आदर्श बनवली होती.
          सोहेलचीही शाळा आदर्श बनली होती. मग वाटलं की आफणही आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी फॉम भरावा. तसा त्यानंही मीनासारखाच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी फॉम भरला. त्यातच जे मीनासोबत घडलं. तेच त्याचेसोबतही घडलं. आदर्श शिक्षक पुरस्काराच्या स्पर्धेत त्याचंही मीनासारखंच कार्य असूनदेखील त्यात त्याची वर्णी लागली नाही व भलत्याच व्यक्तींना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेत. जे मंत्र्यांचे नातेवाईक वा जवळचे लोकं होते. शेवटी तो खजील झाला मीनासारखाच व तोही मीनासारखाच आदर्श शिक्षक पुरस्काराचा नाद सोडून आपले कर्तव्य करु लागला होता. 

**********************१२*********************

             आदर्श शिक्षक पुरस्कार....... मीना आणि सोहेलला मिळालाच नाही शेवटपर्यंत. त्यांनी तद्नंतर तो पुरस्कार मिळविण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यातच वर्षामागून वर्ष निघून गेली व आता ते निवृत्तही झाले होते. तशी त्या आदर्श पुरस्काराबाबत त्यांच्या मनात खंत होतीच. तोच एक दिवस उजळला. त्या दिवशी शिक्षकदिन होता. 
          तो शिक्षकदिनच होता व त्या दिवशी तो थोडासा उदासच होता आणि कसा न राहणार. कारण त्याच दिवशी आदर्श पुरस्काराची घोषणा होवून आदर्श शिक्षकांना तशा स्वरुपाचा पुरस्कार मिळत होता. त्याला तो दिवस व तो पुरस्कार त्याला आठवत होता. तोच आठवली त्याला मीना. तसं मीनाशी बरेच दिवस बोलणं झालं नव्हतंच. 
         त्याला मीना आठवताच त्यानं मीनाला फोन लावला. म्हणाला,
            "हॅलो, मी सोहेल बोलतोय. ओळखलं का?"
           "होय. ओळखलंच. कशी विसरणार तुला. बोल, बऱ्याच दिवसांनी फोन केलाय. कसा आहेस?"
          "ठीक ठाकच आहे. तू कशी आहेस?"
          "मीही ठीकठाकच. परंतु......?
          "परंतु काय? काही प्रॉब्लेम्स आहेत का? सांग मला. मी येवून दुरुस्त करतोय."
            "तसं नाही रे. माझी दोन्ही मुलं विदेशात स्थावर झाली ना. तोच प्रॉब्लेम."
            "मग तू एकटीच असते का इथं?"
            "नाही रे. मी एका विद्यार्थ्याच्या घरी राहते. त्यानंच नेलं मला आपल्याजवळ. त्याला जेव्हा माहित झालं की मी एकटीच राहते इथं. सर्व मुलं विदेशात राहतात, तेव्हा नेलं त्यानं."
           "छानच. चांगले वागत नाही मुलं?"
           "नाही रे, मला तर अगदी फुलासारखंच ठेवतात."
          "मग तो विद्यार्थी चांगला वागत नाही काय?"
          "नाही रे, तोही फुलासारखाच जपतोय."
          "मग तरीही प्रॉब्लेम्स."
          "प्रॉब्लेम्स तसा नाही रे. वाटतं की आपली मुलं डोळ्यानंही दिसत नाहीत. फिरकूनही पाहात नाहीत. स्वतःची मुलं असूनदेखील. अन् ही मुलं आपली नसूनही आपली काळजी घेत आहेत. तुला माहित नाही. मी तर एकाच विद्यार्थ्याच्या घरी आहे. परंतु तिथं मी शिकविलेली बरीच मुलं मला भेटायला येतात. हालहवाल विचारतात व पुरेसे पैसे सुद्धा देतात खर्चाला."
           "का बरं? तुला पेन्शन नाही का?"
           "आहे रे. परंतु ते मला जबरदस्तीनं देतात. म्हणतात की राहू द्या मॅडम तुमच्याकडे गोळा. आमच्याकडे खर्च होतील."
           "बरं ते जावू दे. तू खाण्यापिण्याचा पैसा ज्या विद्यार्थ्याकडे तू राहते, त्याला देते की नाही?"
            "अरे, त्याला मी पैसे देते. परंतु तो घेतच नाही. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. चांगल्या मोठ्या हुद्यावर आहे तो."
           "मग सर्व पैसा जमाच ठेवते की काय?"
           "नाही रे, वस्तू घेतेय मी त्यांच्या घरासाठी. कधी भाजीपाला देखील आणतेय. कधी फळं. कधी त्यांच्या मुलांना काही घेवून देतेय. कधी एखाद्यावेळेस त्यांचं शाळेचं शुल्कसुद्धा. तोही खर्च करतेवेळेस तो टोकतोय मला. परंतु मी त्याला सांगीतलंय की मी तुझ्या घरात जो पैसा खर्च करणार. त्यासाठी मला टोकायचं नाही. नाहीतर मी एकटीच बरी. तेव्हापासून तो टोकत नाही. अन् विशेष म्हणजे मला रात्री एकटंच जेवायला देत नाहीत. सर्वजण सोबतच बसतो जेवायला."
          "एवढी सगळी जर तो विद्यार्थी तुझी सेवा करतोय, तर तू तुझ्या मुलांची आठवण तरी कशाला करतेय? त्यालाच आपला मुलगा समज."
         "होय, मी तशीच मानते आणि वाटतं कधीकधी की ती आपली मुलं, आपली नाहीत. अन् हे आपले विद्यार्थी आपले पोट कापून काढलेले नसले तरी आपले आहेत. तुला माहित आहे आदर्श शिक्षक पुरस्काराची गोष्ट."
          "होय, मला अगदी उत्तमपद्धतीनं माहित आहे. अगं, आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. याची खंत मी आजपर्यंत जाणून आहोच. ते शल्य कधीच जीवनातून मरेपर्यंत जाणार नाहीच."
          "होय. मलाही वाटत होती ती खंत. परंतु मी धन्य झालेय. आता माझंच बघ. माझी स्वमुलं विदेशात असतांना ही मुलं, माझं इथं कोणीच नसतांना माझी निःशुल्क सेवा करतात. ही गोष्ट आदर्श पुरस्कारापेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे की नाही."
          "होय, अगदी खरंच. तसे माझेही विद्यार्थी भेटतात कधीकधी. हालहवाल विचारतात. बोलतात जवळ येवून. ही गोष्ट मलाही आदर्श शिक्षक पुरस्कारापेक्षा मोठी वाटते."
           "छान. तुला माहित नाही आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांची गोष्ट. मी एका शिक्षकाच्या संपर्कात होती. त्याचं कसं झालं. ते सांगतेय थोडंसं. बिचारा आत्महत्या करुन मरण पावला. बिचाऱ्याला आत्महत्याच करावी लागली. स्वतःच्या मुलाजवळ असूनदेखील. तेव्हा विचार आला. विचार आला की बरं झालं, आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार नाही मिळाला ते. जिथं आपलं काहीच योगदान नसतांना खोटी नाटी माहिती सादर करुन समाजात आदर्श शिक्षक म्हणून स्वतःच गौरवून घेतात. तिथं आपण निवृत्त होताच ना आपल्याला कोणता समाज विचारत. ना कोणतेच आपलेच शिकविलेले विद्यार्थी, ना आपलीच स्व लेकरं. माझी स्व मुलं विदेशात जरी असली तरी मला रोजच फोन लावतात. रोजच माझी आठवण करतात आणि रोजच मला तिथं ये म्हणून बोलावतात. परंतु मी भारतीय रहिवाशी असल्यानं तिथं राहताच येत नाही. हे बंधन आहे. म्हणूनच मला इथंच राहावं लागतं. परंतु इथंही मी बरीच सुखी आहे."
           "किती बेकारच झालं त्याचं. अशी मुलं नसावीतच. अन् नकोय असं आदर्शपण. ज्या आदर्शपणात आपलीच मुलं आपली सेवा करीत नाही. त्यांच्यानुसार आपण केव्हा केव्हा मरतो आणि केव्हा नाही, असं वाटतंय."
            "त्या शिक्षकाला आपल्याच काळात आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. आता कसा मिळालाय ते विचारु नकोस."
          "माहित आहे. कसा मिळालाय तो."
          "परंतु त्या आदर्श शिक्षकानं आपल्या घरी सुसंस्कार फुलवले नव्हते. माहित आहे, त्याला पेन्शन असूनही त्याची मुलं त्याची सेवा करीत नव्हती. एकदा तर त्याच्या मुलानं त्याला मरणाचं नाटकच करायला लावलं होतं. मग तो मरण पावल्याची बातमी पसरवली होती. लोकंही आले. त्यांनी दुरुनच पाहिलं. तेव्हा नाकात कापसाचे बोळे होते. हाताची बोटं बांधलेली होती. शरीराला खाली उतरविण्यात आलं होतं. त्याच्या डोक्याच्या भागात अगरबत्ती व दिवा लावला होता. जसा बनाव प्रेतासाठी करतात तसा. तेव्हा तो मेलाच असल्याचं दिसलं. त्याचा विचार होता, गुपचूपपणे त्याला मरण पावलेला सांगून प्रेत घोषीत करायचं व प्रेताची विल्हेवाट लावून आपल्या मागील कटकट दूर करायची. परंतु माशी शिंकली. कदाचित एखादी माशी त्याच्या नाकात शिरावी अशी व तो शिंकरला. कदाचित त्याला जीवंतच जाळून टाकण्याचा त्याचा विचार होता. अन् तसं त्याला त्याच्या मुलानंही जबरदस्तीनं करायला लावलं होतं. मग कळलं की तो जीवंत आहे. त्यानंतर लोकं तिथून निघून जाताच व बिंग फुटताच त्यानं त्याला मारलं व त्याच्या पत्नीनंही त्याला काहीबाही म्हटलं. हे सहन न झाल्यानं त्यानं आत्महत्या केली. परंतु प्रकरण दबलं नव्हे तर दाबलं गेलं."
          "बापरे, विचित्रच झालं तर...... त्यापेक्षा आपण कितीतरी पटीनं बरे. माझी मुलं तशी नाहीत. ती जास्त शिकली नाहीत. परंतु बरी आहेत या घडीला. काय करायचं, आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार नाही मिळाला त्याचं. निदान तशी मुलं निघायला नकोतच."
         तो म्हणाला. परंतु त्याला एक प्रकारची जी खंत तेवढी वाटत होती. ती खंत आता दूर झाली होती. अशातच तो एक प्रसंग घडला. 
         तो दिवस व त्या दिवशी त्याला दरवर्षी भेटायला येणारी ती त्यानं शिकविलेली गतकाळातील मुलं. ती मुलं त्याला दरवर्षी काही ना काही देवून जायची. ती मुलं यावर्षीही त्याला भेटायला आली होती. त्यांच्या हातात एक दैनंदिनी होती व एक पेन होता. त्यांनी तो पेन व ती दैनंदिनी त्याला भेट म्हणून दिली व पेढ्याचा एक घास भरवला. तेव्हाचा क्षण त्याला आदर्श शिक्षक पुरस्कारासारखाच वाटत होता. तो क्षण अनुभवतांना त्याला आज गहिवरुन आलं होतं व वाटायला लागलं होतं की ज्या पुरस्कारासाठी त्यानं प्रयत्न केले होते एवढे दिवस. तो पुरस्कार या लेकरांनी दिलेल्या दैनंदिनी व पेनापेक्षा मोठा नव्हता.
          ते शाळेतील विद्यार्थी निघून गेले होते, आले त्या वाटेनं. त्यानंतर त्यानं ती दैनंदिनी उघडली. त्यात लिहिलं होतं.
          'सर, आपल्यामुळे आमचं आयुष्य धन्य धन्य झालं. कदाचित आपण भेटला नसता तर....... तर आम्ही काळे व कोरडे पाषाणच राहिलो असतो.'
        ती लिहिलेली अक्षरं. कालच्या बाळबोध असलेल्या व आजच्या समजदार मुलांनी लिहिलेली अक्षरं. त्यानं दुसरं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं,
         'सर, आपण फार थोर आहात. आमच्या आईवडीलांनी फक्त आम्हाला जग दाखवलं. परंतु आपण आम्हाला जगाची ओळख करुन दिली.'
          त्यानंतर तिसरं पान उघडलं. ज्यात लिहिलं होतं,
         'सर, ही दैनंदिनी आमच्याकडून आपणाला बक्षीस आहे. आपल्या शिकविण्याच्या कार्याचा गौरव आहे. आपणास हक्कानं म्हणणे आहे की आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही अनुभव आलेत. ते आपण या दैनंदिनीवर उतरवावेत. ज्यातून जगाला प्रेरणा मिळेल.' 
           सोहेलनं दैनंदिनी बंद केली. तोच त्याच्यासमोर त्याचा काळा भूतकाळ उमटला. एकेक आठवण ताजी होवू लागली. तो संघर्ष आणि त्यातही इमानदारीनं शिकविणं. सर्व काही आठवत होतं त्याला. अन् ते प्रसंग आठवताच त्याला गहिवरुनही येत होतं. तेच गहिवरणं ऐकून उषा तिथं आली. तिनं ते सगळं दृश्य पाहिलं. आपले पती रडत असतांना तिला दिसले. कालपर्यंत एवढा संघर्ष करुन जे हिंमत हारले नाही व रडले नाही. आज का बरं गहिवरतात. याचं कुतूहल तिला वाटलं व ती मागवून त्याचेजवळ आली. तिनं त्याचे खांद्यावर हात ठेवला व म्हटलं,
         "नाथ, का बरं रडता आहात?"
          ते तिचं बोलणं. तोच त्यानं आणखी जोरात हंबरडा फोडला. त्यानंतर त्यानं तिचा हात हातात घेतला व उत्तर देत तो म्हणाला,
          "बघ, मी संघर्ष केला. हे तुलाही माहित आहे आणि मी इमानदारीनं शिकवलं. हे मलाही माहित आहे. खरं तर मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळायला हवा होता. परंतु नाही मिळाला. हे तेवढंच बरं झालं. कारण आदर्शपणाच्या कसोटीत माणसानं आदर्शच राहावं लागतं. कुठंही थुंकता येत नाही. काहीही कोणाला अपशब्द, अपमानदर्शक शब्द वा अर्वाच्च बोलता येत नाही. लोकं नावबोटं ठेवतात. म्हणतात की हा आदर्श शिक्षक. बघा, काय बोलतो ते. बघा, कसा वागतो ते. सारीच बंधनं येतात. वागण्यावर व विचारावर बंधनं. खरा आदर्श शिक्षक तोच की आजच्या काळात कुणाजवळ वेळ नसतांना, तो शिक्षक निवृत्त झाल्यानंतर त्यानं शिकविलेले विद्यार्थी त्याला आवर्जून भेटायला येणं. गुणगोष्टी करणं. एखादी अल्प का होईना, भेटवस्तू देणं. पेढ्याचा घास भरवणं. खरंच उषा, हा आदर्शपणाचा पुरस्कार नाही का?"
          "होय, आपण तसे आदर्शच आहात. परंतु आपली आजपर्यंत कोणी किंमतच केली नाही. परंतु आता ते सगळं जावू द्या. आनंद घ्या आणि आनंद द्या लोकांना. आनंदानं उर्वरित आयुष्य जगा. आपण संघर्ष केला व त्यातून तरले. तेच पुष्कळ मोठं झालं."
          उषेनं त्याचं सांत्वन केलं. तसा तो म्हणाला,
          "हो कळतंय मला की मी संघर्ष केला. मला मॅनेजमेंटनं त्रास दिला. माझी नोकरीही उशिराच कायम स्वरुपाची झाली. परंतु त्यातही मी स्थिर राहिलो. त्याचं कारण तूच आहेस. तुझ्यासारखी पत्नी मला कदाचित लाभली नसती तर मीही खचलो असतो. मला जगता येणं कठीण झालं असतं. कदाचित माझा मृत्यूही झाला असता. तू जगवलंस मला. माझी हिंमत खचू दिली नाहीस संघर्षातही. संकटातही तू साथ दिलास. माझा साथ सोडला नाहीस. त्यामुळंच खरी आदर्श तूच आहेस. म्हणूनच आजही मी जीवंत आहे आणि धडधाकट देखील आहे. हे तुझेच उपकार आहेत की मी आजही दिपस्तंभासारखा उभा आहे."
          ते ऐकताच त्याची पत्नी म्हणाली,
         "तसं वैगेरे काही नाही. मी एका पत्नीची जी भुमिका असते. ती यशस्वीरित्या पार पाडली असेल कदाचित. त्याबद्दल मी पाहिजे त्या प्रमाणात प्रशंसनीय नाही. मी फक्त कर्तव्यच केलं माझ्यातील पत्नीस्वरुपाचं."
        ती म्हणाली. तसा तो रडता रडता स्तब्ध झाला व तो स्तब्ध होताच ती घरात निघून गेली होती.
        सोहेलनं दैनंदिनी उघडली व त्यानं त्या दैनंदिनीवर लिहायला सुरुवात केली व शब्द उमटले. त्या शब्दांनी त्याचं संपुर्ण संघर्षमयी जीवन रेखाटून टाकलं होतं दैनंदिनीत. ज्याला नाव दिलं गेलं होतं, आदर्श शिक्षक. ज्यात व्यथा व प्रथाही मांडण्यात आल्या होत्या. ती पुस्तक त्याच्याच विद्यार्थ्यांनी तद्नंतर प्रसिद्ध केली होती व ती पुस्तक आज जगाची प्रेरणा बनली होती, आदर्श शिक्षकाची दैनंदिनी म्हणून. हे तेवढंच खरं होतं.

********************************समाप्त*******