देवाचे ठाणे ७मागील भागकेला.तेव्हा अवकाशयानातून दोन तेजस्वी पुरुष खाली उतरले. डोक्यावर हिरेजडित मूकूट,कानात चमकदार कुंडल, गळ्यात रत्नखचित हार,कमरेला पिवळं पितांबर,पायात खडावा.अगदी राजा रविवर्मा यांच्या चरित्रातील देवासारखा वेष होता. तोपर्यंत आदिमानवांची जमात ओरडत तिथपर्यंत आली. समोरचे दिव्य पुरुष पाहून ते सारे गुढग्यावर बसून हात जोडून तसेच राहिले. पुढे सुरू.... समोरच दृश्य माझ्यासाठी धूसर होत गेले.काही काळ फक्त अंधार जाणवत राहिला.एका खोल विवरातून मी बाहेर पडत आहे असं मला जाणवू लागले.जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी कातळ सड्यावर उभा होतो.समोर त्या शिल्पाच्या मानव माझ्या समोर उभा होता." तू जे बघितलेस ते दृश्य दहा हजार वर्षांपूर्वीचे होते.ती आमची पृथ्वीवरील पहिली भेट होती."" पण तुम्ही नेमके कुठून आलात ? ते दोन दिव्य पुरुष कोण होते?" मी विचारलं." आम्ही इथून नव्वद प्रकाश वर्षे दूर असलेल्या 'अस्कांत 'नावाच्या एका ग्रहावरून आलोय. प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तर आम्हाला पृथ्वीवर यायला नव्वद वर्षे लागतील. पण आम्ही प्रकाशाच्या कित्येक पट वेगाने प्रवास करु शकतो.त्यासाठी आम्ही शक्तीशाली चुंबकीय ऊर्जेचा वापर करतो.आमचा संपूर्ण ग्रह मोठ्या चुंबकीय ऊर्जेने भरलेला आहे.आमची सगळी उपकरणे ही चुंबकीय ऊर्जेवर काम करतात.जे दोन पुरुष तू पाहिलेस ते त्या ग्रहाचे त्यावेळचे अधिपती होते. "" पण तुम्ही त्या दोघांपेक्षा वेगळे आहात ते कसे? आणि या कातळावर तुमची आकृती कोणी कोरली?"" तुमच्या भाषेत मी त्या ग्रहावरील यंत्रमानव किंवा रोबोट आहे. त्या अधिपतींनी ' अस्कांत ' ला परतताना मला त्या आदिमानवांना सज्ञान करण्यासाठी इथेच ठेवले होते."" म्हणजे?"" त्या वेळी इथे जे मानव होते त्यांना भाषा , अग्नी,चाक,शेती यांची माहिती नव्हती.मी त्यांना पहिल्यांदा भाषा म्हणजे बोलून संपर्क करणे.दोन दगड एकमेकांवर घासून अग्नी तयार करायला शिकवलं.हे सगळं हळूहळू होत होतं.पण जसजसे ते शिकत गेले तसतसा त्यांचा मेंदू विकसित होत गेला. ते विचार करु लागले...मांडणी करुन लागले व अनुमान काढू लागले. इथे शिकलेली माणसे पुढे दुस-या जमातीत मिसळली व त्यांना शिकवू लागले.अशा रितीने समाज बांधवांनी सुरू झाली."" अरे वा! हा तर मानवी प्रगतीचा इतिहासच आहे."मी म्हणालो." मी फक्त सुरवात केली.पुढची प्रगती मानवानं स्वतः केली. मानव मला देवाचा दूत समजू लागले. तर 'अस्कांत ' ग्रहाच्या अधिपतीना देव समजू लागले. त्या आदिमानवांनी माझी प्रतीकृती इथे कृतज्ञता म्हणून कोरली व त्यालाच मी माझं ठिकाण बनवल.आमच्या ग्रहावरचे लोक दर शंभर वर्षांनी या सड्याला भेट देत व सर्वांसोबत इथे उत्सव साजरा करत..म्हणून या ठिकाणाला' देवाचे ठाणे ' म्हणतात. इथे ज्या दुर्मिळ वनस्पती दिसतात त्या आम्ही इथे आणल्या आहेत."" तुमच्या ग्रहावरचे लोक आजही इथे येतात ?"" हो.पण इथले लोक ही परंपरा विसरले.मानव स्वार्थी झाला.त्यामुळे आमचे लोक इथे अदृश्यपणे आजही उत्सव साजरा करतात. उद्याच अस्कांत चे अधिपती इथे येणार आहेत.