प्रिय सोना..
असेच एकदा आपण टूर वर गेलो होतो सिमला कुलु मनाली तिथे फिरायला लहान लहान गाड्या होत्या रस्ते वळणावळणाचे , एकदम उंच एकदम खोल आठवडा भर हा प्रवास झाल्यावर तुला त्याचा त्रास झाला शेवटच्या दिवशी आपण चंदिगड येथे आलो आणि तुला उलट्या सुरू झाल्या स्वतःच डॉक्टर असल्याने तू स्वतः औषधोपचार सुरू केलास पण डी हायड्रेशन झाल्याने तुला अशक्तपणा आला मी रात्रभर जागीच होते सकाळी आपले विमान होते विमान मुंबईत पोचल्यावर मी ताबडतोन कॅब बुक केली तुला कोल्हापूरला सुखरूप नेल्यावर माझ्या जिवात जीव आला ही आठवण तू नेहमी काढत असे आपली ही नॉर्थ ईस्ट टूर पुरी झाल्यावरआणि माझे आजारपण झाल्यावर मी पुन्हा पूर्वव्रत झाले आपण दोघे जाऊन सगळ्या देवळात पेढे वाटून आलो सुखरूप या संकटातून बाहेर काढल्या बद्दल आभार मानले आता सुरू झाले आपले नेहेमीचे रूटीन सहज एकदा गप्पा मारताना आपले काय काय बघायच राहिले आहे असे तू चेक करीत होतास दुबई दोन वेळ काश्मीर दोन वेळ गुजरात तीन वेळ राजस्थान चार वेळ बाकी भारत भ्रमण तर झालेच होते फक्त अमृतसर आणि वाघा बॉर्डर आणि पांडेचरी इतकेच आता पहायचे होते आपण ठरवले आपण दोघेच विमानाने अमृतसरला जायचे चार पाच दिवस हॉटेल मध्ये राहून तिथे मिळणारे वेगवेगळे पंजाबी प्रकार खायचे सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर बघून परतायचे वाघा बॉर्डर ची माती एकदा कपाळाला लावायची होती ते झाल की मग पोंडेचारी पाहायचे होते आपल्याला पण ते तर बघायचं सोडून तुच त्या आधी निघून गेलास तुझा वाढदिवस होता सकाळीच मी तुला अंघोळ झाल्यावर औक्षण केले तुला औक्षण केलेले खूप आवडायचे नाश्ता करून आपण जाऊन वाईट आर्मी ला देणगी देऊन आलो जे काम बरेच दिवस प्रलंबित होते दुपारी आपण कुठेतरी जेवायला जाणार होतो पण नेमके त्या दिवसात गणपती सण चालू होताशहरातले बरेच रस्ते अडलेले होते.म्हणून आपण जवळच एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो तिथेच तुझ्या मैत्रिणीचे मिस्टर तिचा मुलगा नातवंडे भेटली आपण फोटो सुद्धा काढले.भरपूर भाज्या असलेले ते जेवण तुला खूप आवडले होते तेव्हा कुठ माहित होत की हा तुझा शेवटचा वाढदिवस असेल आपण आपल्या नेहेमीच्या रूटीन मध्ये चालत होतो मग आले गणपती आपण गणपती साठी पुण्यात जाणे कधीच बंद केले होते इथे सुद्धा मोठ्या दीराच्या घरी आपले गणपती असत ते कधी आपल्याला दर वर्षी बोलावत नसत कधी लहर आली तर फोन करीत मीच म्हणले चला जाऊन येऊ भाऊजी कडे त्यांनी नाही बोलावले तर काय झाले आपल्या घरचा गणपती आहे तू नाईलाजाने तयार झालास आपण जाऊन गणपती दर्शन घेतले भाऊजी वहिनींच्या पाया पडलो कोणी कसेही वागले तरी तुझ्या मनात आकस नसायचा गप्पा गोष्टी सुरु असताना तुझ्या बहिणीचे मिस्टर त्यांची मुलगी पण आले खूप गप्पा रंगल्या खरेतर तुझ्या बहिणीचे मिस्टर एखाद्या छोट्या कारणावरून रुसून बसले होते गावात राहत असून त्यांनी आपल्या घरी येणे बंद केले होते जवळच त्यांच्या मुलीची सासुरवाडी होती तिथे येत पण आपल्याकडे नाही आपण त्यांच्या दुकानात पण जाऊन भेटत होतो नुसते घरी येतो म्हणायचे पण मनात आकस होता आपण ही जाणे बंद केले तुझे आवडते वाक्य होते "हम किसी के घर नहीं जायेंगे"आता मात्र भाऊजींच्या घरी जसे काही घडलेच नाही अशा गप्पा करीत होते शेवटी मीच म्हणाले त्यांना डोक्यात काही राग ठेवू नका आता येणाऱ्या माझ्या वाढदिवसाला आपण सगळी फॅमिली जेवायला जाऊ ते तोंड देखले होहो म्हणाले ना नंतर त्यांनी फोन केला ना संपर्क ठेवला आणि जेव्हा तू गेलास तेव्हा ..ते आजारी होते हे आम्हाला का बोलला नाही असे म्हणत होते मी म्हणाले मी तर invite केले होते तेव्हा तुम्हीच आला नाहीत..मग ते काहीतरी नातीचे थातुरमातुर कारण सांगू लागले गणपती विसर्जन नंतर तुला अचानक डोके दुखीचा त्रास सुरू झाला अधून मधून डोके दुखू लागले आपले फॅमिली डॉक्टर आणि तुझे मित्र यांना आपण दाखवले त्यांनी ecg काढला त्यात काहीच दोष नव्हता त्यांनी गोळ्या लिहून दिल्या दुखायला लागले तर घ्या म्हणाले परत तुझी दाढ दुखी सुरू झाली दातांचे डॉक्टर ही तुझे मित्रच होते त्यांनी रूट कॅनल करायचा सल्ला दिलामग तुझी दातांची ट्रीटमेंट सुरू झाली इतरही दाढेत थोडी complocation होतीच डोके दुखी चालू होतीचमुलाला मी सांगितले तुझ्या दुखण्या बद्दल पण त्याच्याकडे वेळ नव्हता दाढेचे काम चांगले चालले होते शेवटी फक्त cap बसवायचे शिल्लक होते दिवाळी जवळ आली होती त्यापूर्वी ट्रीटमेंट पुरी झाली तर बरे अशी आपली इच्छा होती दिवाळीत त्यांचा दवाखाना बंद असणार होतामधल्या काळात आपले पूर्वीच मुंबई बुकिंग केले होते तिकडे जायचे होते डॉक्टर नी गेलात तरी चालेल असे सांगितले मी आमच्या बँक हॉलिडे होमचे आधीच बुकिंग केले होते आपण चार दिवस राहिलो दादरची वेगवेगळी हॉटेल्स try केलीमाझ्या एका फेसबुक मित्राला भेटलो तो आपल्याला जिप्सी हॉटेल मध्ये घेऊन गेला नाना पालकर स्मृती समिती इथे देणगी देऊन आलो आपण तिथले कायमचे देणगीदार होतो त्यामुळे त्यांनी आपल्याला तिथेच जेऊन जायचं असा आग्रह केला सगळी इन्स्टिट्यूट परत फिरून दाखवली दादर ला वीणा वर्ल्ड च्या ऑफिस मध्ये जाऊन पुढच्या ट्रिप ची माहिती,brosher घेऊन आलो एक दिवस उगाचच शॉपिंग केली तुला सगळ्याची भारी हौस होती आणि मीही तुझी साथ द्यायला..दोन ऑक्टोबर ला माझा वाढदिवस होता दरवर्षी आपण एकमेकांचे वाढदिवस मोठ्या हॉटेल ना साजरा करीत असू पण त्याच दिवशी नेमकं तुझ्या ट्रीटमेंट चे सेशन होते माझा वाढदिवस साजरा होत नाही यामुळे तुझी चिडचिड होत होती पण मीच म्हणले जाऊ दे रे नंतर करू belated…त्या दिवशी आपण तुझ्या दुसऱ्या डॉक्टर मित्रांच्या क्लिनिक वर गेलो हे ट्रीटमेंट चे सारे सांगितले त्यांना जेव्हा आपण माझ्या वाढदिवसाचे सांगितले तेव्हा त्यांनी मला शुभेच्छा दिल्या तू फोटो सुद्धा काढले येणारा दसरा आपण तुझ्या ट्रीटमेंट सेशन मधेच होतो सगळे बरे चालले होते होते त्याच वेळेस तुझ्या जुन्या कंपाऊंडर च्या घराची वास्तुशांत होती ठराविक जवळच्या लोकांनाच आमंत्रण होते त्यात आपण होतो तुझ्याकडे करत असलेली नोकरी त्याने कैक वर्षा पूर्वी सोडली होती पण तुझ्याविषयी त्याला आदर होता संबंध कायम राखले होते आपण दोघेही गेलो तुझ्या पूर्वीच्या दवाखान्याची पेशंट लोक भेटली सगळ्यांना तुझ्या विषयी खूप आदर तुलाही बरे वाटले जेवण आपल्या आवडत्या केटरर्स चे सुग्रास आणि आपल्या ब्राम्हणी पद्धतीचे मस्त जेवलो आपण फोटो वगैरे काढले तुझी ट्रीटमेंट चालूच होती चार पाच दिवसाला सिटिंग असत मी तुझ्यासोबत आत येऊन बसत असे डॉक्टर तुझे मित्रच असल्याने ते सगळ मला दाखवत समजावत मला त्यातील काहीच कळत नव्हते पण तो डॉक्टरांचा माझ्याविषयी आदर होता दिवाळी चार दिवसावर आली होती तुझे फक्त cap बसवायचे काम शिल्लक होते