Stamp Paper Part 7 in Marathi Crime Stories by Dilip Bhide books and stories PDF | स्टॅम्प पेपर भाग 7

Featured Books
Categories
Share

स्टॅम्प पेपर भाग 7

स्टॅम्प पेपर 

पात्र परिचय

प्रशांत.               वाड्याचा मालक

विशाखा               प्रशांतची बायको.

विजय राघव           प्रशांतचा  मित्र आणि बिल्डर

जयसिंग              भाडेकरू.

मल्हार               भाडेकरू.

अप्पासाहेब            भाडेकरू.

विश्राम               आप्पासाहेबांचा मुलगा.

गणेश                भाडेकरू

सुधाकर               भाडेकरू 

 

भाग  ७     

भाग ६   वरुन पुढे वाचा........

“त्यामध्ये फ्लॅट आणि ५० लाख देण्याचा उल्लेख होता त्या बद्दल तुम्हा लोकांची काय प्रतिक्रिया होती?” – घोलप.

प्रशांत साहेबांनी आमच्या साठी इतकं काही केले की त्यांना पैसे मिळताहेत बघून आम्हाला पण बरंच वाटलं.” - अप्पासाहेब.

ठीक आहे तुम्ही जाऊ शकता.

“युअर ऑनर, २००२ मधे अमृतलाल आणि प्रशांत यांची ओरियंट हॉटेल मधे भेट झाली. तिथे चर्चा होऊन सर्व फायनल झालं. त्याप्रमाणे अमृतलाल साहेबांनी कराराचा मसुदा तयार केला आणि अप्रूव्हल साठी श्री रतनकुमार यांच्या हस्ते प्रशांत साहेबांच्या ऑफिस मधे जुलै २००२ मधे पाठवला. प्रशांत साहेबांनी तो मसुदा पाहिला, आधीच्या भेटीत ३० लाख कॅश ठरले होते पण यावेळेस प्रशांत साहेबांनी ते बदलून ५० लाख केले. आणि तिथे सही पण केली. आमच्या साहेबांनी ते अॅक्सेप्ट केलं आणि फायनल करार अस्तित्वात आला. हा करार नोटोराइज करून घेतला आहे. २००२ च्या डिसेंबर मधे प्रशांत साहेबांना ५० लाख पोचण्यात आले. अमृतलाल हे कॅश चा धंदा करत नाहीत. त्यामुळे त्यांना ५० लाखांची रोकड  बँकेतून काढावी लागली. यावरून हे सिद्ध होतं की प्रशांत साहेबांना पैशांची गरज होती म्हणून हा करार केला. आता ते का नाकारत आहेत हे त्यांनाच माहीत. हवं तर कोर्टाने २००२ च्या जुलै आणि २००२ च्या डिसेंबर चे  प्रशांत  साहेबांच्या सिक्युरिटी रजिस्टर चेक करावी. त्यामध्ये रतनकुमार या नावाची नोंद असेल. डिसेंबर मधली कॅश काढल्याची एंट्री पण बँकेच्या पास बूक मधे मिळेल.  आता निर्णय आम्ही कोर्टाच्या न्याय्बुद्धी वर सोडतो आहे.” – घोलप

“युअर ऑनर ही प्रतिपक्षाने रचलेली काल्पनिक कहाणी आहे. याला पुरावा काहीच नाही. आमचा या कथना वर विश्वास नाही. खरं काय आहे त्यासाठी माझी कोर्टाला अशी विनंती आहे त्यांनी रतन कुमारला साक्षी साठी बोलवावं, आणि आम्हाला त्याची क्रॉस घेण्याची अनुमति द्यावी.” – निंबाळकर.  

