भाग १
रात्रीचे साडेअकरा वाजले होते. शहरापासून थोडं दूर असलेला तो लांबलचक हायवे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अंधार पसरला होता. फक्त बाईक्सच्या हेडलाईट्सचा पांढराशुभ्र उजेड आणि इंजिनांचा घुमणारा आवाज वातावरण दणाणून सोडत होता.एक-दोन नाही...पंधरा-वीस सुपरबाईक्स रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या.त्यांच्या आसपास जमलेले रायडर्स. कोणी हेल्मेट अॅडजस्ट करत होतं, कोणी ग्लोव्हज चढवत होतं, तर कोणी रेसच्या आधीचा अॅड्रेनालिन रश एन्जॉय करत होतं.
"आज दमनला हरवायचं आहे."
कोणीतरी आत्मविश्वासाने म्हटलं.
आजूबाजूचे सगळे हसले.
"स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत रे."
त्यावर दुसऱ्याने टोला मारला. त्याचवेळी गर्दीत अचानक शांतता पसरली.
दूरवरून एका बाईकचा आवाज जवळ येऊ लागला.... गडगडाटासारखा.
क्षणाक्षणाला वाढत जाणारा. पुढच्याच क्षणी काळ्या रंगाची स्पोर्ट्स बाईक तिथे येऊन थांबली.
कावसकी निन्जा एच 2
बाईकवरून उतरला तो.
सहा फूट उंच.
काळा टी-शर्ट.
रिप्ड जीन्स.
डोळ्यांवर काळे गॉगल्स.
चेहऱ्यावर बेफिकीर आत्मविश्वास.
दमन भोसले.
त्याला पाहताच अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
दमनने हेल्मेट काढलं.
केसांवरून हात फिरवला.
आणि बाईकला टेकून उभा राहिला.
"हाय, डॅम."
एक स्टायलिश मुलगी त्याच्याजवळ आली.
तिच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू होतं.
ती सरळ त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली,
"आज माझ्यासोबत राईड करशील?"
दमनने त्या हाताकडे पाहिलं.
मग तिच्याकडे.
आणि शांतपणे तिचा हात बाजूला केला.
क्षणभर मुलगीही गोंधळली.
"व्हाय?"
ती भुवया उंचावत म्हणाली.
दमन हलकंसं हसला.
"कारण मी बाईक चालवतो..."
तो तिच्याकडे पाहत थांबला.
"...लोकांच्या भावना नाही."
आजूबाजूला उभ्या असलेल्या काही मुलांच्या तोंडून हसू फुटलं.
मुलीने नाराजीने ओठ वाकडे केले.
"इतका अॅटिट्यूड कशाला?"
दमनने हातातले ग्लोव्ज वर सरकवून परफेक्ट करत निर्विकारपणे म्हणाला,
"अॅटिट्यूड नाही."
"मला फक्त माझ्या बाईकच्या मागची सीट रिकामी आवडते."
क्षणभर तिथे शांतता पसरली.
मग कोणीतरी ओरडला,
"रेडी फॉर द रेस?"
सगळ्यांच्या नसांमध्ये पुन्हा अॅड्रेनालिन उसळलं.
दमनने हेल्मेट घातलं.
बाईक स्टार्ट केली.
इंजिन गर्जलं.
त्याच्या ओठांवर एक धोकादायक स्मित उमटलं.
"बाकी तुम्ही रेस करायला आलात..."
तो एक्सिलरेटर फिरवत म्हणाला,
"मी जिंकायला आलोय."
रेस संपून जवळपास अर्धा तास झाला होता.
हायवेपासून थोडं दूर असलेल्या एका रूफटॉप लाउंजमध्ये सगळे रायडर्स जमले होते.
मोठ्या स्पीकर्सवर मंद संगीत सुरू होतं.
टेबलावर स्नॅक्स, कोल्ड ड्रिंक्स आणि काहींच्या हातात बीअरचे ग्लास होते.
दमन भोसले नेहमीप्रमाणे मध्यभागी बसला होता. कारण आजही तोच जिंकला होता.
"भाऊ, खरं सांग... तू माणूस आहेस की मशीन?"
एका मुलाने हसत विचारलं.
"मशीन."
दुसऱ्याने लगेच उत्तर दिलं.
"फरक एवढाच की याचं पेट्रोल महाग आहे."
हशा पिकला.
एका हातात बीअरचा ग्लास फिरवत हसत दमन मित्रांचं बोलणं ऐकत होता.
त्याचवेळी तीच मुलगी त्याच्याजवळ येऊन बसली.
"एक गोष्ट विचारू?"
दमनने भुवई उंचावली.
"विचार."
"तुला कोणतीच मुलगी आवडत नाही का?"
आजूबाजूची मंडळी लगेच कान देऊन ऐकू लागली.
दमन खुर्चीत मागे रेलला.
क्षणभर विचार केल्यासारखं केलं.
आणि म्हणाला,
"आवडेल."
मुलीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
"फक्त अजून भेटली नाही."
दमन शांतपणे म्हणाला,
क्षणभर टेबलवर शांतता पसरली.
"वा! म्हणजे साहेब प्रेमाची वाट बघतायत?"
एक मित्र चिडवत म्हणाला.
दमनने हसत मान हलवली.
"नाही."
"प्रेम शोधायचं नसतं."
"ते झालं की कळतं."
"आणि ज्या दिवशी होईल..."
त्याच्या ओठांवर मिश्किल स्मित उमटलं.
"...त्या दिवशी मी माझा राहणार नाही."
क्षणभर सगळे त्याच्याकडे पाहत राहिले. मग कोणीतरी टाळी वाजवली.
"हा बघा... बीअर आणि सिगारेटच्या धुरात बसून प्रेमाच्या गप्पा मारतोय."
पुन्हा एकदा हशा पिकला. दमनने हसत सिगारेट अॅशट्रेमध्ये विझवली.
सकाळचे दहा वाजून गेले होते.
भोसले हाऊसच्या डायनिंग एरियामध्ये शांतता होती.
मोठा संगमरवरी डायनिंग टेबल.
काचेच्या भिंतीतून आत येणारा सूर्यप्रकाश.
आणि टेबलच्या एका टोकाला बसलेले विक्रम भोसले.
समोर लॅपटॉप ओपन होता.
एका हातात कॉफीचा मग.
ते सतत कुणालातरी फोनवर सूचना देत होते.
"नाही, तो प्रपोजल आजच फायनल हवा."
"आणि हो... सिंगापूर टीमसोबतची मीटिंग पुढे ढकलू नका."
कॉल संपला. विक्रम भोसले यांनी घड्याळाकडे पाहिलं.
दहा वाजून दहा मिनिटं. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
तेवढ्यात वरच्या जिन्यावरून कोणीतरी खाली येताना दिसलं.
विस्कटलेले केस.
काळा टी-शर्ट.
आणि अजूनही झोप न उडालेला चेहरा.
दमन भोसले.
तो जांभई देत खाली आला.
डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीत बसला.
"गुड मॉर्निंग, डॅड."
विक्रम भोसले यांनी घड्याळाकडे बोट दाखवलं.
"दहा वाजलेत, दमन."
दमनने समोर ठेवलेला कॉफीचा मग उचलला.
एक घोट घेतला.
आणि निर्विकारपणे म्हणाला,
"घड्याळ खराब झालं असेल."
विक्रम भोसले यांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं.
"घड्याळ नाही."
"तुझं आयुष्य खराब होतंय."
वडिलांनी कोरड्या आवाजात उत्तर दिलं.
दमनने दुसरा घोट घेतला.
"इतकं काही वाईट नाहीये."
"मी अजून जिवंत आहे."
दमनच्या ओठांवर हसू उमटलं.
"सकाळी सकाळी एवढं प्रेम नका दाखवू."
"लोकांना गैरसमज होईल."
विक्रम भोसले यांनी एक दीर्घ श्वास घेतला.
कधी कधी त्यांना वाटायचं की हा मुलगा त्यांच्या घरात बदलून ठेवलेला आहे.
त्यांच्यासारखा बिझनेसचा वेडा नाही.
जबाबदारीचं ओझं नाही.
कशाचाच ताण नाही.
जसं काही आयुष्य हा एक मोठा विकेंड आहे आणि तो त्याचा आनंद घेतोय.
"काल पुन्हा रेस?"
त्यांनी विचारलं.
"हम्म."
"आणि त्यानंतर पार्टी?"
"हम्म."
"आणि ड्रिंक्स?"
दमनने क्षणभर विचार केल्यासारखं केलं.
"या प्रश्नाचं उत्तर माझा वकील देईल."
विक्रम भोसले यांनी कपाळावर बोटं घासली आणि राग आवरला.
दमन मात्र हसत होता. काही क्षण शांतता होती.
मग विक्रम भोसले सरळ मुद्द्यावर आले.
"पुढच्या आठवड्यात एक महत्त्वाची मीटिंग आहे."
दमनच्या चेहऱ्यावर लगेच संशय उमटला.
"माझा काही संबंध नाही ना?"
"आहे."
"मग मी येत नाही."
विक्रम भोसले यांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं.
"मी अजून मिटींगबद्दल सांगितलंच नाही."
"तरीही उत्तर तेच आहे."
