शनिवारची सकाळ होती, मुंबईत शनिवार म्हणजे कॉलेजच्या स्टुडंट्स साठी दोन प्रकारचा असतो, काहींसाठी उशिरा उठायचा म्हणजेच रोजच्यापेक्षा थोड अजून.. आणि काहींसाठी आज आपल्याकडे वेळ आहे तर आपलं काम करून घेऊ अशा प्रकारे ...
आरव दुसऱ्या प्रकारात येत होता.. त्याला त्याचा वेळ वाया घालवून द्यायचं नसत.
साडे आठच्या आसपास आरव ने खिडकी उघडली.... खिडकी उघडताच बाहेर वाट पाहू असणाऱ्या सूर्याची किरणं भसकन आतमध्ये आली.. .टेबलावर कालची प्रोजेक्ट फाइल ठेवलेली होती बाजूला लॅपटॉप, दोन पेन आणि एक अर्धवट भरलेला कॉफी मग आणि अर्थातच त्याची ती काळी डायरी...
आरवची आई किचन मध्ये नाश्ता करत होती, आरव अजून कसा उठला नाही म्हणून तिने आरवला आवाज दिला...
आरव..
हम... आरव ने हुंकार केला फक्त...
आज कॉलेज आहे ना की सुट्टी आहे?
हो आहे ना.. प्रोजेक्ट आहे त्यामुळे जावं लागेल..
प्रोजेक्ट आहे का अजून दुसरं काही आहे... आरव च्या आईने थट्टेमध्ये विचारलं.
प्रोजेक्टच आहे गं..अजून काही नाही आहे..
आईने अजून काही विचारलं नाही..ती त्याला चांगल ओळखून होती. तो जर काही मनात ठेवत असेल तर ती लगेच ओळखत..त्याच्या आवाजातला छोटासा बदल सुद्धा तिला कळायचा. पण ती त्याला काही विचारत नव्हती..
कदाचित म्हणून आरव तिच्यासमोर पूर्णपणे भावना व्यक्त करत नसे..आपल्या माणसांकडून दोन काळजीचे दोन प्रश्न जरी विचारले गेले की आपण भावूक होऊन सगळी कथा त्यांच्यासमोर मांडतो..पण इथे तसं नव्हतं..
आरवने लॅपटॉप बंद केलं..
आई नाश्ता दे.. आवाज देत बाहेर आला..
फक्त दोन मिनिट दे..आईने टेबल वर प्लेट ठेवली आणि म्हणाली आज किती वाजता येणार?
माहिती नाही....आरव ने उत्तर दिलं
जेवायला तरी येणार ना? आई ने विचारलं
हो...आरव म्हणाला
खरंच ना...आईने पुन्हा विचारलं
हो गं खरच...
आरवची आई हसली .. ठीक आहे मग मी ठेवते तुझ्यासाठी म्हणत पोळीचा आरव च्या ताटात वाढली..
आरवने पोळीचा तुकडा घेत म्हणाला.. आई..
काय...आईने विचारलं..
नाही काही नाही...आरव बोलला.
बोलणा.. काही बोलायचं आहे का? काही आहे का? सांग...काय झालं बोल.. आरव ची आई बोलू लागली
तू कधी कधी जास्तच प्रश्न विचारतेस.....आरव एका दमात बोलला.
आणि तू कधी कधी काही सांगतच नाहीस... आई म्हणाली
आरव हसला आणि म्हणाला...हम..बॅलन्स आहे..
तुझं आयुष्य आहे..ते माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती असणार..हो ना..आईने त्याच्याकडे बघत विचारलं..
हो...आरव म्हणाला...
मग कधी वाटलच तर कोणाशी बोलायचं...तर...ती थोडी थांबली आणि पुन्हा बोलू लागली... वाटलं जर बोलावस तर माझ्याशी बोल...
आरवने काही उत्तर नाही दिलं..त्याने फक्त मान हलवली..
दहा वाजता आरव लायब्ररी मध्ये पोहचला, समीर अगोदर तिथे पोहचला होता, आरव ने पाहील की समीर प्रोजेक्ट फाइल फक्त समोर घेऊन बसला होता मात्र काम काही करत नव्हता, तो फक्त मोबाईल वर रीळ बघत होता.आरव त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला..
काय चाललंय?
समीर ने लगोलग फोन बंद केला आणि म्हणाला
Research
कशाच...? प्रश्नार्थक नजरेनेआरवने विचारलं.
Human behaviour..
काय?..आरवला हे उत्तर अपेक्षित नव्हतं..
त्यावर समीर म्हणाला...लोक कोणत्या reels वर जास्त हसतात .. शेअर करतात..ह्याचा अभ्यास चालू आहे.. हे काम सुद्धा महत्वाच आहे.
आरव ने खुर्ची ओढत म्हणाला..तुला प्रोजेक्ट मधुनच काढलं पाहिजे..काही कामाचा नाही आहेस तू..
