काळी बाहुलीभाग ३ बंद खोलीतला आवाज
दरवाजावर झालेल्या त्या तीन टकटकांनी संपूर्ण घर हादरल्यासारखं झालं. निखिलच्या कानात अजूनही त्या आवाजाचा प्रतिध्वनी घुमत होता. बाहेर कोणी आहे याची त्याला खात्री होती, पण त्या व्यक्तीला आत येऊ द्यायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आजी त्याच्या शेजारी उभी होती. तिच्या हाताची पकड इतकी घट्ट होती की निखिलच्या मनगटाला दुखायला लागलं होतं.बाहेर पुन्हा शांतता झाली.काही सेकंद गेले.मग दरवाजाच्या पलीकडून हळू आवाज आला.आजी, मला आत येऊ दे.आजीच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. तिचे डोळे दरवाजावर खिळले. निखिलने पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर इतकी खोल भीती पाहिली होती.तो हळू आवाजात म्हणाला, आजी, कोण आहे ती.आजीने उत्तर दिलं नाही.बाहेरून पुन्हा आवाज आला.आजी, तू मला विसरलीस का.आजीच्या डोळ्यांत पाणी आलं.निखिलला काहीच समजत नव्हतं. त्या आवाजात लहान मुलीची निरागसता होती, पण त्याच आवाजात काहीतरी असं होतं ज्यामुळे अंगावर काटा येत होता.आजीने अचानक निखिलचा हात ओढला.आपण या खोलीतून बाहेर जायचं नाही.निखिलने विचारलं, का कोण आहे बाहेरआजी म्हणाली, कारण ती आपल्याला दार उघडायला लावते.तेवढ्यात दरवाजावर पुन्हा टकटक झाली.यावेळी टकटक अगदी हलकी होती.जणू बाहेर उभं असलेलं कुणीतरी रागावलेलं नव्हतं.ते फक्त वाट पाहत होतं.निखिलने खोलीत नजर फिरवली. अंधारात पलंग, कपाट आणि जुन्या वस्तूंच्या सावल्या विचित्र दिसत होत्या. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात आजीचा चेहरा अधिकच फिकट दिसत होता.मग निखिलला एक गोष्ट जाणवली.बाहेरून आवाज येत होता, पण सावली मात्र दिसत नव्हती.दरवाजाच्या खाली थोडी जागा होती.जर कोणी बाहेर उभं असेल तर पायांची सावली दिसायला हवी होती.पण तिथे काहीच नव्हतं.निखिलने आजीला ते दाखवलं.आजीने पाहिलं आणि तिचे ओठ थरथरले.ती कुजबुजली, ती आता तशी राहिलेली नाही.निखिलने विचारलं, ती कोण आहे ती ,आणि ती आत येऊ दे अस का म्हणत आहे आजीने उत्तर दिलं नाही.अचानक दरवाजाच्या पलीकडून लहान मुलीचा हसण्याचा आवाज आला.खिदळल्यासारखा.पण त्या हसण्यात आनंद नव्हता.तो आवाज ऐकताच आजीने दोन्ही कान झाकले.बस कर.तिच्या तोंडून अचानक मोठ्याने शब्द बाहेर पडले.हास्य थांबलं.घर पुन्हा शांत झालं.निखिल आजीकडे पाहत राहिला.आजी, तुला नेमकं काय माहीत आहे. जे तू माझ्यापासून लपवत आहे आजी बराच वेळ काहीच बोललं नाही.मग ती हळूहळू पलंगाजवळ बसली.तिचा श्वास जड झाला होता. भीतीने तिचे अंग थरथरत होते जणू तिने खूप भीती वाटणारे काहीतरी पाहिले होते ती म्हणाली, ही पहिली वेळ नाही.निखिलच्या अंगावर काटा आला.काय पहिली वेळ नाही.आजीने त्याच्याकडे पाहिलं.ही बाहुली या घरात आधीही आली होती.निखिलला काहीतरी आठवलं तो आजीला म्हणाला पण तू म्हणालीस की बाहेर फेकून दे.आजीने मान खाली घातली.कारण मला वाटलं होतं ती परत कधीच येणार नाही.निखिल काही क्षण शांत राहिला.नंतर त्याने आजीला विचारले कधी आली होती.आजीने उत्तर देण्याआधीच खोलीच्या बाहेरून एक मोठा आवाज झाला.जणू कुणीतरी लाकडी वस्तू जमिनीवर ओढत होतं.घसर्र.घसर्र.आवाज हळूहळू घराच्या दुसऱ्या टोकाकडे गेला.निखिलने आजीकडे पाहिलं.आजीच्या डोळ्यांत आता अश्रू होते.ती म्हणाली, चाळीस वर्षांपूर्वी.निखिल काही बोलला नाही.आजी पुढे म्हणाली, तेव्हा मी तुझ्यापेक्षा थोडीच मोठी होते. या घरात तेव्हा खूप लोक राहायचे. तुझा आजोबा, माझे दोन भाऊ, आई बाबा आणि गावातली एक मुलगी.निखिलने विचारलं, कोणती मुलगी.आजी काही क्षण गप्प राहिली.मग तिने अतिशय हळू आवाजात एक नाव उच्चारलं.गौरी.ते नाव ऐकताच घराच्या कुठल्यातरी बंद खोलीतून आवाज आला.टक.आजी दचकली.निखिलने त्या दिशेने पाहिलं.घराच्या मागच्या बाजूला एक जुनी खोली होती. ती अनेक वर्षांपासून बंद होती. तिथे जुन्या वस्तू, शेतीची साधनं आणि तुटलेलं फर्निचर ठेवलेलं होतं.निखिलने त्या खोलीकडे बोट दाखवलं.तिथून आवाज आला.आजीने मान हलवली.ती खोली उघडायची नाही.निखिलने विचारलं, का.आजी म्हणाली, कारण तिथेच ती शेवटची दिसली होती.निखिलच्या अंगावर शहारा आला.गौरी.आजीने होकार दिला.ती तेव्हा नऊ वर्षांची होती.निखिलच्या मनात त्या काळ्या बाहुलीचा चेहरा आला.त्याने विचारलं, तिच्याकडे अशीच बाहुली होती का.आजीने त्याच्याकडे पाहिलं.तिच्या चेहऱ्यावर अचानक अपराधी भाव उमटला.हो.मग ती बाहुली कुठे गेली.आजीने काही उत्तर दिलं नाही.निखिल उठला.त्याने बंद खोलीकडे पाहिलं.दरवाजा जाड लाकडाचा होता. त्यावर जुनं कुलूप लटकत होतं.पण त्या कुलपावर आतून नखं घासल्यासारख्या खुणा होत्या.निखिल दरवाजाजवळ गेला.आजी मागून म्हणाली, तिकडे जाऊ नकोस.निखिल थांबला.दरवाजाच्या पलीकडून अचानक एक आवाज आला.अगदी हलका.जणू एखादं मूल रडत होतं.आजीने डोळे बंद केले.निखिलने कान दरवाजाजवळ नेला.रडण्याचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता.हुंदका.मग दुसरा हुंदका.मग एखाद्याने कुजबुजल्यासारखा आवाज केला.मला बाहेर काढ.निखिल मागे झाला.त्याने आजीकडे पाहिलं.आजी रडत होती.निखिल म्हणाला, आजी, ही खोली चाळीस वर्षांपासून बंद आहे. मग आतून आवाज कसा येतोय.आजीने उत्तर दिलं नाही.ती हळूच म्हणाली, कारण काही गोष्टी बंद केल्या म्हणून संपत नाहीत.निखिलच्या अंगावर काटा आला.त्याने पुन्हा कुलपाकडे पाहिलं.अचानक आतून जोरात धक्का बसला.धाड.दरवाजा थरथरला.आजी किंचाळली.निखिल दोन पावलं मागे सरकला.पुन्हा धक्का बसला.धाड.धाड.जणू आत कुणीतरी बाहेर पडण्यासाठी दरवाजा तोडत होतं.निखिलने आजीचा हात पकडला.आपण घराबाहेर जाऊ.आजीने मान हलवली.पण तेवढ्यात घरातील सगळे दिवे एकाच वेळी बंद झाले.पूर्ण काळोख झाला.निखिलने मोबाईल काढला.या वेळी मोबाईल सुरू झाला.त्याने टॉर्च लावली.प्रकाश सरळ बंद खोलीच्या दरवाजावर पडला.आणि त्याला जमिनीवर काहीतरी दिसलं.एक छोटी काळी बाहुली.ती दरवाजाच्या अगदी समोर बसली होती.निखिलचा श्वास अडकला.आजीने बाहुलीकडे पाहताच दोन्ही हात डोक्यावर ठेवले.नाही.ती परत आली.निखिल हळूहळू बाहुलीजवळ गेला.त्याने तिला हात लावला नाही.बाहुलीचा चेहरा बंद खोलीच्या दरवाजाकडे होता.जणू ती कुणाची तरी वाट पाहत होती.मग बंद खोलीच्या आतून पुन्हा मुलीचा आवाज आला.यावेळी आवाज अगदी स्पष्ट होता.आजी, निखिलला सांग.आजी थरथरली.निखिलने तिच्याकडे पाहिलं.सांग काय.आजीने त्याच्याकडे पाहिलं.तिच्या चेहऱ्यावरचं सगळं रक्त उतरलं होतं.ती काही बोलणार इतक्यात बंद खोलीच्या दरवाजावर कुणीतरी आतून तीन वेळा हात आपटले.धाड.धाड.धाड.आणि मग आतून तोच आवाज आला.माझी बाहुली त्याने पुरली होती.निखिलच्या अंगावर शहारा आला.त्याने आजीकडे पाहिलं.आजीच्या डोळ्यांत आता भीतीपेक्षा अपराध होता.निखिलने थरथरत विचारलं, त्याने म्हणजे कोण.आजीने उत्तर दिलं नाही.ती फक्त बंद खोलीकडे पाहत राहिली.मग तिच्या मागून एक अतिशय हलका आवाज आला.निखिल.निखिलने वळून पाहिलं.काळी बाहुली आता जमिनीवर नव्हती.ती बंद खोलीच्या दरवाज्याच्या हँडलवर बसली होती.आणि तिच्या काळ्या डोळ्यांच्या खड्ड्यांतून दोन बारीक पांढरे ठिपके निखिलकडे पाहत होते.तेवढ्यात बंद खोलीचं कुलूप स्वतःहून हललं.खण.खण.खण.आजीने निखिलचा हात पकडला.आणि मग त्या बंद खोलीच्या आतून एका मुलीने अगदी हळू आवाजात म्हटलं.निखिल, दार उघड.मला अजूनही आठवतंय, त्या रात्री तुझ्या आजीने माझ्यासोबत काय केलं होतं.क्रमश: