Everything on Abol's mind - Part 12 in Marathi Love Stories by Amol Meshram books and stories PDF | अबोला मनातले सारे काही - भाग 12

Featured Books
Categories
Share

अबोला मनातले सारे काही - भाग 12

एक वर्ष झाल्याच्या नंतर सायली पळसगाव ला परत आली ती एकटीच आली आपल्या मुलीला घेऊन तीन महिने झाले तरी ती इथून गेलीच नाही एक दिवस ती  वहिनीला भेटली वहिनीने तिला विचारले सायली तू आता इथेच आहेस तू आता आपल्या घरी का गेलीस नाही सायलीने सांगितले वहिनी मी आता त्या माणसाकडे कधीच जाणार नाही वहिनी सायली सोबत बोलत असताना सचिनने बघितले आणि सचिनला खूप राग आला 

एकदा दुपारच्या वेळी गावातील शांत वातावरणामध्ये बौद्ध विहाराच्या समोर असलेल्या पारिजातकाच्या सावलीत सचिन एका लाकडी खोडावर शांत बसला होता नेमकी त्याच वेळी तिथून ती वहिनी पाणी भरण्यासाठी चालली होती वहिनीला पाहताच सचिनच्या मनात विचार आला आणि त्याने न अडखळता विचारले वहिनी तुमच्या घरी फ्रिजमध्ये थंड पाणी मिळेल का 

वहिनी थांबली आणि म्हणाली नाही रे सचिन फ्रिजमध्ये पाणी नाही आहे पण तुला थंडच हवे असेल तर सांग मी एक गडू भरून फ्रिजमध्ये थंड पाणी तुझ्यासाठी ठेवू का 

सचिनने चेहऱ्यावर हसू आणत तात्काळ म्हटले होय वहिनी ठेवा ना प्लीज 

वहिनीने ताबडतोब घरात जाऊन एक गाडीवर थंड पाणी आणले आणि पाणी थोडे गार झाल्यावर ती ते सचिन कडे घेऊन आली सचिनने पाण्याचा गडू हातात घेतला आणि पाणी पिताच तो गंभीर झाला तो वहिनीला म्हणाला वहिनी एक सांगू का तुम्ही एकतर त्या सायली सोबतच बोलायचे पूर्णपणे सोडून द्या नाहीतर मग माझ्यासोबत बोलणे बंद करा कारण वाईट वेळेत किंवा तब्येत बिघडल्यावर ती सायली तुम्हाला बघायला दवाखान्यात कधीही धावून येणार नाही त्या संकटात तुम्हाला मदत करायला मीच धावून येईल 

वहिनीला त्याचे बोलणे थोडे अनाकलनीच वाटले तिने आश्चर्याने विचारले का रे सचिन असे अचानक काय झाले तू असा का बोलतोस 

तेव्हा सचिनच्या डोळ्यात भूतकाळात घडलेला घटनाक्रम तरळला तो दुःख व्यक्त करत म्हणाला वहिनी जेव्हा तिला सातवा महिना चालू होता तेव्हा ती माझ्यासोबत फिरायला बाहेर आली होती दुर्दैवाने त्याच वेळी तिचा चुलत भाऊ आम्हाला एकत्र फिरताना बघितला त्यानंतर थोड्याच वेळात तिचा नवराही तिथे पोहोचला त्या कठीण प्रसंगातही सायली माझ्यासोबत यायला आणि माझ्यासोबतच राहायला पूर्णपणे तयार होते पण नंतर कोणास ठाऊक तिच्या भावाने तिला कसलीशी मोठी धमकी दिली असावी आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची भीती दाखवली असावी त्यामुळे सायली पूर्णपणे बदलली 

सचिन पुढे मनाला तिने पोलीस स्टेशन मध्ये सरळ हात वर केले आणि सर्वांसमोर असे भासवले की ती तिच्या नवऱ्यासोबतच खुश आहे तिने उलट माझ्यावरच बळजबरी केल्याचा आरोप लावला आणि माझ्यावर केस दाखल झाले एवढे दिवस मी गावात तुम्हाला कुठेच दिसत नव्हतो कारण मी त्या खोट्या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये अडकलो होतो माझ्या घरच्यांनी गावात कोणालाही खरे सांगितले नाही आणि सर्वांना असे सांगितले की सचिन बाहेरगावी हार्वेस्टर वर कामाला गेला आहे म्हणूनच आता मला तिचा खूप राग येतो आणि तिचे नाव ऐकले तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते 

बहिणीने सचिनचे हे सगळे दुःख शांतपणे ऐकून घेतले तिला सचिनची बाजू समजली तिने त्याला समजावताना म्हटले अरे सचिन तू उगाच जास्त ताण देऊ नकोस या जगात माणसाची खरी परीक्षा संकटात होते गाव आहे इथे सगळे भेटतीलच आणि सर्व गोष्टी चा निकाल वेळोवेळी लागेल तू आता शांत रहा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करणे सोडून टाक सर्व काही ठीक होईल 

वहिनीचे हे बोलणे ऐकून सचिनला थोडे माणसे समाधान मिळाले आणि तो शांत झाला 

काही वेळाने वहिनीच्या मनात विचार आला सचिन तर खोटं बोलत आहे सायली अशी करू शकत नाही तिने सचिनला म्हटले सचिन तुम्ही तर मला बोलू नको म्हणतात पण आहा गावात भेटाल डावात तेव्हा मग मी तुम्हाला सांगेन मग वहिनी तिथून निघून गेली