एक दिवस तुमची हाव आणि यंत्रे तुम्हाला संपवणार आहेत.तो दिवस अगदी जवळ आलाय.मग पुन्हा नव्याने सुरुवात होईल.त्यावेळी आमचे अधिपती ते सगळ करतील." त्या अस्कांत वरच्या यंत्र मानवाकडून मला त्या ग्रहावरील बरीच माहिती मिळाली.तिथे तरंगती चुंबकीय घर होती.जीचुंबकाच्या विजातीय ध्रुवातील प्रतीकर्षण गुणधर्मावर चालत. गरज पडली तर ते आपला ग्रह चुंबकीय घुक्याच्या आवरणाखाली दडवून ठेवत. ज्यामुळे तिथे कोणतीही बाह्य यंत्रणा काम करु शकत नव्हती.तिथल्या जमिनीत चुंबकीय पदार्थ मोठ्या प्रमाणावर होते व पृथ्वीवर न सापडणारी काही मूलद्रव्येही तिथे होती.ते शेती करतात पण गरज पडली तर चुंबकीय ऊर्जेचा वापर करून ते स्वतःचे शरीर दिर्घकाळ प्रभारीत करु शकतात.त्यांचा एक दिवस हा पृथ्वीवरील शंभर वर्षांएवडा आहे. तो यंत्रमानव त्या मानवी शिल्पा खाली खोदलेल्या भुयारात राहतो व तिथे प्रचंड चुंबकीय ऊर्जा भरलेली आहे.त्यामुळे त्या जागी चुंबक सूची काम देत नाही. ही सगळी माहिती ऐकताना पूर्व दिशा उजळून लागली तसा तो यंत्रमानव अदृश्य होत त्या शिल्पा खाली गेला.-----******++++++-------*******________*****____ही सगळी अद्भुत माहिती एकूण मी थक्क झालो होतो. परग्रहा वरील जीव गेली हजारो वर्षे पृथ्वीला भेट देत होते. पण आता ते पूर्वी प्रमाणे समोर येत नव्हते.पण त्या यंत्र मानवाने सांगितलेले ते वाक्य माझ्या कानात परत परत घुमत राहिले." तुमची हाव आणि यंत्रे तुम्हाला लवकरच संपवणार आहेत."खरच अस घडेल? आज ऐ आय बाबत काही शास्त्रज्ञ तसादावा करताहेत...म्हणजे आज आपण अंताच्या शेवटच्या पायरीवर उभे तर नाही ना ,असं मला वाटलं. मी सड्यावरून निघालो.तिथे काल सुरूंग पेरणारी व बंदोबस्ताचे पोलिस झोपल्या सारखे पडले होते.मी गाडी स्टार्ट केली त्या आवाजाने एक पोलिस धडपडत जागा झाला.त्याने आजूबाजूला पाहिले व डोळे चोळू लागला." अहो, आम्ही इथे कसे आलो?" त्याने विचारले." काल रात्री काय घडले ते तुम्हाला आठवत नाही?"त्याने नकारार्थी मान हलवली." आठवत नाही तेच चांगले आहे."मी तिथून बाहेर पडलो.रूमवर आलो.आंघोळ वैगरे केली व काकूंनी दिलेला चहा व नाष्टा खाल्ला.तेवड्यात सुजाताला फोन आला." मी रेल्वेत बसलेय.अडीच वाजता रत्नागिरी येथे येईन.तू न्यायला ये." दुपारी जेवल्यावर मी रत्नागिरीच्या दिशेने निघालो.वाटेत मला समजलं की काल रात्री सड्यावर थांबलेली वर्माची माणसे वेड्यागत वागत होती .त्यांना मागचं काहीच आठवत नव्हते.जणू त्यांची सगळी स्मृती कोणत्यातरी कारणाने नष्ट झाली होती.आपण कोण तेच त्यांना आठवण नव्हते.ते सगळे प्रचंड घाबरले होते.गावकरी याला देवाचा प्रकोप मानत होते. अर्थात वर्मा ह्यामुळे थांबणार नव्हता हे नक्की.तो नव्याने कारस्थाने करणार होता. मी रत्नागिरीत पोहचलो.रेल्वे अर्धा तास लेट होती.सुजाता आल्यामुळे माझ्या कामात अडथळा निर्माण तर होणार नाही ना ?असा प्रश्न मला पडला होता.पण तिच्या येण्याची मनात उत्सुकता सुध्दा होती.-----****-----****------*****------*****-----*****---भाग सातवा समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे