Misstery in Marathi Women Focused by lekhani books and stories PDF | Miss'tery - भाग 13

The Author
Featured Books
Categories
Share

Miss'tery - भाग 13

दुर्गा तिच्या वाटेला निघाली पण अभय तिथून गेल्यावरच..
😉😏

वाट जंगली होती..सावधान चालीने ती जंगलाच्या आत खोल जाऊ लागली....वाटेत तिला दोन असामी दिसले.. तिच्याकडेच बघत होते.. पण संशयी नजरेने..

दुर्गा सावधान होती.. हाताची मूठ कधी झाली तिचे तिलाच कळले नाही.. ते असामी तिच्या जवळ आले... बॉडीगार्ड वाटत होते शरीरयष्टीने. पण पेहराव सादा होता...

" कोण तु? इथे काय करतेस? 😒"

" शैतानाचे फरमान, आले तुझ्या घरी.. ठेवायचे कि प्राणाला नाकारायचे... तुमचे तुम्ही ठरवा 😏.. "त्या लोकांना कळले..

हे त्या लोकांचे गुपित भाषेचे वाक्य होते... त्यांला कळले कि ही आपल्या बॉस ची चाकर आहे.. आजू बाजूला नजर फिरवून.. त्यांनी तिला रस्ता दाखवला...

दुर्गा तिथून पुढे निघाली 😏अजून दाट जंगलात जाताना ती आणखी सतर्क झाली.. हळू हळू तिला काळ्या रंगाचा पताका सारख आकार दिसला.. थोडीशी निर्धास्त झाली ती.

समोर तिला फ्लॅट सारखे घर दिसले.. ती पुढे आली.. माफिया ला शोभेल असेच घर होते ते... काळे आणि काळे.. वरतून ते दिसणारे नव्हते वरून.. कारण दाट झाडी होती आणि ह्या काळ्या रंगा मुळे तर आणखी कठीण होत होते.. कारण त्या घराचे रंगच असे होते कि निसर्गात मिश्रित होऊन जाईल ते. दरवाज्या समोर ती आली..

समोर आणखी दोन जने होती... त्यांला तेच वाक्य पुन्हा सुनावले.. तिला आत सोडले.

समोरच विक्रम उभा होता.. 😏 असा हसत होता..

दुर्गाने ही स्मित हास्य त्याला दिले.

" या.. दुर्गा ताई. स्वागत आहे.. तुमची सेवा काय करू.... स्वर्ग दाखवू का म्हणता तर. 😉 दोघांला मज्जा येईल 😁"

"😏 तु मला स्वर्ग दाखवायच्या आतच तुला नरक दाखवेल.. 😈. साधी समजायची चूक नको करुस.. पचतावशील.. भल्या भल्या लोकांना नरक दाखवले आहे मी. 😏तु काय चीझ आहेस..🤣🤣"

" अरे ताई😂 तुम्ही कश्याला रागे धरताय..😂😂मस्करी केली.. 😉"

" पण मी हे मस्करी म्हणून कधीच घेत नाही.. सो माझ्याशी बोलताना जपून 😉"

"😊😊😊. खतरनाक आहे ही.. जपून विक्रम.नाहीतर तुला मसनात घालेल ही " मनातच तो बोलला.

"जायचे नाही का आत 🤨"
" हो चला. पहिले माझा महाल फिरवतो.. "

" लगेच🤨.. माझ्यावर एवढा विश्वास का? जर मी विश्वास भंग करणारी निघाली तर काय करशील 😏. "

"तु हे करणार नाहीस मला माहित आहे 😁"
" कश्यावरुन 🤨? "
" लाचार आहेस पैश्यासाठी... 😏जर तेच बंद केले तर काय करशील गं तु 😁"

" माझी चिंता तु नको करुस.. मी कमवणारी आहे.. 😉फरक नाही पडत मला.. "

" बर ठीक आहे.. दुसरा ऑपशन.. आई बाबा शिबिरात काम करतात ना.. जर ते शिबीरच उरले नाही तर 😏.. सध्या पुण्यात आहेत ते😁😁.. " शैतानी हास्य त्याच्या तोंडून निसटले..

.. 😨 डोळे मोठे झाले.. " ए- एय माझ्या आई बाबांला हात नाही लावायचास तु..जे काही करायचे ते मला कर.. "

"कशी सरळ झालीस गं तु 😂😂😂..मला पण लेचा पेचा समजू नकोस तु 😉मी कमी नाही.... मनात आले तर मग काहीबी करू शकतो.... चल 😏"

दुर्गा त्याच्या मागे गप्प चालू लागली.. पण ती हसत होती.. ओठ दाबत हसत होती... ते त्याच्या लक्षात आले नाही..
" 😁😁म्हणे मी काही पण करू शकतो 😏.. तुला काय माहित माझे आई बाबा कसे आहेत.. संस्कार शिबीर जरी घेत असले तरी काय ते हात पाय मोडणे  विसरले नाहीत... तुला काय वाटले... सगळे तुलाच जमते का 🤣.aww.. बिचारा 😆😆.. "

सगळा महाल तिने डोळे मोठे करून पहिला.. असे घर देखील असू शकते हे तिला वाटले नव्हते..

त्याचे घर अर्धे जमिनीत आणि अर्धे जमिनीवर होते... जमिनीच्या घरात जायला त्याने कोड टाकला होता. जो सहज उघडता येणार नव्हता... तो फक्त त्यालाच माहित होता.. आणि त्याच्या आईला... वरती नॉर्मल हॉल, किचेन, 2रूम होते.. पण खरे घर खाली होते.. आणि तिथे जायचे असेल तर एक गुपित दरवाजा होता ज्याला कोड होता.. पण तो दरवाजा देखील असाच सापडणारा नव्हता... त्याने कार्पेटच्या खाली, ते देखील लायनी दिसणार नाही असा दरवाजा..!!

कोड देखील दुसरीकडे टाकायला लागणारा.. पूर्ण नियोजन केले होते त्याने...
कोड काही दुर्गाला दाखवला नाही.. पण तिला शेवटचे दोन अंक दिसले होते! 

"७९" असे होते ते दोन अंक..

ते दोघे खाली गेले...इथेच हा जास्त राहत होता. सगळा कारभार खाली होता..

तिला dining रूम मध्ये आणले... बसवले.
"काय खाणार तु?"
" veg मध्ये काहीही "
"🤨 नॉनव्हेग नाही खात तु..?"
" नाही खात मी 🙄"
"पण जनावरासारखं वागतेस खरे 🤣.survival साठी सगळे काम करतेस.. वाह! छान 👌👏"
😊 तिने जबरदस्ती smile दिली..


त्याने ऑर्डर सांगितली आणि तो बसला..
" आई कुठे आहे तुझी? "
" ती असेल रूम मध्ये.. का?? "
" म्हणले भेटावं त्यांला. बघायचे होते मला शैतानाला जन्म देणारी कोण आहे "

" 🤣🤣शैतानाला जन्म पण शैतानानेच दिला आहे.. "
"असं का 😁.. बरे आहे. भेट व्हावी म्हणते."

" बोलावतो तिला मग भेट.. "
त्याने आपल्या आईला बोलावून घेतले..त्याची आई तिथे आली. दुर्गाने नमस्कार केला. तो आईने स्वीकार केला.. आणि खुर्चीवर बसल्या..


" मला याद फर्मावलीस.. कोण कारणाने? "
" सहज भेटावे म्हटले.. शेवटी तुम्हीच ना त्या ज्या या सगळ्यासाठी जबाबदार आहे 😊". चाबरटपणे ती बोलली. पण तिने ओळखले होते कि ह्याची आई महा चाबरट आहे. म्हणून.

" बरोबर बोललीस.. मी फक्त कल्पना सुचवणारी आहे.. काम विक्रम करतो 😊 मी नाही.. "

" स्त्री असून स्त्री चीच अब्रू लुटता तुम्ही. "

" तु काय वेगळे करते आहेस. 😏"

" तुमचे चुकतंय.. सूड कारण आहे ह्याला.. तुम्ही तर सरळ कल्पना दिलीत 😏. आपल्या मुलाला थांबवू शकला असता तुम्ही पण नाही केले तसे तुम्ही 😏"

" मी नाही चुकत. तु चुकते आहेस..मला जे बरोबर वाटते ते मी करणार ...भले ते त्याच्या पप्पांनी सुरु केलं असेल... पण mastermind माझा आहे या सगळ्यांच्या मागे 😉😁. "

दुर्गा आश्चर्याने बघत होती.. अजिबात आशा नव्हती याची..

" आश्चर्यचकित नको होऊस.. मला पैसा प्यारा आहे.. म्हणून मग याच्या बापाचा धंदा वाढवण्यासाठी सगळा आता पिटा केला होता.. आणि guess what, today it's successful😁भले लोकं विकायचा डाव फसला पण ड्रग्स तर कधीच पोहोचले. त्याचा पैसा भेटला मला.. आणि पुढे अजून खूप काही घडणार आहे"खूप भयंकर हास्य तिच्या तोंडून निसटले...

तेवढ्यात जेवण हाजीर झाले.." जेवून घे.. आणि माझ्या धंद्याच्या आड यायचा प्रयत्न करू नकोस.. महागात पडेल. 😈"

स्वतःचीच लाळ गिळत दुर्गाने मान डोलावली.. तिला कळले होते कि हे सगळे danger आहेत..

ती निमूटपणे जेवत होती.त्यांचे जेवण झाले..

"तुला एक सांगायचे होते.. ह्या लोकांना तु कुठे राहू शकतोस याची खात्री पटली आहे.. जपून रहा नाहीतर भिंग फुटेल.." 

" तु काळजी नको करुस.. सगळे नीट राहणार आहे.. तशी तजवीज करून ठेवणार आहे मी. 😉"

" hmmm... "

" मी निघते नाहीतर माझ्या इथल्यांना संशय येईल माझ्यावर... शोध काम करायचे आहे. तसं सांगितले पण आहे.. नाही केले तर मग माझ्यावर उलटतील... 😏"

" hm.. जा जा.. शेवटी तुला जपून राहावेच लागणार.."

" येते मी.. "

ती तिथून सावकाश निघून गेली.. आता तिने त्या एरिया मध्ये खोटे खोटं चं शोधकाम सुरु केले...पाहिले ती त्याचं बिल्डिंग जवळ येऊन थांबली जिथे ती होती. कारण तिला आतून वाटतं होते कि हा अभय पुन्हा तिथे फिरकणार.. आणि तसेच झाले.......