अशक्य... माझ्याशिवाय प्रोजेक्ट अधुरा आहे....समीर जोशात म्हणाला..
हम्म...आणि तो का? तुझं काय कंट्रब्यूशन आहे प्रोजेक्ट मध्ये..आरव म्हणाला..
Team Spirit...समीर
आरव हसला आणि म्हणाला ठीक आहे ठीक आहे चल काम कर गपचूप....
सायली नाही आली का?समीर ने विचारलं..
माहिती नाही...आरव ने लॅपटॉप उघडत सहज उत्तर दिलं..
तुला माहिती नाही मग कोणाला माहिती पाहिजे...समीर म्हणाला
का?.. आरव ने त्याच्या कडे बघत विचारलं
तू काल तिच्यासोबत होतास ना..बोलत होतास ना? किती वेळ बोलत होतास? ..समीर ने त्याच्याकडे बघत विचारलं..
काही विशेष नाही..फक्त प्रोजेक्ट बद्दल चर्चा करत होतो..
समीर पुढे अजून काही बोलणार इतक्यात सायली लायब्ररीच्या दारातून आत आली, तिच्या हातात दोन फाईल्स होत्या थोडी घाईतच दिसत होती ती थेट त्या दोघांकडे आली.
सॉरी सॉरी उशीर झाला....ती म्हणाली
समीर ने लगेच घड्याळाकडे बघितलं... दहा वाजून पंधरा मिनिट..
तू लायब्ररी मध्ये फक्त घड्याळ बघायला बसला आहेस का? सायलीने त्याच्याकडे बघत विचारलं..
नाही गं तुझीच वाट बघत होतो..समीर बोलला..
माझी? सायली एक भुवई करत बोलू लागली
नाही...प्रोजेक्ट टीम ची....समीर ने लगेच उत्तर दिलं..
तीन फक्त हम्म उत्तर दिला आणि ती आरव च्या शेजारी जाऊन बसली...
कालचा डाटा आणला आहेस का? सायली ने आरव ला विचारलं
हो .. आणला आहे ना... आरव ने लॅपटॉप तिच्याकडे फिरवत म्हणाला
टोटल 103 respondents...सायलीच्या चेहऱ्यावर जिंकण्याच समाधान होतं.. फायनली... ती म्हणाली
सावलीने स्क्रीन वर चार्ट उघडला..चार्ट कडे थोडा वेळ पाहिल..
18 to 21 - 31 Respondents
22 to 25 - 46 Respondents
26 to 30 - 26 Respondents
20 to 25 जास्तच आहेत...एक्सपेक्टेड होतं मला...सायली म्हणाली
का? आरव ने विचारलं
ओबियस्ली कॉलेज आणि फर्स्ट जॉब पॉप्युलेशन असणार.. सायली म्हणाली
तू रिसर्च पण करू शकते? आरवने कुतुहलाने विचारलं
मला सगळ माहिती असतं...सायली कॉन्फिडन्स मध्ये बोलली
Good....आरव ने जास्त काही विचारलं नाही..
सायलीने पुढची शीट उघडली..
Investment Preference
Mutual Fund - 34
Stocks - 27
FD - 18
Gold - 13
Crypto - 7
Others - 4
चार्ट कडे बघत सायली ने विचारलं..crypto फक्त सात...? मला वाटल जास्त असतील...आजकाल क्रिप्टो खूप ट्रेडिंग आहे..सगळ्यांना झटपट पैसे पाहिजे असतात..
लोक बोलतात काही आणि करतात वेगळंच... आरव म्हणाला..
सायली थोडावेळ शांत झाली..मग म्हणाली तू प्रत्येक गोष्ट ऑब्सर्व करतोस का?
बहुतेक.... आरव स्क्रीन कडे बघत म्हणाला..
मलाही असच ऑब्सर्व करतोस का?
आरव ने फक्त तिच्याकडे पाहिलं..तो अनुत्तरीत झाला..
समीर ने दुरून आवाज दिला..हो तुझं तर विशेष observation चालू आहे...
तू तुझं काम कर ना... सायलीने समीरकडे पेन फेकत म्हणाली
मी माझं कामाचं करतोय...
ही दिसतंय ते किती काम करतो आहेस ते...सायली लटक्या आवाजात म्हणाली..
साडेबारा वाजले होते..लायब्ररी मध्ये बसून सगळ्यांना कंटाळा आला होता..जास्त करून समीरला ..त्याने लॅपटॉप बंद केलं ...मला तर जॅम भूक लागली आहे...समीर पोटाला हात लावत सगळ्यांकडे बघत म्हणाला...
हाहाहाहा...तू एक तासांपासून फक्त भुक आणि भूक करतोस... प्रोजेक्ट पेक्षा जास्त लक्ष तुझं खाण्यावर आहे अस वाटायला लागलंय... नेहा त्याच्याकडे बघत उतरली..
