Ek Premkatha Ashihi in Marathi Love Stories by Adv Nikhil Deore books and stories PDF | एक प्रेमकथा अशीही.... - भाग 11

Featured Books
Categories
Share

एक प्रेमकथा अशीही.... - भाग 11

भाग 10 वरून पुढे


श्रुती आणी माझ्यातही जे दोन वर्षामध्ये गैरसमजुतीचे धुके पसरले आहे...खरंतर गैरसमजुतीचे धुके म्हणणं अतिशयोक्तीचे ठरेल आमच्यात जे खूप मोठ्या कालावधीमुळे अबोलपणाचे धुके पसरले आहे ते लवकरात लवकर दूर व्हावं एवढीच इच्छा आहे ' अभिमन्यूच्या मनात बऱ्याच गोष्टी दाटून आल्या होत्या. 

कानात इअरफोन लावून तो त्याच कॉलेज मागे टाकत समोर समोर सपासप  चालत होता. पाऊले आता ज्ञानभारती कॉलेजकडे वळली होती. योगायोगाने त्या पावसाळी वातावरणात गाणंही अगदी साजेस वाजत होत. 
' पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा 
  पाऊस दाटलेला ,माझ्या घरावरी हा 
  दारास भास आता , हळुवार पावलांचा 
   हळुवार पावलांचा ,पाऊस दाटलेला '

गाणं ऐकता ऐकता तो कधी ज्ञानभारती महाविद्यालयात पोहचला हे त्याच त्यालाही कळलं नाही. ज्ञानभारती महाविद्यालयही प्रशस्त आणी भव्य होत. कॉलेजच्या चारही दिशेला वेगवेगळे विभाग होते. मुख्य बिल्डिंगच्या डाव्या बाजूला मोठं उद्यान होत त्यामागेच दुमजली असं मोठं ग्रंथालय होत.
कॉलेजच्या अगदी शेवटच्या टोकवर वाणिज्य ( Commerce) विभाग होता. 
'नक्की शोधावं तरी कुठे हिला. एवढं भव्य असं कॉलेज आहे...असेल तरी  कुठे ही ? हिला मी ओळखू शकेल कि नाही ?' असे कितीतरी प्रश्न अभिमन्यूच्या मनाच्या पटावर उमटले होते. 
चालत चालत तो कॉलेजच्या शेवटच्या टोकावर म्हणजेच वाणिज्य विभागाजवळ पोहचला. वाणिज्य विभागाच्या विरुद्ध दिशेला जांभळाच झाड होत. अभिमन्यू फिरत फिरत नकळतपणे तेथेच जाऊन पोहचला. 
' काही वृक्षांच हृदयात मर्मस्पर्शी असं स्थान असतं...आता या जांभळाच्या वृक्षालाच  बघा ना...जेव्हा माझी श्रुतीसोबत पाहिली भेट झाली तेव्हा हे जांभळाच झाडंच साक्षी होत'. अभिमन्यूच्या मनाच्या गाभाऱ्यात आठवणी दाटून आल्या होत्या. अजूनही धुके गर्द असल्यामुळे त्याची  दृष्टी बोथड झाली होती. एवढयात त्याच हृदय जोरजोरात धडकायला लागलं होत जणू ही कुणाचीतरी  गोड  चाहूल असावी  ..पण नक्की कुणाची ?
" तू आणी इथे ?" कुणाच्यातरी हृदयभेदि स्वरांनी त्याच्या आठवणींचे विचारचक्र थांबले. 
'हा आवाज तर तिचाच आहे ' अधीर होऊन अभिमन्यू स्वतःशीच म्हणाला. 
आवाजाच्या दिशेने डोके मिचकावत  तो पाहू लागला . गर्द धुक्यामुळे तिला पाहण्यास अजूनही तो असमर्थ होता. शेवटी त्याची दृष्टी तिच्यावर येऊन थांबली...त्याला दिसलं त्याच भूतकाळात हरवलेलं पहिलं प्रेम ' श्रुती'. त्या क्षणिक काळातही त्याच्या मनात एकच गीत वाजत होत. 
💞💕 मिलो का जैसे था फासला , सदियों का जैसे 
            था रास्ता अनजान था दिल के होना है क्या
            फिर भी मुझे लगता है क्यू हमको तो 
             मिलना ही था 💕💕
           ( song credit :- Love story 2050)
थंडगार वारा सुटल्यामुळे तिचे रेशमी केस हवेत उडून चेहऱ्यावर आले होते. ती शरीराने बरीच अशक्त झाली होती, चेहऱ्यावरची कांतीही जरा ओसरली होती , खोल आत  गेलेले नेत्र तिच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असलेला ताण तणाव अप्रत्यक्षपणे दर्शवित होता. 
' श्रुती बरीच बदलली आहे...नक्की काय झालं असावं हिच्यासोबत ' अभिमन्यू स्वतःलाच प्रश्न विचारत होता. 
" मी काय म्हणत आहे तू इथे कसा ?" श्रुतीच्या आवाजाने तो भानावर आला. 
" सहजंच ...माझ्या एका मित्राला भेटायला आलो होतो पण तू इथे  कशी म्हणजे दहावीनंतर सरळ सरळ दोन वर्षांनी  बघतोय तुला  म्हणून सहज विचारलं" 
" मी याच कॉलेजला आहे B.com first year ला " 
शांतपणे श्रुती म्हणाली. 
" हो का मला माहीतच नाही" अभिमन्यू रेटून खोटा बोलला होता. 
" चल आपण कॅन्टीनमध्ये बसून जरा गप्पा मारू किती दिवसांतर भेटतोय ना आपण" श्रुती त्याला कॅन्टीनकडे घेऊन जात म्हणाली. 
श्रुती वरून वरून जरी प्रसन्नता  , उत्साह दाखवत असली तरी तिच्या मनाच्या शांत डोहात अशांततेच्या लहरी पसरल्या होत्या आणी ही गोष्ट अभिमन्यूच्या चाणाक्ष बुद्धीने अचूक हेरली होती. 
आता तो श्रुतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी  कासावीस झाला होता.  
-----------------------------------------------------------------
समोर वाफाळलेले चहाचे दोन कप ठेवले होते आणी एका प्लेटमध्ये गरम गरम  समोसे ठेवून होते. 
" वरुण आणी अवनी कुठे दिसत नाही आहे . केव्हापासून शोधतेय मी त्यांना. कितीवेळ वाट पाहायची त्यांची आपण कँटिंगमध्ये" ऋतुजा जरा रागातच म्हणाली. 
" हो ना मी पण केव्हापासून फोन try करतोय त्यांचा  पण दोघांनाही फोन लागत नाही आहे " अनिकेत क्षणात बोलून गेला. 
" अहाहा ! काय कडक ,गरम चहा आहे..सकाळी सकाळी अश्या एका चहाच्या घोटाने मन कसं  प्रसन्न होऊन जात " चहाचा एक घोट घेत अनिकेत म्हणाला. 
' म्हणे चहाच्या एका घोटाने फार प्रसन्न वाटतंय..माझ्या आयुष्यात एवढं झंझावाती वळण आलंय याच गांभीर्य काहीच नाही वाटते याला ' ऋतुजा  मनाशीच हितगुज करीत होती आणी एक उसनं हास्य देऊन म्हणाली 
" हो का! चहाचा आस्वाद घेऊन झाला असेल तर आपण मूळ विषयावर बोलूया का".
" हो नक्कीच ...आधी मला सांग तू काही खाल्ल कि नाही ?" 
" हो मी पहाटेच नास्ता करून आलेय. ते जाऊदे पण तू आधी सांग तुझं अभिमन्यूसोबत बोलणं झालंय का ? म्हणजे मला अशी शंका आहे किंवा काही दिवसापासून अभिमन्यूची अवनीशी वाढती जवळीक पाहून मला असं वाटतंय  कि त्याला ती आवडतं असावी " एकदमात ऋतुजाने अनिकेतवर प्रशांचा भडीमार केला. 
' प्रेमात मनुष्य  किती शंकावादी होतो. स्वतःच्या मित्र - मैत्रिणीवरही शंका घेतो..काय कराव प्रेम आहेच अशी गोष्ट'.
त्याच्या चेहऱ्यावर ऋतुजाच्या प्रश्नामुळे हास्य खुललं होत पण तिला राग  येऊ नये म्हणून चेहऱ्यावर शांत भाव दर्शवित तो म्हणाला 
" नाही अवनी फक्त त्याची एक चांगली मैत्रीण आहे ..त्याच्या आयुष्यात श्रुती नावाचं एक पान  आहे".
" श्रुती...ही कोण आहे ?" भुवया उंचावत ऋतुजा म्हणाली. तिच्या कपाळावर आठ्यांच जाळ पसरलं होत. 
अनिकेतने अभिमन्यूच्या आयुष्यातील सर्व तपशील एकापाठोपाठ सांगितला. ऋतुजा कमालीची शांत वाटत होती. जणू तिची काही बोलण्याची इच्छाच नसावी. न राहवून ती म्हणाली 
" मग आता भूतकाळात किती वेळ रमून राहणार आहे तो. श्रुती त्याच्या आयुष्यातील भूतकाळातल  एक पान होत ना मग आता ते पान पलटवून नवीन अध्याय सुरु करण्यात त्याला अडचण तरी काय आहे ? "
अनिकेत शांतपणे फक्त ऐकत होता. पुढे काय बोलाव हे त्याला सुचतच नव्हतं. 
" जर असं झालं असतं तर खरंच किती बरं झालं असतं ".
" म्हणजे तुला काय म्हणायचं ?" 
" म्हणजे त्याच भूतकाळात हरवलेलं प्रेम वर्तमानात परतलंय असं मला वाटतंय ".
" काय ?.." गंभीर भाव देत ऋतुजा म्हणाली. 
नक्की काय सुरु आहे तिला कळून कळत नव्हतं. 

क्रमश . ..