Misstery in Marathi Women Focused by lekhani books and stories PDF | Miss'tery - भाग 15

The Author
Featured Books
Categories
Share

Miss'tery - भाग 15

त्या लोकांना आधीच माहित होते कि तिथे रेड पडणार होती.. त्यांच्या मेन कंट्रोल नेच सांगितले होते. म्हणून पूर्वीच सगळी तयारी करून त्यांनी ठेवली होती.."

"काय..?"

"त्यांनी ते ड्रग्स चे पॅकेट आणि उरलेले ड्रग्स सगळे जमिनीच्या खाली टाकले.. जसे लोकांसाठी गुपित भुयार होते तसेच ड्रग्स लपवण्यासाठी त्यांनी जमिनीत एक गुप्त कॉम्पर्टमेन्ट बनवले आहे.. ते काही सापडले नाही."

"पण तुम्हाला कसे माहित कि जमिनीत गुप्त जागा आहे?" दुर्गाने सवाल केला.

" त्या लोकांनीच सांगितले.. पण त्या लोकांना.. ते कसे केले जाते हे माहित नाही. कारण फक्त विश्वासू लोकांना तो कॉम्पर्टमेन्ट सांभाळण्याची जबाबदारी आहे. फक्त त्या लोकांनाच माहित आहे कि ते कसे उघडायचे.. मला संशय आहे कि ते देखील तसेच त्या गुप्त भुयारच्या मार्गा सारखे असेल. काहीतरी कोडे असणार" पण तुम्ही त्या विक्रम ला शोधायचे सोडून इतर गोष्टी का शोधत आहात. मेन तर तो विक्रम आहे. "अभय म्हटला.

" भले विक्रम मेन आहे. पण त्याचे इतर धंदे देखील बंद पाडणे आपले कर्तव्य आहे.. फायदाच नाही ना. तो मेला तरी त्याचे इतर लोकं का तो धंदा बंद करतील. असेही किती जणं तो धंदा करतात. हे मी वेगळे सांगायला नको. ड्रग्स विकणाऱ्यांला लीडर्स ची गरज नाही. ते स्वतःच लीडर बनून काम करत राहतील.म्हणून मग त्या सोबत आपल्याला या गोष्टींवर पण लक्ष घालायला हवे. त्याचे अजून असे किती लॅब्स आहेत, किती गोडाउन आहेत, नेटवर्क केवढं मोठं आहे, त्याला मुख्य मदत कोण करतं, डीलर्स कोण कोण आहेत ते. "

बरोबर आहात तुम्ही.. काय मॅडम एकदम 'Miss'tery सारख्या काम करत आहात तुम्ही. एकदम विचार करून. सावधानी तपासून. कधी कधी वाटते कि तुम्हीच 'Miss'tery

आहात. ". अभय म्हटला आणि शुभम ने हो म्हणत दाद दिली.

हे ऐकताच नियती गंभीर झाली. तिने तीक्ष्ण नजरेने अभय आणि शुभम कडे पाहिले. पण लगेच भाव लपवून हास्य चेहऱ्यावर आणले. कोणालाच कळले नाही.

काहीही काय बोलतोस तु.. मी माझे काम करते. मोहीम जोखीमेची. त्यात बारकाईने लक्ष घातलेच पाहिजे नाही का. "

"हो बरोबर."

" ही एका क्षणासाठी 'Miss'tery हे नाव ऐकल्यावर गंभीर का झाली. आणि लगेच भाव बदलून भुरळ पाडली समोरच्याला. ही आहे तरी कोण. फक्त IG तर ही मुळीच नाही. याच्या पलीकडे काहीतरी आहे ही. लक्ष ठेवा अभय . "अभय च्या मनात विचार येऊन गेला.... एकटक तो नियतीकडे बघत होता. संशयी नजरेने. चेहऱ्यावर नव्हते पण डोळ्यात होते. ते नियती ला लगेच समजले.

" ह्याला ज्याचा संशय नाही आला पाहिजे तोच येत आहे. नियती कंट्रोल.. ". चेहऱ्यावर हास्य ठेवून तिने अभय ला विचारले.

" अभय आता तु सांग. तुला काय काय सापडले. ". अभय भानावर आला.
" अं- हा-हा.. मला जास्त काही सापडले नाही. मी ज्या भागात होतो तिथे काही दिसले नाही सहजा सहजी. गर्दी चे ठिकाण आहे म्हणून मग जास्त शोधलेच नाही. "

" पण असं कसं तु करू शकतोस. गर्दीचे ठिकाण जरी असले तरी तुला नीट शोधायला पाहिजे. अश्या ठिकाणी काही बंद दुकाने वैगरे असतात जी भले लांबून बंद दिसतात., पण रात्री तिचं दुकाने जागी असतात कोणाच्या नकळत. आणि अशी ठिकाणे वापरली जातात. सगळा psychological खेळ आहे.. माणसे विचार काय करणार कि गर्दी चे ठिकाण कोण का इथे फासायला येईल. पण हाच तर डाव असतो..

रात्री कोणाला कळेल कि काय होते त्या बंद जागेत. अशी ठिकाणे उलटून वापरली जातात. आणि ते बरोबर मॅनेज करतात सगळे कोणाला कळू नये म्हणून." नियती एका श्वासात सगळे बोलली.

अभय मान खाली घालून ऐकत होता.