तुला नाही समजणार...माझी बॉडी मला सिग्नल देते ..खायला टाक..खायला टाक....समीर थट्टेमध्ये बोलला..
तुझं बॉडी तुला रोजचं सिग्नल देतं...ओंकार हसत म्हणाला
हो मग..म्हणून मी तुमच्या सर्वांपेक्षा जास्त जबाबदारी घेतो....समीर बोलला
तू येणार का? सायली ने आरव कडे बघत विचारलं..
कुठे? आरव ने मान वर करत विचारलं
कॅन्टीन... सायली म्हणाली
आरवने लॅपटॉप बंद केलं आणि निघाला...
समीर ने लगेच भुवई वर करत म्हणाला...अरे वा...
काय झाला...काही होतं का? आरव ने विचारलं
काही नाही...काही नाही..चालू देत...
कॅन्टीन मध्ये नेहमीपेक्षा कमी गर्दी होती..सायलीने दोन कॉफी ऑर्डर केल्या....
आज कॉफी? आरवने तिच्याकडे बघत विचारलं
हो....सायली म्हणाली
तू रोजचं कॉफी पिते?
नाही...सायली
मग...कॉफी का? आरव
तुझ्यावर पडलेल्या कॉफीची आठवण म्हणून..सायली बोलली
आरव हसला.. तो विषय संपला नाही का अजून...
नाही...मला अजून गिल्ट आहे...सायली म्हणाली
तुला प्रत्येक गोष्टीचा गिल्ट येतो का? आरवने विचारलं
सायली काही क्षण थांबली...आणि म्हणाली..नाही
आरव पुढे काही बोलला नाही...
आजुबाजूला इतर विद्यार्थ्यांचा आवाज येत होता...कोणी चेअर ओढत आहे तर कोणी मोठणे हसत होते..कोणी assiagnment बद्दल वाद घालत होत...पण त्यांच्या टेबल वर मात्र शांतता होती..
कालच्या गोष्टीबद्दल.... सायली कॉफीचा सिप घेत बोलणार तर अडकली..
हम्म..काय? आरव ने तिच्याकडे बघत विचारलं..
काल मी जरा जास्तच रिॲक्ट केलं ना...सायली ने आरवला विचारलं
तू रागावली होतीस... आरवने विचारलं
हो...सायली शांतीने म्हणाली
मला कळलं होतं...आरव म्हणाला
तुला वाईट वाटलं का? सायली ने विचारलं
आरव थोडावेळ शांत झाला...हो वाईट तर वाटल होत..
खरंच?...सायली निरागस डोळ्याने त्याच्याकडे पाहत विचारलं..
हो.. आरव
का? सायली
कारण तू माझ्याशी बोलत नव्हतीस... आरव एका झटक्यात म्हणाला
एवढंच? सायली ने अपेक्षित केलं ते उत्तर नाही भेटल
हो...आरव म्हणाला
ती काही वेळ शांत झाली...मला वाटल तुला फरक पडणार नाही...
पडतो....आरव
किती? सायली ने विचारलं
तुला नाही वाटत तू जरा जास्त प्रश्न करतेस... आरवने हसून विषय बदलायचा प्रयत्न केला..
विषय नको बदलू... उत्तर दे...सायली सिरीयस झालेली
मला नाही माहिती.. आरव ने विषय संपवला..
मला माहिती आहे तुला सगळ माहिती असतं...मग आपण मित्र तरी आहोत ना? सायली म्हणाली
तुला काय वाटत... आरव ने हसत विचारलं
मी प्रश्न केला आहे ना मग तू अगोदर सांग...सायली म्हणाली
हो...आहोत ना मित्र..आरव म्हणाला
फक्त मित्र ..? सायली म्हणाली
आरव एकदम शांत झाला...काय बोलायचं त्याच्या ध्यानीमनी नाही आलं..तरी पुन्हा विषय टाळण्यासाठी अजून थट्टेत म्हणाला...
मित्र होण्यासाठी अगोदर परीक्षा द्यावी लागते...
म्हणजे....सायली मोठ्याने हसत म्हणाली
तू अजून पास नाही झाली आहेस...35 आउट ऑफ 50 आहेत अजून..
सायली त्याच्याकडे बघत राहिली...मग हसली...तू ना...कधी कधी एकदम वेगळाच वाटतोस...
चांगला की वाईट? आरव ने विचारलं
हम्म...अजून ते ठरलं नाही...सायली विचार करत म्हणाली
ठीक आहे....आरव म्हणाला..
हो पण मला तुझ्याशी बोलायला खूप आवडत...सायली बोलली
मलाही... आरवने कॉफीकडे बघत म्हणाला
त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांच्यात आपण मित्र आहोत यापेक्षा अजून काहीतरी अधिक जवळचं अस वाटत होतं...नाव नसलेलं ...स्पष्टीकरण नसलेलं...
क्रमशः
©DipakRinge05