“केस वाटली तेवढी साधी दिसत नाहीये. पण दोन्ही पक्षांचा यूक्तीवाद ऐकल्यावर हे कोर्ट अश्या निष्कर्षावर पोचले आहे की,  कोणा निरपराध्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी आदेश देतो की श्री प्रशांत यांच्या सहीचा फ्रेश नमूना घेऊन या सहीची पडताळणी एका हस्ताक्षर तज्ञा कडून करून घेण्यात यावी. फिर्यादी पक्षाच्या वतीने मूळ पेपर बघण्याची विनंती केली होती त्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट या कोर्टात जमा करावे असा प्रतिवादी पक्षाला हे कोर्ट आदेश देत आहे. कोर्ट पुढील सुनावणीसाठी तारीख देत आहे. रतन कुमार ला पुढच्या डेट ला उपस्थित राहण्यासाठी समन्स धाडा ” – कोर्ट.

बाहेर आल्यावर तिघांचेही चेहरे गंभीर होते. सगळंच उलट सुलट झालं होतं. केस जवळ जवळ हातातून गेल्यातच जमा होती.

“निंबाळकर साहेब, हे तर विपरीतच झालं. तुम्हाला तर खात्री होती की आज निकाल लागून जमिनीचा ताबा मिळेल म्हणून.” – प्रशांत.

“आपण आधी माझ्या ऑफिस मधे जाऊ आणि तिथे बोलू. आपल्या भात्यात अजून काही बाण राखून ठेवले आहेत. आपण केस नक्की जिंकणार यात मला कसलाही संशय नाही. तुम्ही पॅनिक होऊ नका.” – निंबाळकर.

ऑफिस मधे पोचल्यावर प्रशांतने अधीर होऊन काळजीच्या स्वरात म्हंटलं,

“हूं, आता सांगा तुमची काय रणनीती आहे ते.” – प्रशांत.

“असं आहे की प्रतिपक्ष काय युक्तिवाद करेल यांचा अंदाज असतो, पण यावेळेस तो अंदाज थोडा चुकला. घोलप वकिलांनी भलताच स्टँड घेतला, त्यांनी बहुधा सगळी पूर्व तयारी केली असणार,  म्हणजे रतनकुमारची रजिस्टर मधली नोंद. हा रतनकुमार प्रशांतच्या ऑफिस मधे कोणाला भेटायला आला होता? माझ्या अंदाजाप्रमाणे तो प्रशांतचं नाव सांगून नुसताच ऑफिस मधे आला. आणि १०-१५ मिनिटं थांबून परत गेला. आणि दोन्ही वेळेस त्यांनी हीच ट्रिक वापरली. बँकेतली कॅश काढण्याची नोंद सुद्धा याच श्रेणीतली आहे. हे सगळं अगदी ठरवून केलं गेलं आहे. नाहीतर कोण कुणाच्या ऑफिस मधे केंव्हा गेला हे तारखे नूसार कोणी लक्षात ठेवत नाही तसंच बँकेतून केंव्हा किती पैसे काढले हे सुद्धा लक्षात नसतं. म्हणून म्हणतो की ते लोकं पूर्ण तयारी गेल्या चार वर्षांपासून करत होते.” – निंबाळकर.

“ते आता कळलं, पण हा खोटेपणा आपण उघडकीस कसा आणणार आहोत? तुम्ही म्हणाले की काही बाण अद्यापही आपल्या जवळ आहेत, ते कोणचे?” – प्रशांत.

“सांगतो.” निंबाळकर म्हणाले आणि त्यांनी बेल दाबली. प्यून आत आला. “ अरे,  विराज ला बोलाव”

विराज आला हातात बरेच कागद होते, काही स्टॅम्प पेपर पण होते.

“हूं, संशोधन झालं का पूर्ण? काय निष्कर्ष निघाला.?” – निंबाळकर.

“सर, तुम्हाला जी शंका वाटत होती तसाच प्रकार आहे. मी सर्वच पेपर घेऊन आलो आहे.” – विराज.

मग निंबाळकर वकिलांनी प्रशांत, अप्पासाहेब आणि मल्हार ला सर्व नीट समजावून सांगितलं. म्हणाले,

“आता सांगा यावर तुमचं काय मत आहे?” – निंबाळकर.

“काय गुगली आहे! यात तो नक्की अडकणार.” प्रशांत.

“पण निंबाळकर साहेब, आज पण आपलाच विजय होणार याची आपल्याला खात्री होती. पण त्याने वेगळाच डाव टाकला आणि आपण निरुत्तर झालो. असंच काही पुढच्या वेळेस घडलं तर?” – प्रशांत.

“असं काही होण्याची शक्यता तर दिसत नाहीये. आता “अमृतलालने मूळ  पेपर कोर्टात जमा केले की मला कळेल. मग मी जाऊन ते बघीन आणि त्यांचे फोटो काढून आणेन मग त्याला काही पळवाटा शोधता येणार नाहीत. तरी सुद्धा काही वेगळं घडलच, तर ते वेळेवरच निपटावं  लागेल. फक्त प्रशांत तू एक कर थोडा केसांचा भांग वेगळा काढ, मिशी आहे तर ती काढून टाक” – निंबाळकर.

तिघंही या उत्तरावर थोड्या काळजीने पण बऱ्याच निश्चिंत मनाने घरी गेले.

कोर्टाची तारीख लागली. सर्व कोर्टात हजर झाले. कोर्ट आल्यावर,

“अॅड. घोलप, तुमचा साक्षीदार आला आहे?” – जज

“हो युअर ऑनर.” – घोलप.

जाजसाहेबांनी फाइल उघडली, त्यात एक लिफाफा होता. तो त्यांनी वाचायला. म्हणाले,

“फॉरेन्सिक रीपोर्ट आले आहेत. दोन्ही सह्या मॅच होत आहेत असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. या बद्दल आपण नंतर बोलू. आत्ता अॅड. घोलप साक्षीदाराला  बोलवा आणि सुरू करा. या केस वर जास्त वेळ देता येणार नाहीये.” – जज

“रतनकुमार तुम्ही प्रशांतसाहेबांच्या ऑफिस मधे गेला होता?” – घोलप

“हो साहेब. दोनदा गेलो होतो. एकदा ड्राफ्ट ची अप्रूव्हल घेण्यासाठी आणि एकदा पैसे देण्या साठी.” – रतन कुमार. यातन कुमार

“किती पैसे दिले? आणि कोणाला दिले?” – घोलप.

“प्रशांत साहेबांना ५० लाख दिले.” – रतनकुमार.

“ठीक आहे. फिर्यादीचे वकील क्रॉस घेणार का?” – घोलप.

“रतन कुमार, तुम्ही प्रशांत साहेबांच्या ऑफिस मधे कधी गेला होता?” – निंबाळकर.

“२५ जुलै ला.” – रतन कुमार.

“पण रजिस्टर मधे तर २५ जून ची एंट्री आहे. यावर काय म्हणण आहे तुमचं?” – निंबाळकर.

रतनकुमार थोडा थांबला. त्याने अॅड घोलपांच्या कडे पाहिल, पण घोलप निर्विकार होते. रतन कुमार जरा गोंधळला. तो काहीच बोलला नाही नुसताच घोलप वकिलांकडे बघत राहिला.

“रतनकुमार, तुम्ही कोर्टात उभे आहात. जे काही सांगायचं आहे ते कोर्टाला. तेंव्हा त्यांच्याकडे बघून बोला. तुमच्या वकिलांकडे बघून नव्हे.” – निंबाळकर.

निंबाळकरांच्या स्वरात आता थोडा कोरडेपणा आला होता, ते लक्षात आल्यावर रतनकुमार अजूनच गोंधळला. थोडा घाबरला पण. तो म्हणाला,

“असू शकतं साहेब,” रतनकुमारला अर्धवट तोडून निंबाळकर म्हणाले,

“जे काही सांगायचं आहे ते कोर्टाला सांगा त्यांच्या कडे बघून बोला.” – निंबाळकर. “असू शकतं साहेब, माझा तारखे मधे गोंधळ झाला असेल शेवटी चार वर्ष झाली त्या गोष्टीला.” – रतन कुमार आता कोर्टा कडे बघून बोलला.  

“त्या वेळेस तुम्ही प्रशांतसाहेबांना ५० लाख कॅश नेऊन दिले.” – निंबाळकर.

“हो साहेब.” रतन कुमार.

कोणच्या नोटा होत्या? म्हणजे १००० च्या की ५०० च्या की १०० च्या.

“१००० च्या.” – रतन कुमार.