दमन आरामात खुर्चीत रेलला.
"डॅड, तुम्ही बिझनेस सांभाळा."
"मी देशाची अर्थव्यवस्था सांभाळतो."
"कशी?"
"पैसे खर्च करून."
त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव पाहून क्षणभर विक्रम भोसले यांनाही हसू आलं.
पण त्यांनी ते दाबलं.
"पुरे झाले विनोद."
त्यांचा आवाज आता गंभीर झाला.
"ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे."
"आणि यावेळी तू माझ्यासोबत असणार आहेस."
दमनने कॉफीचा मग खाली ठेवला.
"डॅड..."
"नाही म्हणजे नाही."
विक्रम भोसले यांनी त्याचं वाक्य मध्येच तोडलं.
"पंचवीस वर्षांचा झालास तू."
"आता तरी कंपनीत काय चालतं ते बघ."
दमन काही बोलला नाही.
त्याने फक्त खिडकीबाहेर नजर टाकली.
विक्रम भोसले काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले.
मग शांतपणे म्हणाले,
"एक दिवस असा येईल, दमन..."
"जेव्हा आयुष्य तुला गंभीर व्हायला भाग पाडेल."
दमन हसला.
"तो दिवस आल्यावर बघू."
"मिटींग कधी आहे?"
विक्रम भोसले यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान उमटलं.
"मंगळवारी"
दमनने कपाळावर हात फिरवला.
"डॅड, मला उगाच यात ओढू नका."
"तुला यात यावंच लागेल."
काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत राहिले.
मग दमन खुर्चीतून उठला.
"ठीक आहे. त्या दिवशी मी जिवंत आणि शुद्धीत असेन तर येईन."
"दमन!"
वडिलांचा आवाज आता थोडा वाढला.
"काय? हेच तर कमिटमेंट आहे माझ्याकडून."
विक्रम भोसले यांनी त्याच्याकडे वैतागून पाहिलं.
दमन मात्र हसत हसत मागे सरकला.
"आता मी फ्रेश होऊन येतो. माणसाला उठल्या उठल्या बिझनेस पचत नाही."
असं म्हणत तो वरच्या मजल्याकडे निघून गेला.
विक्रम भोसले त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले.
"विद्या हा मुलगा एक दिवस मला वेड लावणार आहे."
"तू नक्की काय खाल्लं होतंस ह्याच्यावेळी...?"
आतून येणाऱ्या पत्नींकडे पाहत ते म्हणाले.
विद्या भोसले हसल्या.
"तुम्ही खूप शहाणे होता का त्याच्या वयात?"
विक्रम भोसले यांनी लगेच मान हलवली.
"होतो."
"अजिबात नव्हता."
विद्या खुर्ची ओढून बसत म्हणाल्या.
"कॉलेजमध्ये असताना आठवतंय? आज पुणे, उद्या गोवा, परवा महाबळेश्वर."
"ते वेगळं होतं."
"काहीही वेगळं नव्हतं."
त्या हसत म्हणाल्या.
"फरक एवढाच की तुम्ही बाईकवर फिरायचात, आणि तुमचा मुलगा सुपरबाईकवर फिरतो."
विक्रम भोसले काही क्षण गप्प बसले.
मग त्यांनी कॉफीचा कप उचलला.
"माझी भिती त्याच्या फिरण्यात नाहीये, विद्या."
त्यांचा आवाज आता थोडा गंभीर झाला.
"मला माहिती आहे तो वाईट मुलगा नाही."
"पण त्याला अजून आयुष्याची किंमत कळलेली नाही."
"जबाबदारीची जाणीव नाही."
"काहीतरी स्वतःचं उभं करायची भूक नाही."
विद्या शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होत्या.
"कळेल."
त्या मृदू आवाजात म्हणाल्या.
"कधी?"
विक्रम भोसले वैतागून म्हणाले.
"पंचवीस वर्षांचा झाला आहे तो."
विद्या हसल्या.
"माणसाला काही गोष्टी वयाने नाही कळत."
"मग?"
"योग्य व्यक्ती भेटली की कळतात."
विक्रम भोसले भुवया उंचावत त्यांच्याकडे पाहू लागले.
"तू परत तुझ्या त्या मालिकांसारखं बोलतेयस."
"आणि तुम्ही परत बिझनेस न्यूजसारखं."
दोघेही हसले.
वरच्या मजल्यावरून दमनच्या खोलीचं दार बंद होण्याचा आवाज आला.
विद्या त्या दिशेने पाहत म्हणाल्या,
"काळजी करू नका."
"आपला मुलगा हरवलेला नाहीये."
"फक्त अजून त्याला त्याचा रस्ता सापडायचा आहे."
To be continued.....
******************