Everything on Abol's mind - Part 7 in Marathi Love Stories by Amol Meshram books and stories PDF | अबोला मनातले सारे काही - भाग 7

Featured Books
Categories
Share

अबोला मनातले सारे काही - भाग 7

काही दिवसांनी शेतात धान कापणीची वेळ आणि कापण्यासाठी सचिन सचिनचे पप्पा सायली ची मम्मी अमोल आणि श्रीकांत असे सगळेजण एकत्र शेतावर गेले शेतात सगळे जण आपापल्या कामात मग्न होते 


त्या दरम्यान सचिनची मम्मी एका शाळेत जेवण बनवण्याचं काम करत असल्यामुळे तिला दुपारी मिळायची ती सुट्टी झाल्यावर थोड्यावे थोड्या वेळासाठी थेट शेतावर यायची तिकडे सचिन शेतातून किंवा कामातून सवड काढून घरी यायचा तेव्हा सायलीला जशी संधी मिळायची ती लगेच सचिनच्या घरी जायची आणि त्याला भेटून आपल्या मनातल्या गोष्टी बोलायची 


मैत्रिणीची साथ 

सायली आणि वहिनीची मैत्री इतकी घट्ट होती की सायली सकाळी आठ वाजता तिची मम्मी कामावर गेली की वहिनीच्या घरी यायची आणि सायंकाळी दिवा लावायच्या वेळेवर घरी जायची तितक्यात च वेळामध्ये सायली सचिन सोबत वहिनीच्या घरून दिवसभर फोनवर बोलायची 


मग असंच करता करता एक दिवस हे दोघेही जण आठ दिवसांसाठी बाहेर जाणार होते सायली वहिनीच्या घरी आली चुटकीला घेऊन चुटकेने सायलीला साडी लावून दिली सायलीने साडी घातली दुपट्टा बांधला आणि सायली सोबत गाडीवर बसून निघून गेली वहिनीला आणि चुटकीला वाटलं की हे सायंकाळपर्यंत वापस येतील पण हे आठ दिवस काही आलेच नाही नंतर अमोल ने त्यांना व्हिडिओ कॉल केला तर सायली भाग भरून होती 


जेव्हा हे आठ दिवसानंतर घरी आले तेव्हा गावामध्ये सगळे बोंब पसरली होती की हे दोघेजण पळाले म्हणून ते आल्यावर व दिसल्यावर वहिनीला सगळेजण विचारायचे ही तर पळाली होती ना मग ही कशी आली वहिनी त्यांचं दोघांचं प्रेम लपवत होती आणि सांगायची की नाही ते तर आपल्या मैत्रिणीकडे गेले होते 

पण लोकांच्या मनात डाऊट आलाच होता आणि फिरायला गेल्याबद्दल सगळ्या गावाला माहित झालं होतं की यांचं लफडं चालू आहे बुवा पूर्ण गावामध्ये लहान लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच याबद्दल समजलं होतं 


गावातील चर्चा आणि घरच्यांचा गाफीलपणा 

आता गावात पुन्हा एकदा चर्चांना उधान आलं होतं पण इकडे मात्र सगळं काही पूर्वीसारखंच सुरळीत चालू होतं सायली रोज नियम धरून वहिनीच्या घरी यायची आणि सचिनही तेथेच यायचा सगळे जण मिळून मिसळून राहायचे इतकच नाही तर सायली सचिनच्या घरी सुद्धा बिनधास्त येणं जाणं करायची 


जरी ते आपल्या विश्वात मश्गुल असले तरी लोकांच्या तोंडून येणाऱ्या त्या वेगवेगळ्या गोष्टी आणि कुजबुज आत्ता सायलीच्या मम्मीच्या आणि भावाच्या कानावर सुद्धा पडू लागल्या होत्या पण आश्चर्य म्हणजे त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे अतिशय सहजपणे दुर्लक्ष केले 

त्यांच्या मनात आपल्या लेखी बद्दल किंवा बहिणीबद्दल पूर्णपणे विश्वास होता त्यांना असं वाटत होतं की गावकरी कायमचं विनाकारण काहीतरी बडबड करत असतात आणि या लोकांच्या बोलण्यात काही तथ्य नाही त्यामुळे त्यांनी त्या गोष्टींना अजिबात महत्व दिल नाही आणि त्याकडे साप दुर्लक्ष केलं काही दिवस हे सगळं असंच शांतपणे आणि पूर्वीसारखा चालू राहिला 

अंधारातील वादळ 

नंतर असं म्हटलं की याची कल्पना कोणीच केली नव्हती एक दिवस अचानक गावामधली डीपी पेटली आणि संपूर्ण गावात दिवसभर एकच हलकोड उडाला दिवसभर गावात लाईट आलीच नाही आणि रात्रीची सुद्धा तीच गंमत झाली चारही बाजूंना सुनसान अंधार आणि एक भयंकर रात्र पसरली 

विज नसल्यामुळे घरातील उखाड्याने आणि कंटाळवाणीने त्रसत झालेले गावातील सगळे लोक घराबाहेर अंगणात येऊन बसले होते सायली चालत वहिनीच्या घरी आली आणि तिच्या अंगणात बसून इतर मंडळी सोबत गप्पा मारू लागली वहिनीच्या घराजवळ एक बुद्ध विहार होतं त्या बुद्ध विहाराच्या परिसरात पुष्कळ असे लोक जमले होते श्रीकांत अमोल आणि इतर अनेक जण तिथेच होते विशेष म्हणजे त्या बुद्ध विहाराच्या वरती सचिन बसला होता सर्वत्र पसरलेला त्या अंधारात बुद्ध विहाराच्या वर बसलेल्या सचिनची नजर अचानक अंगणात खाली बसलेल्या सायलीवर पडली आजूबाजूला जरी गधड अंधार असला तरी सचिनच्या मनात मात्र एका वेगळ्या प्रकाशाने गर्दी केली होती