" अश्या ठिकाणी सध्या मेणबत्तीत पण काम होते. ड्रग्स चे बॉक्सेस वगरे असले तिथे तर. स्टोर रूम प्रमाणे पण वापरू शकतात. किंवा बॉडी पार्ट, ऑर्गन्स काहीही असू शकते स्टोरकेलेले.लो temperature सगळ्यांलाच माहित आहे हे कुजत नाहीत. मग तिथं तसें काहीतरी असू शकते नाही का? रात्री हलवत असणार जेव्हा सगळे गाढ झोपलेले असतात. कोणाला संशय येऊ नये म्हणून मग लपवण्यासाठी वरती काहीतरी ठेवत असतील सामान वैगरे."

हो मॅडम, चुकले माझे. मी.."

आता अभय तु माझ्यासोबत असणार. तुला एकटे सोडणार नाही मी."

हे ऐकताच दुर्गा मनात हसत होती. " जास्तच उडत होता. बरं झाल पंख छाटले. त्या मनाने माझे काम होत राहील. "

आरोही आणि शुभम तुम्हा दोघांला काय सापडले? "

" मॅम आम्ही मुंबई च्या passoon डॉकयार्ड च्या इथे होतो. तर मग तिथे विचारपूस करताना आम्हाला असे कळले कि, कोण तरी राहू नावाचा त्यांचा एक कस्टमर आहे.. तर तो मग दर महिन्यालाएक बोट बनवून घेतो.. मदन नावाचा.. जरा specialized पद्धतीने बनवून घेतो.. प्रत्येक बोट मध्ये थोडी का होईना एक्सट्रा स्टोरेज space बनवून घेतो. आणि त्या साठी त्यांला खूप पैसे देतो म्हणून मग ते पण बनवून द्यायचे..

त्याला विचारले कि माणूस जो बोलणी करायला यायचा तो प्रत्येक वेळेस वेगळा असायचा का कि एक होता. तर मग त्यावर तो म्हणला कि वेग वेगळे यायचे.

मला असे वाटतं आहे कि हा विक्रमच आहे.. "

कश्यावरून?

" कारण बघा ना तुम्ही.. मुद्दाम कोणी मदन आणि राहू अशी नावे ठेवतील का... वरतून दोन्ही devil ला संबंधित नावे आहेत.. हे खूप वेगळे वाटते.. आणि म्हणतात ना दुष्ट कर्म करणाऱ्यालाच ही आशी नावे सुचतात.

वरतून दर महिन्याला बोट. हे संशयी नाही वाटत का तुम्हाला.एक बोट कितीतरी वर्षे चालू शकते. दर महिन्याला कोण का करेल..? आणि ज्याकडे पैसा आहे तोच हे करू शकतो वाटतं नाही का तुम्हाला..

आणि त्याने एक सांगितले. विचारपूस साठी एकदा त्या बोट ची बोलणी करायला आलेला माणूस कडे तो जात होता. पहिले त्याला तो बोलताना दिसला.. जवळ गेला तेव्हा त्याने ऐकले कि.. "Sir bodies, आणि ड्रग्स बरोबर लोड होतील त्या बोटीत. चांगलीच बनवून घेईल. तो बनवतो देखील." हे त्याने ऐकले.. तो घाबरला होता. आणि त्या माणसाने देखील धमकी दिली. सांगितले कि मारून टाकेल म्हणून तो गप्प होता."

मग त्याने आत्ता कसे काय सांगितले तुम्हाला..? " अभय ने विचारले.

" आता त्याला वचन देऊन आलो कि तुम्हाला काहीच नाही होणार याची खात्री आम्ही देतो.. "

" काय केले तुम्ही? " आवाज चिडीला आला होता अभयचा.
"तु चिडतोस का हरवेळेस. आणि तुला नाही सांगणार आम्ही. तुझी सध्याची परिस्तिथी बघता. तु त्या लायकीचा नाहीस. हे आमच्यातच राहील." आरोही चिडून बोलली.

" मला जरी नाही सांगितलेस. तरी मी शोधून काढेल. " वरतून शांत पण आतून चिडून तो म्हटला आपल्या मनातच.

आरोहीने पुढे सांगितले." मग पुढे आम्ही पोर्ट ला गेलो. तिथे पण मदन नावाच्या बोटीची विचारपूस केली. पण तिथे कळले कि अशी बोट कधीच इथून गेली नाही. म्हणले असे कसे होईल..

पण तो नक्कीच कुठे दुसरीकडून पाठवत असणार.. पोर्ट ला चेकिंग होऊ शकते. तो रिस्क नाही घेणार. कुठून दुसरीकडे जात असणार ती बोट..

आणि त्या डॉक वाल्याकडून कळले कि ती बोट ते स्वतः टेम्पो आणून बोट घेऊन जायचे.. कुठे हे माहित नाही.. पण लांब जाणारच नाही ते.. इथेच कुठून तरी सोडत असणार ते बोट. शोधावे लागेल..
" hm. नक्कीच तो त्याच्या घराच्या इथून कुठंतरी सोडत असणार त्या बोटी. " नियती म्हटली.

"दुर्गा.. तुला काय सापडले? "दुर्गालाल भानावर आणत शुभम म्हणाला..

हा मी वडाळाच्या इथ े होते.. क्रांतीलाल eye क्लिनिक आहे ना तिथे...."

पुढील भागासाठी stay tuned