Everything on Abol's mind - Part 10 in Marathi Love Stories by Amol Meshram books and stories PDF | अबोला मनातले सारे काही - भाग 10

Featured Books
Categories
Share

अबोला मनातले सारे काही - भाग 10

सायलीच्या घरच्यांना एक विचार आला की आपली पोरगी तर त्याला विसरणार नाही याच भीतीने त्यांनी तिला तंत्र मंत्र करणाऱ्या कडे नेले आणि त्यांनी तिला एक धागा बांधून दिला रात्रीच्या अकरा वाजता सायलीच्या भावाने आपल्या फ्लॅटमध्ये काहीतरी आणून गाडलं हे सगळं वहिनी पाहत होती कारण वहिनीच्या घराजवळच सायलीचे रिकामे प्लॉट होते पण वहिनीची आणि सायलीचे नंतर भेट झाली नाही त्यामुळे वहिनी सायलीला काहीही सांगू शकली नाही आता जवळच पोडा आला होता आणि या सर्व प्रकरणा मुळे सायलीच्या घरी आणि सचिनच्या घरी प्रचंड ताणतणाव  सुरू झाले होते 


दुसऱ्या दिवशी सकाळीच घरामध्ये एकच खडबड उडाली होती सायली रात्रीपासून घरात दिसत नव्हती मम्मीने आणि भावाने सगळीकडे शोधा शोधा केली पण तिच्या पत्ता लागला नाही ती नक्कीच त्या सचिनच्या मागे गेली असणार किंवा त्याच्याच संपर्कात असणार या भीतीने मम्मीचा जीव खालीवर होत होता आपली मुलगी सचिन सोबत लग्न करून आयुष्य बरबाद करून घेईल या विचाराने तिचे धाबे दणाणले होते 
वेळ न घालवता मम्मीने आणि भावाने तात्काळ एक धाडसी निर्णय घेतला सायलीला तात्पुरता घरापासून थोड्या लांब राहणाऱ्या लहान काकाच्या घरी पाठवून दिल दोन-तीन दिवस ते तिथेच लहान काकाच्या सुरक्षित आश्चर्य खाली राहिली त्या दोन-तीन दिवसातच घरच्यांनी कशीबशी जुळवाजुळ करून सायली साठी एक मुलाचा शोध सुरू केला आणि आश्चर्य म्हणजे इतक्या कमी वेळात त्यांना एक मुलगा मिळाला सुद्धा 

तो मुलगा गावचा होता आणि हैदराबाद मधील एका कंपनीत कामाला होता त्याला आई वडील नव्हते फक्त एक सावत्र आई होती घरच्या परिस्थितीमुळे आणि घाई घाई घेतलेला निर्णयामुळे सायलीच्या मम्मीने क्षणाचाही विलंबन लावता तिला थेट हैदराबादला नेऊन त्या मुलाशी तिचे लग्न लावून दिले 

हा सगळा विवाहाचा घाट अत्यंत घाईघईत
 आणि गुपचूप उरकवला गेला होता कारण जर कोणालाही याबद्दल कळले असते किंवा पोलीस स्टेशनमध्ये यांची वाचता झाली असती तर मोठे संकट आढवले असते सायली अल्पवयीन होती त्यामुळे तिच्या वयाच्या मोठा कायदेशीर प्रश्न निर्माण झाला असता 

अशीच पाच सहा महिने निघून गेले मग एक दिवस अचानक सायली गावात परत आली आणि ज्याच्या सोबत तिचं लग्न झालं होतं तो मुलगाही तिच्यासोबत आला होता पण विशेष म्हणजे तिच्या घरच्यांनी तिला गळ्यात मंगळसूत्रा ऐवजी काळा धागा बांधायला लावला होता आणि तिच्या भांग लपवून भरायला सांगितलं होतं कुणालाही शंका येऊ नये म्हणून ते केसाच्या आधाराने कुंकू लपवून भरत असे जेणेकरून कोणाच्या नजरेस पडणार नाही तरीही हळूहळू ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आलीच की आता तिचं लग्न झालं आहे 

या संपूर्ण प्रवासात सायलीचे पप्पा अतिशय साधे होते आणि तिची आत्या खूप साधी होती खरंतर त्या दोघांना सायलीचा लग्न सचिन सोबत करून द्यायचं होतं पण तिचा भाऊ आणि मम्मी थोडे वेगळ्या स्वभावाचे आणि रागीट दिमाकाचे असल्यामुळे त्यांनी तिचे लग्न दुसऱ्याच कोणासोबत तरी परस्पर उरकून दिलं होतं काही दिवस गावात राहिल्या नंतर सायली पुन्हा हैदराबादला निघून गेली 

आत्ता सायलीचा लग्न दुसऱ्या कोणाशी तरी झाला आहे हे जेव्हा सचिनला समजलं तेव्हा तो पूर्णपणे हताश झाला आणि काहीच करू शकला नाही तो खूप राहू लागला अमोल आणि श्रीकांतला हे सगळं पहावत नव्हतं कारण सचिन त्यांचा पक्का आणि खरा मित्र होता 

तिकडे दिवाळीचा सण जवळ आला होता गावाकडची धान कापणी ची वेळ झाली होती आणि नेहमीप्रमाणे गावकरी दुसऱ्या गावी पंधरा दिवस साठी धान कापण्याच्या मजुरीसाठी जात असत त्यामुळे अमोल आणि श्रीकांत आपल्या सोबत सचिनलाही बाहेरगावी धान कापण्याच्या कामासाठी घेऊन गेले 

ते तिघे गावात नसताना मागे गावात एका बाईने वहिनीला आपल्या घरी बोलावले आणि सुनावले दुसऱ्याच्या पोरीची जिंदगी खराब केलीस तुला पण एक मुलगी आहे उद्या तिच्यावरही अशी वेळ येऊ शकते तुझ्यामुळे हे सगळं झालं तूच त्या सायलीला आपल्या घरी बोलवत होतीस आणि तुझा नवरा अमोल त्या सचिनला घरी बोलवून घेत होता म्हणूनच त्या दोघांचे प्रेम संबंध जुळले