“ही कॅश तुम्ही कशी नेली? म्हणजे लिफाफ्यात, पिशवीत की ब्रीफकेस  मधे?”– निंबाळकर.

रतनकुमारच्या चेहऱ्यावर चल बिचल झाली आणि त्याने वळून घोलपांच्या कडे पाहिलं. “तिकडे कोर्टाकडे  बघून सांगा.” – निंबाळकरांनी आठवण करून दिली.

“लिफाफा असेल साहेब.” – रतन कुमार.

“चला ठीक आहे. आता मला सांगा तुमचं ऑफिस कुठे आहे?” – निंबाळकर.

“बोरिवलीला.” – रतन कुमार.

“प्रशांत साहेबांचं ऑफिस माहीमला आहे म्हणजे तुम्ही बोरिवलीहून  माहीमला लोकल ने गेला असाल.” – निंबाळकर.

“ऑब्जेक्शन. निंबाळकर लीडिंग प्रश्न विचारात आहेत.” – घोलप.

“यात लीडिंग काय आहे? बोरिवली ते माहीम असा प्रवास लोकलनेच  केल्या जातो. आम्ही पण तसंच करतो. सर्वच करतात.” – निंबाळकर.

“घोलप उगाच व्यत्यय आणू नका. निंबाळकर प्रोसिड.” – जज.

“रतनकुमार, जज साहेबांना प्रश्नाचं उत्तर द्या.” निंबाळकर.

“हो साहेब लोकलने गेलो होतो.” – रतनकुमार

“लोकलच्या एवढ्या प्रचंड गर्दीत ५० लाखांची कॅश असलेला लिफाफा नेताना तुम्हाला भीती नाही वाटली? लिफाफा फाटला असता तर?” – निंबाळकर.

आता रतनकुमारला काही सुचेना. तो तसाच उभा राहिला.

“हरकत नाही. तुम्ही प्रशांत साहेबांना कॅश दिली ती त्यांनी स्वत: मोजून घेतली का? मोजून झाल्यावर तुम्हाला पावती दिली का? त्यावर तुमच्या समोर हस्ताक्षर केले का?” – निंबाळकर.

“हो. साहेब.” – रतनकुमार.

“युअर ऑनर प्रतिपक्षांचे वकील सतत खाणा खुणा करून रतन कुमारला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी तसं करून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये.” – निंबाळकर.

“हे मी पण नोटिस केलं आहे. घोलप मर्यादा पाळा “ – जज.

“या कोर्ट रूम मधे प्रशांत साहेब आहेत का? – निंबाळकर.

रतनकुमार ने नजर फिरवली. तो प्रशांतला कधी भेटलाच नव्हता त्यामुळे त्याला ओळखता येईना.

“माहीत नाही साहेब.” – रतनकुमार.

“ज्या माणसाला तुम्ही ५० लाख दिलेत आणि दोनदा भेटलात त्याला ओळखत नाही? तुमच्या समोर ज्याने सही केली, त्या माणसाला तुम्ही ओळखत नाही? आश्चर्य आहे.” – निंबाळकर.

रतनकुमार काही बोलला नाही.

“तुम्ही साक्ष देण्यापूर्वी शपथ घेतली होती. खरं बोलीन, खोटं सांगणार नाही, आठवतंय न?” – निंबाळकर.

“हो.” रतनकुमार.

“तुमच्या माहिती साठी सांगतो, खोटी साक्ष दिलीत तर ७ वर्षांची जेल होऊ शकते. त्यामुळे जे सत्य आहे तेच सांगा. कोणाच्या दबावाखाली खोटं बोलू नका. त्रास तुम्हालाच होईल.” – निंबाळकर.

 आता रतनकुमार पुरता ढेपाळला. तो कोर्टाकडे वळून म्हणाला,

“साहेब मी प्रशांत साहेबांना कधीच भेटलो नाही. त्यांना पैसे पण दिले नाही मी फक्त ऑफिस मधे गेलो आणि आलो. माझ्यावर दया करा. मी काहीही गुन्हा केला नाही.”

क्रमश:......

दिलीप भिडे